कुडा बौद्ध लेणी Kuda Buddhist Leni


लेणीचे नाव :कुडा  बुद्ध लेणी 

लेण्यांची उंची : लेणीचा प्रकार  : दुर्लक्षित लेणी                                                                         डोंगररांग       : सह्याद्री जिल्हा               : रायगड      श्रेणी           : सोपी तालुका              : तला            गाव                   : कुडे मांदाड

लेणीचा इतिहास :  सातवाहन काळात या लेण्यांची बांधणी झाली असून हि लेणी बौद्ध धम्मातील हीनयान आणि महायान पंथातील आहेत. या लेण्यांचे राजवंश नेमका सांगता येत नसला तरी शिलालेखात महाभोज नावाने उल्लेख आहे आणि महाभोज हे अशोक काळातील महाराष्ट्रातील एक पद आहे ते सातवाहन काळात देखील कायम असल्याचे आपणास पाहायला मिळते या मध्ये महाभोज मांदव यांचा उल्लेख सापडतो एकूणच लेण्यांचा कालावधी निश्चित सांगता येत नाही कारण लेण्यांचे बांधकाम हे प्राचीन लेण्यांमध्ये मोडते इसवी सनापूर्वी दुसरे शतक   कालखंड असावा पण या लेण्यांचा कालखंड इतिहास तज्ज्ञांनी इसवी सण तिसरे शतक इतके सांगितले आहे. परंतु एकूण लेण्यांचा बांधकाम शैली पाहून हि लेणी एकाच काळातील वाटत नाही ह्यांची सुरुवात हि इसवी सणाच्या पूर्वीची असायला हवी कारण लेणी बांधकाम शैली इसवी सनाच्या पूर्वीच्या लेण्यांशी साम्य साधणारी आहे. स्तूपांची रचना अगदी पितळखोरा लेण्यातील स्तूपाशी जाऊन मिळते भाजे लेण्यातील स्तूपांची रचना हि सारखीच आहेशिवाय ये  लेण्यांवर आढळणारे एक चिन्ह आहे ज्याला लोक डमरू म्हणतात मुळात ते व्यापाराचे ट्रेडमार्क असावे अशी शक्यता आहे ते चिन्ह कान्हेरी नाशिक अजिंठा महाड लेण्यात हि सापडते विशेष म्हणजे हे डमरू आडव्या पद्धतीने पाहिल्यास स्तूपाच्या आकाराचे आहे दोन स्तूप एकमेकासमोर कोरलेले आहेत  अश्या पद्धतीने हि व्यापाराचे  एक चिन्ह असावे कारण बहुतांश राजानि स्तूपाचे चिन्ह वापरलेले आहे सातवाहन पुळुमावी यांच्या  हि काळात स्तूप चे चिन्ह कोरलेले पाहायला मिळते शिवश्री वाशिष्टीपुत्र पुळुमावी यांच्या वनवासी इथे मिळालेल्या शिलालेखात चैत्याची आकृती पाहायला मिळतेअश्या पद्धतीने चिन्हांचा वापरत केला जात होतात्याच पद्धतीने हि लेणी  आपणास पाहायला मिळतात एकूण अंदाज बांधता हि लेणी सातवाहन काळात सुरु  होऊन अगदी इसवी सण  सहाव्या शतकापर्यंतचे तिचे बांधकाम पूर्ण केले असावे कारण नंतर च्या काळात इथे मुर्त्या कोरण्याची काम  आपणास पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे या लेण्यांवर असणाऱ्या मुर्त्यांची साम्य कान्हेरी बौद्ध लेण्यांवर  पाहायला मिळतात अगदी सारख्याच आकाराच्या बुद्ध मुर्त्या असून एक सारख्या आहेत  नाग लोकांनी बुद्धाच्या पदम पुष्पचे देठ पकडलेले आपणास पाहायला मिळते आणि त्या  कमळावर बुद्ध विराजमान आहेत अश्या पद्धतीनेच साम्य आपणास पाहायला मिळतेएकूण लेण्यांचा इतिहास हा असाच इसवी  सनाच्या पूर्वी जातो व त्याची समाप्ती इसवी सन यावर येते . तसेच कुडा लेण्यांच्या बाबतीत आपणास पाहायला मिळते या लेण्यावर असणारी मूर्तीकला यावरून ती नंतर कोरलेली आहेत याचे ज्ञान होते शिवाय महाभोज लोकांच्या कडून या लेण्यांना संरक्षण होते शिवाय सातवाहन  राजांनी बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी या लेण्याचे काम केले आहे शिवाय व्यापारी लोकांना संरक्षण मिळावे म्हणून  देखील या लेण्यांची बांधणी केली असावी असा निष्कर्ष काढला जावू शकतोदुसरी गोष्ट अशी कि या लेण्यांची रचना पाहता हे एखादे अभ्यासाचे स्थान असावे किंवा एखादे विद्यापीठ साधारण या लेण्यावर  अर्धी लेणी निवासस्थान असून अर्धी लेणी अभ्यासस्थान आहे यामुळे या लेण्यांना विशेष महत्व आहेशिवाय हि लेणी जास्त उंचावर नाहीतया लेण्या कोरण्याचा निश्चित कालावधी आपण पाहू या यावर  पुरातत्व विभाग व अभ्यासक यांचे मत आहे कि हि लेणी इसवी सन १०० ते १८० च्या काळातील असावी महाराष्ट्रात लेणी कोरण्याचे काम सातवाहन राजांच्या  काळात झालेले आहे शिवाय महाराष्ट्रातील बहुतांश लेणी हि इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३०  या कालखंडात बांधली  गेली आहेत आता कुडा लेण्या बांधण्याचे कालखंड एक तर इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन चौथ्या शतक पर्यंत ती कोरलेली आहेत यात गौतमी पुत्र सातकर्णी आणि यज्ञ सिरी सातकर्णी यांचा  कालखंडात लेणी कोरलेली आहेत असा सदर्भ सापडतो लेणी क्रमांक सहा हि सातवाहन गौतमी पुत्र सातकर्णी व यज्ञ सिरी सातकर्णी यांच्या कारकिर्दी मध्ये बांधलीगेली आहेत

पाहण्याच्या गोष्टी : कुडा बौद्ध लेण्यावर असणारी लेणी हि एक अप्रतिम शिल्पकला वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे हि लेणी व्यापारी बंदरावर बांधलेली लेणी आहेत इथे असणाऱ्या शिलालेखात जनसामान्य लोकांचे जनजीवन आपणास अभ्यासण्यास मिळते शिवाय प्रत्येक लेण्यांची बांधणी लेण्यात काय काय आहे हे पाहायला  मिळतेया ठिकाणी असणाऱ्या लेण्यांपैकी या ठिकाणी पाच चैत्यगृह आहेत शिवाय या ठिकाणी मोठ मोठे विहार इथे प्रत्येक लेणी मध्ये पाण्याचे  कुंड पाहायला मिळते या ठिकाणी लेणी क्रमांक ६ मध्ये बुद्ध शिल्पांचा शिल्पपट आहे इथे स्तुपांची रचना देखील कोरीव आहे शिवाय इथे शिलालेख अतिशय सुबक कोरलेले आहेत शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी हि लेणी फार उत्तम असून या ठिकाणी शांत वातावरण आहेया लेणीत सुरुवातीपासून लेणी मध्ये स्तूप शिल्प शिलालेख यांचा सुरेख असा मेल या लेण्यात आपणास पाहायला मिळतो  लेण्या ह्या दोन भागात  विभागल्या असून वरच्या भागात शैलगृह आहेत  तर खालच्या भागात विहार चैत्यगृह आहेतपाण्याच्या टाक्यांची रचना व पाण्याची पातळी उत्कृष्ट असे स्थापत्यशास्त्र असून इथे अनेक ठिकाणी बौद्ध चिन्ह पहायला मिळतातलेणीत असणाऱ्या शिलालेखात अनेक ठिकाणाचा उल्लेख आपणास पाहायला मिळतो तसे इथल्या राजकीय कार्यप्रणाली चा इतिहास हि समजतोसमोर राजपुरी खाडीचे विहंगमय दृश्य आपणास पाहायला  मिळतेसंध्याकाळच्या वेळेस सूर्य सूर्यास्तास जातेवेळी सूर्याची किरणे चैत्य स्तुपावर पडताना त्यामध्ये  होणाऱ्या रंगांची उधळण हा क्षण एक पर्वणी च असतेकुडा बौद्ध लेणी इतिहासातील एक अनमोल पर्व आहे यास अवश्य भेट द्यावी
लेणी वर पोहोचण्याच्या वाटा मुंबई मार्गे इंदापूर रेल्वे स्थानकात उतरून तला मार्केट कडे जाणार्या बस ने  अथवा मिनीडोर ने जाता येते  तला मार्केट मधून कुडा लेणी वर जाण्यासाठी मिनी डोर ने जाता येते मुख्य रस्त्यवर लेणी चा बोर्ड लावलेला आहे बाजूला च कुलकर्णी फार्म हाउस आहे तेथून लेणी कडे जाता येते
खाजगी वाहनाने सरळ मुंबई गोवा हायवे ने इंदापूर बस स्थानकातून सरळ लेणी कडे जाण्यासाठी निघावे 
लेणी मध्ये  पाण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था खाली गावात होते अथवा तला मार्केट मध्ये होते लेणी मध्ये राहण्याची व्यवस्था होते लेणीत मोठे विहार असून राहण्यासाठी उपयुक्स्त असे ठिकाण  आहे परंतु रात्री चे इथे राहण्यास  कोणी नसते 

लेणी च्या वर्कशॉप साठी ABCPR टीम कडे संपर्क साधू शकता लेणी ची संपूर्ण माहिती अगदी शिलालेखासाहित माहिती देण्यासाठी लेणी संवर्धक ABCPR टीम तयार आहे  त्यांच्याकडे संपर्क साधून भारताचा हा प्राचीन वारसा समजून घेवू शकता 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat