गौरव लेणी संवर्धकांचा

प्राचीन इतिहासाला पुनर्जीवित करण्यासाठी पुढच्या पिढीला आपला इतिहास समजावा यासाठी काम करत असताना लेणी संवर्धनातून धम्मसंवर्धन ह्या कामासाठी आपले योगदान देवून काम करणाऱ्या व तरुणांना आपल्या शांत स्वभावाने मार्गदर्शन करणाऱ्या जेष्ठ लेणी संवर्धकांचा गौरव हा झालाच पाहिजे.

ABCPR लेणी संवर्धन टीम चे जेष्ठ लेणी संवर्धक व २२ प्रतिज्ञा अभियानाचे प्रचारक आयु. विनोद वासेकर सर यांचा आज जन्म दिवस आहे. बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी ओळखून चळवळीत एक प्रामाणिक पणे काम करणाऱ्या जेष्ठ लेणी संवर्धक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते बाबासाहेबांच्या विचारांशी एक राहून समाजाला आपला इतिहास कळवा बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीज्ञांचे महत्व कळावे म्हणून आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ कोणती हि अडचण कारणे न सांगता देणारे आमचे जेष्ठ लेणी संवर्धक विनोद वासेकर सर यांना त्यांच्या जन्म दिनी मंगल कामना

लेणी संवर्धन कार्यात सहभागी झाल्यावर डोंगर दऱ्या तून कड्या कपारी मधून रस्ता काढत आपला वारसा जो हजारो वर्षे होवून हि बौद्ध धम्माचा इतिहास सांगतोय आणि तो जनमानसात गेला पाहिजे म्हणून वयाचे भान न ठेवता तरुणांसोबत तरुण होणारे व योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून तरुणांना हि त्यांची जबाबदारी सांगणारे शांत स्वभावाने आपली एक वेगळी ओळख सांगणारे लेणी संवर्धक म्हणून आज महाराष्ट्रातील अनेक लेण्यांवर काम करत ABCPR लेणी संवर्धक म्हणून ते काम करत आहेत हे काम करत असताना तनमन धनाने ते ह्या कामाला सहकार्य करत आहे अश्या लेणी संवर्धकांचा ABCPR लेणी संवर्धक टीम कडून त्यांचा गौरव केला जात आहे.

लेणी संवर्धनासाठी कायम टीम सोबत राहून टीम च्या प्रत्येक उपक्रमात उपस्थित राहून तसेच टीम च्या प्रत्येक कृतीशील उपक्रमात सहभागी होवून आपले योगदान देणाऱ्या लेणी संवर्धक विनोद सर यांना जन्म दिनाच्या मंगलमय सदिच्छा

🎂🌺🍁💐🌷
चक्रवर्ती सम्राटअशोक कालीन धम्मलिपीमधुन सदिच्छा भेट
🍃🍂🍁💐🌹

🍂 बुध्दांच्या करुणामय मार्गाने तुमचे… 🍃कल्याण हो …
🍂मंगलहो…. 🍃भला हो…

ABCPR
( प्राचिन बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “गौरव लेणी संवर्धकांचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat