गौरव लेणी संवर्धकांचा

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अनेक बौद्ध अनुयायांनी प्राचीन काळात बुद्ध लेण्यांची निर्मिती करण्यासाठी आपले योगदान दिलेले आहे. हजारो वर्षे ते आज हि आपणास पाहायला मिळत आहे. असा दैदिप्यमान इतिहास जतन करण्यासाठी आपली पाउले पुढे पडलीच पाहिजेत. ABCPR लेणी संवर्धक टीम हि ध्येयावर काम करण्यासाठी निस्वार्थपणे काम करत होती. या टीम सोबत अनेक लोक जॉईन होत गेले अनेक लोक आले तसे निघून हि गेले. पण जे निस्वार्थपणे या चळवळीत काम करत राहिले असे मोजकेच लोक आपणास पाहायला मिळतात.

लेणी संवर्धन कार्यात लेणी संवर्धक टीम ला भेटलेले काही अनमोल हिरे आणि त्यांचा जन्म दिवस हा लेणी संवर्धक यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण च असतो. लेणी संवर्धन टीम मधील जेष्ठ लेणी संवर्धक यांचा आज जन्म दिवस आहे. वयाने जेष्ठ असून हि वयाने कनिष्ट असणाऱ्या व्यक्ती शी आदराने सन्मानाने वागणारे व्यक्तिमत्व लेणी संवर्धकांचे हक्काचे घर जिथे केव्हा हि लेणी संवर्धक कुठून हि आला तरी हक्काची जागा मिळते. अल्पावधी च लेणी संवर्धक कुटुंबात सामील होवून लेणी संवर्धकांचे एक महत्वाची जागा झाली. प्रत्येक रविवारी जेष्ठ असून हि सातत्याने लेणी वर येवून लेणी संवर्धन कार्यात हातभार लावून पुढच्या पिढीला हा संदेश च जणू देत असतात. कि हा वारसा आपला आपण च जपायचा आहे. गेली दोन वर्षे सातत्याने लेणी वर काम करत एक परिवाराप्रमाणे संपूर्ण कुटुंब ह्या लेणी संवर्धन कामात सामील झाले. बघता बघता लेणी संवर्धन हि चळवळ त्यांच्या घरातील हक्काची चळवळ झाली. आणि या चळवळीतील लोकांचे हक्काचे घर हि झाले. इथून कोणता लेणी संवर्धक उपाशी जात नाही . त्यांनी आपल्या मुलांना देखील या चळवळीचा एक हिस्सा बनवला लेणी संवर्धकांसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ते सतत पुढे असतात. मग ते सहकार्य कोणते हि असो वेळोवेळी त्यांचे सहकार्य असते. २०२० हे वर्ष कोरोनाच्या महामारी मध्ये असताना देखील लेणी चे काम थांबले नाही पाहिजे सातत्याने राहावे यासाठी नेहमीच आग्रही राहून लेणी संवर्धकाना या संकट काळात हि साथ दिली

एक जाणते उपासक या नात्याने आपल्या धम्म गुरूंच्या राहण्याची व्यवस्था थेट आपल्या घरी करून या संकट काळात त्यांना कुठे हि त्रास होणार नाही याची काळजी घेतली त्यांच्या कुटुंबीयात त्यांची दोन्ही मुले हि त्यांना सहकार्य करत आपल्या पित्याच्या कामात आपले योगदान देत असतात. आपल्या नावाप्रमाणे उपासिकेचे कर्तव्य बाजाबत आपल्या धम्म गुरूंची सेवा करत कुशल कर्माची उपसंपदा जणू हे कुटुंब करत होते. ज्या पद्धतीने मिगारमाता विशाखा यांनी पुब्बाराम विहार भिक्खू संघास दिले होते त्याच प्रमाणे ABCPR लेणी संवर्धक टीम चे हे पुब्बाराम आहे.

ज्या व्यक्तिमत्व बद्दल आम्ही सांगतो आहोत ते व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीचे पंथर च्या काळातील पंथर आहेत. आणि आजचे ABCPR टीम चे जेष्ठ लेणी संवर्धक आयु. शामराव सोमकुवर सर यांचा आज जन्म दिवस आहे. अश्या व्यक्तिमत्वाचा जन्म दिवस आणि त्यांचा गौरव हा होणार च कारण जसे तुमचे काम असेल तसेच तुमचे नाव हि असते.

लेणी संवर्धन चळवळीत आम्हा तरुण लेणी संवर्धक लोकांना सापडलेले अनमोल रत्न आहे. प्रत्येक गोष्टीत पाठींबा देत आजवर सोबत कायम आहेत. आज पूर्ण कुटुंब हे या चळवळीत आपणास पाहायला मिळेल हि ताकद आहे धम्माच्या विचारांची

चळवळ घरात रुजली पाहिजे तरच ती वाढते आणि जिवंत राहते ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जेष्ठ लेणी संवर्धक आयु शामराव सोमकुवर सर घरात आधी धम्म रुजला पाहिजे तरच तो इतरांमध्ये रुजेल

लेणी संवर्धक टीम ला वेळोवेळी मार्गदर्शन करत आपला बहुमुल्य वेळ ते लेणी संवर्धन कामासाठी देत असतात अश्या जेष्ठ लेणी संवर्धक सोमकुवर सर यांना ABCPR टीम च्या तरुण पिढी काढून व जेष्ठ सहकाऱ्यांच्या कडून जन्म दिनाच्या मंगलमय सदिच्छा.

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक_कालीन_धम्मलिपीमधुन_सदिच्छा_भेट

#बुध्दांच्या_करुणामय_मार्गाने_तुमचे
#कल्याण_हो …
#मंगल_हो….
#भला_हो
#ABCPR(#प्राचिन_बौद्धलैणी_संवर्धन_संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat