प्रज्योत कदम

https://www.facebook.com/prajyot.s.kadam

नाव : प्रज्योत संजय कदम
पत्ता : मु. पोस्ट. बसनी ,ता.जिल्हा रत्नागिरी

लेणी संवर्धक

प्रज्योत कदम हे रत्नागिरी मधील बसनी गावातून आहेत. सामाजिक बांधिलकी जपत गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीत काम करत आहेत. सामाजिक धार्मिक व शैक्षणिक चळवळीत काम करत असताना अनेक संघटनांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आंबेडकरी चळवळीत आपले योगदान दिलेले आहे. स्वतः एक उच्च शिक्षित असून समाजाला प्रगतीकडे कसे नेता येईल याच्यासाठी अविरतपणे काम करत आहेत.

प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धन कामात ते पुढे असून महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी असणाऱ्या बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम ते करत आहेत.

एक अभ्यासक असून चळवळीचा संयमी वक्ता देखील आहेत शिवाय अनेक विषयांवर अभ्यास असून स्पष्टवक्ता व अभ्यासू चिंतन व संयमशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची चळवळीत ओळख आहे. लेणी संवर्धन कामात महत्वाची भूमिका बजावत बौद्ध धम्माचा इतिहास जतन करण्याची आवश्यकता आहे यासाठी ते अविरतपणे काम करत आहेत.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat