चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख : गिरनार शिलालेख ३

सम्राट अशोक यांच्या शिलालेखांची सखोल माहिती

शिलालेखांचे लिप्यांतर

देवानं पियो प्रियदसि राजा एवं आह द्वादस वसाभिसितेनं मया इदं आञापिता
सवत विजिते मम युता च राजूके च पदेसिके च पंचसू वासेसु अनुसां
यानु नियात एतायेव अथाय इमाय धमानुसस्टीय यथा अञा
य पि कंमाय साधू मातरी च पितरी च सुस्तुसा मिता संस्तुत ञातिनं बाम्हण
समणान साधू दानं प्राणानं अनारंभो अपव्ययता अप भांडता साधू
परिसा पि युते आञपयीसति गणनाय हेतुतो च व्यंजनतो च

शिलालेखाचे भाषांतर

देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे सांगतो आहे कि, राज्याभिषेकाच्या बारा वर्षांनी मी अशी आज्ञा करतो कि माझ्या राज्यात असणारे सर्व युक्त रज्जूक व प्रादेशिक या सर्व अधिकाऱ्यांनी पाच वर्षांनी नियमित पणे आपल्या अधिकार क्षेत्रात धम्म शासनासाठी जावे त्याच बरोबर इतर कारबार देखील करावेत . माता पिता यांचे सेवा करणे उत्तम आहे मित्र आप्त ब्राह्मण श्रमण यांना दान देणे उत्तम आहे जीव हिंसा न करणे उत्तम आहे. अल्पव्यय आणि अल्प संचय करणे उत्तम आहे. परिषदे कडून अश्या व अन्य आज्ञा संक्षेपाने आणि विस्तारित पणे युक्तांना दिल्या जातील.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा हा शिलालेख आपल्या अधिकारी वर्गाला आपल्या अधिकार क्षेत्रात जावून पाहणी करण्याचे आदेश आहेत कि जनता धम्मा नुसार आचरण करते कि नाही ते शिवाय कोणत्या गोष्टी उत्तम आहेत हे पाहणे म्हत्वाचे माता पित्याची सेवा होते कि नाही अहिंसा होते कि नाही कोणत्या हि प्रकारचे गैर कृत्य आपल्या राज्यात होत नाही ना हे पाहण्यासाठी प्रत्येक अधिकारी वर्गाला आपल्या अधिकार क्षेत्रात जावून पाहणी करायला सांगणारा चक्रवर्ती सम्राट हा जगातील एकमेव असा सम्राट आहे ज्याने प्राचीन काळात हि उत्तम शासन प्रणाली चालवली होती

सम्राट अशोक यांच्या शिलालेखांची घेवू या सखोल माहिती

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat