पांडव लेणी म्हणून का बौद्ध लेणी ला पांडव लेणी का म्हटले जाते ?…..

पांडव लेणी म्हणून का बौद्ध लेणी ला पांडव का म्हटले जाते
चला इतिहासच पाहू  या
प्राचीन काळात लेणी निर्माण  कार्य कधी सुरु झाले हा महत्वाचा  भाग आहे  तर  भारतात पहिली लेणी  कोरण्याचे कार्य हे सम्राट अशोकाने केले सम्राट अशोकाने  इसवी सन  पूर्व  तिसऱ्या शतकात बिहार पासून जेहनाबाद  मध्ये असलेले बराबर टेकडी या टेकडी वर  पहिली लेणी बांधली याच कालावधी मध्ये महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजांनी महाराष्ट्रात भाजे पितळखोरा कोंढाने कान्हेरी लेणी बांधण्यास सुरुवात केली या अर्थात लेणी कोणी बांधली यांचे शिलालेख आपणास उपलब्ध होतात
या महत्वाच्या माहिती मध्ये पांडवांचे महाराष्ट्रात काय योगदान होते का आणि पांडव  हे पात्र आहे कि ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे पाहण्यासाठी आपल्याला महाभारत हे महाकाव्य पाहावे लागते मुळात महाभारत हा एक  काव्य ग्रंथ आहे जो महर्षी व्यास यांनी लिहिला आहे चला या महाभारताचा इतिहास पाहू या
महाभारत  इतिहास :
     आज उपलब्ध असलेला महाभारत हा ग्रंथ इ, सन २०० ते इ, सन ५०० यामध्ये लिहिला असल्याची माहिती भेटते महाभारत ग्रंथात एकूण ९६२२४ श्लोक आहेत पण त्याचे हे आजचे स्वरूप हे मुल स्वरूप नाही महाभारत ग्रंथ व १८ पुराने व्यास यांनी लिहिली शुद्र व स्त्रियांच्या कल्याणाकरिता ती लिहिली असे सांगितले जाते
ज्यावेळी व्यासांनी मूळ महाभारत लिहल त्यावेळी त्यांच्या श्लोकांची संख्या हि केवळ ८८००  इतकी होती आणि त्याचे नाव हे जय संहिता होते { उदाहरण पहा महाभारत आदिपर्व श्लोक ६२-२२ }
पुढे जनमेनजय राजाच्या महायज्ञाच्या वेळी वैश्यपायन ऋषींच्या संपादनाखाली जय संहीताचे वाचन करण्यात आले तेथे अनेक ऋषींनी आपल्या कथा रचून जय संहितेच्या नावावर  कथन करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा ८८०० च्या श्लोकांचे वाढती संख्या झाली २४००० साली आणि जय संहीताचे नाव बदलून त्याचे नाव भारत संहिता ठेवण्यात आले
वेळोवेळी  यज्ञाच्या वेळी भारत संहिता चे वाचन होत गेले त्यात निरंतर अनेक ऋषींनी आपल्या श्लोकांची भर देत गेले आणी तिसर्यावेळी उसश्रवा सौति नावाच्या ऋषीच्या संपादनाखाली भारत संहिता च्या रचना कथन केल्या गेल्या आणि तेव्हा  त्या श्लोकांची सांख्य हि २४००० वरून ९६२२४ इतकी वाढली आणि मग त्याचे नाव बदलून महाभारत करण्यात आले एकंदरीत काय तर व्यास यांनी लिहिलेला जय संहिता वाढवून इतका मोठा केला कि त्याचे अवाढव्य महाभारत ग्रंथात रुपांतर करण्यात आले यासाठी आपल्याला महाभारत आदिपर्व श्लोक १-३०० मध्ये पाहावे  लागेल पहा काय आहे ते
” महत्ताद भारवत्ताच्य महाभारत मुच्चते ।। माभारात आदिपर्व १-३००
आता आपण पहिले तर  व्यासांच्या जय संहिता ग्रंथात अनेक ऋषींनी ऋचा घुसडल्या मुले मुल ग्रंथाच्या अकरा पटीने आपल्या रचना भरून महाभारत बनवला 
आता गीतेचा एकही श्लोक कृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितलेला नाही हा गीता मागाहून महाभारतात घुसडली आहे प्रथम आपण सर्वच  ग्रंथांचे निर्माण कधी झाले आहे ते  पाहूया
वैदिक आर्य धर्माचे सर्व धर्मग्रंथ हे सिंधू संस्कृती नंतरचे 
सिंधू संकृती इंद्राने नष्ट केली याचा पुरावा ऋग्वेद ऋचा ६ सर्ग २७ श्लोक ५  मध्ये सापडतो काही लोक म्हणतात कि पुराने  हि संकृती नष्ट झाली पण प्रश्न असा उद्भवतो कि जर सिंधू संस्कृती पुराने नष्ट झाली तर ऋग्वेदात असे का लिहिले कि सिंधू संस्कृती इंद्राने नष्ट केली असा उल्लेख का यावा म्हणजे वेद म्हणजे निव्वळ गप्पा मारण्याचे साधन आहे का ? तसे असो वा  नसो पण ऋग्वेदात सिंधू संस्कृती नष्ट केल्याचा उल्लेख येन म्हणजे , ऋग्वेद हा सिंधू संस्कृती नष्ट झाल्यावर लिहिण्यात आला आहे यात शंका नाही .
 सन १९२२ साली सर जॉन  मार्शल यांच्या नेतृत्वाखाली सिंधू संस्कृती मधील ७०० स्थळांचे उत्खनन करण्यात आले. त्यात लहान गाव याबरोबर मोहेंदजोडो व हडप्पा हि शहरे देखील उत्खननात सापडली. शास्त्री यांच्या अहवालानुसार व कार्बन च्या सहाय्याने सिंधू संस्कृती हि इसवी सन पूर्व २५०० ते इ. स. पुर्व ३००० मध्ये अस्तित्वात आली होती हे सिद्ध होते हा काळ एकूण ४५०० ते ५००० वर्षामधील आहे म्हणूनच ऋग्वेदाचा काळ हा इ. स. पूर्व १५०० म्हणजे ३५०० वर्षापूर्वीचा नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल
यावरून वैदिक आर्य धर्मीय ऋग्वेदादि ग्रंथांचा काळ हा लाख वर्षाचा सांगतात याला कोणताच सत्य आधार नाही असा अर्थ होतो आता  जय संहिता निर्मितीचा काल हा साधारण इ. स. २ ते ५ वे शतक असल्याचे गृहीत धरले आहे व्यासाला महाभारताचा लेखक मानले जाते . ज्यामध्ये गीतेचा देखील समावेश आहे वास्तविक गीता   हा काही वेगळा ग्रंथ नाही हा महाभारताचा एक भाग आहे हे जो मागाहून त्यात घुसडला आहे म्हणजे महाभारत भीष्मपर्व मधील अध्याय २५  ते ४२ म्हणजे एकूण १८ अध्यायांचा भाग म्हणजे गीता होय गीता महाभारताच्या २५ व्या अध्यायापासून सुरु होते . तिचा २२ ,२३ व २४ या अध्यायांशी काहीच संबंध जुळत नाही . तसेच महाभारताच्या ४३ या अध्यायाचा गीतेच्या १८ व्या अध्यायाशी देखील काहीच संबंध जुळत नाही . डॉ  सर्व पल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती व गीतेचे गाढे अभ्यासक त्यांनी आपल्या भगवत गीता या ग्रंथातील लेखकाची भूमीका  यामध्ये लिहतात मला गीतेचा रचयता कोण आहे य़ाचा पत्ताच लागत नाही . आता गीता हा स्वतंत्र ग्रंथ असल्याचा आभास निर्मान केला गेला  तसेच गीता  नायक कृष्णाचे इथे खूप महात्म वर्णन करण्यात आले आहे गीताकारणाने गीतेची निर्मिती वैदिक आर्य धर्माला आलेली ग्लानी  करण्यासाठी करण्यात आले . आता धर्माला ग्लानी केव्हा येते जेव्हा इतर कोणत्या धर्माच्या अस्तित्वामुळे त्याच्या प्रसारामुले धर्माला ग्लानी आली आहे हे मान्य करावे लागते नाही तर ईश्वर प्रणीत धर्माला ग्लानी का यावी ईश्वराच्या व्यवस्थेत कुणी ढवळाढवळ केली म्हणून ग्लानी आली असावी असे अनेक प्रश्न निर्माण होतात याचा पुरावा खुद्द गीतेतच  आहे श्लोक ३-३५ मध्ये हा आहे यात कृष्ण म्हणतो कि  आपला धर्म कितीही गुणहीन असला तरी आपल्याच धर्माचे पालन करावे दुसर्याचा धर्म कितीही उत्तम असला तरी त्याचे पालन करू नये तो भयावह आहे दुसरे  धर्म अस्तित्वात  येण्याचे कारण वर्णव्यवस्था व त्याद्वारे विशिष्ट वर्गाला देण्यात येणारी अमानवीय वागणूक हेच होय . नाही तर कृष्णाला दुसऱ्याचा धर्म भयावह म्हण्याची पाळी आलीच नसती .
याचा अर्थ गीता अर्थात जी कृष्णाने पांडव अर्जुनाला रणांगणावर सांगितले असे म्हटले जाते तर आम्ही ती गीता कुण्या अर्धवट लेखकाने महाभारतात गुसडली आहे हे सिद्ध  करता येते कारण इथे कृष्ण व्याकरण छंद यांच्या चुका करताना आपणास दिसतो याचा अर्थ तो व्याकरणात अडाणी आहे का हा होतो 
पुढे या पांडवांचा इतिहास महाभारताशिवाय सापडत नाही याचा अर्थ महाभारतात निर्माण केलेले पात्र हे पांडव काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा सबंध नाही प्राचीन काळात  यांचे ग्रन्थ जर का जुने असतील तर त्याला कोणत्या लिपी मध्ये लीपिबद्ध केले याची माहिती मात्र दिली जात नाही  महाभारत हे काव्यसंग्रह आहे यात अनेक ऋषींनी आपले श्लोक सामील करून महाकाव्य  केले हे नाकारता येत नाही महाभारत हे पांडव व कौरव यांचे युद्ध याबाबत ची माहिती आहे यात कुठे हि  पांडवानी लेणी कोरली आहेत असा उल्लेख सापडत नाही 
महाराष्ट्रात असंख्य लेण्यात असणारे शिलालेख आहेत पण एका हि शिलालेखात पांडवांचे नाव सापडत नाही 
महाराष्ट्रात सातवाहन हा राजवंश आढळतो आणि त्याचे अधिकारी वर्ग आपणास आढळतात पण पांडव नावाचे कोणते हि व्यक्ती आपणास या शिलालेखात सापडत नाही यावरून हि लेणी पांडवानी कोरलेली नाही  हे सिद्ध पांडवानी लेणी कोरलेली नाही हे सिद्ध झाले तरी  मग यांना पांडव लेणी का म्हणतात याचा आपल्याला पुरावा भेटणे आवश्यक आहे वैदिक ग्रन्थ हे बौद्ध ग्रंथानंतर चे आहेत याचे अनेक पुरावे आहेत कारण वैदिकांचे एक हि विद्यापीठ आपणास या देशात आढळत नाही हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे पण बौद्ध धम्माची अनेक विद्यापीठे शिलालेख आढळून येतात यावरून वैदिक ग्रंथ हे बौद्ध धम्माच्या नंतर चेच आहेत आणि त्यातले हे पांडव आहेत 
पांडव हे कोणी ऐतिहासिक  व्यक्तिमत्व नसून काल्पनिक पौराणिक कथेतील पात्र आहे ज्याला ठोस पुरावा नाही त्याला भौगोलिक इतिहास नाही त्यामुळे पांडव हा विषय इथे संपतो पण लेण्यातील पांडव हि काय भानगड आहे याचा इतिहास शोधणे आवश्यक आहे आणि यासाठी आपण प्रथम शिलालेख अभ्यासणार आहोत 


मुंबई मधील कान्हेरी या ठिकाणी लेणी क्रमांक ३ या ठिकाणी चैत्यागृहाच्या सुरुवातीला असणाऱ्या स्तंभावर उजव्या स्तंभावर हा शिलालेख लिहिलेला आहे शिलालेख पाहू या 
धम्मलीपी देवनागरी लीप्यांतर :  ञो गो त म पु त स सा मि सि रि य ञ स सो त कं  णि स्स स  व छ रे गि म्ह प खे पं च मे ५ दि व से द त मि त स 

वा णी ज के  हि उ त्ह  का ले नु य उ प ने हि गा ….. खा ति ये हि भा तू हि ग ज से ने न ग ज मि ते न क प ला यि  चे ति य घ र आ च रि या न नि का य स भा दा य नि या नं प रि ग हे प ति ठा पि त मा ता पि तू नं अ भ ति ता नं पु जा य कु टू बि नि न बा लि का नं स व …. त स भा गि ने या स नि क य  स ना त व ग स च अ ग प टि अ सि य स व्व स ता नं च हि त सु खा य हे तू ए थ च न व क मि क का प व जि तो थे रा भ द त अ च ला भ द त ग ह ल भ द त वि ज य मि ता भ द त बो धि क भ दं त ध म पा ला उ पा स को च  ने ग मो अ ला द स पु तो अ प रे  णु को स मा ता पि ता आ च रि या न थे रा न भ द त से उं ला नं सि से नं उ प र खि त न भ द त बो धि के न क त से ल व ढ कि हि ना य क मि क से हि क ढि च कि हि म हा क ट क हि ख द र कि न च मि  ठि के नं 
प्राकृत भाषा : रञो गोतम पुतस सामि सिरियञस सोतकंणिस्स सवछरे गिम्ह पखे पंचमे ५ दिवसे दतमितस 
वाणीजकेहि उत्हकाले नुय उपनेहि गा ….. खातियेहि भातूहि गजसेनेन गजमितेन कपलायि  चेतियघर आचरियान निकायस भादाय नियानं परिगहे पतिठापित मातापितूनं अभतितानं पुजाय कुटूबिनिन बालिकानं सव …. तस भागिनेयास निकयस नातवगस च अगपटि असिय सव्वसतानं च हितसुखाय हेतू एथच नवकमिकका पवजितो थेरा भदत अचला भदत गहल भदत विजय मिता भदत बोधिक भदंत धमपाला उपासको च  नेगमो अलादस पुतो अपरेणुकोस मातापिता आचरियान थेरान भदत सेउंलानं सिसेनं उपरखितन भदत बोधिकेन कत सेलवढकिहि नायकमिकसेहि कढिचकिहि महाकटकहि खदरकिन च मिठिकेनं 

मराठी भाषांतर :  राजा गौतमीपुत्र सामी सिरी यज्ञ सातकर्णी याचे राज्य ग्रीष्म ऋतूतील पंचम पक्ष पाचवा दिवस दत्तामित्र आजचे पाकिस्तान चे निवासी बंधू क्षत्रिय गजसेन व गजमित्र यांनी मातापित्यांच्या नाव लौकिकास व आपली पत्नी पुत्र कन्या भगिनी समस्त नातेवाईक यांच्या हित सुखार्थ ह्या पूज्य चैत्यगृहाची निर्मिती करुन भद्रायनी पंथीय आचार्य व भिक्षु संघासाठी प्रतिष्ठापना केली चैत्यगृहाच्या निर्मितीसाठी स्थापित थेर भदंत अचल यांचे शिष्य भदंत गहल भदंत विजयमित्र भदंत बोधिक व भदंत धम्मपाल हे सर्व नवकम्मीक म्हणजे तंत्रज्ञ होते बुद्ध उपासक व्यापारी आल्हाद याचे पुत्र अपरेणुक हे संयोजक होते आचार्य थेर भदंत सिंहल यांचे शिष्य भदंत बोधिक ह्या उपरक्षित यांनी चैत्यगृहाच्या निर्मिती सौंदर्यपूर्ण केली नागकमिक कटीचक्र महाकटक हे तीन शिल्पकार होते आणि स्तूप व शिल्पना चकाकी करणारे कुशल कर्मी हे स्कंदरक नामक शिल्पकर्मी होते

हा शिलालेख देण्याचे एकमेव कारण या शिलालेखात लेणी कोरणाऱ्या लोकांची नावे आलेलि आहेत अन्यथा महाराष्ट्रातील लेण्या ह्या  शिल्पकारांची नावे सापडत नाहीत म्हणून हा शिलालेख आता आपण पांडव लेण्याबाबत बोलू या 
आपल्याकडे असणाऱ्या पाली भाषेचे डिक्शनरी मध्ये सर्च करा पिवळ्या रंगाला काय म्हणतात तर उत्तर मिळते  पंडू
   पिवळसर देखील म्हणतात पुरावा म्हणून खालील पाली इंग्लिश भाषांतर पहा 
paṇḍu: [adj.] pale-yellow; yellowish.
सदर गोष्ट पाहताना आजचा दाखला घेता आजच्या इंजिनियर लोकांच्या ड्रेसकोड अथवा डोक्यावरील टोपी हि पिवळ्या रंगाची आपणास पाहायला मिळते आणि वरील शिलालेखात इंजिनियर या शब्दासाठी प्राकृत  शब्द आलेला आहे तो म्हणजे नवकम्मिक  पांडव लेणी म्हणण्यामागे काय कारण असावे याचा जेव्हा विचार करत खोलात जाऊन याची माहिती घेतल्यावर लक्षात येते ते म्हणजे ह्या लोकांच्या  कपड्यांचा रंग हा पिवळ्या रंगाचा असे  म्हणजे पिवळसर रंगाचे चीवर हे या भिक्षु ना होते आता हे सारे जन भिक्षु आहेत हे आपल्याला स्पष्ट कल्पना मिळते काम करणारे लोक मध्ये शिल्पकार कोण आहेत  त्यांची माहिती मिळते चकचकीत पणा आणण्यासाठी कोणती व्यक्ती आहे याची माहिती मिळते जसे आज आपण प्रत्येक कामाची वाटणी करून दिलेलि असते तसेच त्या काळात हि आपणास ते पाहायला मिळते 
या नवकम्मिक लोकांचा वस्त्राचा रंग पिवळसर असल्याने लोक त्यावेळी यांना पंडू लोक म्हणत असतात पिवळ्या रंगाचे वस्त्र घालणारे लोक म्हणजे पंडू लोक त्यावेळी संपूर्ण जनता हि  या लेण्यात काम करणाऱ्या लोकांना सहकार्य करत असे आणि  अश्यावेळी या लोक म्हणत असावीत कि पंडू लोक लेण्या कोरत आहेत त्या काळी  म्हणायची पद्धत कदाचित अशी असेल कि पंडू लोकस कतं  लेणं  याचा पुढे जावून पंडू लोकांनी लेण्या कोरल्या असा झाला असावा आणि कालांतराने याचा अर्थ बदलून हि पांडवानी लेणी कोरली असा वाक्य प्रयोग प्रचलित झाला आणि हा पांडव शब्द म्हणजे पंडू शब्द होय जो पाली मधील शब्द आहे आजचा पिवळा रंग हा पाली मध्ये पंडू म्हणून म्हटला जातो हे याचे प्रमाण आहे कि पंडू चे पांडव झाले आणि आज लोकांनी पांडव लेणी म्हणून म्हणण्यास सुरुवात केली 
याचा लोकांनी गैरसमज हि करून घेतला कि पांडवांचे अज्ञातवासात असताना पांडव महाराष्ट्रात आले आणि त्यांनी लेण्या कोरल्या आणि त्यातून लोकांच्या मनात पांडव लेणी हि संकल्पना त्या पंडू लेणी ला जोडून घेतली असावी असा एक अर्थ हि निघतो 
महाराष्ट्रात जेव्हा लेण्यातील शिलालेख पाहतो आपण तेव्हा आपणास हि लेणी कोणी  कोरली  याची माहिती मिळते 
पांडवानी लेणी कोरली हा जो अपभ्रंश या महाराष्ट्रात झालेला आहे कारण महाराष्ट्राची लोकभाषा पाली होती याचे पुरावे आपणास लेण्यातून मिळतात प्राकृत पाली हि लोकभाषा असून कालांतराने महाराष्ट्र हा मराठी मध्ये बोलू लागला परन्तु महाराष्ट्राची लोकभाषा हि प्राचीन प्राकृत पाली आहे हे आपणास बघायला मिळते 

जुन्या काळातील हि ऐतिहासिक देन कुणी तरी लिहिलेल्या महाकाव्यातील काल्पनिक पात्रांनी कोरलि असे कोणी म्हणत असेल  तर अश्या लोकांच्या चेहऱ्यावर हे शिलालेख फेकून मारले पाहिजेत कि इथे घाम  घालून रक्ताचे पाणी करून  असंख्य पिढ्या या ठिकाणी निष्ठेने काम करत होत्या त्यांच्या श्रमाचे श्रेय घेण्यासाठी केलेला हा मुर्खपणा नव्हे तर काय 
ज्यांनी आपल्या दान पारमिता पूर्ण करत धम्माचे आचरण करून धम्मासाठी अनमोल वारसा धम्म दान दिला त्या लोकांची दान पारमिता हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा होय 
महाराष्ट्रातील च काय या जम्बुद्विपातील महान बौद्ध सम्राटांच्या इतिहासाचे श्रेय कुण्या कवीने लिहलेल्या ग्रंथात असणाऱ्या काल्पनिक पात्रांना देणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा आहे  हा हे सिद्ध होते 

असंख्य शिलालेख हे याचे पुरावे आहेत लेणी कोरणाऱ्या लोकांचे धम्म दांचे काही शिलालेख पाहू या 

हा शिलालेख आहे कुडा बौद्ध लेणी तळा तालुका रायगड जिल्हा या जिल्ह्यातील कुडे गावातील ही लेणी असून ह्या लेणीमधील १४ लेण्यांधील खिडकीवर हा शिलालेख कोरलेला आहे साधारण याचा कालखंड हा इसवी सन पहिल्या शतकातील असून
शिलालेख पुढील प्रमाणे
क र हा क ड क स लो ह वा णि यि य स म हि क स दे य ध म ले णमराठी भाषांतर करहाडकस म्हणजे आजचे कऱ्हाड येथील लोहार अर्थात लोखंडाचा व्यापारी महिक याने लेण्यांचे धम्म दान दिलेमहत्वाचे म्हणजे
महाराष्ट्रातील कऱ्हाड चा उल्लेख हजारो वर्षांपूर्वी लेण्यात कोरलेला असून त्या लेण्यात कऱ्हाड मधील लोखंडाचा व्यापारी महिक याने लेण्यांसाठी धम्म दान दिलेले आहे
केवळ दान नसून ते धम्मासाठी दान दिलेले आहे हा महत्वाचा भाग आहे की लोक धम्माची शिकवण आचरणात आणत होते
आता पूर्वी जाती व्यवस्था नव्हती कश्या पद्ध्तीने जातींची निर्मिती झाली हे आपल्याला इथे लक्षात येते
एका लेण्यात असणाऱ्या शिलालेखात जातीचा उल्लेख नाही लोकांच्या व्यवसाय वरून ती व्यक्ती कोण आहे हे सांगितले आहे पण नंतर च्या काळात जाती ची निर्मिती ही व्यवसाय करणाऱ्या लोकांवरून केली हा पुरावा आहे कार्ला बौद्ध लेणीतील  गौतमीपुत्र सातकर्णी चा शिलालेख (आनपयति) मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवानपवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालाहारे उतरे मगेगामे करजकेभिखुहले  ददम  एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि  एतस चसगामस करजकान भिखुहलपरिहार वितराम  अपावेस अ . . . . पारिहारिक च  एतेहि न परिहारेहि परिहरह  एतस चस गाम करजकेभिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत . . . . छतो विजयठसातारे दतो ठे. . .  पटिका सव वा प  दिव सिवखदगुतेन कटा .शिलालेखाचे  भाषांतर: 

मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की वलुरक येथील लेण्यांत वास्तव करणाऱ्या भिक्षूंच्या संघाला महासंघिकांना निर्वाहाकरिता मामाड आहारातील (विभागातील) उत्तरेच्या मार्गावरील करजक गावात भिक्षुहल (भिक्षूंकरिता जमीन) दिले आहे. म्हणून तुम्ही त्यांना त्या जमिनीचा ताबा द्यावा.
या करजक गावातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत. या जमिनीत कोणी (अधिकाऱ्यांनी) प्रवेश करू नये. त्यात हस्तक्षेप करू नये. तश्याच (अन्य) सवलती दिल्या आहेत. या (सर्व) सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गांव आणि भिक्षुहलसंबंधित सवलतींची तुम्ही नोंद करून ठेवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती विजयी शिबिरात राजाने दिली आहे. तिची पट्टीका संवत्सर १८ वर्षापक्ष ४ दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.मामाड किंवा मामाल (आजचा मावळ तालुका) हा मावळ प्रांतासंदर्भातील सर्वात जुना पुरावा आहे. त्याचबरोबर लेखात उल्लेखलेले वलुरक म्हणजे आताचे कार्ले गांव. ह्या कार्ले गावापासून ७-८ किमीवर करजगाव आहे. तेच लेखातील करजक गाव. ह्या लेखाचा सुरुवातीचा भाग नष्ट झाल्यामुळे ही आज्ञा कोणत्या राजाने आणि कुठून दिली हे इतर शिलालेखांवरून ठरवता येते. ह्या लेखात उल्लेख आलेले करजक गांव पूर्वीच उसभदत्ताने (ऋषभदत्त) याने वलूरक लेण्यांमध्ये वर्षावास काळात राहणाऱ्या भिक्षूंच्या निर्वाहाकरीता दिल्याचा शिलालेख कार्ले येथे आहे. त्या शिलालेखात करजक गावाचा उल्लेख करजिक असा केलेला आहे.अशाच पद्धतीचा विजयी शिबिरातून गौतमीपुत्र सातकर्णीने आज्ञा दिलेला शिलालेख लेख नाशिक येथील लेणी क्र. ३ मध्ये आहे. कार्ले येथील आज्ञासुध्दा विजयी शिबिरातूनच दिलेली आहे. आधी ऋषभदत्ताने महासंघिकेला दिलेले दान विजयी राजाने पुन्हा महासंघिकेला दिले आहे. तसेच नाशिक लेखात संवत्सर १८ आहे, कार्ले येथील लेखाचे संवत्सर सुध्दा १८ आहे. नाशिक येथे संवत्सर १८ वर्षापक्ष २ दिवस १ या दिवशी त्रिरश्मी येथील भिक्षुंना अजकालकिय शेत दान दिल्यानंतर दोन आठवड्यांनी गौतमीपुत्र सातकर्णीने पुणे आणि आजूबाजूचा परिसर क्षत्रापांकडून जिंकून घेतल्यानंतर कार्ले येथील महासंघिय पंथाच्या भिक्षूंना हे करजक गांव दिले असल्याचे हा शिलालेख आहे इथे वर्षापक्ष ४ थे  आहे म्हणजे  २ च आठवड्याने याचा अध्यादेश दिलेला आहे कुडा लेणी मधील हा शिलालेख लेखाचे वाचन
अयितिलु उपासकस बम्हनस भयाय भयिलाय
बम्हनिय चेतीय घरो देय धम्मयाचे भाषांतर आहे
अयितिलु येथील ब्राह्मण उपासक याची पत्नी भयीला या ब्राह्मण पत्नींने चैत्यगृहाची धम्मदान दिले आहेइथे बौद्ध उपासक एक ब्राह्मण आहे ज्याच्या पत्नीने बुद्धस्वरूप चैत्यगृह धम्मासाठी दान दिलेले आहे 

भाजे  लेण्यात १७ नंबरच्या विहारातील शिलालेखात नादसव नावाच्या नागाने विहारातील खोली दान केल्याचा उल्लेख सापडतो सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या दागोबावर छोटे छोटे शिलालेख आहेत त्यातील एकावर आदरणीय स्थविर अंपिनाक  यांचा स्तूप असल्याचा उल्लेख आहे  कुडा येथील पाच नंबरच्या लेण्यातील शिलालेखात नागनिका हे नाव आलेले आहे लेणी २४ मध्ये नाग गृहस्थी आणि व्यापारी यांचे दान केलेली आहेत व्यापारी वसूलनाक यांनी दान केलेली लेणी २५  व २६ क्रमांकाची आहे तर २७ क्रमांकाची लेणी हि वाहमीत याची बायको पुसनाक याची आई सिव दता  हिने लेणी साठी दान केले आहे बेडसा लेण्यात नासिक च्या सेठ आनंदाचा मुलगा पुष्पनाक  याचे दान आहे तर  चैत्यगृहाच्या पाण्याच्या टाकी च्या वर खडकांवर महारथींनी महादेवी समदिनीका हिचे आहेआणि हि महाभोजाची मुलगी आणि अपदेवनाकाची बायको आहे कार्ले येथील लेण्यातील सुरुवातीचे शिलालेख  आहेत त्यातील मोठ्या चैत्यगृहात सिंह स्तंभावर गोतीचा मुलगा महारथी अग्निमित्रनाक  याने सिंहस्तंभ दान केल्याचा लेख आहे शेलारवाडी येथील शिलालेखात घेनुकाकट येथे  राहणारा कुणबी शेतकरी उसभनाक याची बायको सियागुणनिक आणि तिचा गृहस्थी मुलगा नंद यांनी  लेण्याला दान केले आहे  जुन्नर येथील पहिला लेख बराचसा नष्ट झाला असून  शेवटचा भाग फक्त थंभूतीनाक असा आहे शिवनेरी येथील चैत्यगृहात वीर सेन नाक नावाच्या मुख्य गृहपती आणि सचोटीच्या व्यापाऱ्याने सर्व जगाच्या  कल्याणासाठी व सुखासाठी दान केले आहे असा उल्लेख आहे 

अश्या पद्धतीने असंख्य शिलालेख आहेत जे हि लेणी कोणी  कोरली याचे ऐतिहासिक पुरावे सांगत आज हि उभ्या आहेत अश्यावेळी पांडवानी लेणी कोरली असे कोण म्हणत असेल  तर त्यांना त्यामागचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे पांडवानी लेणी कोरली हि अफवा पसरवून हिंदू लोकांनी आपली दैवते लेण्यात बसवली अतिक्रमण केले आणि आज ते आपणास पाहायला  मिळते पांडवानी लेण्या कोरल्या याची जनमानसात माहिती पसरवली आणि लोकांना त्यांच्या इतिहापासुन दूर केले चला आता खरा इतिहास सांगू त्यांना त्यांचे खरे पूर्वज सांगू या चला बौद्धमय भारत लोकांना सांगू या आपला इतिहास सागू या 
पांडव लेण्या कश्या आहेत हे समजून सांगताना पुराव्यानिशी माहिती सांगू या

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat