गांधारपाले बुद्ध लेणी जनजागृती अभियान ABCPR टीम

महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर असलेली क्रांती भूमी महाड चवदार तळे . या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह आणि त्याच ठिकाणी मनुस्मृती या ग्रंथाचे केलेले दहन आणि नंतर गांधारपाले बुध्द लेण्यावर लेणी पाहून येणे या घटना इतिहासात अजरामर आहेत.
दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक या चवदार तळ्यावर या क्रांती ला अभिवादन करण्यास येत असतात. अश्यावेळी महाड येथे असणरी हि क्रांती भूमी आणि त्याच ठिकाणी दोन हजार वर्षापूर्वी चा बौद्ध धम्माचा अनमोल ठेवा ह्या सार्याचा संगम आपणास पाहायला मिळतो. २० मार्च रोजी लाखोच्या संख्येने लोक येत असतात आणि बाबासाहेब यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यास जात असतात अश्यावेळी अनेक लोक प्राचीन बुद्ध लेणी गांधारपाले या लेणी वर हजर होतात अश्या लोकांना हा धम्म वारसा समजावा म्हणून प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन यांच्या माध्यमातून लोकांना लेणी बद्दल जनजगृती अभियान घेतेले जाते २० मार्च २०१८ रोजी गांधारपाले या बुद्ध लेणीवर ABCPR लेणी संवर्धक टीम ने लोकांना जनजागृती अभियान द्वारे लेणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचे काही क्षण खालील फोटो मध्ये

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “गांधारपाले बुद्ध लेणी जनजागृती अभियान ABCPR टीम

 1. सिध्दार्थ संजीवनी शहादेव बोराडे says:

  तुम्ही करत असलेले कार्य अतुलनीय आहे.. शब्दात मांडणे अवघड आहे.. खऱ्या अर्थाने इतिहासाचा वारसा जपण म्हणजे तुमच काम आहे .. मी नियमित आपल्या टीमकडून केलेल्या कार्याबद्दल खुप प्रभावित आहे . खुप खुप धन्यवाद टीमचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat