कोळकेवाडी बुद्ध लेणी संशोधन Kolkewadi Buddhist caves Research

☸ ट्रेकिंग  बुद्ध लेणी  : कोळकेवाडी बुद्ध लेणी   ☸
🔥 दिवस : रविवार दिनांक ३ डिसेंबर   २०१७
🔥 कॅटेगरी : ट्रेकिंग 
🔥 लोकेशन : कोळकेवाडी बुद्ध लेणी
🔥 कालावधी : एक दिवस
🔥  श्रेणी  : कठीण

दिनांक ३ डिसेंबर २०१७रोजी चिपळूण  तालुका रत्नागिरीला जिल्ह्यामधील कोळकेवाडी गावातील बौद्धवाडी च्या वरील डोंगरावर असणाऱ्या बुद्ध लेण्यांची माहिती आजवर अज्ञात होती गावातील लोक त्यांना पांडवलेणी म्हणून म्हणत असत शिवाय हा किल्ला म्हणून कोळकेवाडी दुर्ग म्हणून देखील याची माहिती दिली जाते परंतु किल्ला असावा असे कोणतेच या ठिकाणी अवशेष नाहीत पण लेण्या असल्याचे या ठिकाणी अवशेष मोठ्या प्रमाणावर आहेत हे पाहण्यासाठी दिनांक ३ डिसेंबर २०१७ रोजी टीम कोळकेवाडी लेण्यांवर दाखल झाली या लेण्यांचे संशोधन करण्यात आले साधारण या लेण्यांची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी मोठा लेणी समूह आहे अशी माहिती मिळाल्यावर त्याची शोध मोहीम सुरु झाली पहाटे सर्व लेणी संवर्धक या बुद्ध लेण्यांकडे रवाना झाले सर्वप्रथम पाण्याचे टाके असणारे विहार सापडले ज्यामध्ये स्तंभाचे कोरीव काम असून सध्या ते मातीने पूर्ण भरलेले होते व संपूर्ण विहारात  पाण्याचे स्वरूप आले होते 

त्यांनतर अजून वरच्या वाजूला भिक्षु निवास होते भिक्षु निवासाच्या बाजूला एक चैत्य गृह होते ज्याची कमान व स्तंभाचे कोरीव काम आपणास पाहायला मिळतात सध्या लेण्यात मोठ्या प्रमाणावर मातीने भरलेले पाहायला मिळते 

त्याच्या पुढे हि काही लेणींचे अवशेष आहेत
संपूर्ण टीम त्या ठिकाणी लेण्यांचे अस्तित्व पाहून संध्याकाळी पुन्हा घरी निघाली   
या लेण्यांवर संवर्धन मोहीम निश्चित करून

काही निवडक फोटो 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat