चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख : गिरनार शिलालेख २

चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा गुजरात राज्यातील गिरनार येथील दुसरा शिलालेख

Giranar Roct Edict 2 ( Corpus Inscriptonum Indicarum Vol-1)

शिलालेखाचे लीप्यांतर

सवत विजितेम्हा देवानंप्रियस प्रियदसिनो राञो
एवमपि प्रांचतेसु यथा चोडा पाडा सतिय पुतो केतलपुता अ तांब
पणी अतियको योनराज ये वा पि तस अतियकस सामिनो
राजानो सवत देवानंप्रियस प्रियदसिनो राञो द्वे चिकीछा कता
मनुस चिकीछा च पसू चिकीछा च ओसूढानि च यानि मनुसोपागानिच
पसोपागानिच यत यत नास्ति सवता हरापितानि च रोपापितानि
मुलानि च फलानि च यत यत नास्ति सवात हारापितानि च रोपापितानि च
पंथेसु कुपा च खानापिता वछा च रोपिपिता परिभोगाय पसूमनुसानं

शिलालेखाचे भाषांतर

देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा त्याच्या राज्यात सर्वत्र आणि सिमे जवळच्या राज्यात चोल पांड्या सत्यपुत्र केरळपुत्र ताम्रपर्णी यवन राजा अन्तियोक आणि अन्तियोक याच्या जवळच्या राज्यात सर्वत्र देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा याने दोन चिकित्सालय अर्थात हॉस्पिटल ची स्थापना केली आहे. मनुष्य चिकित्सालय आणि पशु चिकित्सालय . मनुष्याच्या उपयोगी आणि पशूंच्या उपयोगी औषधे जेथे जेथे नाहीत तिथे सर्वत्र आणून त्याची लागवड केली आहे. कंदमुळे आणि फळे जिथे जिथे नाहीत अश्या ठिकाणी सर्वत्र त्याची लागवड केली आहे. वाटसरू साठी विहारी निर्माण केल्या आहेत पशु आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वृक्ष लावले आहेत.

सम्राट अशोक यांच्या शिलालेखातून मानवाच्या कल्याणासाठी च नाही तर पशु प्राण्याच्या कल्याणासाठी देखील सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत रिखित राज आदेश कोणत्याच राजाचे नाहीत म्हणून इतिहासात हि दखल घेतली जाईल असे सुराज्य या सम्राट अशोकाच्या साम्राज्यात पाहायला मिळते रत्याने वाटसरू जाईल आणि त्यासाठी पाणवठे तयार करून रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करून लोकांच्या सोखसोयी निर्माण करणारा तसेच आपल्या प्रजेच्या आरोग्याची काळजी घेणारा तसेच पशूंच्या हि आरोग्याची काळजी घेणारा सम्राट अशोक जगात एकमेव असा आहे अश्या महान सम्राटांचे विस्मरण झाले हेच या भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल. आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखामुळे भारताचा इतिहास किती महत्वाचा होता हे आपणास प्रकर्षाने जाणवते. अनेक राजे महाराजे होवून गेले पण त्यापैकी कुणालाच हे शक्य झाले नाही असे साम्राज्य निर्माण करणारा महान चक्रवर्ती जगात अजरामर ठरला तो याच कामासाठी .
आज देशात लोकशाही असून देशाच्या जनतेच्या मुलभूत गरजांची पूर्तता होत नाही. आज हि पाण्याची समस्या आरोग्य विषयक दुरवस्था सांगायला नको अशी आहे. रस्त्याच्या दुतर्फा सोडा डोंगर माथ्यावर झाड शिल्लक राहिलेली नाहीत आज देश गंभीर अश्या समस्या ओढवून घेत आहे अश्यावेळी सरकार म्हणून शासनात ज्यांच्याकडे राजदंड आहे असे लोक धर्माच्या नावाखाली देशाचे वाटोळे करण्याकडे वळत आहेत अश्यावेळी सम्राट अशोक यांच्या शिलालेखांची ओळख व्हावी म्हणून आपल्यापुढे सम्राट अशोक यांचे शिलालेख मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

Voice Of Buddhism YouTube Channel

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat