लयणगिरि (शिरवळ ) बुद्ध लेणी

प्राचीन भोर प्रांतात शिरवळ या ऐतिहासिक गावी असणारी हि बुद्ध लेणी प्राचीन लयनगिरी डोंगरावर असलेली हि ऐतिहासिक बुद्ध लेणी.

लेणीच्या माहितीचे व्हिडीओ मराठी

लेणीच्या माहितीचे व्हिडीओ हिंदी


शिरवळ लेणी चा इतिहास
शिरवळ बुद्ध लेणी प्राचीन लयनगिरी बुद्ध लेणी या नावाने ओळखली जाते. लेणी कोरण्यासाठी सातवाहन सम्राटांचे मोठे योगदान या महाराष्ट्रात आहे तसेच सामान्य जनतेचे व व्यापारी वर्गाचे हि मोठे योगदान या महाराष्ट्रात असलेले आपणास पाहायला मिळते. शिरवळ बुद्ध लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात बांधलेली असून हा सातवाहन काळ मानला जातो. ह्या ठिकाणी कोणता हि शिलालेख नसल्याने लेणी कोणी बांधली या विषयी माहिती उपलब्ध राहत नाही. तरी इतर ठिकाणी केलेल्या बांधकाम आणि शासन काळ याचा कालावधी पाहता सिमुक सातवाहन यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्या निर्माण करण्याचे काम जोरात पाहायला मिळते. शिरवळ बुद्ध लेणी हि देखील सातवाहन काळात सुरु झालेली लेणी आहेत.

शिरवळ लेणी हि हीनयान पंथीय भिक्खुंसाठी निर्माण केलेली लेणी आहेत. या ठिकाणी कोणता हि महायान कालखंड पाहायला मिळत नाही. हीनयान भिक्खुंसाठी हि लेणी निर्माण केल्याचे या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. जेम्स बर्जेस यांनी Caves And Temple या पुस्तकात शिरवळ लेणी ची माहिती लिहिली लिहिली आहे १८८० साली त्यांनी आपल्या पुस्तकात शिरवळ बुद्ध लेणी बाबत नमूद केलेले आहे
जेम्स बर्जेस यांनी लिहिलेल्या आपल्या पुस्तकातील मजकूर पुढील प्रमाणे
पेज क्रमांक १६८ मध्ये पाचव्या मुद्द्यावर त्यांनी लिहिलेले आहे
A line drawn southwards from Poona nearly parallel to the Western Ghats or Sahyadri Hills, passes through groups at Sirwal, Wai, and Karhad, embracing about 80 caves.
त्यांनतर ते पुढे १८४ पेज वर दुसऱ्या मुद्द्यावर लिहितात
A number of groups in Konkan and Dekhan, all to the south of Bombay, and all bearing a general character of small plain dwellings for Bhikshus, with flat-roofed shrines for the Dagoba and Viharas. The chief group in the Konkan are at Kuda and in the neighbourhood of Mhar (महाड) and Kol; those in the Dekhan on the other side of the Sahyadri Hills or Ghats are chiefly at Karhad, about 30 miles south of Satara, and at Wai and Sirwal, north of the same town. These range perhaps from 200 B.C. to 50 A.D
पुढे लेणी ची सविस्तर माहिती लिहिताना ते
The ‘Sirwal group of caves is in the territory of the Pant Sacheva
of Bor, on the north-east border of the Satara Zilla. They are
between 2 and 3 miles south-west from the Sirwal traveller’s bangala,
4 east of Bor, and 13 north of Wai, or in long. 73° 59′ E., lat. 18° 8′
N., at the head of a short narrow valley on the eastern slope of a
spur from the Mandhardeva range of hills,^ which bound the Nira
valley on the south.
They face the north-east, and are of the same severely plain type
as all the earliest caves. The first is a small chaitya cave 20 feet
3 inches by 14 feet, square at the back, with a plain dagoba 5 feet
3 inches in diameter, having a plain capital of four 3 inch fillets.
The door is 5 feet wide, but the whole floor is so silted up that no
part of the interior is more than 5J feet high.
The second excavation has been a vihara, of which the whole front
has disappeared with one of the cells on the right hand side. It has
been about 26 feet square, with three cells on each side and in the
back: in all, except two, are the usual stone benches. Four of
them have small window openings, a foot square, with a countersunk
margin on the outer side. Round the hall runs a bench, up
to the level of the top of which the floor is filled with dry mud.
The third is, apparently, a natural cavern, 17 feet deep, irregular
in shape, and only about 3^ feet high.
The remaining four in the lower tier and two in the upper are
more or less irregular apartments, much ruined by the decay of the
rock; one of them has two benched cells at the back, but thev
possess no special interest. There are also six small excavations on
the south side of the ravine, filled up with rubbish.
जेम्स बर्जेस यांच्या पुस्तकात हि सविस्तर माहिती आपणास वाचायला मिळते.

जेम्स बर्जेस आणि जेम्स फोर्ग्युसन यांचे पुस्तक डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी


शिरवळ लेणी चे ऐतिहासिक दाखले देखील आपणास पाहायला मिळतात

शिरवळ बुद्ध लेणी ह्या १८ लेण्यांचा समूह आहे. एक चैत्य गृह दोन विहार व भिक्खू निवास अश्या पद्धतीने या लेणी ची रचना आपणास पाहायला मिळते

सध्याची लेणी ची अवस्था हि अतिक्रमित लेणी म्हणून आहे ह्या लेणी मध्ये चैत्य गृहासमोर शिवलिंग बसवलेले आहे. ह्या लेणी ची माहिती सातारा Gazette १८८५ मध्ये देखील उल्लेख आलेला आहे.
M K ढवळीकर यांच्या मते सात लेण्यांचा समूह असल्याचे म्हटले आहे तर सध्या घडीला एकूण १८ लेण्यांचा समूह आहे आणि याची नोंद जेम्स बर्जेस यांनी केलेली आहे. हि लेणी कोणी शोधली याबाबत स्पष्टता नसली तरी Mr. H. Bartle E. Frere, हे सातारा प्रांतात कमिशनर म्हणून होते त्यांनी १८५० साली वाई येथील लोहारे लेणी चे संशोधन केलेले आढळते. त्यामुळे यांच्याच काळात हि लेणी पहिल्यांदा समोर आलेली असावी.
हि बौद्ध लेणी असल्याचे अनेक पुरावे आपणास ह्या ठिकाणी पाहायला मिळतात
अश्या पद्धतीने शिरवळ लेणी ची थोडक्यात माहिती आपणास ABCPR लेणी संवर्धक टीम च्या वेबपोर्टल वर उपलब्ध करू देत आहोत

अधिक माहिती साठी व टीम सोबत काम करण्यासाठी JOIN US ने फॉर्म भरून पाठवून देणे

ABCPR TEAM
लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन
एक पाऊल धाडसाचे बौद्ध वारसा जोपासण्याचे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat