नेणावली ( खडसांबले ) बुद्ध लेणी / Nenavali {khadasamble} Buddha Leni

लेण्यांची उंची : लेणीचा प्रकार  : दुर्लक्षित लेणी              डोंगररांग  : सह्याद्री  जिल्हा : रायगड                                                         श्रेणी       : कठीण
तालुका: सुधागड पाली              गाव  : नेणावली 

लेणीचा इतिहास :  नेणवली लेण्यांना खडसांबळे लेणी असे हि म्हटले जाते हे दोन्ही गावाच्या जवळ असणारी लेणी असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कोरलेली लेणी आहेत . हि लेणी प्राचीन बौद्ध व्यापारी मार्गावर आहेत चौल बंदरावरून नागोठणे खाडी मार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर हि लेणी कोरलेली आहे यांचा शोध रेव्हरंट ऍबटने १८८९ साली या लेण्यांचा शोध लावला . त्याआधी लेणिवर लिहिणाऱ्या फर्ग्युसन व  बर्जेस याना याची माहिती नव्हती असे दिसते त्यानंतर हेन्री कझेन्स याने यावर लिहले आहे
हि लेणी इसवी सणाच्या पूर्वी २ च्या पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत या लेण्यांचे निर्माता राजवंश सापडत नसला तरी महाराष्ट्रात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन राज्यांचे साम्राज्य होते त्यामुळे साहजिक च ह्या लेण्यांची निर्मिती मध्ये सातवाहन राजांचा सहभाग असणार आपण असे म्हणू शकतो कि हि लेणी सातवाहन राजांच्या काळात कोरलेली आहेत शिवाय हा व्यापारी मार्ग असल्याने लेण्या ना  सातवाहन राजांचे सहकार्य आहे असे वाटते व्यापारी मार्गावर असणारी  हि लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणून स्वीकारले तरी चुकीचे वाटत नाही या लेण्याची निर्मिती इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून झाली असून ती इसवी सण पाचव्या शतकापर्यंत तिचे काम चालू होते त्यामुळे हा काळ सातवाहन राजांच्या साम्राज्यात होता विशेष कोकणवर सातवाहन राजांचे साम्राज्य  होते आणि त्यामध्ये ह्या लेण्याची  निर्मिती हि बरेच काही सांगून  जाते
या लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्य सेनानी ह्याच लेण्यात इंग्रजांपासून लपून राहिले होते. यांचा अर्थ हि लेणी या काळात इंग्रजांना सापडली नाहीच इतक्या आतमध्ये आहेत  या लेण्यांच्या बाबतीत सांगायला अजून एक महत्वाची गोष्ट हि लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत
लेण्याच्या शिल्पकलेची नोंद घ्यावी अशी काही लेणी आहेत तश्या पद्धतीची माहिती ऍबट याने दिलेली आहे शिवाय हेन्री कझेन्स  यांनी दिलेली आहे

पाहण्याच्या गोष्टी : ह्या लेणीचा दगड  हा लाल रंगाच्या बुरुम असणारा दगड असून जास्त टिकावू नाही त्यामुळे या लेण्यांचे खूप नुकसान झालेलं आहे
या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे काही जण २१ च लेण्यांचा उल्लेख करतात कारण प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे कारण बरीच लेणी हि गाडली गेली आहेत  डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत लेण्यांचा दर्शनी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे या लेण्यांवर शिलालेख असू शकतात हे नाकारता येत नाही जवळपास सर्वच लेण्याचे प्रवेश द्वार नष्ट झालेलं आहेत  लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत आज ती भग्न असली तरी त्यांचे पूर्वीचे  सौंदर्य मात्र अप्रतिम होते  आजच्या घडी ला असणारा स्तूप डोंगरातून पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी टेक्निक अश्या बऱ्याच गोष्टी आपणास सांगता येतील
या लेण्यातील बरीच लेणी  हि नष्ट झालेली आहेत भग्न अवस्थेत आहेत बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेले असून छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे लेण्याच्या एका ठिकाणी दोन स्तूपांचे अवशेष सापडतात अर्ध्या अवस्थेत ते स्तूप हि आहेत अर्हत भिक्खुंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते आणि या ठिकाणी स्तूपणाची रांग असावी असे वाटते कारण अश्याच पद्धतीचे भाजे लेण्यांवर स्तूपांची मांडणी आहे कदाचित  या लेण्यांच्या नंतर च भाजे लेण्यांची न निर्मिती केली गेली असावी असे  वाटते
त्याच्या बाजूलाच एक प्रशस्त विहार असून ते पूर्णपणे मातीखाली गाडले गेले आहे एका बाजूने आत मध्ये जाण्यास रास्ता आहे पण  तो पूर्णपणे घातक आहे समोरून बंदिस्त असल्याने व उंचीने कमी असल्याने  त्यातून बाहेर निघताना त्रासदायक आहे
लेणे क्रमांक १ हे अर्धवट लेणे वाटते पण ते अर्धवट लेणे नसावे कारण त्याचा वरचा भाग हा पूर्णपणे कोसळलेला असल्याने त्याचे अवशेष आजूबाजूला च असणार कारण डोंगराचा वरचा कडा पूर्णपणे कोसळलेला आहे
दोन नंबर च्या लेण्याची मागची भिंतच आपणास ओळखता येते बाकी त्याची समोरील दीर्घिका वैगरे नष्ट झालेले आहे
तीन नंबर च्या अवशेषांवरून पुढे दीर्घिका असून प्रांगण आहे व मागे एक शून्यागार आहे दर्शनी भाग पूर्णपणे कोसळलेला आहे
चार नंबर च्या हि लेण्यात भिंतीचे अवशेष छताला चिटकून असलेले आपणास पाहायला मिळतात  शिवाय भिंती पूणर्पणे कोसळल्या असून  समोरील दर्शनी भाग नष्ट झालेला आहे
पाच नंबर च्या लेण्या सारख्याच आहेत  शिवाय त्याच्या मागच्या भिंतीस लागून शयन ओटा आपणास पाहायला मिळतो
सहा नंबर च्या लेण्यांचा फक्त खोली च आपणास ओळखता येते शिवाय खोलीच्या मागच्या भिंती मध्ये एक कोनाडा आहे
सात नंबर च्या लेण्याची हि सारखीच अवस्था आहे मागची खोली ओळखता येते बाकी सर्व भग्न अवस्थेत आहेत
एकूण लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झाले असल्याने छताचा भाग शिल्लक असून आज ती त्या लेण्याचे साक्ष देत आहेत
लेणे क्रमांक आठ हे भव्य असून त्याचा विन्यास नमुनेदार आहे प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत [प्रवेश करता येतो दीर्घिकेच्या बाजूला एक दालन आहे दालनाच्या उजव्या  बाजूस एक अंतर दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे बाह्य दालनाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत  आंतर दालनाच्या समोर असणाऱ्या भिंती वर   चौरसाकृती खिडकी आंतर दालनाच्या उजव्या बाजूस ओटा आहे एकूण च या लेन्यांची  मांडणी पाहता हे लेणे अनेक खोल्यांची सदनिका असल्यासारखे वाटते
या  लेण्यात एकूण पाच ओटे आहेत त्यामुळे इथे किमान  पाच भिक्खूंची झोपण्यासाठी ची व्यवस्था असावी
नऊ नंबर  च्या लेण्यात छत शिल्लक असून मागच्या खोलीत व मागच्या भिंतीच्या  बाजूला  ओटे शिल्लक आहेत
दहावे लेणे हे  इथले प्रमुख लेणे आहे इथे आपणास  प्रशस्त असे विहार पाहायला मिळते त्याला सभागृह किंवा मोठे चैत्यगृह म्हणता येईल महाराष्ट्रातील अतिविशाल चैत्यगृहात याचा समावेश होतो हे आयताकृती असे चैत्यगृह आहे  इथे महत्वाची गोष्ट म्हणजे या लेण्यांच्या  स्तूपाच्या बाजूला एकूण सतरा खोल्या आहेत एकूण स्तूप पाहता इतर लेण्यांप्रमाणे तो आपल्याला मध्यभागी दिसत नाही तो एका कोपऱ्यात दिसतो यावरून एकूण असा अंदाज काढता येतो  कि स्तूपाची कल्पना नंतर आली असावी शिवाय हा स्तूप इतर स्तूपांपेक्षा वेगळा वाटतो किंचित आद्य स्तूप असावा असे म्हणता येईल  या लेण्या  इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरल्या गेल्यामुळे  या लेण्यांची  बांधणी प्राचीन वाटते  सतरा भिक्खू निवास असून ते अर्हत भिक्खू किंवा जेष्ठ भिक्खू यांच्या साठी ध्यान साधना करण्यासाठी कोरलेली  असावीत स्तुपावर लाकडी छत आणि लाकडाची हार्मिक असावी असे म्हणता येईल  एकूण या विहार लेण्याच्या मध्यभागी स्तूप असावा नंतर तो हटवला गेला असावा असे दिसते कारण तिथे  त्याचे अवशेष जाणवतात  एकूण च खोल्यांचा समोर असणारा ओटा त्यांनतर असणारे विहाराची जागा त्यानंतर असणारे स्तूपाचा गर्भगृह पाहून  मन थक्क करणारी वास्तू स्थापत्य कला विकसित झालेली होती असे म्हणायला हरकत नाही  एकूण च दर्शनी भाग नष्ट झाल्याने इथे शिलालेख असावा असे म्हणता येऊ शकते कारण एवढा मोठा लेण्यांचा समूह आणि  शिलालेख नाही असे म्हणता येत नाही छोट्या छोट्या लेण्यांवर शिलालेख पाहायला मिळतात  मग एवढ्या मोठा लेणी समूह असून तिथे शिलालेख नसेल असे म्हणता येणार नाही कारण सर्वच लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झालेले आहेत  आणि शिलालेख शक्य तो दर्शनी भागावर च कोरलेला असतात खाली पडलेल्या दगडांच्या अवशेषात कदाचित तो सापडू शकतो    शक्यता नाकारता येत नाही
दर्शनी भागात लाकडाचे  काम असावे कारण तश्या पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात  स्तूपाच्या पाठीमागून पाणी वाहून नेण्याची व व्यवस्था केलेली आहे शिवाय  ते पाण्याच्या टाक्यात नेलेली असावी पण  पुढे असणारे पाण्याचे टाके नष्ट झालेले आहे एकूण च  मांडणी पाहता म्हणावे लागेल
एकूण कझेन्स  यांनी देखील या लेण्यांचा कालावधी हा इसवी सन पूर्वी दुसरे शतक सांगितले आहे शिवाय एम एन देशपांडे यांनी हि याला   दुजोरा दिला आहे नाडसूर इथे सापडलेल्या आहुत नाण्यांचा वरून त्यांनी देखील या मताला दुजोरा दिलेला आहे
प्रमुख लेणे अतिशय देखणे आहे सध्या त्याची भग्न अवस्था देखील मनाला आनंद देऊन जातो
त्याच्या बाजूलाच ११ ते २१ पर्यंत ची लेणी आहेत ती हि भग्न अवस्थेत आहेत बाजूला कडा कोसळल्या मुले अतोनात नुकसान झालेले आहे या  येण्याचे तिथले अतिशय प्रशस्त अशी विहार भग्न झाली असून कड्याच्या दगडाखाली व पावसाच्या पाण्यासोबत आलेली मातीने भरलेली आहेत
कड्याच्या पलीकडे  हि अनेक लेणीचा समूह आहे जो एकच आहे परंतु कडा तुटल्यामुळे त्याचे विभाजन झालेले आहे तिकडे हि विहार  संघाराम तसेच शून्यगृह आहेत ऐसपैस अशी जागा असणारी कातळात कोरलेली लेणी आहेत तिकडे जाणे थोडे से घातक आहे कारण  डोंगराचा कडा कोसळल्या मुले तिकडे जाणे शक्य नसते पण एवढे हि कठीण नाही कि तिकडे जाता येत नाही सहज जाऊ शकतो आपण या ठिकाणी एकूण ४२ ओटे पाहायला मिळतात जे  भिक्खुंच्या झोपण्यासाठी कोरलेले असतात या ठिकाणी जवळपास ७० भिक्खुंच्या झोपण्याची व्यवस्था केलेली असावी  शिवाय इथे ७० पेक्षा जास्त भिक्खुंच्या निवासाची व्यवस्था केलेली असावी
त्याच्या पुढे असणारी लेणी हि सध्या जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असून शिवाय मातीने भरलेली आहेत डोंगराचे कड्याचा दगड हा समोर पडल्याने दर्शनी भागाचे अतोनात नुकसान झालेले आहे शिवाय आतमध्ये लेणी   देखील  कोसळली आहेत लाल रंगाचा बुरुम दगड असला तरी भव्यदिव्य असे लेणे कोरलेले आहे
या  लेण्यांविषयी जास्त माहिती सापडत नाही  कारण लेण्यांवर लिहणाऱ्या बर्जेस वैगरे अभ्यासकांना याची माहिती मिळालेली नाही  बर्जेस यांनी महाराष्ट्रातील १२०० लेण्यांचा अभ्यास करून आपला रिपोर्ट बनवले असून महाराष्ट्रातील उर्वरित लेणी हि  अभ्यासात आलेली नाहीत त्यापैकी हे खडसांबळे बौद्ध लेणी आहेत

लेणींविषयक माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष गेल्यावर च लेण्यांचा अभ्यास करता येऊ शकतो कारण त्याचे बांधकाम त्याची बांधकाम शैली शिवाय तिथे असणारे स्तूपांची रचना पाहता अश्या पद्धतीचे स्तूप  आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही  बाकीचे स्तूप हे शिल्पकलेने समृद्ध असे आहेत त्यामुळे त्या लेण्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे असे म्हणायला हरकत नाही  

खडसांबळे लेणी हि नेणवली गावात असल्याने त्यांना नेणवली लेणी म्हणून च म्हटले गेले पाहिजे परंतु ब्रटीश अभ्यासकांना ते खडसांबळे गावातून आल्यामुळे त्यांनी त्याला ते नाव दिले असावे असा अंदाज वर्तवणे चुकीचे ठरणार नाही

या लेण्यांचे वैशिष्ट्य असे कि याच्या एका बाजूला ठाणाळे म्हणजे नाडसूर ची लेणी आहेत तर एका बाजूला गोमाशी लेणी आहेत  दोन्ही हि बौद्ध लेणी आहेत गोमाशी लेण्यात भूमी स्पर्श मुद्रेत असणारी बुद्धाची मूर्ती असून हे एक छोटेसे लेणे आहे

एकूण च नेणवली लेणी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आपण आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे
लेणी वर पोहोचण्याच्या वाटा :मुंबई मार्गे खोपोली रेल्वे स्थानकात येवून तेथून खाजगी वाहनाने नेणावली गावात पोहचता येते नेणावली घावत वाघमारे वाडी हि आदिवासी लोकांच्या वस्ती मधून  लेणी वर जाण्यासाठी रस्ता आहे 
लेणी मध्ये पाण्याची व्यवस्था नाही  लेणी वर जाताना सोबत पाच  लिटर पाणी प्रत्येकी घेवून जाणे  लेणी वर जेवणाची व्यवस्था नाही खाली गावात व्यवस्था  होईल 

 लेणी च्या वर्कशॉप साठी ABCPR  टीम कडे संपर्क साधावा 

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

2 thoughts on “नेणावली ( खडसांबले ) बुद्ध लेणी / Nenavali {khadasamble} Buddha Leni

 1. Namo BUDDHAY..Jai Bhim

  I Appreciate ur Work….and I like to meet u to Decide Our Further Strategy ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat