नेणावली बुद्ध लेणी :

☸ ट्रेकिंग  बुद्ध लेणी   : नेणावली    बुद्ध लेणी   ☸
🔥 दिवस : बुधवार  दिनांक ३१ जानेवारी    २०१८
🔥 कॅटेगरी : ट्रेकिंग 
🔥 लोकेशन : नेणावली  बुद्ध लेणी
🔥 कालावधी : एक दिवस
🔥  श्रेणी  : कठीण

दिनांक ३१ जानेवारी रोजी नेणावली या बुद्धिलेणीवर संशोधन मोहीम घेण्यात आलीं रायगड मधील गॅझेट मध्ये या लेण्यांची माहिती दिली  असताना, त्यामध्ये काही लेण्यांचा उल्लेख होता कि, या ठिकाणी या लेण्यांकडे जाण्यास मार्ग नाही.  यासाठी  आम्ही या लेण्यांकडे पहाटे पहाटे निघालो असताना, अनेक ठिकाणे तपासून पाहिली त्यानंतर हि लेणी कुठे आहेत याचा शोध घेत आम्ही त्यांच गावाच्या आदिवासी पाड्यात विचारणा केली असता, आम्हाला लेण्यांची माहिती सापडली कि मुख्य लेनिच्याच बाजूंला असलेली लेणी हीच ती लेणी असून, आम्ही त्याला भेट दिली लेणीचे संपूर्ण अवस्था पाहिल्यावर या लेण्यावर काम करणे आवश्यक आहे . अश्या  पद्धतीने पुन्हा या लेण्यावर  काम हे २५ फेब्रुवारी ला या लेण्यावर पुन्हा येण्यासाठी चा निर्णय घेवून आम्ही सर्व जन निघालो.

लेणी हि अत्यंत दुर्वाव्स्थेत आहेत  लेण्यावर साफ सफाई करून लेण्यांची माहिती घेत पुढील कार्यक्रम नियोजित करून  गावातील स्थानिक लोकांचा शोध घेत आम्ही या गावातील बौद्ध वाडीत आलो. वाडीतील लोकांना आम्ही या लेण्यांची माहिती दिली असता त्यांना ती लेणी म्हणजे  पांडवानी कोरलेली आहेत का असे वाटत होते. शेवटी आम्ही त्यांना सत्य माहिती सांगून या लेण्यांचे जतन झाले पाहिजे यासाठी काम केल पाहिजे असे त्यांना सांगून आम्ही मुंबईकडे निघालो.

लेनितले काही निवडक क्षण

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat