कोंढाणे बौद्ध लेणी KONDHANE BUDDHIST LENI

लेणीचे नाव :कोंडाणे बुद्ध लेणी   लेण्यांची उंची : 
लेणीचा प्रकार  : दुर्लक्षित लेणी                                                  डोंगररांग : सह्याद्री
 जिल्हा : रायगड                                                                        श्रेणी : मध्यम
तालुका : कर्जत           
गाव : कोंडाणे

लेणीचा इतिहास :  कोंडाणे बुद्ध लेणी हि हीनयान पंथीय बुद्ध लेणी असून यांची निर्मिती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन सम्राटांच्या काळात झाली. कोकणातून बोरघाट मार्गे घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर  हि लेणी आहेत . तसेच सोपाऱ्याहून कल्याण मार्गे नाणेघाटातून जुन्नर वरून पैठण ला जाणारा प्राचीन व्यापारी मार्गामुळे जागोजागी लेण्या कोरण्यात आल्या यामुळे बौद्ध भिक्खूना राहण्याची व्यवस्था होत असे
कोंडाणे बुद्ध लेणी हि भाजे व  पितळखोरा या लेण्यांच्या समकालीन लेणी आहेत या लेण्यातील शिलालेखात आलेला उल्लेख पुढील प्रमाणे '' कण्हस  अंतेवासींना बलकेन कतं  म्हणजे कन्हशिष्य बलक याने हे लेणे निर्माण केले लिपीचा   आधारावर हि अशोकालीन लिपी असल्याने ती अशोकाच्या काही वर्षांनंतर च कोरण्यात आली असावी असा निष्कर्ष काढता येतो विद्या दहेज यांनी ह्या लेण्यांची निर्मिती बिहार येथील बाराबार  लेणी व भाजे लेण्यांच्या मधल्या  काळात झाली असावी असे मत व्यक्त केले आहे सातवाहन राजा च्या काळात या लेणीची निर्मिती झाली   असावी असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे
या लेण्या बौद्ध भिक्खुंच्या वास्तव्यासाठी असल्याने या ठिकाणी सुदंर चैत्यगृहाची निर्मिती करण्यात आली.

पाहण्याच्या गोष्टी : कोंडाणे बुद्ध लेणी दोन हजार दोनशे  वर्षांपूर्वी  निर्माण केलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे या याठिकाणी दोन हजार वर्षांपुवीची कलेचा उत्तम नमुना आपणास पाहायला मिळतो
कोंडाणे लेणी वर असणारी चैत्य गृहाची रचना अप्रतिम असून कलेने त्याला अलंकृत केलेलं आहे
या लेण्यांचा दर्शनी भाग हा जणू काही नव्या नवरीच्या शालू  पांघरावा असा आहे वृक्षवल्लीने नटलेली हि लेणी अप्रतिम सौंदर्याचे उत्तम असे ठिकाण आहे
शांतिमय ठिकाण असून निसर्गाने या ठिकाणाला नटलेले आहे
कोंडाणे गावातून वरती जंगलातून वरती आल्यावर जवळ गेल्याशिवाय लेण्यांचे दर्शन होत नाही जवळ जवळ गेल्यावर लेण्यांचे दर्शन होते समोरील असणारी चैत्याची कमान मनाला मोहून टाकणारी आहे
चैत्याच्या दर्शनी कमानीवर अनेक नक्षीकामाने अलंकृत केलेलं आहे
कोंडाणे  बुद्ध लेण्यांमध्ये एकूण ८  विहार आणि   चैत्यगृह आहे    या मधील विहार हे सर्वात    जुने आहेत हि लेणी  इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत
चैत्यगृह : या लेण्यातील जे चैत्यगृह आहे त्याच्या दर्शनी भाग हे पिंपळाच्या पानाच्या  वातायान असून छत हे गजपृष्ठाकार आहे या चैत्यगृहांची लांबी २२ मीटर लांब असून ८ मीटर रुंद व ८.५  मीटर उंच आहे स्तूपाचा  परीघ हा २.९ मीटर आहे  सध्याचा स्तूप हा  तोडून फोडून टाकलेल्या अवस्थेत आहे चैत्याला लाकडाची कमान होती जवळपास २००० वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आज हि आपणास पाहायला मिळते  चैत्याला स्तंभाचे वलय होते  यातील स्तंभ हे अष्टकोनी असून  स्तंभावर चिन्ह अंकित आहेत  आज ते स्तंभ भग्न अवस्थेत पडलेले आहेत
चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे  नक्षीकाम आहे तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात सुंदर असे युगलपट देखील  आपणास पाहायला मिळतात या युगल पटतील पुरुष हे योद्धे असावे कारण त्यांच्या हातात शस्त्र   पाहायला मिळतात  त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जे वर कोरलेले आपणास दिसतात
चैत्यगृहाच्या अगदी डाव्या बाजूला च एक यक्षाची  भग्न अवस्थेत असणारी मूर्ती आपणास पाहायला मिळते त्या मूर्तीच्या डोक्यावरील फेट्यावरील नक्षीकाम पाहून त्यावेळचे कलेचे वैभव काय आहे हे आपणास कळते  फेट्यावरुन हे शिल्प किती सुंदर असू शकते याचा विचार केला असता बुद्ध लेण्यातील हे वैभव आपणास पाहायला मिळते

विहार : चैत्यगृहाच्या बाजूला एक विहार आहे जवळपास आयताकृती हे विहार असून याचा दर्शनी भाग कोसळला आहे  आतमध्ये प्रत्येक बाजूस सहा असे एकूण अठरा भिक्षु निवास आहेत भिक्षु निवासाच्या दरवाजावर चैत्य गवाक्ष कोरलेले आहेत त्याशिवाय दरवाजे असल्याच्या खुणा देखील आहेत   संभामंड्प हा  ११ मीटर लांब आहे तर ९.५ मीटर रुंद आहे छतावर असलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी १५ स्तंभांची मांडणी असावी असे निदर्शनास येते
छताला रंगकाम असल्याचे अवशेष पाहायला मिळतात सभागृहाच्या बाहेर च्या भागात भिंतीला चैत्य कमानीप्रमाणे पिंपळाच्या पानाची कमानीत अर्धउठावदार स्तूप कोरलेले आहे वेदिका पट्टीची नक्षीकाम आहे  समोरील भाग कोसळल्या मुळे समोरील दर्शनी भागाची पडझड झाली असून तिथले अवशेष नष्ट झाले आहेत
तसेच याच विहाराच्या समोरील भागावर एक शिलालेख कोरलेला आहे जो सहज लक्षात येत नाही
या ठिकाणी असणाऱ्या विहाराची  रचना दोन मजली इमारती सारखी असावी असे आहे इथे असणाऱ्या सुंदर वास्तुकलेचा अविष्कार आपणास पाहायला मिळतो
ह्या लेण्यांची शिल्पकला कोरीव काम अप्रतिम व उच्च दर्जाचे आहे लेणी मध्ये असलेली भिक्षु निवास व लेण्यातील असणारे पाण्याचे व्यवस्थापन हे लेणी तिथे पाणी हि संकल्पना आपणास पाहायला मिळते
कोंडाणे लेणी मध्ये असणारी भिक्षु निवास हे इथे राहणाऱ्या बौद्ध भिक्षु साठी कोरण्यात आली प्राचीन काळी या ठिकाणी ऐतिहासिक अशी ओळख असणारी लेणी सध्या   भग्न अवस्थेत आहेतलेणी  लेणी मध्ये असणारी विहार हि भिक्षु च्या राहण्यासाठी चे भिक्षु निवास स्थळ आहेत

पाण्याची टाकी : ऐतिहासिक अश्या प्राचीन बौद्ध लेण्यात जल व्यवस्थापन हे अतिशय सुंदर आणि बारा हि महिने पाणी लेण्यात खेळते राहील याची केलेलि व्यवस्था म्हणजे बौद्ध लेण्यातील पाण्याचे टाके हे टाके वर्षभर भरलेले असते या मधील पाणी हे अतिशय थंडगार आणि शुद्ध असून पिण्यासाठी योग्य मानले जाते
पाणी आणि लेणी हे समीकरण जवळपास सर्व च लेण्यावर आपणास पाहायला मिळते

लेणी वर पोहोचण्याच्या वाटा 
मुंबई मार्गे व पुणे मार्गे कर्जत या रेल्वे स्थानकात उतरून कर्जत येथील मुख्य रस्त्यावर ब्रिज वर कोंढाने लेणी वर जाण्यासाठी खाजगी वाहने असतात  खाजगी रिक्षा ३०० रुपये घेतात तर कोंदिवडे पर्यंत ३० रुपये प्रत्येक सीट ने जाणारे खाजगी वाहने देखील आहेत

लेणी वर पाण्याची  व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था खाली गावात होते
लेणी वर राहण्याची व्यवस्था आहे लेणीत असणाऱ्या विहारात ५० एक माणसे राहू शकतील अशी जागा आहे
मधमाश्यांचे पोळे असल्याने सुगंधी द्रव्ये मारून जाणे टाळावे  शिवाय कोणते हि सुगंधी वस्तू सोबत घेवू नयेत

लेण्यांच्या माहितीसाठी ABCPR टीम च्या लेणी संवर्धक लोकांकडे संपर्क साधून या लेणी ची माहिती घेवू शकता

लेणीचे वर्कशॉप साठी ABCPR कडे संपर्क करावा

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “कोंढाणे बौद्ध लेणी KONDHANE BUDDHIST LENI

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat