भारताच्या इतिहासातील शिक्षणाचा सुवर्णकाळाची माहिती देणारी कान्हेरी निर्वाणभूमी

महाराष्ट्राला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . महाराष्ट्रात असंख्य गिरिशिल्प अर्थात काळ्या पाषाणात कोरलेली असंख्य कोरीव शिल्प म्हणजेच लेण्या आपणास पाहायला मिळतात. कान्हेरी म्हटले कि डोळ्यसमोर उभा राहतो तो भारताच्या गौरवशाली शिक्षणाचा दैदिप्यमान इतिहास . इसवी सनाच्या पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट चक्रवर्ती अशोकाने या भूभागाला आपली प्रांतिक राजधानी चा दर्जा देत इथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्रांती निर्माण केली. आणि प्राचीन काळापासून च हे शहर आर्थिक क्रांतीचे केंद्रस्थान राहिलेले आहे ते आजपर्यंत. कान्हेरी लेण्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे या लेण्यात एक महत्वपूर्ण अशी जागा जी जगाच्या इतिहासात खूप कमी ठिकाणी आहे आणि जरी कुठे असली तरी त्यांचा लिखित पुरावा सापडणे खूपच कमी.
कान्हेरी लेणी समूहात निर्वाणभूमी नावाची संकल्पना ऐकूनच त्याविषयी जिज्ञासा निर्माण होते. निर्वाणभूमी म्हणजे दुःख मुक्त माणसांच्या शेवटच्या क्षणाची जागा जिथे त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करून त्या शरीर धातूवर स्तुपांची निर्मिती केली जात असे . कान्हेरी मधील हे ठिकाण सर्वांसाठी नवीन च वाटते कारण आजपर्यंत हे ठिकाण कुणाला सहज पाहता आलेले नाही. हि लेणी या लेणी संकुलातील ८७ क्रमांकाची लेणी आहेत. निर्वाणभूमी अर्थात स्मशान लोकांच्या मनावर दडपण असतेच याचे कि स्मशानात कसे जायचे शिवाय ते लोकांसाठी एक नवीच होते कि स्मशानात बुद्धाचा स्तूप कसा काय बुद्ध शिल्प कशी काय याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात आणि याचे उत्तर सुरुवातीला असलेला शिलालेख देवून जातो .

निर्वाणभूमी च्या सुरुवातीलाच बुद्धाच्या पायांचे चिन्ह आणि एक शिलालेख या सर्व निर्वाणभूमीचा अर्थ सांगून जातात बुद्धाच्या पावलांच्या वरच्या भागात परिगहिता हा शब्द लिहिलेला आहे हा धम्मलिपी मध्ये लिहिलेला असून यांचीजी भाषा आहे हि प्राकृतपाली आहे . परिगहिता चा अर्थ होतो आपल्या गुरूच्या पावलावर पाउल टाकत जावून निर्वाण साधने थोडक्यात . बुद्धाच्या पावलावर पाउल टाकत हे सारे भिक्षु निर्वाणपदाला पोहचले याचे ऐतिहासिक लिखित पुरावे या लेण्यात आपणास पाहायला मिळतात

निर्वाणभूमी चा शोध जेम्स बर्ड यांनी १८३९ मध्ये कान्हेरी लेणी वर येवून प्रथम लावला त्यावेळी त्यांना निर्वाणभूमी मध्ये असलेला स्तूपाचे उत्खनन करताना एक वर्तुळाकार पोकळ असा दगड भेटला तो दगड जिप्सम च्या तुकड्यांनी त्याला झाकले होते आतमध्ये दोन कलश सापडले होते. एका कलशात लाल रुबी रक्षा एक मोती सोन्याचे तुकडे व सोन्याची पेटी होती तर दुसऱ्या कलशात चांदीची पेटी रक्षा होती शिवाय दोन ताम्रपट देखील होते . जेम्स बर्ड यांनी १८४७ ‘Historical Researches on the origin and principles of the Buddha and Jaina Religions’  नावाचे बुक लिहून याविषयीचे काही ठसे व शिलालेखांचे ठसे या पुस्तकात लिहिले आहेत . जेम्स बर्ड यांच्या नंतर याचे काय झाले त्या कलाशांचे काय झाले याबाबत आज पर्यंत माहिती नाही .
या ठिकाणी मुख्य स्तूपाच्या पायाचे उत्खनन १८५४ ला वेस्ट या अधिकाऱ्याने केले त्यांना या ठिकाणी अनेक शिल्पपट सापडले त्यात सिंह हरीण वाघ कीर्ती शिल्प तसेच बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा योगमुद्रा अश्या विविध प्रकारच्या शिल्पपट इथे सापडले शिवाय स्तूपाचे अवशेष हि सापडले.

निर्वाणभूमी मध्ये १६० पेक्षा जास्त अर्हत भिक्षूंच्या स्तूपाचे अवशेष आपणास पाहायला मिळतात. जवळपास हि निर्वाणभूमी खूप मोठ्या परिसरावर पसरलेली आहे शिवाय प्रत्येक ठिकाणी दगडात कोरलेले स्तूप देखील आपणास पाहायला मिळतात. या ठिकाणी मुख्य स्तूप हा जवळपास ३५ फुट उंचीचा असून छतासाठी दगडात जागा केल्याची आपणास पाहायला मिळते स्तूपाच्या बाजूला भिंती मध्ये आत तीन खोल्या खोरल्या असून त्यात अनेक मुर्त्यांची शिल्प कोरलेली आहेत यात बुद्धाच्या त्रिमूर्ती शिल्पकला आपणास या ठिकाणी पाहायला मिळते . मुर्त्या ह्या सिंहासनावर बसलेल्या असून प्रलंबपाद आसन व्यवस्था तर धम्मचक्र प्रवर्तना मुद्रे मध्ये मुर्त्या आहेत बाजूंला पद्म पाणी वज्रपाणी बोधिसत्वांच्या शिल्प असून सिंहासनाच्या बाजूंला सिंहाचे शिल्प कोरलेल आहे. तसेच वरच्या भागात विद्याधर कोरलेल असून ते उच्च विद्याविभूषित असल्याचे शिल्पकाराने कोरलेले आहे .

कान्हेरी लेणीचे उत्खनन १८३९ ला जेम्स बर्ड याने केले लेणी क्रमांक ३ च्या समोर असणाऱ्या स्तूपाचे उत्खनन करत असताना त्या ठिकाणी त्यांना एक ताम्रपट सापडला हा ताम्रपट त्रेकुटक राजांच्या कालावधी असून वाकाटक यांच्या नंतर त्रेकुटक हे महाराष्ट्राचे सार्वभौम राजे झालेले आपणास पाहायला मिळते या ताम्रपटात सिंधू देशातील म्हणजे आज आपण त्याला पाकिस्तान म्हणतो येथील कनक चा रहिवाशी बुद्धीश्री आणि पुष्यवर्मन यांच्या मुलगा जो भिक्षु झाला होता बुद्धीरुची याने मातीच्या विटांचे चैत्य बांधले होते .ज्यांनी दहा पारमिता पूर्ण करून ज्ञानप्राप्ती ने जो धम्म लोकांना दिला जो दुःख मुक्तीचा मार्ग लोकांना दिला व त्यांच्या भिक्षु च्या साठी निर्माण केलेला टिकून राही अशी प्रार्थना यात केलेली आहे . आता यामध्ये वापरण्यात आलेला शब्द चैत्य हे स्तुपासाठीचे संबोधन आहे .

शोभना गोखले यांनी १९७३ साली दरीत पडलेले स्तुपांच्या अवशेषांचे शोध घेतला त्यावेळी त्यांना २७ शिलालेख कोरलेले दगड सापडले . हे शिलालेख स्तूपाच्या वरती लिहिलेले असावेत असा त्याचा निष्कर्ष निघतो.

शिलालेख

शिलालेख १

थे रा ण अ य वि ज य से ना न ते वि जा ण अ र ह ता ण थू भं
थेराण अय विजयसेनान तेविजान अरहताण थूभं
भाषांतर : अर्हत तेविज्ज स्थविर आर्य विजयसेन यांचा स्तूप
यामध्ये विजयसेन हे अर्हत असून त्याव्यतिरिक्त त्यांना तेविज्ज म्हटलेले आहे ज्यांना तिन्ही काळांचे ज्ञान असते अशी व्यक्ती भूत भविष्य वर्तमान काळाचा त्यांचा अभ्यास असून ते त्यांना अवगत असल्याचे तेविज्ज पदवी मधून आपणास समजते याला इंग्रजी मध्ये three fold knowledge म्हटले जाते

शिलालेख १

………. थे रा ण
अ र ह न्ता ण झा यि ण थू भं
……….. थेराण अराहन्ताण झायिनं थूभं
भाषांतर :अर्हंत स्थविर झायीन यांचा स्तूप
या ठिकाणी झायीन नावाचे भिक्षु हे अर्हत आहेत याची नोंद इथल्या शिलालेखात केलेली आहे अर्हत म्हणजेच टी व्यक्ती दुःखमुक्त झाली आहे.

शिलालेख ३

थे रा ण अ य्य म हा ण अ र ह न्ता ण छ ल भि ञ ण प ति सं भि द पा त्ता ण थू भ
थेराण अय्य महानं अरहण्ताण पतिसंभिदपात्ताण थुभ
भाषांतर : अर्हत स्थविर आर्य महान यांचा स्तूप आहे . स्थविर महान हे सहा स्टेज पूर्ण असलेले भिक्षु आहेत त्यांच्याकडे इधी दिभासोतं परिचित्ताविजानना पुब्बेनिवासा दिब्बचक्खू आणि आसवखयज्णण या सहा महत्वाच्या अवस्था त्यांनी पूर्ण केल्याची नोंद या शिलालेखात लिहलेली आहे.
इधी म्हणजे नैसर्गिक सामर्थ्य सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त
दिभासोतं म्हणजे कानांची ऐकण्याची क्षमता इतरांपेक्षा अतिसूक्ष्म
परिचित्ताविजानना म्हणजे टेलिपॅथी
पुब्बेनिवासा म्हणजे ज्याला आपल्या भूतकाळाचा ज्ञान होणे
दिब्बचक्खू म्हणजे अनोखी दृष्टी जिला सम्यक दृष्टी म्हणू शकतो
आसवखयज्णण म्हणजे विकृतीवर विजय मिळवणे
अश्या प्रकारे बौद्ध भिक्षूंच्या ज्ञानाची कक्षा किती मोठी होती त्याकाळात भारतात दिले जाणारे ज्ञान किती उच्च दर्जाचे होते याचा अंदाज आपणास इथे मिळतो

शिलालेख ४

थे रा ण भ द ण्त दा मा ण अ णा गा मि ण थू भ
थेराण भदण्त दामाण अणागामिण थूभ
भाषांतर : स्थविर भदंत दामान हे अनागामी आहेत त्यांचा स्तूप
वरील शिलालेखात स्थविर भदंत हे अनागामी झालेले आहेत बौद्ध धम्मातील निर्वाण पदाकडे जाण्यासाठी सोतापन्न सद्गृदागामी अनागामी आणि अर्हत अशी पायरी असते त्यात ते अनागामी अर्थात अर्हत होण्याच्या एक स्टेज मागे होते.

शिलालेख ५

थे रा ण अ य्य इ ण्द से न प यु ता ण प भि णा ण अ र ह ण्ता ण स ता ण थू भ
थेराण अय्य इण्दसेन पयुताण पभिणाण अरहण्ताण सताण थूभ
भाषांतर : स्थविर आर्य इंद्रसेन यांनी नियुक्त केलेले अर्हंत सतान यांचा स्तूप
यामध्ये इंद्रसेन हे कदाचित या कान्हेरी लेण्यातील कुलगुरू असावेत कारण त्यांनी सतान या अर्हंत भिक्षु ना नियुक्त केलेले आहे. एकूण च कान्हेरी या विश्वविद्यापाठ यांचा दर्जा लक्षात येतो .

शिलालेख ६

थे रा ण अ य्य व हि न्ना ग्रा ण अ र ह ण्ता ण ति ल पा ल का ण थू भ
थेराण अय्य वहिन्नाग्राण अरहण्ताण तिलपालकाण थूभ
अर्हंत स्थविर आर्य वहिन्नाग्रान तिलपालक हे दुसऱ्या कोणत्या तरी बौद्ध विद्यालयातील शिक्षक असावेत त्यासाठी द्यांचा उल्लेख अश्या पद्धतीने या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो

शिलालेख ७

धि ले ण अ र ह ण्ता ण थू भ
धि लेण अरहण्ताण थूभ
भाषांतर : धि लेण अर्हन्तांचा स्तूप
या ठिकाणी हा शिलालेख त्रुटक आहे सुरुवातीची अक्षर नाहीत परन्तु यांच्या शेवटी धि आलेला आहे कदाचित तो समाधी मधील एखादा शब्द असावा बुद्धघोष यांचा अट्ठशिलानी मधील काही महत्वाच्या शब्दाचा मिळतो भिक्षुकाच्या विविध कॉलीटी आपणास पाहायला मिळतात यामध्ये बौद्ध भिक्षुंचा आपल्या भावनांवर पूर्ण कंट्रोल असतो धितीमीला म्हणून त्याला संबोधले जाते . अश्या प्रकारे बौद्ध भिक्षूंच्या विविध गुणांचा उल्लेख या शिलालेखात मिळतो

शिलालेख ८

थे रा ण ……….णा ये ण अ र ह ण्ता ण
थेराण ……….णायेण अरहण्ताण
भाषांतर : अर्हत स्थविर ….. णायेन
या ठिकाणी आलेला उल्लेख नायी अर्थात हि अर्हत भिक्षु मधील अजून एक उच्च अवस्था प्राप्त भिक्षूंची एक अवस्था आहे यामध्ये याला पतीसंभीदमग्गपली याचा अर्थ आहे कि भिक्षु ला ७३ प्रकारचे ज्ञान आहे शिवाय यामध्ये श्रावक अर्थात त्याला ६३ प्रकारचे ज्ञान आहे अशी व्यक्ती श्रावक पदवी प्राप्त करू शकतो अश्या पद्धतीने या ठिकाणी या भिक्षूंचे नाव नष्ट झालेले असले तरी त्यांच्या पदवीचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे .

शिलालेख ९

थे रा ण अ य्य सं घ न न्दा ण अ र ह ण्ता ण व सी ण थु भ
थेराण अय्य संघनन्दाण अरहण्ताण वसीण थुभ
भाषांतर : अर्हंत स्थविर आर्य संघनंद यांचा हा स्तूप असून अर्हत मधील वसीन नावाची अवस्था त्यांनी पूर्ण केलेली आहे.
यामध्ये वसीन हा शब्द महत्वाचा आहे कारण विशुद्धी मग्ग मध्ये याचे विश्लेषण दिलेले आहे ज्यांचे आपल्या संपूर्ण शिरीरावर तसेच आपल्या भावनेवर कंट्रोल असतो अशी व्यक्ती या पदवी मध्ये येते यामध्ये समाधी आधीचे चिंतन म्हणजे चिंतन समाधी त्यांनतर समाधीचा निर्धार केला जातो नानात्र समाधी मधून जे उदयास येते ते ज्ञान आणि समाधी नंतर त्यावर केले गेलेलं चिंतन अश्या प्रकारचा खूप मोठा व महत्वाचा भाग या एका शब्दात पाहायला मिळतो

शिलालेख १०

थे रा ण अ य्य खे म का ण अ र ह ण्ता ण थु भ
थेराण अय्य खेमकाण अरहण्ताण थुभ
भाषांतर : अर्हत स्थविर आर्य खेमक यांचा स्तूप

शिलालेख ११

थे रा ण भ द ण्त वि ज य मि त्ता ण अ र ह ण्ता ण थु भ
थेराण भदण्त विजयमित्ताण अरहण्ताण थुभ
भाषांतर : अर्हंत स्थविर भदंत विजयमित्र यांचा स्तूप

शिलालेख १२

थे रा ण अ य्य खे म का रा ण थु भ
थेराण अय्य खेमकाराण थुभ
भाषांतर : स्थविर आर्य खेमकार यांचा स्तूप

शिलालेख १३

थे रा ण अ य्य अ र ह ण्ता ण थु भ
थेराण अय्य अरहण्ताण थुभ
भाषांतर अर्हत स्थविर आर्य यांचा स्तूप
या ठिकाणी कदाचित नाव नष्ट झालेले असावे परंतु हा स्तूप अर्हत असणाऱ्या स्थविर यांचा आहे हे नमूद केलेलं आहे व ते आर्य म्हणून त्यांना संबोधन लावलेले आहे

शिलालेख १४

थे रा ण अ य्य …. ण अ र ह ण्ता ण थु भ
थेराण अय्य …. ण अरहण्ताण थुभ
भाषांतर : अर्हत स्थविर आर्य …. यांचा स्तूप
या ठिकाणी भिक्षूंचे नाव नष्ट झाले असून त्यांच्या पदवी मात्र स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केली आहे

शिलालेख १५

थे रा ण अ य्य अ र ह ण्ता ण स ता ण
थेराण अय्य अरहण्ताण सताण
भाषांतर : अर्हंत स्थविर आर्य सता …
याठिकाणी अर्हत स्थविर यांच्या नावाचा अर्धवट उल्लेख आलेला असून ते अर्हत असल्याचे नमूद केलेलं आहे.

शिलालेख १६

थे रा ण …….. अ र ह ण्ता ण थु भ
थेराण …….. अरहण्ताण थुभ
भाषांतर : अर्हंत स्थविर …….. यांचा स्तूप
या ठिकाणी भिक्षु अर्हत असल्याचे नमूद केलेलं आहे पण त्यांच्या नावाची अक्षर खराब झालेली आहेत

शिलालेख १७

थेराण अय्य
स्थविर आर्य
या ठिकाणी केवळ स्थविर आर्य असाच उल्लेख असलेला शिलालेख सापडला आहे

शिलालेख १८

थे रा ण अ य्य पु ता ण अ र ह ण्ता ण छ ल भि णा ण थु भ
थेराण अय्य पुताण अरहण्ताण छलभिणाण थुभ
भाषांतर : अर्हंत स्थविर आर्यपुत्र छलभिनाण स्तूप
या ठिकाणी आर्य पुत्र म्हणून विशेष अशी पदवी आपल्याल अर्हंत मधील पाहायला मिळते याचा अर्थ यांनी सहा ज्ञानाची अवस्था पूर्ण केल्या आहेत ज्यांना या सहा विशेष ज्ञान संपदान केलेलं आहे .
त्यांच्याकडे इधी दिभासोतं परिचित्ताविजानना पुब्बेनिवासा दिब्बचक्खू आणि आसवखयज्णण या सहा महत्वाच्या अवस्था त्यांनी पूर्ण केल्याची नोंद या शिलालेखात लिहलेली आहे.
इधी म्हणजे नैसर्गिक सामर्थ्य सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त
दिभासोतं म्हणजे कानांची ऐकण्याची क्षमता इतरांपेक्षा अतिसूक्ष्म
परिचित्ताविजानना म्हणजे टेलिपॅथी
पुब्बेनिवासा म्हणजे ज्याला आपल्या भूतकाळाचा ज्ञान होणे
दिब्बचक्खू म्हणजे अनोखी दृष्टी जिला सम्यक दृष्टी म्हणू शकतो
आसवखयज्णण म्हणजे विकृतीवर विजय मिळवणे
अश्या प्रकारे बौद्ध भिक्षूंच्या ज्ञानाची कक्षा किती मोठी होती त्याकाळात भारतात दिले जाणारे ज्ञान किती उच्च दर्जाचे होते याचा अंदाज आपणास इथे मिळतो

शिलालेख १९

थे रा ण अ य्य सा मि ण अ न्ध का वी रा
थेराण अय्य सामिण अन्धकावीरा
भाषांतर : स्थविर आर्य सामीन अंधकवीरा याचा अर्थ आहे कि सामीन हे आंध्रमधील असावे असा याचा अर्थ घेतला जातो

शिलालेख २०

थेराण ……. अरहण्ताण थुभ
भाषांतर : अर्हंत स्थविर …. यांचा स्तूप या याठिकाणी भिक्षूंचे नाव आपणास पाहायला मिळत नाही

शिलालेख २१

थेराण भदन्त जायीन तिन्ह अरहण्ताण सतान थुभ
भाषांतर स्थविर भदंत जायीन आणि अर्हंत सतान यांचा स्तूप

शिलालेख २२

थेराण अ
भाषांतर : स्थविर अ अर्थात आर्य असा उल्लेख असावा परन्तु पूर्ण माहिती आपणास भेटत नाही

शिलालेख २३

थेराण आय्य सिवणाग अरहताण छलभिञण थुभ
भाषांतरअर्हंत स्थविर आर्य शिवनाग हे अर्हन्तांच्या वरच्या अवस्था अर्थात त्यांनी शा महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान त्यांना मिळाले होते यामध्ये इधी दिभासोतं परिचित्ताविजानना पुब्बेनिवासा दिब्बचक्खू आणि आसवखयज्णण या सहा महत्वाच्या अवस्था त्यांनी पूर्ण केल्याची नोंद या शिलालेखात लिहलेली आहे.
इधी म्हणजे नैसर्गिक सामर्थ्य सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त
दिभासोतं म्हणजे कानांची ऐकण्याची क्षमता इतरांपेक्षा अतिसूक्ष्म
परिचित्ताविजानना म्हणजे टेलिपॅथी
पुब्बेनिवासा म्हणजे ज्याला आपल्या भूतकाळाचा ज्ञान होणे
दिब्बचक्खू म्हणजे अनोखी दृष्टी जिला सम्यक दृष्टी म्हणू शकतो
आसवखयज्णण म्हणजे विकृतीवर विजय मिळवणे
अश्या प्रकारे बौद्ध भिक्षूंच्या ज्ञानाची कक्षा किती मोठी होती त्याकाळात भारतात दिले जाणारे ज्ञान किती उच्च दर्जाचे होते याचा अंदाज आपणास इथे मिळतो

शिलालेख २४

थेराण आर्य धम्मसेनाण अरहण्ताण गणाचरीयाण थुभ
भाषांतर : गणाचार्य अर्हंत स्थविर आर्य धम्म सेन यांचा स्तूप
यामध्ये अर्हंत भिक्षु यांच्या मध्ये हे या विद्यापीठाचे गणाचार्य अर्थात शिक्षकांचे गुरु असावेत असा होतो

शिलालेख २५

पचेण्ह अरहण्ताण गंताण अयं थुभो
भाषांतर : पचेन्ह अर्हंत आर्य गतान यांचा स्थूप
या ठिकाणी अर्हन्तामधील महत्वाची अवस्था देखील म्हटली जाते आर्य हे विशेषपद वापरले जाते

शिलालेख २६

थेराण अय्य विकन अरहंताण थुभो
भाषांतर अर्हत स्थविर आर्य विकन यांचा स्तूप

शिलालेख २७

थेराण आर्य बादिलाण अरहंताण थुभो
भाषांतर : अर्हत स्थविर आर्य बदिलान यांचा स्तूप

निर्वाणभूमी मध्ये सापडलेल्या स्तुपातून अनेक अर्हंत भिक्षूंची नावे आपणास पाहायला मिळतात .यावरून कान्हेरी लेणीचे शिक्षणाचे महत्व किती उच्च दर्जाचे होते याची माहिती मिळते . कान्हेरी लेण्यांची माहिती सर्वप्रथम बून यांनी या ठिकाणी पाहणी करून घेतली होती त्यावेळी त्यांनी या लेण्यांचा निर्मितीचा काळ व त्यांचे ज्ञानार्जनाचे काम किती मोठे हे लक्षात आणून दिले होते. कान्हेरी वर असणाऱ्या या शिक्षण व्यवस्थेत असे शिक्षक शिकवण्यास होते त्यामध्ये ज्यांना ७३ प्रकारचे ज्ञान व ६३ प्रकारच्या कलेचे ज्ञान होते अश्या या विद्वान इतिहासाला आज भारत पूर्णपणे विसरला आहे आज आम्हाला या ऐतिहासिक इतिहासातून या इतिहास पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात असंख्य लेण्यांचे अवशेष आहेत शिवाय भारतात बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा खूप आहे पण कान्हेरी हे जगभरातील महत्वाचे ठिकाण यासाठी आहे कारण या ठिकाणी असलेले शिक्षणाचे महत्व खूप मोठे होते आणि यासाठी जगभरातील अनेक लोक याठिकाणी येवून ज्ञान संपदान करत होते याचे ऐतिसिक लिखित पुरावे या निर्वांभूमिच्या स्तुपामध्ये असणाऱ्या बौद्ध भिक्खुंच्या शरीर धातू मधून अभ्यासायला मिळते.
निर्वाण अर्थात दुःखमुक्त झालेली व्यक्ती तथागत बुद्ध सम्यक संबुद्ध झाले पण ते एकटेच ज्ञानिवंत झाले नाही तर त्यांनी असंख्य लोकांना ज्ञानिवंत बनवले आणि याचे हे पुरावे आपणास पाहायला मिळतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून इसवी सन १३ व्या शकतापर्यंत कान्हेरी सलग पंधराशे वर्षे ज्ञान देण्याचे काम करत होते अनेक अर्हत भिक्षु निर्माण झाले त्यांनी अनेकांना अर्हत बनवण्यास सहकार्य केले असा हा धम्म कि जो सर्वाना सन्धी देतो निर्वानासाठी कुठे हि आमिष नाही कुठे हि अंधश्रद्धा नाही या आणि पहा याच हेतूवर आजवर अनेक जन आले आणि अर्हत झाले अशी हि निर्वाण भूमी माणसाला दुःखमुक्त करणारी विचारधारा म्हणजेच तथागतांचा हा धम्म .

TeamABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “भारताच्या इतिहासातील शिक्षणाचा सुवर्णकाळाची माहिती देणारी कान्हेरी निर्वाणभूमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat