कोळकेवाडी बौद्ध लेणी : संवर्धन दौरा

☸ ट्रेकिंग  बौद्ध  लेणी   : कोळकेवाडी बौद्ध  लेणी   ☸
🔥 दिवस : १४ फेब्रुवारी आणि १५ फेब्रुवारी    २०१८
🔥 कॅटेगरी : ट्रेकिंग  संवर्धन
🔥 लोकेशन : कोळकेवाडी बौद्ध  लेणी
🔥 कालावधी : २ दिवस
🔥  श्रेणी  : कठीण

३ डिसेंबर २०१७ रोजी कोळकेवाडी बौद्ध लेण्यांचे संशोधन झाल्यावर बौध्द लेण्यांचे संवर्धन कामासाठी कोळकेवाडी बौद्ध लेण्यावर आम्ही  निघालो कोळकेवाडी येथील लेणी संशोधन झाल्यावर त्यांच्या संशोधन कामासाठी संपूर्ण टीम लेणीकडे पोहचली.
प्रथम लेण्यांची  पाहणी करून कामाला सुरुवात  करण्यात आली
लेणी ची माहिती घेत लेणीची क्षमता पाहून लेण्याच्या कामाला सुरुवात केली
लेण्यात माती खूप असल्याने लेण्यातील माती काढण्याचे काम करण्यात आले लेण्यांची  साफ सफाई करण्यात आली

यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून बौद्ध बांधव या ठिकाणी आले होते लेण्याची माहिती घेत  लेण्यातील माहिती साफ करत संध्याकाळ पर्यंत लेण्यांचे काम चालू होते जवळपास खूप लेण्यांचा समूह असून लेणी पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही लेण्याचे ठिकाण अतिशय उंचावर आणि दुर्गम भागात असल्याने लेण्यांचे काम करण्यास अजून गती द्यावी लागणार आहे
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असणाऱ्या लेण्या ह्या  दुर्लक्षित असून त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे लेणीच्या संवर्धन कामासाठी कोळकेवाडी गावातील बौद्ध बांधवांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर  होते  लेण्यांच्या संवर्धनासाठी गावातील लोकांनी पुढाकार घेत या कामाला गती दिली
संपूर्ण टीम या ठिकाणी दोन रात्र राहून या  लेणीचे काम करत होते साधारण४० च्या आसपास लेण्यांचे अवशेष या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात यात काही लेणी अर्धवट तर काही लेणी हि पूर्ण असून या ठिकाणी वास्तव्य असल्याचे पाहायला मिळते  या ठिकाणी असलेले पाण्याचे टाके आपणास पाहायला मिळते  तसेच लेण्यात दोन मजली इमारत हि  पाहायला मिळते

संवर्धनाचे काही फोटो

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat