चैत्र पौर्णिमा कुडा बुद्ध लेण्यावर साजरी

बौद्ध धम्मातील चैत्र पौर्णिमा हि कुडा बुद्ध लेण्यावर ३१ मार्च २०१८ रोजी भारतीय बौद्ध महासभा यांच्या अधिपत्याखाली साजरी करण्यात आली त्यावेळी लेणी संवर्धक टीम ने उपस्थित राहून भारतीय बौद्ध महासभा तला यांना लेण्याच्या विषयी माहिती देवून हा आपला धम्म वारसा आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . भारतात असंख्य लेण्या आहेत त्यात आपल्याच भागात एवढ्या दैदिप्यमान वारसा आहे हा वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भारतीय बौद्ध महासभा तला तालुका यांच्याकडून या लेणी ची देखरेख करण्यासाठी व प्रत्येक पौर्णिमा या ठिकाणी साजरी करण्यात येईल असे आश्वासन घेवून लेणी संवर्धक टीम ची त्यांना नेहमी साथ असेल असे आश्वासन देवून हा कार्यक्रम संपवून जवळच्या तला किल्ल्यावर संसोधानासाठी जाण्यात आले .
तला किल्ल्यावर गेल्यावर त्या ठिकाणी ऐतिहासिक अवशेष अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले किल्ला हा सातवाहन कालीन असून किमान दोन हजार वर्षाचा त्याला इतिहास आहे किल्ल्यावर राजवाडा हा भूमिगत असून पाषाणात कोरलेला पाहायला मिळते तर पाण्याच्या टाके देखील आत भूमिगत कोरलेली पाहायला मिळतात
सविस्तर कामाचे फोटो पाहण्यासाठी खालील फोटो पाहावे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat