धम्मसिरी वर धम्मलिपी अध्यापक म्हणून विवेक गमरे याची नियुक्ती

जयभीम नमो बुद्धाय
धम्मसिरी या ऐतिहासिक अश्या विषयावरील शिक्षण देणाऱ्या शैक्षिणिक संस्थेमध्ये ABCPR लेणी संवर्धक टीम चे लेणी संवर्धक आयु विवेक गमरे यांची धम्मसिरी च्या धम्मलिपी अध्ययन या वर्गावर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी त्यांचे खूप सारे अभिनंदन व पुढील कार्यास त्यांना खूप खूप खूप सदिच्छा


लेणी संवर्धक आयु. विवेक गमरे यांनी धम्मसिरी मधून धम्मलिपी चे शिक्षण घेतले असून आज ते याच धम्मसिरी वर शिक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
ABCPR लेणी संवर्धक टीम कडून त्यांना खूप साऱ्या सदिच्छा
अशीच उतरोत्तर प्रगती करत राहावी आणि आपला संस्कृतीक इतिहास आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने समजावून त्यांना घडवण्यास सहकार्य करत जावे


ABCPR लेणी संवर्धक टीम ने आजवर केलेल्या उपक्रमातील हा एक महत्वाचा उप्रकम आहे कि भारतीय बौद्ध समाजाला त्याचा इतिहास त्याला स्वतःला वाचता आला पाहिजे तरच तो त्याच्या पिढीला सांगू शकेल
आज धम्मलिपी सहज वाचता येवू शकते एवढे काम झालेले आहे अश्यावेळी नवनवीन लोक तयार होत असून आज अभिमानाने सांगावे वाटते कि बाबासाहेबांच्या चळवळीचे त्या समता रथाचे आम्ही नक्कीच वारू होवून काम करू आणि तशीच अपेक्षा आपल्याकडून आहे सर्वजण या कामात सहकार्य करावे हीच अपेक्षा तरी नवीन नियुक्त झालेल्या धम्मलिपी अध्यापक आयु विवेक गमरे यांना खूप साऱ्या सदिच्छा व त्यांचे अभिनंदन
जयभीम नमो बुद्धाय 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat