कोल बौद्ध लेणी / Kol Buddha Leni


लेणीचे नाव :
कोल  बौद्ध लेणी 
 लेण्यांची उंची : लेणीचा प्रकार  : दुर्लक्षित  लेणी                                                                              डोंगररांग       : सह्याद्री जिल्हा              : रायगड                                                                      श्रेणी               : मध्यम तालुका             : महाड               गाव                  :कोल  

लेणीचा इतिहास :  या लेण्यांचा इतिहास पाहता हि सातवाहन कालीन लेणी आहेत गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या अधिपत्याखाली अपरांत संघराज्य होते
नहपान राजाकडून अपरांत गौतमी पुत्र सातकर्णी ने आपल्या अधिपत्याखाली घेतले होते
याच वेळी भारतात बौद्ध धम्म हि जोमाने वाटचाल करीत होता सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून सातवाहन राजांचा उल्लेख सापडतो आणि अशोकाच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धम्म प्रगतीच्या उंच शिखरावर होता अगदी इसवी सन दहाव्या शतकानंतर हि
कोल लेण्याची  बांधणी सातवाहन काळात असून ती भिक्षु ना निवास करण्यासाठी बांधलेली लेणी आहे शिवाय हा एक व्यापारी मार्ग देखील असल्याने या ठिकाणी व्यापाऱ्यांना विसावा घेण्यासाठी देखील या लेण्यांचा वापर केला जात असावा कारण यासाठी जवळपास सहा भिक्खू निवास आहेत
या लेण्या बांधण्यामागाचे कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भिक्खू  प्रवास करीत असतात त्याच्या राहण्याची व्यवस्था म्हणून हि लेणी कोरलेली आहेत
या लेण्यांवर असणाऱ्या लेखात लेणी कोरण्यासाठी दान देणाऱ्या  लोकांची नाव देण्यात आली आहेत
या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका , तसेच ब्यूलर यांचा इंडियन पॅलिओग्राफी यामध्ये तर ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत 

पाहण्याच्या गोष्टी :सविस्तर लेण्यांची माहिती पाहू या
लेणी क्रमांक १. :हि एक छोटे भिक्षु निवास आहे सध्या ते मातीने पूर्ण भरलेले असून त्यावरील शिलालेख हि अस्पष्ट झालेला आहे या लेण्या भिक्षु ना राहण्यासाठी बांधल्या असून या लेण्या मुख्य लेण्याच्या अगदी उजव्या हाताला असणारी छोटी लेणी आहेत याचा वापर राहण्यासाठी किंवा अध्ययनासाठी केला जात असावा
हि लेणी कोरणाऱ्या चे लेखामध्ये नाव आहे पण ते सध्या अस्पष्ट झालेले आहे वाचता येत नाही इथे कोणती हि कलाकुसर आपणास पाहायला मिळत नाही कारण लेणी मातीने पूर्ण भरलेली आहेत
लेणी क्रमांक २. :हे मुख्य विहार लेणी आहे या ठिकाणी प्रर्थानास्थान असण्याची शक्यता आहे कारण हे लेणे मातीने पूर्ण भरलेले आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ह्या लेण्यात काही नाणी वैगरे सापडली आहेत  या लेण्यांची कमान आपणास स्पष्ट पाहायला मिळते शिवाय लेण्यांच्या आतमध्ये एक छोटी संघाराम पाहायला मिळते तसेच हे विहार ऐसपैस असे आहे याची साधारण उंची पाहता कमीत कमी २० फुट असू शकते
मातीने भरलेले असल्यामुळे या लेण्यात पूजा स्थान असण्याची दाट शक्यता आहे
लेण्याच्या डाव्या बाजूला आतमध्ये एक खोली आहे  कदाचित या खोलीमध्ये एखादे मुर्तीस्वरूप असण्याची शक्यता आहे कारण लेणी पूर्ण मातीने भरलेली आहेत
या लेण्याच्या डाव्या बाजूला भिंतीवर एक शिल्लेख कोरलेला आहे यात  ” ठरट गह्पती पुतस सेठीस संघरखित सदय धम लेन असा उल्लेख याचा अर्थ ठरट गृहपतीचा मुलगा श्रेष्टी संघरक्षित याने हे धम्म लेन दान दिल्याचा उल्लेख आहे  या उल्लेखानुसार हे मुख्य लेन असून बौद्ध धम्माशी सबंधित आहे अश्या प्रकारचे विहार इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण या ठिकाणी विहाराचे प्रवेश द्वार समोर असून आतमध्ये डाव्या बाजूस एक खोली आहे त्यामध्ये प्रार्थनेसाठी एखादे शिल्प असू शकते
हे लेन देणारा ठरट गृहपती हा व्यापारी आहे आणि या व्यापाऱ्याने हे लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे
या लेण्यांचे बांधकाम साधारण इसवी सन पूर्व पहिल्या शतकात केलेलं आहे
याची बांधणी शैल गृहाप्रमाणे आहे एक मोठे विहार म्हणून आपण ते पाहू  शकतो मातीने भरल्यामुळे त्याचा दर्शनी भाग आपणास छोटा वाटतो परंतु   हे  मोठे प्रशस्त असे लेणे आहे
याच्या आतमध्ये असणारी खोली देखील पूर्णपणे भरलेली आहे  या लेण्यांचे एकून आकारमान येथील सर्व लेण्यापेक्षा मोठे असून हे मुख्य लेणे आहे
लेण्यावर कोणती हि कलाकुसर नाही पण कोरीव शिलालेख मात्र आहेत
लेणी क्रमांक ३. :हे एक  छोटे से संघाराम आहे अगदी प्रमुख लेण्याच्या बाजूलाच हे कोरलेले आहे व याच्याच बाजूंला प्रमुख लेण्याविषयी चा  शिलालेख आहे  या लेण्यांची पडझड झालेली असून आतमध्ये  एक कोरीव आसन आहे जे भिक्षु ना ध्यान साधना करण्यासाठी कोरलेले आहे या तिथे आराम करण्यासाठी ते कोरलेले असावे
अगदीच छोटे से असे आहे छोटा सा दरवाजा आहे व आतमध्ये आडव्या पद्धतीने आसन आहे बाकी लेन हे प्रमुख लेण्याच्या बाजूलाच आहे
सध्या लेणे हे भग्न अवस्थेत आहेत समोर मातीने पूर्ण भरलेले आहे
लेणी क्रमांक ४. :हे भिक्खू निवास आहे हे भिक्खू गृह आहे अगदी कोरीव असे हे लेणे आहे एकाच दगडात हि सारी लेणी कोरलेली आहे  या लेण्यात एक आसन व्यवस्था आहे तसेच समोर एक दरवाजा व एक खिडकी अश्या पद्धतीचे त्याचे बांधकाम आहे समोर मातीने पूर्ण भरलेले आहे त्यामुळे हे लेणे पडझड झालेली आहे भग्न अवस्थेत च हि लेणी आहेत
या लेण्याच्या वरती एक शिलालेख कोरलेला आहे
यामध्ये ” अघासकस  गमिकियसा  सिवदतस लेणे ”
अघासकस  गावातील उपासक सिवदत्त  याने या लेण्यांचे दान दिलेले आहे
हि सध्या पडझड झालेली आहे व मातीने भरलेली आहेत
या लेण्यात असणारा शिलालेखाची लिपी हि ब्राह्मी असून सातवाहन कालीन आहे लेणी क्रमांक ५ :हि देखील भिक्खू निवास आहेत या लेण्यात एक आसन व्यवस्था आहे शिवाय या लेण्याच्या चौकटीवर एक शिलालेख आहे  या लेण्याचा दरवाजा व एक खिडकी असे प्रवेश करण्यासाठी ची समोरील जागा आहे आतमध्ये अत्यंत कोरीव खोदकाम केले असून एकाच दगडात त्यांनी हि लेणी कोरलेली आहेत
काळ्या पाषाणात हि लेणी उठावदार दिसतात या लेण्याचे देखील एक दरवाजा एक खिडकी अशीच मांडणी आहेत आतमध्ये आसन अश्या पद्धतीची मांडणी आहे  या लेण्याच्या प्रवेश द्वारावर शिलालेख आहे
त्यामध्ये अशी माहिती आहे ” भद्र उपासकस दुहुतूयसिरिय सिवदतस बितीया काय लेन देय धम्म ”
भद्र उपासकाची कन्या व सिवदत्त याची पत्नी धम्म सिरी हिने धम्म दान केलेली लेणी  असा उल्लेख या लेण्यावर आहे सिवदत्त व त्याच्या बायकोने हि दोन लेणी दान केलेली आहेत
लेण्यांची माडणी साधी आहे केवळ भिक्खू ना राहण्यासाठी हि निवासस्थान म्हणून कोरलेली आहेतलेणी क्रमांक ६ :हा एक संघाराम आहे पण हा सध्या पूर्ण मातीखाली गाडला गेलाय याच्या आजूबाजूच्या कोरीव खुणा फक्त दिसत आहेत  याचे उत्खनन केल्यास ते एक मोठे संघाराम सापडेल  या  इथे एक भिक्खू निवास असण्याची शक्यता आहे हे लेणे  मातीखाली असल्यामुळे याची जास्त माहिती सांगता येत नाही तरी हे एक संघाराम असुन इतर प्रमाणेच इथे हि आसन व्यवस्था असेल
लेणी क्रमांक ७ :हि अत्यंत साठी लेणी आहेत कोणते कोरीव काम नाही या लेण्यात केवळ एक संघाराम आहे भिक्षु न निवास करण्यासाठी बांधलेली हि लेणी आहेत हे आकाराने थोडे मोठे आहे कोपर्यातील  बाजूंला हि लेन आहे यामध्ये चौकोनी कडा आहे कोरीवपणे कोरलेली आहेत आतमध्ये सध्या पद्धतीची बांधणी आहे पण हि लेणी आता भग्न अवस्थेत आहेत  इथे दुर्लक्ष असल्यामुळे या लेण्या शेवटच्या घटका मोजत आहेत असे दिसते
सदर सर्व लेण्या पाहिल्यानंतर  हि बौद्ध धम्माच्या भिक्खू साठी बांधण्यात आलेली बौद्ध लेणी आहेत या लेण्यांची बांधणी एकाच दगडात कोरलेली आहेत कातळात हि लेणी कोरलेली आहेत याच्या बाजूच्याच डोंगरात अजून काही  लेणी आहेत
शिवाय  कोल लेणी हि प्राचीन लेणी असून सातवाहन कालीन इतिहास आहे त्यांचा पुरातन वारसा मौल्यवान आहे
बौद्ध लेण्यांची अशी अवस्था कायम होत राहिलेली आहे कारण लोकांच्या मनात असणारे अज्ञान आणि यामुळेच हि लेणी आजवर अशीच पडलेली आहेत
सदर लेण्या शोधण्याचे काम ABCPR लेणी संवर्धक टीम चे लेणी संवर्धक  आयु. मुकेश जाधव यांनी केले असून त्या गावातील सर्वच तरुण व जाणत्या लोकांनी आता लेणी संवर्धनासाठी कंबर कसलेली आहे
हि लेणी उपेक्षित राहू नये म्हणून  याकडे लक्ष देणे आवश्यक आहे
बौद्ध लेण्यांचे ऐतिहासिक्त्व जगाला माहिती व्हावे म्हणून प्रयत्न करू या
लेण्यावर पोहोचण्याच्या वाटा  : रायगड मधील महाड या  बस स्थानका बाहेरून कोल गावात जाण्यासाठी खाजगी वाहने असतात त्याचा वापर करून आपण कोल या गावी बौद्धवाडी मध्ये उतरावे  तिथून सरळ वरती चालत आल्यास बुद्ध विहार आहे तिथे बौद्ध बांधवाना घेवून लेण्यावर जाता येते अन्यथा लोकेशन सर्च करून जाऊ शकता कोल बौद्ध लेणी जीपीएस लोकेशन 

लेणी वर वर्कशॉप साठी ABCPR टीम कडे संपर्क साधावा

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat