पर्वती येथील सातवाहन कालीन लेण्यांचे संवर्धन कृती कार्यक्रम

ABCPR टीम

ABCPR (Ancient Buddhist Caves Perservation and Research) या टीमने काही दिवसांपूर्वी पुण्यातील पर्वती येथील सातवाहन कालीन ऐतिहासिक लेणीच संवर्धन करण्यासाठी केलेल्या आवाहनाला पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबईतील लेणीसंवर्धक, इतिहास अभ्यासकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

लेण्यांचा इतिहास हा इ. स. पुर्व तिसर्‍या शतकापासून म्हणजेच सम्राट अशोकाच्या काळापासून ते इ. स. बाराशे शतक इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत आढळतो. या दरम्यानच्या काळात सातवाहन कालातील जवळपास तीस सम्राटांनी लेण्यांच्या निर्मिती साठी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे. या कालावधीत कोरलेल्या या लेण्यांमध्ये धर्मप्रसार करण्यासाठी चैत्यगृह, गर्भगृह, भिक्खूनिवास, व्यापार्यांसाठी विश्रांमगृह आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याची टाकी कोरण्यात आली.
पर्वती येथील सातवाहन कालीन लेणीत प्राचीन आणि ऐतिहासिक लेणी आणि पाण्याच टाकं आहे. परंतु पुरातत्व विभागाचे या प्राचीन वास्तूकडे इतर लेण्यांप्रमाणेच दुर्लक्ष केलेले असल्यामुळे ही वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ही बाब जेव्हा ABCPR च्या पुणे टीमच्या निदर्शनास आली तेव्हा आद. मकरंद लंकेश्वर, नागेश भोसले आणि दिपक गायकवाड या लेणीसंवर्धकांनी या लेणीच संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि ही वास्तू जपण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले.

या लेणीसंवर्धन कृतिशील उपक्रमामध्ये जवळपास चाळीस संवर्धकांनी सहभाग घेऊन घाणीच साम्राज्य असलेल्या या लेणी परिसरात श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली. या संवर्धनाच्या या उपक्रमात चीन मधून आलेल्या लिंग ली आणि झँग झाओली या इतिहास अभ्यासकांनी आपलं बहुमुल्य योगदान दिले. व हा सातवाहन कालीन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मदत केली. आज अशा अनेक प्राचीन वास्तूकडे सरकारी यंत्रणेने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एकतर नष्ट होत आहेत किंवा विकृत केल्या जात आहेत.

ABCPR टीम अशा प्रकारच्या प्राचीन वारसा लाभलेल्या वास्तू जपण्यासाठी काम करत असून वेळोवेळी लोकांनासुध्दा आवाहन करत आहे.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat