जागतिक महिला दिन

खरे पाहता जगात स्त्रियांना आपले हक्क मांडण्याचा अधिकार च या जगात नव्हता हे एक जागतिक सत्य आहे कारण मताधिकार हा जवळ जवळ विसाव्या शतका पर्यंत स्त्रियांना दिला गेला नव्हता तो अधिकार मिळावा म्हणून जगात अनेक स्त्रिया संघर्ष करीत होत्या १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु हि सुद्धा वर्णभेदी निघाली आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.या मध्ये  क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. तसेच ७१ ला पुण्यात साजरा करण्यात आला मग १९७५ ला युनो ने जागतिक महिला दिन म्हणून ८ मार्च  घोषित केला . 

आता महिला दिनाचा थोडा इतिहास पाहिलात कसा साजरा करण्यात आला तो पण  जगाने महिलांना ते सर्व अधिकार दिले अगदी घरापासून संसदेपर्यंत प्रत्येक स्तरावर महिलेला पूर्ण स्वतंत्र बहाल केले पण भारत आज हि अपवाद आहे याला अशी अनेक  राष्ट्रे आहेत केवळ भारतच नव्हे पण भारत विशेष करून कारण या भारत देशात महिला ह्या केवळ उपभोगाची वस्तू म्हणून मानली जात  असे आणि केवळ आणि केवळ उपभोग यासाठीच तिचा वापर 

पण याच भारतीय महिलांना खरा न्याय  देण्यास सुरुवात केली ती तथागत बुद्धाने महिलांचा आद्यप्रवर्तक म्हणून आपण बुद्धाकडे पाहू शकतो  कारण जिथे महिलांना डोक्यावरचा पदर काढण्याची मुभा नव्हती तिथे महिला एक भिक्षु होवून तमाम जनतेला मानवतेचा महान संदेश देत होती हे वास्तव रुपी काम  बुद्धाने सुरु केले 

पुढे अशोकाने आपली कन्या संघमित्रा हिलाच धम्माच्या प्रसाराकरिता जगात पाठवले सिंहल म्हणजे आजचे श्रीलंका ठिकाण इथे बुद्ध धम्माला नेण्याचे काम या स्त्रीने केले 

महाप्रजापती गौतमी हि चिरप्रव्रजित भिक्खुनी श्राविका मधील पहिली भिक्खुनी होय तथागत यांची आई व मावशी दोन्ही नाती जपत सिद्धार्थ बुद्ध झाल्यावर गौतम बुद्ध ह्या आपल्या मावशीच्या आद्य नावाने जगप्रसिद्ध झालेमहाप्रजापती हि शाक्यांची महाराणी असून  शुद्धोधन यांची पत्नी होती नंद नावाचा तिला  मुलगा होता तथागतांच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसात महामाया यांचे निधन झाल्यावर सिद्धार्थ यांचे पालनपोषण आई प्रमाणे  केले 
अर्हत भिक्खुनी म्हणून भिक्खू संघात महिला म्हणून महा प्रजापती हि भिक्खुनी संघातील सर्वात महत्वाच्या होत्या त्यांनतर बुद्धाच्या  भिक्खू संघात असंख्य महिला अर्हत पदा पर्यंत गेल्या हा स्त्री ला मिळालेला सर्वात मोठा मानाचा स्वाभिमानाचा इतिहास आहे आणि तो महिलांचा मिळालेला बहुमान आहे. महाप्रजापती यांनी बुद्धाने दिलेल्या शिकवणीनुसार आदर्श भिक्खुनी संघ निर्माण केला खर्या अर्थाने भारतातील इतिहास हा महिलांच्या इतिहासाचा गौरव असणारी हि बाब आहे. 

भिक्खुनी खेमा :  मगध नरेश बिम्बिसार यांची पत्नी म्हणून त्यांचा इतिहास आहे परंतु  बुद्ध जेव्हा वेळूवनात राहत होते तेव्हा बिंबिसार  वारंवार त्यांच्या दर्शनाला जात असे शिवाय तथागत हे रूप हे अनित्य आहे रूपावर आसक्त होवू नका असे उपदेश देत असत हे तिच्या कानावर आले होते खेमा हि वेळूवनात जाण्यासाठी तयार नसे म्हणून बिम्बिसार राजाने कवी ला वेळूवनातील वनश्री बाबत रसभरीत कविता ऐकवली तिला त्याकडे जाण्यास आकर्षित केले असा  इतिहास नोंद केला जातो आता वेळूवनात गेल्यावर भगवंतांचे दर्शन घ्यावे लागणार  आणि बिंबिसार ने तसे तिला सांगितले हि होते पण टी वेळूवनातील निसर्ग पासून पुन्हा माघारी फिरली असता नोकरांनी बिंबिसार यांची आज्ञा सांगितली तेव्हा नाखुसीने तिला बुद्धाकडे जावे लागले ज्यावेळी टी बुद्धाकडे येत असते वेळी तिचे लक्ष बुद्धाच्या सेवेस असणाऱ्या स्त्रीकडे पाहून एवढी लावण्यवती स्त्री बुद्धाच्या सेवेला येतात आणि या स्त्री पुढे मी काहीच नाही हे पाहून तिच्या मनातील अहंकार नष्ट होवू लागला बुद्धाकडे गेल्यावर बुद्धाने तिला धम्म सांगण्यास उ=सुरुवात  केली आणि बुद्धाच्या शिकवणी नुसार पुढे हीच खेमा अर्हत पदाला गेली पुढे टी बिम्बिसार यांची आज्ञा घेवून भिक्खुनी झाली आणि  भिक्खुनी संघातील एक महान भिक्खुनी झाली 
बुद्ध ज्यावेळी अनाथ पिंडक याच्या जेतवनात राहत होते तेव्हा त्यावेळी खेमा साकेत  च्या जवळ असणाऱ्या तोरणवत्थू  गावात वर्षावास साठी होती प्रसेन जीत राजा श्रावस्ती ला येत असताना या गावात विश्रामाला होता  त्यावेळी त्याला ब्राह्मणाचा किंवा श्रमनाचा उपदेश ऐकण्याचा इच्छा झाली त्याने चौकशी केल्यावर कळले खेमा पेक्षा जास्त विद्वान या गावात कोणी नाही  आणि मग खेमा प्रसेनजीत यांना उपदेश करण्यासाठी  गेली असता राजाने प्रश्न केला  कि आर्ये तथागत मरणोत्तर होते कि नाही त्यावर खेमा म्हणाली हे तथागत यांनी सांगितले नाही त्यावेळी राजाने विचारले असे काय कारण असेल त्यावेळी खेमा म्हणाली कि तुमच्याकडे असे कोणी आहे का कि जो समुद्राचे पाणी मोजू शकेल त्यावर राजा म्हणाला हे कसे शक्य आहे समुद्र खूप अमर्याद आहे खेमा त्यावर म्हणाली कि त्याचप्रमाणे तथागत यांना मोजता येणे शक्य नाही तथागातांचे रूप नष्ट झाले  कि ज्या वेदनेने ज्या संज्ञा ने ज्या संस्कार नि ज्या विज्ञानाने तथागत यांना मोजता येईल ते सर्व नष्ट  झालेलं असेल म्हणजेच मरणोत्तर तथागत होते कि नाही तर सरळ उत्तर  आहे शक्य नाही 
त्यानंतर हेच प्रश्न प्रसेनजीत यांनी बुद्धाला विचारले असता बुद्धाने हि तेच उत्तर दिली दोघांची  उत्तर सारखी होती एवढे धम्मात परिपक्व झाले होती  अश्या प्रकारे महिला भिक्खुनी मध्ये सर्वोच्च पदाला जावून पोहचली 


उप्पलवन्ना  तसेच पटचारा धम्म दिन्ना नंदा सोना सकुला भद्दा कुण्डल केसा भद्दा कापिलानी भद्दा कच्चाना किसा गौतमी सिगाल माता अश्या महान  भिक्खुनी होवून गेल्या आहेत त्याच प्रकारे असंख्य उपासिका देखील होवून गेलेल्या आहेत हा महिलांचा आलेख पाहता जगातील असा कोणताच जागतिक धर्म नाही ज्यांच्याकडे एवढी स्त्रियांची श्रुंखला सापडू शकेल एवढ्या महान स्त्रियांचे योगदान सापडू शकेल शिवाय असंख्य स्त्रिया ह्या शासन कर्त्या होत्या  आणि हा इतिहास जगातील कोणत्याच धर्माला नाही जो केवळ बौद्ध धम्मात च आहे 
 बौद्ध धम्माचा वारसा अभ्यासात असताना महिलांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी जर का कोणती विचारधारा असेल  ती केवळ आणि केवळ बुद्धाची शिकवण आहे अन्य कोणत्या हि शिकवणीत हि विचारधारा सापडत नाही एखाद्या स्त्री ला सर्वोच्च अशी ठिकाणी पाहू शकेल 
हा त्या शिकवणीचा प्रभाव आहे त्या विचार धारेचा प्रभाव  आहे . 
आज  भारतीय संविधानाने ते सारे अधिकार देवू केलेत हि बाबासाहेबांची बुद्धाप्रती असणारी  जवळीक होती  बाबासाहेब बुद्धाकडे वळले बुद्ध विचारधारा सापडली जी विचारधारा हजारो वर्षापूर्वी या देशातील स्त्रियांना महान बनवून गेली अश्या देशात आम्ही विषमतावादी का झालो यावर हा खरा विचार झाला पाहिजे होता जो बाबासाहेब यांनी केला आणि त्या नुसार च  अधिकार संविधानिक पद्धतीने देवू केले 
जागतिक महिला दिनी सर्व भारतीयांना खूप साऱ्या सदिच्छा 
चला बुद्ध समजून घेवू बुद्ध जाणून घेवू आणि आचरणात आणू 

जागतिक दिनानिमित्त त्रीरश्मी बुद्ध लेणीवर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ABCPR महिला लेणी संवर्धक टीम उपस्थित आहे सर्वाना त्याचे निमंत्रण

Team ABCPR 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat