कार्ला बुद्ध लेणी शिलालेख / Karla Buddhist Leni Inscription

KARLA BUDDHIST LENI

कार्ला बौद्ध लेणीच्या चैत्यगृहाच्या मधील  आणि उजव्या दरवाजांवरील दुसऱ्या व तिसऱ्या पट्टीवर सहा ओळीत कोरला आहे.बौद्ध धम्माला मिळालेला राजाश्रय गौतमीपुत्र सातकर्णी याचा हा आदेश आहे यावरून गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा बौद्ध धम्माचा अनुयायी होता हे अजून जास्त सांगण्याची गरज नाही शिवाय या शिलालेखात च काय कार्ला मधील शिलालेखात एकविरेचा उल्लेख आलेला नाही आता इतिहासकार कसा इतिहास लिहतात बघा सातकर्णी राजाच्या आदेशात कुठेच दिवीचे नाव नाही कोणत्या हि शिलालेखात नाव नाही  यावरून हि देवीची मूर्ती तिथे पहिली होती आणि मग नंतर लेणी बांधली असे होऊ शकणार नाही कारण लेणी कोरणाऱ्या ना तिचा  उल्लेख नक्की केला असता  याचा अर्थ हि देवीची मूर्ती हि नक्कीच लेण्यातील एखादे शिल्प असणार जे मूर्तिकला सुरु झाल्यावर ची आहे नाही तर राजाच्या आदेशात देवीचे उल्लेख आले असते पण देवीची निर्मिती हि खूपच अलीकडे केलेली वाटते  थोडक्यात बौद्ध धम्माचा प्रभाव हे पाहण्यासाठी खालील शिलालेख पहा 

(आनपयति) मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवानपवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालाहारे उतरे मगेगामे करजकेभिखुहले  ददम  एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि  एतस चसगामस करजकान भिखुहलपरिहार वितराम  अपावेस अ . . . . पारिहारिक च  एतेहि न परिहारेहि परिहरह  एतस चस गाम करजकेभिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत . . . . छतो विजयठसातारे दतो ठे. . .  पटिका सव 
वा प  दिव सिवखदगुतेन कटा .

मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की वलुरक येथील लेण्यांत वास्तव करणाऱ्या भिक्षूंच्या संघाला महासंघिकांना निर्वाहाकरिता मामाड आहारातील (विभागातील) उत्तरेच्या मार्गावरील करजक गावात भिक्षुहल (भिक्षूंकरिता जमीन) दिले आहे. म्हणून तुम्ही त्यांना त्या जमिनीचा ताबा द्यावा.
या करजक गावातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत. या जमिनीत कोणी (अधिकाऱ्यांनी) प्रवेश करू नये. त्यात हस्तक्षेप करू नये. तश्याच (अन्य) सवलती दिल्या आहेत. या (सर्व) सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गांव आणि भिक्षुहलसंबंधित सवलतींची तुम्ही नोंद करून ठेवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती विजयी शिबिरात राजाने दिली आहे. तिची पट्टीका संवत्सर १८ वर्षापक्ष ४ दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.

मामाड किंवा मामाल (आजचा मावळ तालुका) हा मावळ प्रांतासंदर्भातील सर्वात जुना पुरावा आहे. त्याचबरोबर लेखात उल्लेखलेले वलुरक म्हणजे आताचे कार्ले गांव. ह्या कार्ले गावापासून ७-८ किमीवर करजगाव आहे. तेच लेखातील करजक गाव. ह्या लेखाचा सुरुवातीचा भाग नष्ट झाल्यामुळे ही आज्ञा कोणत्या राजाने आणि कुठून दिली हे इतर शिलालेखांवरून ठरवता येते. ह्या लेखात उल्लेख आलेले करजक गांव पूर्वीच उसभदत्ताने (ऋषभदत्त) याने वलूरक लेण्यांमध्ये वर्षावास काळात राहणाऱ्या भिक्षूंच्या निर्वाहाकरीता दिल्याचा शिलालेख कार्ले येथे आहे. त्या शिलालेखात करजक गावाचा उल्लेख करजिक असा केलेला आहे.

अशाच पद्धतीचा विजयी शिबिरातून गौतमीपुत्र सातकर्णीने आज्ञा दिलेला शिलालेख लेख नाशिक येथील लेणी क्र. ३ मध्ये आहे. कार्ले येथील आज्ञासुध्दा विजयी शिबिरातूनच दिलेली आहे. आधी ऋषभदत्ताने महासंघिकेला दिलेले दान विजयी राजाने पुन्हा महासंघिकेला दिले आहे. तसेच नाशिक लेखात संवत्सर १८ आहे, कार्ले येथील लेखाचे संवत्सर सुध्दा १८ आहे. नाशिक येथे संवत्सर १८ वर्षापक्ष २ दिवस १ या दिवशी त्रिरश्मी येथील भिक्षुंना अजकालकिय शेत दान दिल्यानंतर दोन आठवड्यांनी गौतमीपुत्र सातकर्णीने पुणे आणि आजूबाजूचा परिसर क्षत्रापांकडून जिंकून घेतल्यानंतर कार्ले येथील महासंघिय पंथाच्या भिक्षूंना हे करजक गांव दिले असल्याचे हा शिलालेख आहे इथे वर्षापक्ष ४ थे  आहे म्हणजे  २ च आठवड्याने याचा अध्यादेश दिलेला आहे 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “कार्ला बुद्ध लेणी शिलालेख / Karla Buddhist Leni Inscription

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat