एस. रविंद्र

https://www.facebook.com/ravindra.minakshi.manohar

नाव : एस . रविंद्र
पत्ता : मु. पोस्ट. मुसाड बौद्धवाडी , तालुका खेड , जिल्हा रत्नागिरी .

लेणी संवर्धक

रविंद्र सावंत हे खेड तालुक्यातील मुसाड या गावातील असून गेली १४ वर्षे भारतातील बौद्ध धम्माची ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करत आहेत. आंबेडकरी चळवळीत गेली अनेक वर्षे काम करत असताना प्राचीन बौद्ध धम्माचा इतिहास जतन करण्यासाठी प्रयत्नशील असून गेली अनेक वर्षे ते यावर अध्ययन करत आहेत. प्राचीन धम्मलिपी चे अभ्यासक असून प्राचीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. महाराष्ट्रातील गडकोट तसेच ऐतिहासक स्थळांची भेट देवून त्यांचे अध्ययन करत आहेत महाराष्ट्रातील २२५ पेक्षा जास्त गडकोट स्वतः पाहून त्यावर अध्ययन केलेलं आहे शिवाय महाराष्ट्रातील जवळपास बहुतांश लेण्यावर आजवर स्वतः जावून त्यांचे अध्ययन करत आहेत .

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन हे ध्येय उराशी ठेवत संपूर्ण भारताचा दैदिप्यमान इतिहास जतन करण्यासाठी ABCPR या लेणी संवर्धक टीम सोबत ते काम करत आहेत शिवाय dhammalipi sikkhan research institute अर्थात धम्मसिरी यांच्या माध्यमातून धम्मलिपी शिकवण्याचे काम हि करत आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat