कान्हेरी बुध्दलेणी धम्मोत्सव

ABCPR टीमच्या वतीने मागिल काही दिवसांपासून सातत्याने कान्हेरी बुध्दलेणी येथे आयोजित धम्मोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत होतो. त्यामुळे मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार आणि सहभागी धम्मबांधवांचे अभिनंदन. कालचा धम्मोत्सव आवश्यक होता कारण त्यामागच कारणही काहीस संवेदनशील होतं. जे बांधव सहभागी झाले नाहीत ते सहभागी झाले असते तर त्यांच्या लक्षात आले असते की लेणी संवर्धन का आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व विभागाने आणि पोलिस प्रशासनाने केलेली आवश्यक तयारी वेळोवेळी जाणवत होती. प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता का भासली असेल, किंवा त्यामागे असणारी संवेदनशीलता याची जाणीव कान्हेरी लेणीवर आलेल्या बांधवांना काल नक्कीच झाली असेल.

गेली अनेक वर्षे आम्ही मिळेल त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून सातत्याने प्रयत्न करतोय की जास्तीत जास्तं लोकांचा सहभाग कशा प्रकारे वाढेल. कारण प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संख्येत वाढ होणं गरजेचं आहे. लोकांनी टाळाटाळ केली आणि हीच परिस्थिती कायम राहिल्यास आपण काहीच करू शकणार नाही. येणारा काळ खूप संघर्षाचा असणार आहे.

महाशिवरात्रीला प्रत्येक वर्षी प्रशासन काळजी घेताना दिसुन येतं पोलिस बंदोबस्त किंवा भारतीय पुरातत्व विभाग लेण्यांवरती येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करून आतमध्ये सोडून विशेष काळजी घेत होतं. त्यामुळे यासारख्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात कारण निर्माण होणारा संभाव्य धोका प्रशासनाला टाळायचा असतो. मग या सुविधा कायम का नसतात हा प्रश्न निर्माण होतो त्याच उत्तर म्हणजे आपला समाज फक्त आणि फक्त सिझनल जागरूक होतो. बाबासाहेबांची जयंती, पुण्यतिथी आणि मागील काही वर्षांपासून एक जानेवारी. बस चळवळ फक्त इथेच घुटमळत राहतेय. आपला हा धम्माचा वारसा कोणीतरी नष्ट करू पाहतय याकडे आपल लक्षच नाही. मग कोणीतरी येऊन तुमच्या लेणीमध्ये कोणी कुत्रही येत नाही हे बोलतो आपल्याला हिनवतो तेव्हा मात्र आपल्या भावना दुखावल्या जातात दोन तीन दिवस सोशल मीडियावर निषेधांचा महापूर येतो. आणि काही दिवसांत तो विरूनही जातो. पण आपल्या भावना सुध्दा अशाच कधीतरी उफाळतात आणि त्या महापूराप्रमाणे लगेचच विरून जातात. भावनांचा उद्रेक न करता संविधानीक पध्दतीने त्यांना कृतीची जोड द्यायला आपण का विसरतो हा प्रश्न शिल्लक राहतोच.

दिलेल्या सुविधा असतील तर त्या काही एकाएकी घडून आलेल्या नाहीत त्यासाठी अनेक संघटनांनी मागील अनेक वर्षांपासून एकत्रित केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे. येत्या काही दिवसांत त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी सतत कार्यरत राहून नेहमीच प्रयत्न करावे लागणार आहेत. प्राचीन वास्तूंकडे सरकारी यंत्रणा लक्ष देत नाही हे खर आहेच परंतु येणाऱ्या काळात आपणही निदान तरुणांनी एकत्र येऊन संघटित पाठपुरावा करण्यासाठी मोठा संघर्ष उभारला जावा यासाठी प्रयत्न करुयात.

 • लक्ष्मण कांबळे

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat