तिरन्हू बुद्ध लेणी : धम्म अध्ययन चारिका महिला दिन विशेष

भारताची संस्कृती हि मातृसत्ताक संस्कृती असून आपल्याला या संस्कृतीची पाळेमुळे या ऐतिहासिक वास्तू मधून मिळत असतात . या महाराष्ट्रात सातवाहन नावाचा एक राजवंश होवून गेला आहे आणि या सातवाहन राज्यात महिला शासन आपणास पाहायला मिळते. याच इतिहासाला आधारून लेणी संवर्धन चळवळीमध्ये महिला ह्या पुढाकार घेवून आपला धार्मिक तसाच सांस्कृतिक इतिहास जतन करण्यास पुढाकार घेत आहेत .

रविवार दिनांक ८ मार्च २०२० रोजी सकाळी ठीक १० :०० वाजता तिरन्हू अर्थात तिरश्मी बुद्ध लेणी नाशिक या लेणीवर ABCPR महिला लेणी संवर्धक टीम च्या नेतृत्वाखाली धम्म अध्ययन चारिका संपन्न झाली असून याचे विशेष महत्वाची बाब
संपूर्ण कार्यशाळा हि महिलांच्या नेतृत्वात होते महिलांचे लेण्यावर मार्गदर्शन होते महिलांकडून लेणीचे शिलालेख अध्ययन असेल महिलांकडून लेण्यावर धम्माच्या विषयीचे तत्वज्ञान दिले गेले
एकूण च संपूर्ण कार्यक्रम हा महिलांच्या टीम च्या माध्यमातून झाले सदर कार्यक्रमास ABCPR लेणी संवर्धक टीम च्या महाराष्ट्रातील सात विभागातील लेणी संवर्धक उपस्थित होते
अनेक जन आपल्या कुटुंबासोबत हजर राहून मातृसत्ताक इतिहासाला जिवंत करण्यासाठी काम करण्याचे ठरवले
इतिहास पुन्हा जिवंत करून नव्या इतिहासाला गवसणी घालण्यासाठी

संपर्क
ABCPR लेणी संवर्धक टीम

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat