गांधारपाले & कोल बुद्ध लेणी : संवर्धन & जनजागृती कृती कार्यक्रम

प्राचीन बुद्ध लेण्यांचे अनेक अवशेष इतरत्र पडलेले असून त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे . अश्या या महत्वाच्या वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी दिनांक १९ मार्च २०२१ ते २० मार्च २०२१ रोजी ABCPR लेणी संवर्धक टीम च्या माध्यमातून ऐतिहासक गांधारपाले बुध्द लेणीवर कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Gandharpale Buddhist Caves Maharashtra

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना म्हणजे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह . बाबासाहेबांनी केलेल्या पाण्याचा सत्याग्रह तसेच विषमतावादी विचारधारा असणारी मनुस्मृती महाड येथे जाळून समतावादी बुद्धाचा धम्म जाणून घेण्यास सुरुवात केली. अश्या महाड या ठिकाणाची निवड करण्यामागे कोणते कारण असावे तर नक्कीच ते बुद्ध लेण्यांचा इतिहास जाणून घेवून तयार केलेला विचार होता .

डिसेंबर १९२७ मध्ये बाबासाहेब महाड बुद्ध लेण्यावर येवून इथल्या लेण्यांची माहिती पुढे मार्गक्रमणा केली असावी. बाबासाहेब यांचा बुद्धाकडे असणारा ओढा आपल्याला बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीमधून पाहायला मिळते . आता महामानवाच्या ध्येय आणि त्यांची कृती आपण समजून घेवून मार्गक्रम करण्यासाठी अवश्य या कृती कार्यक्रमात सहभागी व्हावे.

२० मार्च हा पाण्याचा सत्याग्रह क्रांतिदिन म्हणून जगापुढे आहे अश्या दिनी इथे आलेल्या प्रत्येक माणसाला धम्मा विषयी जागृती करणे आवश्यक आहे , दरवर्षी प्रमाणे लेणी संवर्धक टीम गांधारपाले बुध्द लेण्यावर जनजागृती साठी उपस्थित राहून नेहमीप्रमाणे आलेल्या लोकांना लेण्या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करून भारताचा हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे .आपण देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे.

गांधारपाले बुद्ध लेण्यांच्या संवर्धन आणि जनजागृती अभियानात सामील होण्यासाठी लेणी संवर्धक टीम कडे संपर्क करू शकता

CLICK PHOTO FOR Contact whats app no.
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat