गोमाशी बुद्ध लेणी

रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यात गोमाशी नावाचे एक गाव आहे. या गावाच्या बाजूंला वाहणाऱ्या नदीच्या किनारी एक लेणी आहेत. या लेणी मध्ये तथागत बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा असणारी मूर्ती आहे.
गोमाशी लेणी चा इतिहास : इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात महाराष्ट्रात सातवाहनांच्या काळात लेण्या कोरण्यास सुरुवात झाली आणि याच काळात महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी हि निर्मिती सुरु झाली लेणी ह्या बुद्धांच्या धम्माची शिकवण जनमानसात घेवून जाणार्या भिक्षूंच्या निवासासाठी कोरण्यात आली प्रामुख्याने लेण्या ह्या व्यापारी मार्गावर कोरण्यात आल्या आहेत . गोमाशी लेणी महाराष्ट्राच्या प्राचीन नागोठणे बंदरातून पाली मार्गे महाड बंदराकडे जाणाऱ्या मार्गात हि लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांचा साधारण पणे काळ पहिला असता इसवी सन पूर्व पहिल्या शतकाचा असावा कारण अत्यंत सध्या पद्धतीने कोरलेली एक शैलगृह आहे.

या ठिकाणी बुद्धाची मूर्ती हि साधारणपणे इसवी सन सातव्या शतकांच्या नंतरची असावी कारण या मूर्तीची शिल्पकला दाक्षिणात्य शिल्पाप्रमाणे पानास पाहायला मिळते . गोमाशी गावात असनारी हि लेणी कुंडलिका नदीच्या काठावर आहे कुंडलिका नदी पुढे जावून चौल बंदराला मिळते अर्थात चौल येथे अरबी समुद्राला जावून मिळते
गोमाशी लेण्यात असणाऱ्या बुद्ध मूर्तीचे स्वरूप पाहू या

या ठिकाणी बुद्धाची मूर्ती हि भूमि स्पर्श मुद्रेत आहे . या मुद्रेत तथागतांनी या धरतीला साक्षी ठेवून आपल्यातील माराला हरवल्याचे सिद्ध केले अर्थात स्वतःमधील विकार वासना दूर करून ते ज्ञान प्राप्तीकडे निघाले आणि त्यासाठी मार विजय हा आपल्या या मुद्रेतून अभ्यासण्यास मिळतो . शिवाय बुद्धाने ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान संपदान केले ते त्या वृक्षाला अश्वत्थ नावाचा बोधिवृक्ष म्हणतात त्याचे शिल्पांकन बुद्धाच्या मूर्ती च्या वरच्या बाजूंला करण्यात आले आहे.

सदर हि लेणी अतिक्रमित झाली असून बुद्धाच्या मूर्तीची पूजा हि इथल्या गावातील लोक भृगु ऋषीची मूर्ती म्हणून त्याची पूजा केली जाते एकूण इथला प्रकार पाहता फारसे ज्ञात नसलेले ठिकाण असून नेणावली गावात जाणाऱ्या रस्त्यात कुंडलिका नदीच्या पुलापासून च दोन किलोमीटर वर हि लेणी आहेत .
प्रमुख्य व्यापाऱ्या च्या मार्गावर असणरी हि लेणी इतिहासातील एक अनमोल असे ठिकाण आहे. आणि महाराष्ट्राला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा देखील आहे.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat