गौरव लेणी संवर्धकांचा

लेणी संवर्धन म्हटले कि स्वाभाविक मेहनती शिवाय दुसरे काहीच नाही. लेणी संवर्धन करताना अनेक लोक सहभाग घेत असतात पण तो एका दिवसा पुरताच असतो पण अखंड पणे लेणी संवर्धन कामात ज्यांनी तन ,मन आणि धनाने उतरून काम करत आहेत अशी माणसे दुर्मिळ असतात. धम्म चळवळ म्हटली कि त्याग हा आलाच आणि आम्हाला अभिमान वाटतो कि लेणी संवर्धक म्हणून प्रत्येक लेणी संवर्धक हा आपल्या आरामाचा दिवस आराम न करता लेणी च्या संवर्धनासाठी धम्म घरोघर नेण्यासाठी काम करत आहे.

आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत सामजिक कार्यात हि आपले योगदान देत धम्म कार्याला गती देणाऱ्या व्यक्तीमत्वाची खरी गरज आहे. हे काम करत असताना कोणता स्वार्थ न पाहता काम करणारी माणसे सध्याच्या युगात सापडणे कठीण अश्यावेळी लेणी संवर्धक टीम मध्ये काम करणाऱ्या अश्याच एका लेणी संवर्धकाची खास त्यांच्याच जन्मदिनी ओळख करून घेवू या कोणता हि स्वार्थ न पाहता कोणता हि मान सन्मान पद प्रतिष्ठा याचा स्वार्थ न ठेवता हे कार्य पुढे चालू राहिले पाहिजे म्हणून आपले योगदान देणारे ABCPR लेणी संवर्धक टीम चे लेणी संवर्धक उपासक आयु. स्वप्निल कळंबे सर यांचा आज जन्म दिवस त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या सदिच्छा

आज अश्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिन आहे जे कोकणातील नवतरुणांना चळवळीत सक्रियपणे सहभागी करत बाबासाहेबांच्या घराण्याबरोबर कसे निष्ठावान राहीले पाहिजे याचे धडे देणारे तथा मुंबई ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यात सक्रिय असे एक शांत संय्यमी व्यक्तिमत्त्व नेहमी लेणी संवर्धन कार्यात हिरारीने सहभागी असणारे आमचे धम्मबंधु लेणी संवर्धक आयु.स्वप्निल कळंबे सरांना ABCPR TEAM तथा DHAMMASIRI तर्फे जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा🎂🏵️🌹💐🌺

☸️ बुध्दांच्या करुणामय धम्ममार्गाने
🍂 मंगल हो🍃
🍃 कल्याण हो🍂
🍂 भला हो🍃

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat