स्त्रियांच्या उन्नतीचा सुवर्णकाळ : बौद्ध संस्कृती

प्राचीन काळात बौद्ध संस्कृती ने एक प्रगत इतिहासाला जन्म दिलाय हे सत्य नाकारता येत नाही. इतिहासाच्या पानापानात हा सत्यतेचा पुरावा लपलेला आपणास पाहायला मिळतो. प्राचीन भारतात स्त्रियांची परिस्थिती काय होती ? आज स्त्रियांची परिस्थिती काय आहे? मध्यकालीन स्त्रियांची परिस्थिती काय होती? या साऱ्याची मांडणी केली तर स्त्रियांच्या उन्नतीचा सुवर्णकाळ हा एकाच संस्कृतीत पाहायला मिळतो ती म्हणजे बौद्ध संस्कृती. प्राचीन भारतात स्त्री राज्य सत्ताक पद्धत असलेली आपणास पाहायला मिळते. आणि संस्कृती हि मातृसत्ताक होती. इतिहासाने स्त्रियांचा हा सुवर्ण इतिहास का लिहिला नाही हे तपासण्याची जास्त गरज आज भारताला आहे. जर का स्त्रियांच्या उन्नतीचा कालखंड काढला जाईल तेव्हा तेव्हा बौद्ध संस्कृती ची पाळेमुळे या देशात पुन्हा बाहेर येवू लागतील या भीतीने स्त्रियांचा उन्नतीचा सुवर्णकाळखंड सांगितला जात नाही. स्त्रियांच्या शोषणाचा इतिहास च सांगितला जातो . पण स्त्रियांच्या उन्नतीचा शासनाचा इतिहास मात्र लपवला जातो धर्माच्या नावाखाली. पण बौद्ध संस्कृतीने मात्र स्त्रियांचा इतिहास लपवला नाही तर जगजाहीर केला थेरीगाथा ७३ अर्हत थेरी ज्यांनी बुद्धाच्या सम्यक मार्गावर चालत निर्वाण पद प्राप्त केले अश्या स्त्रियांचा इतिहास. जगातील अशी कोणती संस्कृती नाही जिने स्त्रीला हि मुक्तीचा मार्ग निवडून मुक्त होता येते स्त्रीला हि एका धर्माचे तत्वज्ञान सांगण्याचा अधिकार मिळतो असे अधिकार दिलेले नाही. भारतात नव्हे संपूर्ण जगात स्त्री उच्च स्थान देणारी संस्कृती म्हणून बौद्ध संस्कृती आपणास पाहायला मिळते. बुद्धापासून इतिहास पहिला तर जगात पहिल्यांदा एक स्त्री भिक्खुनी झालेली आहे व जगात पहिला महिला संन्याशी संघ या विश्वात पाहायला मिळाला तो बुद्धांच्या करुणामय संदेशामुळे. बुद्धाने स्वतःच्या आई ला पहिली भिक्खुनी बनवून पहिली अर्हत भिक्खुनी म्हणून निर्वाण पदाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. बौद्ध संस्कृतीने दिलेला हा मातृसत्ताक जीवनप्रणाली चा भाग पुढे बौद्ध शासन काळात मोठी महत्वाची भूमिका निभावू लागला. अश्याच वैभव संपन्न स्त्रियांच्या इतिहासाचे ऐतिहासिक दाखले ते हि हजारो वर्षापासून या काळ्या पाषाणावर अंकित आहेत अश्या सर्व शिलालेखातून प्राचीन स्त्रियांचे वैभवशाली जीवन अभ्यासू या ?

आपला लेख मराठी असल्याने महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यकर्त्या स्त्री चा इतिहास पाहू या तो हि पुराव्यासहित

सातवाहन सम्राट प्रथम सातकर्णी यांची पत्नी नागनिका राणी : इतिहासाने ज्यांच्यावर अन्याय केला तो राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश सातवाहन या सातवाहन सम्राटांच्या राज्य शासन काळात बलाढ्य स्त्री राज्यकर्त्या होवून गेलेल्या आहेत त्यातील पहिली आणि महाराष्ट्राची पहिली सम्राज्ञी नागनिका राणी . नागनिका हि महारथी त्रनकयिर याची मुलगी व सम्राट सिमुक सातवाहन याची सून तर प्रथम सातकर्णी याची पत्नी असून इसवी पूर्व दुसऱ्या शतकात नागनिका हिचा नागकुळात उदय झालेला असून नागवंशी घराण्यात च तिचा विवाह देखील झालेला आहे. निका हे पद स्त्रियांसाठी लावले जात होते कारण बहुतांश महिलांच्या नावापाठी निका हे शब्द लावले जायचे खास करून नागवंशी महिलांच्या नावामागे. नागनिका हिच्या नावाचा प्रदीर्घ असा शिलालेख नाणेघाट म्हणजे जुन्नर कडे जाताना नाणेघाट हि महत्वाची ऐतिहासिक लेणी आपणास पाहायला मिळतात या ठिकाणी या नागनिका राणी च्या परिवाराचे शिल्पपट होते आज ते अस्तित्वात नसले तरी धम्मलिपि मधील त्यांची नावे मात्र अंकित आहेत. नागनिका हिचा शिलालेख अतिशय प्रदीर्घ आहे. या शिलालेखातून सातवाहन वंशाची व नागनिका हिच्या साम्राज्याची वैभव संपन्नता आपणास पाहायला मिळते. लाखो कार्षापनाचे दान दिल्याचे उल्लेख ह्याच शिलालेखात आपणास पाहायला मिळतात. अंगियकुलवर्धन कललायनामक महास्त्रीची कन्या, अत्यंत श्रेष्ठ अशा सातकर्णीची भार्या आणि वेदिश्री राजाची व श्रीमान सती याची माता होती असे या शिलालेखात उल्लेख केलेला आहे. तसेच सातकर्णी याच्यासोबत केलेले अनेक यज्ञ व्रत अश्या विविध व्रतांची आणि यज्ञाची नावे या शिलालेखात लिहिली गेली आहेत. हे वाचून अनेक इतिहास अभ्यासकांनी सातवाहन हा कसा वैदिक वंश आहे आहे पटवून देण्यासाठी जीवाची पराकाष्टा केलेली आपणास पाहायला मिळते. सातवाहनाच्या हयातीत सातवाहन यांनी वैदिकांसाठी कोणते हि मंदिर बांधल्याचे पुरावे नाहीत किंवा लेणी बांधल्याचे पुरावे नाहीत. बौद्ध धम्मासाठी मात्र राजाश्रय स्पष्ट जाणवतो एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुद्ध लेण्यांची श्रुंखला बांधणारा राजवंश ,म्हणून च त्यांच्याकडे पाहिले जाते. नागनिका राणी च्या नंतर सातवाहन घराण्यात गौतमी बलश्री हि एक बलाढ्य राज्यकर्ती म्हणून उदयास आली नाशिक येथील त्रीरश्मी बुद्ध लेणी वर तिचा नातू वाशिष्टीपुत्र पुळूमावी याने लिहिलेल्या लेखातून गौतमी बलश्री हिच्या कर्तुत्वाची माहिती मिळते. आपल्या आजीच्या स्मरणार्थ देवी लेणे म्हणून भिक्खुणा धम्म दान देण्यात आले आहे. सातवाहन काळात च दिलेल्या दान शिलालेखातून बौद्ध कालीन स्त्रियांचा इतिहास पाहू या.

प्राचीन काळात दान देण्यामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने आपणास पाहायला मिळतो. स्त्री पुरुष समानता केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात आपणास पाहायला मिळते.

प्राचीन कुडा बुद्ध लेणी येथील लेणी क्रमांक १ व ६ या लेणी मध्ये असलेल्या शिलालेखात काय लिहिलेले आहे सविस्तर पहा
“महाभोजिय साडगेरीय विजयाय पुतस महाभोजस मंदवस खंदपालितस लेखकस सुलसदत पुतस उतरता पुतस सिवभूतीस सह भयाय नंडाय देय धम लेणं”
मराठी भाषांतर : महाभोजी साडगेरी विजया हिचा मुलगा महाभोज मंदाव खंदपाळीत याचा कारकून आणि सुळसदत्त आणि उत्तरदत्ता यांचा मुलगा सिवभूती याने त्याच्या पत्नी नंदा हिच्यासोबत लेण्यांचे धम्मदान दिले आहे.
शिलालेखात आलेला उल्लेख हा महाभोजी विजया हिचा आहे. हि महाभोजी आहे अर्थात एक स्त्री अधिकारी आहे. यामध्ये महिले नंतर तिचा मुलगा महाभोज आहे या काळात स्त्री एक अधिकारी असून तिच्या नावाचा उल्लेख शिलालेखात स्पष्ट आहेतच पण ज्याने दान दिला आहे त्याच्या आई चे व पत्नी चे नाव देखील या शिलालेखात स्पष्ट पाहायला मिळते.

Royal women at kuda cave

लेणी क्रमांक सहा मध्ये असलेला शिलालेखात हि जवळपास उल्लेख सारखेच आहेत फक्त शिवभूती याचा कनिष्ट भावू शिवम आणि त्याची पत्नी विजया यांनी दान दिल्याचा उल्लेख आहेच शिवाय त्यांची मुले आणि मुली यांनी देखील दान दिल्याचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतो.

शेलारवाडी बुद्ध लेणी या ऐतिहासिक प्राचीन बुद्ध लेणी मध्ये असलेला शिलालेख
” धेणुकाकडे वाथवस हलकियस कुडूबिकस उसभणकस कुडूबिनिय सियगुतनिकाय देय धम लेणं सह पुतेण नदगहपतिना सहो”
मराठी भाषांतर: डहाणू येथील शेतकरी कुणबी ऋषभनाक याची पत्नी कुणबीण श्रीयगुप्तनिका हिने आपला मुलगा गृहपती नंद याच्या सोबत लेण्यांचे धम्मदान दिले.
सदर लेखात ह्या महिलने लेण्यांचे धम्म दान दिलेले आहे. लेण्याचे धम्मदान देण्याची क्षमता स्त्रियामध्ये होती अर्थात त्या आर्थिक सबल असल्या खेरीज ते शक्य नाही आणि त्यांच्याकडे सत्ता असल्याशिवाय हि शक्य नाही. शिवाय हि शेतकरी महिला असून व्यापारी असल्याचे शिलालेखात उल्लेख येतो तिचा मुलगा गृहपती आहे अर्थात व्यापाऱ्यांचा प्रमुख आहे. शेतकरी असून ते सधन व्यापारी असल्याचे उल्लेख आपणास या ठिकाणी पाहायला मिळतो. आज शेतकरी आत्महत्या करतो प्राचीन काळातील शेतकरी आत्महत्या नाही तर जगाच्या बाजारपेठेत जावून व्यवसाय उद्योगधंदा करत होता आपल्या शेती मालाचा हे स्पष्ट या ठिकाणी जाणवते. एकूण च शेलारवाडी येथील हा शिलालेख शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे. त्याच प्रकारे आत चैत्यगृहात असलेला शिलालेख हा “स्थविर भदंत सिहान यांची शिष्या प्रवज्जित भिक्खुनी घपरा हिच्या मुलीने सर्व भिक्खूकुल आचार्य यांच्यासह बुद्ध आणि संघासाठी हे चैत्यगृह आईवडिलांच्या स्मरणार्थ समर्पित केले आहे”. या शिलालेखात हि आपणास पाहायला मिळते कि दान देणारी मुलगी आहे अर्थात स्त्री आहे स्त्रियांचा हा प्रगत कालखंड जगाच्या इतिहासात कुठे हि पाहायला मिळत नाही याचे हे एक सुंदर उदाहरण आहे.

जुन्नर येथील मानमोडी डोंगरावर अंबा अंबिका लेणीच्या सुरुवातीच्या विहाराच्या अंगणात पाण्याच्या टाक्याच्या सुरुवातीला उजव्या भिंतीवर असलेला हा शिलालेख इसवी सन पहिल्या शतकातील आहेत. आजपासून दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेला हा लेख आहे.
” कुमिय दुहुतुय सुलसाय देय धम पोढी”
मराठी भाषांतर : कुमिय हिची मुलगी सुलसा हिने पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले आहे.
हजारो वर्षापूर्वी महिला किती सक्षम होत्या याचे उत्तम उदाहरण आहे. आणि एवढे स्वातंत्र्य स्त्री साठी केवळ आणि केवळ बौद्ध संस्कृती मध्ये पाहायला मिळते. ते हि अश्या ऐतिहासिक पुराव्यानिशी

Kanheri cave no 3 big chaitygruh

कान्हेरी लेणी मधील लेणी क्रमांक ७५ मधील शिलालेख बाहेरील व्हरांडा च्या डाव्या भिंती वर पाण्याच्या टाक्यावर लिहिलेला आहे शिलालेख जवळपास नष्ट होत आलेला आहे तरी त्याचे स्कॅनिंग झालेले असल्याने आज त्याचे लिप्यांतर करणे सोपे आहे.
सिधं उपासकस कलिअणस नदणपुतस
गहपतिस सेठिस अचलस घरिणि
लवनिकाय सपरिवारस देय धम लेणं
पाणियपोढी न्हाण पोढी कालिवान अबालिकस
निवासण लेणस अखयनिवि काहापणाणि
सतणि तिणि अखयनिवि भिखूसघस देय धम
सवाण तिणि .. ढि.. मिय.. ग पा चि
वरिक हि पोढी देय धम चि
वरिक चातुदिस भिखूसघ मातापितुना
पुञथ सवसतहित सुघथ’

मराठी भाषांतर : कल्याण येथील श्रेष्टी उपासक अचल याची पत्नी लवणीका हिने सर्व परिवाराच्या कल्याणासाठी लेण्याचे , पाण्याच्या टाक्याचे व अंघोळीच्या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले आहे. व कल्याण येथील अंबालिका विहारात राहणाऱ्या भिक्खू च्या चिवरासाठी ३०० कार्षापणाचे कायमस्वरुपी धम्मदान आई वडिलांच्या पुण्यप्राप्तीसाठी आणि सर्व जीवांच्या हितासाठी चारी देशिलेला चारिका करणाऱ्या भिक्खू संघाच्या चिवरासाठी धम्म दान दिले आहे.
सदर शिलालेखात दान देणारी एक महिला असून ती एक व्यापारी असलेल्या उपासक अचल याची पत्नी आहे. धम्मदानाचे स्वरूप पाहून एक गोष्ट लक्षात येऊ शकते कि हि महिला किती सधन आणि सक्षम आहे तिने ३०० कार्षापणाची कायमस्वरूपाची दान दिलेले आहे. भिक्खुंच्या चिवरासाठी दिलेले दान आहे वास्तवात पाहता एक गोष्ट लक्षात येईल ३५ कार्षापण म्हणजे १ सोन्याचे नाणे यावरून अंदाज काढू शकतो सोन्याची किंमत आज काय आहे यावरून आज त्या ३०० कार्षापणाची किंमत आपण समजू शकतो किती असेल लाखो रुपयांचे आजच्या चलनात धम्मदान दिलेले आहे. आणि लेणी पाण्याचे टाके आणि अंघोळीच्या पाण्याचे टाके असे एकूण आर्थिक बजेट काढला गेला तर करोडो रुपयांचे धम्मदान आजच्या चलनात या महिलेने दिलेले आहे म्हणजे करोडो रुपये धम्मदान देण्याची क्षमता त्या काळातील महिलांची होती एवढे वैभव संपन्न इतिहासाची मात्र दखल घेतली जात नाही हि शोकांतिका आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथे प्राचीन कोळ बुद्ध लेण्यात असलेला शिलालेख
“…उपासकस दुहुतूय धमसिरिय सिवदतस बितीयकाय लेणं देय धम”
मराठी भाषांतर : उपासकाची मुलगी आणि शिवदत्त याची पत्नी धम्मसिरी हिने लेण्यांचे धम्मदान दिले आहे.
महिला किती सक्षम होत्या ह्याची अनेक उदाहरणे आपणास या लेण्यामधून मिळतात. यामधील हि काही उदाहरणे पाहता एक गोष्ट लक्षात येते कि जागतिक महिला दिनाला खरे अभिवादन कुणाला करायचे असेल तर ते तथागत बुद्धाला ज्याने स्त्रीला मुक्तीचा मार्ग दिला .

Stylish quean at Kanheri cave


चक्रवर्ती सम्राट अशोक यांची स्वतःची मुलगी भिक्खू संघात सामील होऊन धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अंगावर चीवर घेऊन सिलोन मध्ये जाऊन धम्माचा प्रचार करून तिथल्या लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग देण्याचे कार्य केले अशी भिक्खुणी संघमित्रा भारताला माहित नाही हि एक शोकांतिका आहे. सम्राट अशोक यांच्या राज्य शासनात स्त्रियाध्यक्ष महापात्रा चे अधिकरी पद पाहायला मिळते. हा महिलांना दिलेला मोठा सन्मान आहे आणि कर्तुत्वाला दिलेली संधी
बौद्ध संस्कृती ने महिलांच्या उन्नतीचा सर्वात मोठा पल्ला गाठलेला होता म्हणून च या युगाला महिलांच्या उन्नतीचा सुवर्णकाळ मानला जातो. इतिहासात आज मात्र तो कुठे लुप्त झाला आहे.
महाराष्ट्रात असो वा महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या प्रत्येक बौद्ध वास्तू वर सापडलेले शिलालेख हे स्त्रियांच्या उन्नतीचे ऐतिहासिक दाखले आहेत. सांचीच्या महास्तूपावर असलेले शिलालेख मग सामान्य महिला असो वा भिक्खुणी असो वा व्यापारी सर्वांच्या दानाचा उल्लेख पाहायला मिळतो भारुत च्या स्तूपावर देखील असंख्य महिलांनि दिलेल्या दानाचे उल्लेख आपणास वाचायला मिळतात तसेच अमरावती सन्नती च्या स्तुपावर देखील असंख्य महिलांच्या नावाचे उल्लेख वाचायला मिळतात एवढे ऐतिहासिक पुरावे जगातील कोणत्याच संस्कृतीला ठाम पणे देता येत नाही हे केवळ आणि केवळ बौद्ध संस्कृतीचा इतिहास च पुरावे देऊ शकतो.
महिलांचा हा सुवर्ण इतिहास समजून महिलांनी पावले पुढे टाकली पाहिजे. आज महिलांना त्यांच्या पूर्वजांची माहिती मिळाली तर आज महिलांच्या विकासात वाढ नक्की होईल जिथे महिला विकसित तोच देश विकसित होतो हे त्रिकालाबाधित सत्य हा आपला इतिहास आपणास सांगत असतो.

Karla cave Women statue


बौद्ध संस्कृतीच्या इतिहासाची पाले मुळे समजून घेण्यासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम ला नक्की जॉईन करा
टीम च्या कामात आपले योगदान अवश्य द्या
हा धम्म वारसा म्हणजे एक प्रगत संस्कृतीची ओळख आहे ती नष्ट होणार नाही यासाठी पुढे या
आणि लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन करण्यासाठी आपला इतिहास जपण्यासाठी
एक पाऊल धाडसाचे बौद्ध वारसा जपण्याचे नक्की टाकू या
ABCPR TEAM


Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat