किल्ले विसापूर येथील शिलालेख

☸️#एक_पाऊल_धाडसाचे#प्राचिन_वारसा_जपण्याचे💥#दुर्गकिल्ला_विसापुर_प्राचिन_ऐतिहासिक_माहीती#पुराव्यांच्या_आधाराने_जनमानसात_सादर…” जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास घडवु शकत नाही.”- विश्वरत्न बोध्दिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्वपुर्ण संदेशातुन बोध घेत आम्ही आमचा इतिहास शोधण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करुन आपल्या ध्येयाप्रती जागृत राहुन इतिहास घडवण्यासाठी तत्पर झालो आहोत.सर्वप्रथम किल्याची थोडक्यात माहिती घेऊया …विसापुर किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला समुद्रसपाटी पासून १०८२ मीटर उंच असलेला.तथा पायथ्यापासुनची उंची १५०मीटर असुन किल्याच्या माथ्याचा परिघ हा ४.२कि.मी(२.६ मैल)असा महाराष्ट्रातील किल्यांमधिल.सर्वात जास्त विस्तार असलेला किल्ला.मध्ययुगात किल्याचे नाव ‘ईसागड’असे आढळले. तसेच शिवकालीन पत्रव्यवहारात ‘सबळगड’असे ही नाव आढळुन येते.मध्ययुगीन विभागीय रचनेत विसापुर किल्ला बारा मावळ मधिल पनव मावळ विभागात हा किल्ला गणला जातो.विश्वरत्न महामानव आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला मागच्या वर्षी ABCPR टीम चैत्यभूमी येथे शिवाजी पार्क वर प्राचीन बौद्ध वारसा जनजागृती चे कार्यक्रम घेवून अभिवादन करण्यास आलेल्या प्रत्येक माणसाला हा धम्म वारसा समजावा म्हणून पाच आणि सहा डिसेंबर दोन दिवस संपूर्ण टीम काम करत होती. या वर्षी कोरोना चे संकट असताना चैत्यभूमी वर गर्दी होवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने आवाहन केले होते आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी चैत्यभूमी वर गर्दी होणार नाही यासाठी यावर्षी चे नियोजन रद्द करण्यात आले.यावर्षी बाबासाहेब यांना अभिवादन करायचे पण ते वेगळ्या हेतूने. बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे आमचा संकल्प दिवस आहे या दिवशी आम्ही संकल्प करतो आणि तो पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण करतो.दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी ABCPR लेणी संवर्धक टीम चे आणि धम्मसिरि इन्स्टिट्यूट चे मेंबर अश्याच एका संशोधन कार्यास सकाळी पहाटे घरातून निघाले. ABCPR टीम चे लेणी संवर्धक आयु. अश्विनकुमार धसवाडीकर , संदीप पाटील सर, सुदर्शन सावळे सर,रवींद्र सावंत,मुकेश जाधव सर, आणि लेणी संवर्धक शामराव सोमकुवर यांचा मुलगा वैभव सोमकुवर असे आम्ही सहा जन सकाळी संसोधनास निघालो आणि मग पुढे संशोधन कार्य सुरु झाले. संशोधनासाठी यावेळी निवडला गेला होता विसापूर किल्लाकिल्ले विसापूर हा प्राचीन बोर घाट या व्यापारी मार्गाचा संरक्षक किल्ला. आणि पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक मावळ प्रांतातील ऐतिसिक बुद्ध लेण्यांचे संरक्षक किल्ले म्हणून देखील या किल्ल्याकडे पाहिले जाते. प्राचीन काळात लोहगड आणि विसापूर यांच्या डोंगराला मारकुट डोंगर म्हटले जायचे बेडसे लेणी मध्ये मारकुट चा उल्लेख आलेला आहे. कार्ला अर्थात वलरूक लेणी मधील शिलालेखात मावळ प्रांताचा इतिहास आपणास पाहायला मिळतो. कार्ला लेणी मधील शिलालेख पुढील प्रमाणे ज्यामध्ये मावळ प्रांताचा उल्लेख सापडतो.

💥 (आनपयति) मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवानपवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालाहारे उतरे मगेगामे करजकेभिखुहले ददम एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि एतस चसगामस करजकान भिखुहलपरिहार वितराम अपावेस अ . . . . पारिहारिक च एतेहि न परिहारेहि परिहरह एतस चस गाम करजकेभिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत . . . . छतो विजयठसातारे दतो ठे. . . पटिका सववा प दिव सिवखदगुतेन कटा .शिलालेखाचे भाषांतर:👇मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की वलुरक येथील लेण्यांत वास्तव करणाऱ्या भिक्षूंच्या संघाला महासंघिकांना निर्वाहाकरिता मामाड आहारातील (विभागातील) उत्तरेच्या मार्गावरील करजक गावात भिक्षुहल (भिक्षूंकरिता जमीन) दिले आहे. म्हणून तुम्ही त्यांना त्या जमिनीचा ताबा द्यावा.या करजक गावातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत. या जमिनीत कोणी (अधिकाऱ्यांनी) प्रवेश करू नये. त्यात हस्तक्षेप करू नये. तश्याच (अन्य) सवलती दिल्या आहेत. या (सर्व) सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गांव आणि भिक्षुहलसंबंधित सवलतींची तुम्ही नोंद करून ठेवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती विजयी शिबिरात राजाने दिली आहे. तिची पट्टीका संवत्सर १८ वर्षापक्ष ४ दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.अशाच पद्धतीचा विजयी शिबिरातून गौतमीपुत्र सातकर्णीने आज्ञा दिलेला शिलालेख लेख नाशिक येथील लेणी क्र. ३ मध्ये आहे. कार्ले येथील आज्ञासुध्दा विजयी शिबिरातूनच दिलेली आहे. आधी ऋषभदत्ताने महासंघिकेला दिलेले दान विजयी राजाने पुन्हा महासंघिकेला दिले आहे. तसेच नाशिक लेखात संवत्सर १८ आहे, कार्ले येथील लेखाचे संवत्सर सुध्दा १८ आहे. नाशिक येथे संवत्सर १८ वर्षापक्ष २ दिवस १ या दिवशी त्रिरश्मी येथील भिक्षुंना अजकालकिय शेत दान दिल्यानंतर दोन आठवड्यांनी गौतमीपुत्र सातकर्णीने पुणे आणि आजूबाजूचा परिसर क्षत्रापांकडून जिंकून घेतल्यानंतर कार्ले येथील महासंघिय पंथाच्या भिक्षूंना हे करजक गांव दिले असल्याचे हा शिलालेख आहे इथे वर्षापक्ष ४ थे आहे म्हणजे २ च आठवड्याने याचा अध्यादेश दिलेला आहेया शिलालेखात आपणास मावळ प्रांताचा आणि अधिकारी याचे हि नाव पाहायला मिळतेविसापूर किल्ल्याचा हि प्राचीन इतिहास आपणास समजून येतो येथील शिलालेखामुळे या ठिकाणी कुणाचे आधिपत्य होते याची माहिती मिळते साधारण इसवी सन दुसरे शतक या काळातील शिलालेख असल्याने त्याची माहिती आपणास स्पष्ट होते भाजे लेणी मधील शिलालेखात हि मिळणाऱ्या माहितीनुसार विसापूर येथील राज्यकर्त्यांची नावे आपणास माहिती होतात.विसापूर किल्ल्याचा प्राचीन इतिहास पाहता या किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यावर त्रिरत्न आणि धम्मचक्र कोरलेले आहे याचा आधार घेतला असता हा कालखंड हीनयान काळातील समजला जातो. विसापूर किल्ला हा हीनयान काळात निर्माण केला असल्याचे निदर्शनास येते अर्थात भाजे लेणी च्या नंतर च या किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा किल्ल्याचे आयुर्मान हे इसवी सन पूर्व काळात जाते. याच काळात आपणास पाहायला मिळते कि महाराष्ट्रात सातवाहन यांचे साम्राज्य असलेले आपणास पाहायला मिळते. याच सातवाहनांच्या काळात हा किल्ला निर्माण झाला असावा असे अनुमान निघेत तर शिलालेखांच्या आधारावर यावर ठाम होतो कि हा किल्ला सातवाहन ,काळात निर्माण झाला आहे.विसापूर किल्ल्यावर एकूण ८३ पाण्याच्या टाक्या असून भव्य असे क्षेत्रफळ असणारा महाराष्ट्रातील भव्य किल्ला आहे. या किल्ल्यावर प्राचीन विहार आणि पाण्याची टाकी पाहायला मिळतात. विसापूर किल्ल्यावर शोभना गोखले रमाकांत पाळंदे यांनी देखील लिखाण केलेले आहे संशोधन केलेले आहे बाळासाहेब तिकोने यांनी देखील यावर भाष्य केले आहे. अनेक जणांच्या संसोधानाचे दाखले आपणास पाहायला मिळतात तरी देखील हि सारी संपदा लपून राहण्यामागे नेमका हेतू काय असावा.वरील संशोधन हे जास्त जुने नाही गेल्या ३० चाळीस वर्षाच्या आत मधील संशोधन असे लुप्त होते याची मात्र कमाल आहे. अनेक अभ्यासक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून टाकतात आणि पुढे जातात. पण शिलालेख हा विश्वसनीय पुरावा आहे जो इतिहासाला त्याच्या काळात घेवून जातो. आणि असे शिलालेख शासन दुर्लक्षित करतो हे खेदजनक आहे.भारतीय पुरात्तव विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा कामचुकार पणा भारताचा इतिहास च लुप्त करण्याचे काम करत आहे. जाणून घेवून या विसापूर किल्ल्यावरील शिलालेख एकूण सहा शिलालेखांचा उल्लेख केला गेलाय परंतु मोठ्या कष्टाने पाच शिलालेख शोधण्यास यश आले आहे. आणि त्याच पाच शिलालेखांचा तपशील पुढील प्रमाणे…

💥#किल्ले_विसापूर_येथील_शिलालेख👇

💥 शिलालेख क्रमांक १👇 प्राकृत भाषा : म हा र ठि स को सि कि पु त स …. कायवि ह्नु द त स ले ख क स मु गु द पा लि त स पो ढि
🔴प्राकृत:महारठिस कोसकिपुतस …. कायविह्नुदतस लेखकस मुगुदपालितस पोढि
🔵 मराठी भाषांतर : महारथी कोसकी चा मुलगा विष्णुदत्त याचा कारकून मृगुदपालीत याने पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले. ⚫English : Mrigudpalit, the clerk of Maharathi Kosikiputra Vishnudutta, donated a water tank.

💥 शिलालेख क्रमांक २ :👇सि धं रा ञो वा सि ठि पु त स पु ळू मा वि सस व छ रे २५ पं च विं से …को सि कि पु त स वि न्हु द त स … पो ढि
🔴प्राकृत: सिधं राञो वासिठिपुतस पुळूमाविससवछरे २५ पंचविंसे …कोसिकिपुतस विन्हूदतस … पोढि
🔵 मराठी भाषांतर :धम्माला अनुसरून राजा वाशिष्टीपुत्र पुळूमावी याच्या राज्यवर्ष २५ असताना महारथी कोसकी चा मुलगा विष्णुदत्त याने पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले आहे.
🟣 English : According to the Dhamma, during the reign of King Vashishtiputra Pulumavi in ​​the year 25, Kosikiputra Vishnu Dutta donated a water tank.

💥 शिलालेख क्रमांक ३:👇 म हा र ठि स को सि कि पु त सवि ह्नु द त स पो ढि
🔴प्राकृत: महारठिस कोसकिपुतस विह्नुदतस पोढि
🔵 मराठी भाषांतर : महारथी कोसकी चा मुलगा विष्णुदत्त याने पाण्याच्या टाक्याचे धम्मंदान दिले. 🟣 English : Maharathi Koskiputra Vishnudutta donated a water tank.

💥 शिलालेख क्रमांक ४ :👇 म हा र ठि स को सि कि पु त सवि न्हु द त स पो ढि
🔴प्राकृत: महारठिस कोसकिपुतस विन्हुदतस पोढि
🔵 मराठी भाषांतर : महारथी कोसकी चा मुलगा विष्णुदत्त याने पाण्याच्या टाक्याचे धम्मंदान दिले.
🟣 English : Maharathi Koskiputra Vishnudutta donated a water tank.

💥शिलालेख क्रमांक ५ :या शिलालेखात केवळ दोन च शब्द वाचण्यास शिल्ल्ख राहिलेले आहेत. म हा र ठिस ………. पो ढि वरील दोन अक्षर पाहता व वरील शिलालेख पाहता या हि ठिकाणी जे पाण्याचे टाके दान दिलेले आहे ते महारथी कोसकी चा मुलगा विष्णुदत्त यानेच दिलेले आहे. असा निष्कर्ष निघतो. वरील शिलालेखांच्या अध्ययनावरून एक गोष्ट लक्षात येते कि हा किल्ला साधारण पणे गौतमी पुत्र सातकर्णी याचा मुलगा वाशिष्टीपुत्र सातकर्णी याच्या कालखंडात वापरत असलेला पाहायला मिळतो कारण या ठिकाणी असलेल्या लेण्यांचे अवशेष तसेच येथील पाण्याच्या टाक्याचे अवशेष पाहता किल्ल्याचा इतिहास पूर्णपणे बदलून जातो. आजवर किल्ले म्हटला कि त्याचा इतिहास हा मध्ययुगीन असलेला आपणास पाहायला मिळतो. परंतु या कोरीव शिलालेखामुळे याचा इतिहास च पूर्णपणे बदलून जातो अश्याच इतिहासाचा दाखला आपणास या शिलालेखांच्या माध्यमातून मिळतो. या शिलालेखात आलेला उल्लेख आहा महारथी असून हा सातवाहनराज्यातील एक अधिकारी पद आहे जे प्राचीन व्यापारी मार्गावर असणाऱ्या विभागात पाहायला मिळते शिवाय महाभोज हे पद देखील आपणास बंदरावर आधिपत्य असलेले पाहायला मिळते एकूणच हा इतिहास अतिशय महत्वाचा आहे हे सर्व लोकांना माहिती होत जाईल.#विश्वरत्न_महामानव#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांना#त्यांच्या_महापरिनिर्वाण_दिनी#एक_संशोधनात्मक_अभिवादन#ABCPR_टीम तथा #धम्मसिरी_तर्फे_देण्यात_आले.

💥#लेणी_संवर्धनातुन#धम्म_संवर्धन💥

☸️#ABCPR_TEAM☸️# DHAMMASIRI

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat