विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक जगताचे मॅनेजमेंट गुरु

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पूर्व . १८९१ साली मध्यप्रदेशातील महू गावात जन्मास आलेल्या या  युगसूर्याच्या प्रकाशाने आज या भारताला मॅनेजमेंट मधील  यशस्वी व्यवस्थापक म्हणून आज त्याच्या मृत्यूनंतर हि त्याच्या मॅनेजमेंट च्या  लिखाणावर देश चालतो आहे अश्या या विश्वारत्नाच्या व्यक्तिमत्वाचा आढावा आपल्या   वरील शीर्षकाखाली  घेऊ या

बाबासाहेब याना विश्वरत्न का म्हटले आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे कारण आपल्याला त्यावरच  संपूर्ण व्यक्तिमत्व अभ्यासायचे आहे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व मला कळले असे अजिबात नाही एवढे मोठे व्यक्तिमत्व आमच्या लेखनामध्ये मावेल असे अजिबात नाही पण जे काही  बाबासाहेब  यांचे व्यक्तिमत्व गेल्या १० वर्षाच्या अभ्यासात जाणवले ते मांडणे आवश्यक आहे . हे परिपूर्ण व्यक्तिमत्व आम्ही मांडू शकत नाही कारण तेवढा व्यासंग जगात कोणत्याच मानवाचा असू शकत नाही आणि  कोणत्या पुस्तकाच्या पानात बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व वा चरित्र बंद होऊ शकत नाही . बाबासाहेब याना विश्वरत्न  का म्हणावे तर आधी विश्व म्हणजे  काय ते जाणून  घेणे आवश्यक आहे

एक रत्नागिरी जिल्हा  यासारखे अनेक जिल्हे मिळून एक राज्य तयार होते अनेक राज्य  मिळून एक देश तयार होतो अनेक देश  मिळून एक खंड तयार  होतो अनेक खंड एकत्र मिळून एक पृथ्वी तयार होते आणि अनेक पृथ्वी आणि ग्रह मिळून एक ग्रहमालिका तयार होते अनेक ग्रहमालीका  मिळून एक आकाशगंगा तयार होते व अनेक आकाशगंगा मिळून ते तयार होते त्याला विश्व म्हणतात तेव्हा भारताचे जगाचे महाराष्ट्राचे असली विशेषणे लावून बाबासाहेब याना संकुचित करू  नका ते विश्वाला वंदनीय आहेत असे महापुरुष आहेत.

म्हणून थोडक्यात विश्व काय हे सांगितले आणि अश्या या विश्वाचे रत्न म्हणजे बाबासाहेब आहेत म्हणून विश्वरत्न बाबासाहेब

आता  आपण बाबासाहेब यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा  घेऊ या पण तो आढावा घेताना आपल्याला बाबासाहेब हे आधुनिक जगताचे मॅनेजमेंट चे गुरु कसे आहेत हे पाहायचे आहे त्यामुळे त्याची सविस्तर माहिती आपण पाहू या

सुरुवातीला ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठात जगाचे निर्माते mekars of the world  मध्ये १० हजार वर्षात होऊन गेलेल्या महापुरुषांचा इतिहास शोधून  त्यांची जागतिक क्रमवारी सांगितली त्यात प्रथम स्थानी बुद्ध तर बाबासाहेब चौथ्या स्थानी आहेत जगात सर्वात चार हि नावे भारतीय आहेत हे विशेष

शिवाय  बाबासाहेब याना जगात सिंम्बॉल ऑफ नॉलेज असे म्हटले जाते एक जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व भारतीय लोकांनी समजून न घेतल्याने  भारत आज मागे आहे

बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ या 

प्रथम बाबासाहेब याना ज्ञात असणारे  विषय कोणते आहेत जे जाणून  घेऊ या . 

बाबासाहेब हे जगातील सर्वोत्तम विद्वान का आहेत हे यातून तुम्हाला पाहायला मिळेल 

१}अर्थशास्त्र, २} समाजशास्त्र , ३} राज्यशास्त्र , ४} संख्याशास्त्र , ५} अनुवांशिकशास्त्र , ६} युद्धशास्त्र , ७} मानसशास्त्र ,८} दर्शनशास्त्र ,९} तर्कशास्त्र , १०} प्रशासनशास्त्र ,११} ग्रंथालयशास्त्र , १२} बागकाम शास्त्र , १३} वाणिज्यशास्त्र , १४} पाकशास्त्र , १५} वैद्यक शास्त्र , १६} ज्योतिष्यशास्त्र ,१७} कामगारशास्त्र, १८} लोकसंख्या शास्त्र , १९} शरीरशास्त्र , २०} जलशास्त्र , २१} नीतिशास्त्र , २२} घटनाशास्त्र , २३} कृषिशास्त्र ,२४} धर्मशास्त्र

२५} वनस्पतीशास्त्र , २६} भौतिकशास्त्र , २७} विद्युतशास्त्र ,२८} प्राणिशास्त्र , २९} जीवशास्त्र , ३०} शिक्षण शास्त्र . आदी शास्त्रांचा अभ्यास असणारे बाबासाहेब आपणास माहित असणे आवश्यक आहे 

बाबासाहेब याना माहित असणाऱ्या भाषा मराठी , हिंदी , इंग्रजी , पाली , उर्दू , संस्कृत, गुजराथी ,जर्मन,  बंगाली , पार्शियन , फ्रेंच, कन्नड , पारसी , ब्रिटन, लॅटिन , इंग्रजी युके , मालवणी, खान्देशी, अहिराणी , महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषेचे ज्ञान असणारे बाबासाहेब सर्वज्ञ होते असे का म्हणतात याचा आपणास अनुभव आला असेल . त्याशिवाय  बाबासाहेब इतिहास तत्वज्ञान पुरातत्व विद्या साहित्यशास्त्र इंजिनियरिंग विज्ञान गणित भूगोल मूर्तिकला गायनकला वादनकला चित्रकला असे ना ना विषयाचे ज्ञान असणारे बाबासाहेब आजवर लोकांना माहीत च नाहीत . 

बाबासाहेब यांचे विविध विषयावर असणारे ज्ञान भारताच्या उपयोगी पडले आणि भारताला जे हवे ते देण्यास बाबासाहेब समर्थ ठरले . 

आज आम्ही बाबासाहेब यांच्याकडे एक विशिष्ट समाजाचे नेते किंवा उद्धारकर्ते म्हणून समजले जाते आज बाबासाहेब याना वेगळ्या रूपात समजणे आवश्यक आहे 

बाबासाहेब भारताच्याच नवे तर जगाच्या मॅनेजमेंट इतिहासातील अद्वितीय असे व्यक्तिमत्व आहे . 

बाबासाहेब यांनी केलेलं शेतीचे मॅनेजमेंट :   डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी small holdings in india and their remedies हे पुस्तक लिहून शेती समस्यांचा विचार केला त्याचप्रमाणे on small holders relief bill वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला इंग्रजांचे कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असताना दामोदर घाटी योजना महानदीवर धरण कार्यान्वित करून शेतीचा विचार केला states and miniorites मधूनही शेती व शेतकऱ्याच्या विचार केला प्रत्यक्षात त्यांना शेती करण्याचा योग आला नव्हता क्रियेवीण वाचाळता व्यर्थ  आहे असे त्यांना  वाटत असे प्रत्यक्षात कृती हवी होती पण वेळ मिळत नव्हता हे दुःख कदाचित त्यांच्या मनात असेलही प्रत्यक्षात कृतीची बाबासाहेब वाट पाहत होते आणि ती संधी चालून आली
   डॉ  आंबेडकर दि २० जुलै १९४२ ला इंग्रज कार्यकारी मंडळात रुजू झाले आणि त्यांच्याकडे मजूर खाते आले एका  वर्षानंतर बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला संपूर्ण भारतात हि अनेकवेळा दुष्काळ पडले दुष्काळामुळे अन्न धान्याचा तुडवडा पडला अत्यावश्यक वस्तू गोरगरीबांना स्वस्त भावात मिळाव्या म्हणून बाबासाहेबांनी रेशनिंग सुरु  केल यामध्ये अन्नधाण्याबरोबर घासलेट आणि साखरही होती
लोकांचा अन्नदाता शेतकरी फारच उपेक्षित होता बाबासाहेबांनी उत्तम प्रकारे शेती कशी करता येईल याबद्दल च्या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून अधिक धान्य पिकवा हि मोहीम काढली 

एवढेच नव्हे तर  स्वतःहि त्याबद्दल प्रयोग केला दिल्लीमधील त्यावेळच्या त्यांच्या २२ पृथ्वीराज रोडवर सरकारी निवास्थान असलेल्या त्यांच्या बंगाल्याभोवतीच्या काही मोकळ्या जागेत शोभेची हिरवळ  लावलेली होती ती काढून त्याच्यावर गव्हाचे उत्तम पिक काढले होते व भाज्या व पालेभाज्या लावल्या होत्या त्या पिकांचा त्यांनी पूर्ण हिशेब लिहून ठेवला होता किती बीज पेरले किती खात टाकले किती मजुरी झाली याबद्दलची आकडेवारी व पैश्याचा हिशोब आणि धन्य गोल होईपर्यंत चा सर्व खर्च सविस्तर लिहून ठेवला होता हा सर्व अनुभव घेवून ते त्याबद्दल भेटावयास येणाऱ्या कास्तकारांना सांगत असत
अशाप्रकारे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष शेती करून आलेला अनुभव याची नोंद केलेली होती शेतीतज्ञ स्वतःला म्हणवून घ्यायचे असेल त्यांनी practical  आणि theory याचा विचार करणे आवश्यक आहे ह्या दोनही बाबी बाबासाहेबांनी अंगीकारल्यामुळे ते खरेखुरे शेतीतज्ञ होते  हे निर्विवाद सत्य आहे कोणी ते नाकारू  शकत नाही आणि आजच्या शेतकऱ्याने बाबासाहेबांचे शेतीविषयक  धोरण स्वीकारले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही जर बाबासाहेब समजून  घ्या .  बाबासाहेब यांनी केलेलं शेतीचे मॅनेजमेंट आम्हाला कळायला पाहिजे तुम्ही  शेती करताय तर शेतीसाठी लागणाऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल ला थियरी ची साथ देणे आवश्यक आहे तरच तुम्हाला यशस्वी शेतीचे व्यवस्थापन करता येईल त्याशिवाय शेतीमध्ये कोणत्या कालखंडात कोणते पीक  घ्यावे  तसेच किती जागेमध्ये जास्त पीक येईल असे पीक घ्यावे ह्याचे व्यवस्थपन बाबासाहेब यांनी भारताच्या शेतकऱ्याला दिलेलं आहे पण आम्ही समजण्यात कमी पडलो  आज जे रेशनिंग  मिळते  ते बाबासाहेब यांच्या मजूर मंत्री असताना सुरु झालेले आहे अशोकाने आपल्या  जनतेला सुरु केलं होते शिवरायांनी हि आपल्या रयतेसाठी सुरु केले होते आणि तेच धोरण बाबासाहेब यांनी अवलंबून  जनतेला अन्नधान्य मिळावे म्हणून  प्रयत्न केले 

शेतीविषयक धोरणे  आखावी लागतात बाबासाहेबानी ते दाखवून दिले आहे मंत्री हा केवळ नावापुरता नसावा तर त्याला त्याची माहिती असावी लागते आणि बाबासाहेब हे या जगातील एकमेव व्यक्तिमत्व आहे जे सर्वगुण संपन्न आहेत . 

शेतकरी व शेतमजुरांचे मॅनेजमेंट : भारत हा देश कृषिप्रधान म्हटले जाते पण आज  या देशात शेतकरी वर्गाची खूप बिकट अवस्था आहे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे सरकार निष्क्रिय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वेगळे स्वरूप देवून त्याला विषयाच्या बाहेर फेकण्याचे  काम केल जात आहे याच वेळी आपल्याला बाबासाहेब यांच्या  तत्व ज्ञानाची आवश्यकता भासते ती अशी
 बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विचार १९१८  मधेच केलेला आहे  त्यांनी small holdings in india and their remedies  नावाने पुस्तक लिहिले . जीवनाशी सबंधित  असा शेती उद्योग असल्याने त्यांनी विशेष काळजी घेतलेली आहे गंभीरपणे शेतीचा विचार त्यांनी केलेला आहे भारतातील लहान धारण क्षेत्रे होण्याची कारणे कोणती याचा विचार केलेला आहे वारसा हक्क हि उपजीविकेचे साधन म्हणून लहान लहान तुकड्यात केले जाते याचीही चर्चा केली धारणाक्षेत्राचा आकार वाढविणे व तुकडे जोड करणे याचीही चर्चा केली  आहे
उपभोगाचा निकष न  लावता उत्पादनाचा निकष लावून किफायतशीर धारण क्षेत्रे ठरविणे योग्य आहे असे बाबासाहेब यांना वाटे लहान व मोठे धारण क्षेत्रे यांचा विचार करणे गौण आहे तर जमीन भांडवल व श्रम हे उत्पादक घटक महत्वाचे आहेत असे बाबासाहेब यांना वाटत होते आज हि जमीन श्रम आहे पण भांडवल नसल्याने शेतकरी शेती चांगली करू शकत नाही
there is danger of  too much agriculture in india ला  उत्तर म्हणून बाबासाहेब यांना औद्यागीकीरन हाच खात्रीचा उपाय वाटतो कारण यामुळे शेतकऱ्या बरोबर  बेकारांचा हि प्रश्न सुटेल आणि देशाच्या आर्थिक विकास पण होईल
on  small  holder ‘s felilef bill  ” अल्प भूधारक मदत विधेयक हे श्री अंडरसन यांनी दिनांक १०/१०/१९२७ ला मुंबई कायदे मंडळात मांडले problem  of scatterd farms  आणि problem ऑफ small  farms  ह्या दोन समस्यांचा विचार करण्यासाठी हे विधेयक होते ह्या दोन्ही समस्येवर अंडरसन यांनी दोन उपाय सुचवले सुचवले होते पहिला उपाय जमिनीच्या विभाजनावर नियंत्रण व  दुसरा होता एकसंघ धारणक्षेत्राची विक्री
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या विधेयकावर जोरदार हल्ला चढविला आणि सांगितले कि  केवळ धारणक्षेत्राचे आकारमान वाढवून शेती किफायतशीर करता येत नाही तर त्यासाठी भांडवलाचा योग्य पुरवठा होणे आवश्यक आहे भांडवलाचा तुटवडा हि खरी भारतीय शेतीची समस्या आहे हे आज हि तंतोतंत खरे आहे हे पटते ह्यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते
भांडवला अभावी बी बियाणे औजारे औषधी इत्यादी घेत येत नाही यामुळे उत्पादनावर परिणाम होतो म्हणून भांडवल आवश्यक आहे तसेच इतर वाईट बाबी टाळण्यासाठी सहकार शेतीचा उपाय सुचवला
जमिनीच्या विभाजनावर नियंत्रण आणले तर वारसा हक्काने जो छोटासा जमिनीचा तुकडा मुलांना मिळत होता तो हि बंद होवून भूमिहीन होण्याची पाळी येईल व दारिद्र्य अधिक वाढेल असे बाबासाहेब यांचे मत होते म्हणून त्यांनी त्यास विरोध केला एकंदरीत या विधेयकातील त्रुटी दाखवून व उपाय सुचवून छोट्या शेतकऱ्याचे हित कसे करता येईल याचा प्रयत्न बाबासाहेब यांनी केला आहे
महत्वाचे गोष्ट म्हणजे भारतातील अनेक लोकांनी फक्त त्रुटीच दाखवल्या केवळ उणीवच शोधल्या आजवर त्यावर कोणता उपाय केला पाहिजे हे आजवर  कोणी सांगितले नव्हते पण बाबासाहेब असे एकमेव होते ज्यांनी ज्या ज्या गोष्टीस विरोध केला आहे त्यांनी ज्या ज्या गोष्टीमध्ये त्रुटी आहेत हे दाखविले आहे त्यावर  त्यांनी उपाय देखील सुचविले आहे असे  व्यक्तिमत्व दुर्लभच असते असे बाबासाहेब होते
स्वतंत्र मजूर पक्ष : बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ ला या पक्षाची स्थापना केली  कि भारतातील सर्व जातीधर्माच्या श्रमजीवी जनतेच्या हक्काच्या लढ्यासाठी आणि त्यांनी यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही इथे सर्व जातीधर्माचे समूहाचे लोक सामील करता येतील असे धोरण त्यांनी त्या पक्षाचे होते
शेतकऱ्यांच्या हिताचे दृष्टीने खालील बाबींचा समावेश केला होता
१} शेतीची प्रगती होवून तो धंदा जास्त फलद्रूप व्हावा म्हणून   landmarkej  बँका उत्पादक शेतकरी वर्गाच्या सहकारी पतपेढ्या व खरेदी विक्री करणाऱ्या मार्केटिंग सोसायटीज यांची स्थापना या पक्षाचा कार्यक्रम आहे
२} शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान लहान तुकड्यात होणारी विभागणी असून त्यामुळे भांडवल गुंतविण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही असे या पक्षाचे मत आहे
३} सर्वसाधारण पणे जमीनदाराकडून होणारी शेतकरी कुळांची पिळवणूक अगर त्याजकडून जमिनीचे भागलेपण काढून घेण्याची जमीनदाराची प्रवृत्ती शेतकऱ्यांच्या हिताला विरोधी असल्यामुळे त्यापासून शेतकरी  कुळांचे सरंक्षण व्हावे अश्या स्वरूपाचे कायदे करण्याचा प्रयत्न हा  पक्ष करील
४} शेतकरी वर्ग व कामगार वर्ग यांना सुधारलेल्या राहणी प्रमाणे राहता यावे यासाठी त्यांच्या मुशाहिऱ्यांची किमान मर्यादा आवश्यक असा स्वरुपात हा पक्ष करील
५ } कारखान्यातील कामगारांच्या हिताला आवश्यक असे जे कार्य हा पक्ष करणार आहे तेच कार्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक अशा स्वरुपात हा पक्ष काम करील
६} जबर व्याज खोटे घोटाळ्याचे व्यवहार करणाऱ्या सावकारापासून गरीब व ऋणको चे सरंक्षण होण्यासाठी व शेतकऱ्याला ऋणमुक्त करण्यासाठी योग्य असे कायदे घडवून आणण्याचा प्रयत्न  हा पक्ष करील
७} जमीन धरा पद्धती – करधारा पद्धती अत्य्नात आक्षेपार्ह असून ती सुधारण्याविषयी या पक्षाचे प्रयत्न होतील
अशा प्रकारचे बाबासाहेब यांनी आपल्या पक्षाच्या जाहीर नाम्यात ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्या त्यांनी घटनेच्या परीशिष्ट मध्ये समाविष्ट केले आहेत यासाठी घटनेतील {१ ,२,६,७,९,११ } हि परिशिष्टे पाहिल्यावर समजून येईल कि बाबासाहेब यांनी शेतकऱ्याच्या हिताकडे कसे लक्ष दिले आहे ते
खोतीबील : बाबासाहेब यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे  दिनांक १७ फेब्रुवारी १९३७ ला  खोती पध्दत नष्ट करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात सदर केले  खोती  पद्धत मध्ये शेतसारा  गोळा करण्यासाठी शासनाने खोतांची नियुकिती केलेली असे हा खोत गरीब कुळांकडून शेतसारा वसूल करीत असे व काही हिस्सा शासनाच्या तिजोरीत  भरत असे व त्यांनतर हे खोत गरीब कुळांना त्रास देत जुलीम करीत निरनिराळे मोबदले न देता काम करून घेत यामुळे असंतोष निर्माण तीन खोताना ठार केले शांतता भंग होवू नये म्हणून हि पध्दत नष्ट करण्याची मागणी बाबासाहेब यांनी केली कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याची गुलामिगिरी नष्ट व्हावी म्हणून विधेयक मांडणारे व हल्ला चढविणारे बाबासाहेब हे  भारतातील पहिलेच लोकप्रतिनिधी होते हे लक्षात घेण्यासारखे आहे जमीनदाराणा योग्य अशी नुकसान भरपाई देणे आणि कुळांना वहितिचा अधिकार मिळवून देणे हे या विधेयकाचे उद्धिष्ट होते खोती पद्धत नष्ट करणे आणि ज्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात जमीन आहे त्या गरीब कुळांना land revenue code  १८७९ नुसार वहिवाट दार म्हणून घोषित करून  रयतवारी पद्धत सुरु करणे यासाठी हे  विधेयक प्रस्तावित केले होते
सावकारी नियंत्रण : सावकाराकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत होती याची बाबासाहेब यांना पूर्ण खात्री होती त्याची माहिती होती आणि बाबासाहेब यांना शेतकर्य बद्दल असलेला कळवला पाहण्यात येतोच कि बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत आणि या सावकाराच्या कर्जाच्या जाचातून शेतकऱ्याची मुक्तता व्हावी म्हणून १९३८ ला  बाबासाहेब यांनी मुंबई सावकारी विधेयक तयार केले व या विधेयकात काही बाबी नमूद केल्या त्या अश्या
१ } सावकाराने आपला व्यवसाय करण्यासाठी परवाने द्यावेत या परवान्याची मुदत एक वर्षाची असावी दरवर्षी परवान्याचे नुतनीकरण केले जावे
२} सावकाराने गैरवर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास हा परवाना रद्द केला जावा
३} कर्ज देण्याबाबत लेखी व्यवहार करावा धनको ऋणकोस या व्यवहाराची नोंद असलेले खाते पुस्तक द्यावे
वरील तरतुदी पाहिल्यास लक्षात येते कि आजच्या हि काळात याची गरज आहे असे जाणवते यावरून  असलेली दूरदृष्टी आपल्याला दिसून येते
मोर्चा : बाबासाहेब यांना शेतकऱ्या विषयी असणारा  जिव्हाळा त्यांच्याविषयी असणारे प्रेम किती होते याची जाणीव करून द्यावी लागते हेच आपल्या शेतकरी लोकांची शोकांतिका आहे बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर  करण्यासाठी वैधानिक मार्गाने त्या सोडवण्यासाठी त्यांनी दिनांक १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई विधिमंडळ वर वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावरून कौन्सिल हॉल कडे नेला होता यामध्ये मिरजकर आणि पेंडसे हे कम्युनिष्ट नेते सुद्धा सामील होते आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या काही मागण्या करण्यात आल्या त्या अश्या प्रकारे होत्या
१} जमीन कसणाऱ्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळालेच पाहिजे
२} खोत इनामदार यांच्यासारखे मध्यस्त नकोत
३} शेतकऱ्यावर कर अगर पट्टी बसवण्यापूर्वी त्याला चरीतार्थापुरती योग्य सोय करून दिली पाहिजे
४} शेतसारा बाक्याप्रमाणे थकलेल्या खंडाच्या बाक्याही माफ कराव्यात
५} जमिनीचे  किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पन्नावर सारा अजिबात माफ करावा
६} ७५ रुपये अगर त्यापेक्षा हि कमी शेतसारा देणाऱ्यांचा सारा ५०% नि कमी करावा
७} तीन वर्षे जमीन करणाऱ्या कुळाला कायम कुळ समजले जावे
८} जमिनीविषयक प्रश्नांची पाहणी करण्यासाठी आयोग नेमावा
९} लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी ५०% नि कमी करावी
१०} सर्व खेड्यात मोफत चराई राणे असावीत
११} कर्ज निवारण कायदा लागू होईपर्यंत कर्ज तहकुबी जाहीर करावी
अश्या प्रकारे बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या विधिमंडळ समोर ठेवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे
२० जुलै १९४२ ला बाबासाहेब इंग्रजांच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून चार वर्षे कामकाज केले आणि या कालावधी मध्ये बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या काही योजना पार पडण्याचा प्रयत्न केला आहे 
१} अधिक धान्य पिकवा मोहीम : बाबासाहेब इंग्रजांच्या कार्यकारी मंडळात असताना भारतामध्ये दुष्काळ पडला होता गरिबी बरोबर शेतकऱ्यांचे हि उपासमारीने मरण येणार म्हणून बाबासाहेब यांनी अधिक धान्य  पिकवा मोहीम राबविली शेती उत्तम प्रकारे कशी करावी याबाबतचा प्रसार या मोहिमेद्वारे करण्यात आला प्रत्यक्ष अनुभवातून प्रसार यावा म्हणून बाबासाहेब यांनी दिल्लीच्या निवासस्थानी रिकाम्या जागेतील  हिरवळ काढून तिथे गव्हाचे उत्तम पिक काढले अनेक भाज्या  पालेभाज्या लावल्या होत्या आणि त्याचा संपूर्ण हिशेब सविस्तर लिहून ठेवला होता आणि भेटण्यास येणाऱ्या कास्तकार लोकांना ते अनुभव सांगत
२} दामोदर घाटी योजना : शेतीला उपयुक्त ज्या ज्या योजना आहेत त्याचीही जान बबहेब यांना होती म्हणून त्यांनी शेतीचा विकास होवून शेतकरी सुखी व्हावा म्हणून दामोदर घाटी योजना कार्यान्वित करण्याचे ठरविले दामोदर नदीच्या पुराने पिके घरदार संपत्ती व जीवित्ताहणी होत असे पुराचा तडाका बंगाल बिहार आणि आसाम मधील नद्यांमुळे बसत असे दामोदर नदीचाही अनुभव तोच होता बाबासाहेब यांनी दामोदर घाटी योजना तयार त्याची ब्लू प्रिंट तयार केली होती त्याचा उद्देश होता
The Damodar river is the first river project along this line it will be a multipurpose project it will have the object of not only preventing floods in the damodar river but also have the object of irrigation navigation and the production of electricity 
हा दामोदर घाटी चा प्रकल्प करते वेळी हुशार इंजिनिअर ची  गरज होती  ब्रिटीश सरकारला पटवून देवून ब्रिटीश इंजिनिअर  न घेता अमेरिकेतील टेनेसी व्हलि  authority येथे असलेले वूरदुईन  इंजिनिअर ला घेतले व  हे काम त्यांच्याकडे सोपवले  या योजनेचे प्रमुख म्हणून एन एन खोसला या भारतीय इंजिनिअर ची नियुक्ती महत्वाचे म्हणजे भारतीय लोकांना प्रथम प्राधान्य देणारे बाबासाहेब कधी लोकांच्या पुढे आणले नाही हे वास्तव आहे
त्याच प्रमाणे बाबासाहेब यांनी दुसरा एक प्रकल्प  घेतला महानदी वर धरन बांधण्याची योजना तयार केली याही योजनेचा उद्देश एकाच होता कि शेतकऱ्यांना शेतीसाठी   पाणी मिळावे तसेच त्यातून वीजनिर्मिती सुद्ध व्हावी यासाठी व यातून जीवित हानी वित्तहानी टाळावी म्हणून केलेल्या योजना पाहिल्यावर मुख्य इंजिनिअर बी के गोखले यांनी देखील या योजना बरोबर असल्याचे सांगितले आहे
आता आपण या इंग्रजांच्या  मध्ये राहून भारतीय शेतकऱ्यासाठी बाबासाहेब यांनी केलेले कार्य पाहता बाबासाहेब हे देशद्रोही होते हे बोलणाऱ्या बोलघेवड्या लोकांच्या तुलनेत आजच्या शेकरी वर्गाला समजेल कि बाबासाहेब यांचे त्यावेळच विचार किती महत्वाचे आहेत ते आणि भारताला स्वातंत्र्य ,मिळाल्यावर बाबासाहेब यांनी घटना समितीला जो मसुदा दिला होता राज्ये आणि अल्पसंख्यांक म्हणून यामध्ये शेती आणि शेतकऱ्या बाबत जे विचार त्यांनी स्पष्ट केले होते ते असे होते
१} शेती हा राज्याचा उद्योग असावा
२} मालक कुळ किंवा गहाण वर घेणारा धनको या नात्याने खाजगी व्यक्तीच्या ताब्यात असलेले उद्योगधंदे विमा आणि शेतीची जमीन यांच्या वहीवाटीचे हक्क राज्याकडे असावेत या खाजगी व्यक्तींना जमिनीच्या  मुल्याइतकी भरपाई सरकारी कर्जरोख्याच्या रूपात दिले जावी सक्तीने ताब्यात घेण्यासाठी या  कारखाना यांचे मुली निश्चित करताना आणीबाणी मुले येणारी वाढ भावी काळातील संभाव्य किंवा अनर्जित मुल्य  किंवा सक्तीने ताब्यात घेण्यासाठीचे  कोणतेही  मुल्य  यांची दाखल राज्याने  घ्यायची गरज नाही
३} कर्जरोखा धारण करणाराला रोख रक्कम मिळवण्याचा हक्क कोणत्याप्रकारे आणि केव्हा असेल हे राज्य ठरवील
४} सदर रोख्याचा विनिमय करता  येईल आणि त्यावर वारसाहक्क राहील तरी मुल   रोखाधारकाकडून ज्याला रोखा  मिळाला ती व्यक्ती मूळ  रोखाधारकाचा वारस यांना सरकारने ताब्यात घेतलेली जमीन किंवा कोणत्याही औद्यागिक कंपनीस हितसंबंध परत मिळण्याची मागणी करता येणार नाही  अथवा त्या मालमत्तेबाबत कोणताही  व्यवहार करता येणार नाही
५} कायद्याने ठरविल्यानुसार रोखाधारकास रोख्यावर व्याज मिळवण्याचा हक्क राहील हे व्याज रोख रूपाने या वस्तुरूपाने व योग्य वाटले त्या पद्धतीने सरकार  घेईल
६}शेती उद्योग कोणत्या पायावर उभा केला जाईल हे बाबासाहेब सांगतात i } ताब्यात घेतलेल्या जमिनीची प्रमाणबद्ध आकाराच्या शेतामध्ये सरकार विभागणी करील खेड्यातील कुळांना म्हणजे कुटुंबाच्या गटांना पुढील अटीवर शेते लागवडी साठी दिली जाइल अ } शेतीची लागवड सामुदायिक पद्धतीने केली जाईल ब } सरकारने जारी केलेल्या नियमानुसार आणी आदेशानुसार शेतीची लागवड केली जाईल क} शेतीवर निश्चित केलेई आकारणी दिल्यांनतर शेती उर्वरत उत्पन्न राज्याने ठरविलेल्या कुटुंबाने वाटून घेतील
ii } जात पंथ असा भेद न करता गावातील रहिवाश्यांना जमीन भाड्याने  दिली जाईल या पद्धतीत कुणी जमीनदार असणार  नाही कुणी जमीनदार यांचे कुळ असणार नाही आणि उणी भूमिहीन व मजूर असणार नाही  iii  }शेतीसाठी पाणी जनावरे अवजारे खत  बियाणे इ चा  पुरवठा करून सामुदायिक शेतांची लागवड करण्यासाठी आर्थिक तरदूत करणे राज्यावर बंधनकारक राहील iv } राज्याला पुढील बाबतीत  हक्क राहतील अ} शेती उत्पन्नावर पुढीलप्रमाणे आकारणी करता येईल १ } जमीन महासुलीसाठी एक  भाग २ } कर्जरोखे धारकांना परतफेड करण्यासाठी  एक भाग ३} पुरवठा केलेल्या भांडवल वस्तूच्या वापरासाठी एक भाग ब } जी कुळे कुळ कायद्याच्या नियमांचा भंग करतील किंवा राज्याने दिलेल्या लागवडीच्या साधनांचा योग्य वापर न करता हेळसांड करत  असतील किंवा सामुदायिक शेती योजनेला बाधा येईल अशी कृती करतील त्यांना राज्य योग्य ती शिक्षा करून  शकेल
आता यातून बाबासाहेब यांचा शेतीविषय किती महत्वाचा हेतू आपल्याला स्पष्ट दिसेल शेतकरी भूमिहीन कधी होता कामा नये म्हणून बाबासाहेबांचे विचार पाहता शेतकऱ्यांनी त्यावर विचार करण्याची गरज आहे कारण बाबासाहेब यांनी शेतकऱ्याला खरा  मार्ग दिला आहे यशस्वी  होण्याचा  शेती आणि शेतकरी यांचा विचार बाबासाहेब यांनी  राज्य समाजवादाच्या दृष्टीकोनातून  पाहिले आहे आपण देखील त्याचा विचार केला पाहिजे
आता यांचा संविधानात काय तरदूत आहे ते पाहणे आहे पहा काय आहे ती
भारतीय संविधान कलम ४८ मध्ये लिहिले आहे कि आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसवर्धन याची सुस्त्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणी चि गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्याच्या कत्तलीस मनाई करणे या करता उपाय योजना करील
सातवी अनुसूची मध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या बाबी या सूचीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत  काळजीपूर्वक पाहिल्यास शेतकऱ्यांचे हिताच्या बाबी लक्षात येईल

आता आपण पाहू शकता कि बाबासाहेब यांनी नुसता शेतकरी यांचा विचार केला नाही तर त्यांच्या  सोबत राबणाऱ्या जनावरांच्या कत्तली होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे आज जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करत आहेत त्यांना हि मोठी चपराक आहे कि बाबासाहेब यांच्या धोरणांचा विचार केला असता तर आज बाबासाहेब यांच्या दृष्टीने पहिले असते  तर इतके नक्की  आज या देशाची प्रगती इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे असती बाबासाहेब यांनी पाहिलेली हि दूरदृष्टी होती पण या देशाने बाबासाहेब यांच्याकडे पाहिले ते या देशाचा दलितांचा नेता म्हणूनच पण बाबासाहेब यांच्यातील काही गुण पाहिले असते तर आज या देशाने खरे बाबासाहेब कोण  होते हे पाहणे आवश्यक आहे बाबासाहेब यांच्या कोणत्याही अभ्यासाचा   भाग पाहता  बाबासाहेब यांनी  शेतकरी वर्गाला दिलेला महत्वाचा इशारा आज या शेतकरी वर्गाने समजून घेतला असता तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यास नसत्या
दुसरी गोष्ट बाबासाहेब यांचे सामुदायिक शेती हा काय प्रकार आहे हा आज हि शेतकऱ्याला समजलेला नाही बाबासाहेब यांच्या या महत्वाच्या विषयावर कोणी आजवर ना विचार केला ना त्यांचा आचार केला पण बाबासाहेब यांच्या नावाचा फक्त राजकारण केले आणि बाबासाहेब यांना एका जातीत  बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आज आम्ही करतच आहोत  बाबासाहेब हे शेतकरी मजुरांचे किती विचार करीत होते याची प्रचीती येते पण हे बाबासाहेब आमच्यापुढे कधी आलेच नाही  कारण आम्ही ते पुढे येवू दिलेच नाही 
शेती व शेतमजूर यांच्या हिताचा विचार करणारे बाबासाहेब इथल्या शेतकरी व शेतमजुराला आज हि माहित  नाही म्हणून त्यांच्या माहितीसाठी आम्ही  एक प्रयत्न करतो आहे कि बाबासाहेब यांचे हे रूप समजून घ्या त्यांना फक्त संविधान निर्माते म्हणून किंवा अश्पृश्यांचे पुढारी म्हणून न पाहता  दूरदृष्टी असणारा नेता म्हणून बघा त्यांच्या विविध पैलू अभ्यासून घ्या मग समजेल बाबासाहेब या  भारतातील एक  महामानव आहेत म्हणून जातीमध्ये न पाहता देशाच्या सर्वोकृष्ट भूमिपुत्रापैकी एक भूमिपुत्र ,म्हणून बाबासाहेब यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे

कामगारांचे मॅनेजमेंट :भारतात कामगार चळवळ हि कम्युनिष्ट लोकांनी आपल्या हातात  घेतली पण तिचे मॅनेजमेंट करण्यात कम्युनिष्ट मागे पडले बाबासाहेब यांनी कामगारांच्या संपास विरोध दर्शविलेला आहे त्यांना ते राजकीय संप वाटे  बाबासाहेब  उच्च शिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंड मध्ये राहिले होते तसेच जर्मनी मध्ये हि ते होते त्यावेळी त्यांनी तिथल्या कामगार चळवळीचा  अभ्यास करून  भारतात कामगारांचे भवितव्य घडवण्याचा विचार केला आणि आहे सारे १९३५  च्या आधी कारण बाबासाहेब हे मुंबई मध्ये १९३४ च्या सुमारास कामगार संघाचे अध्यक्ष झाले होते आणि त्यांनी कामगारांची चळवळ सुरु केली कामगारांच्या हिताचा विचार सुरु केला केवळ आर्थिक च नव्हे तर सामाजिक व राजकीय दृष्टया कामगारांचा विचार करणारे बाबासाहेब या जगातील एकमेव कामगार नेते आहेत 

१९३५ च्या कायद्यान्वे निवडणूक होऊन प्रांतांना स्वायत्तता मिळणार होती आणि म्हणून बाबासाहेब  यांनी १५ ऑगस्ट १९३६  ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली यामध्ये त्यांनी जातीधर्म पंथ असा भेद न  करता कामगार हित पाहिले  आहे . 

बाबासाहेब आधुनिक जगतात कामगारांचे उद्धारकर्ते आहेत हे  बऱ्याच जणांना माहित नसल्याने त्यांच्यासाठी  महत्वाच्या गोष्टी आपण  सांगत आहोत त्या अश्या पद्धतीने  

संविधानातील कामगारांच्या हितासाठी केलेली तरतूद पहा 

१} कलाम ३९{ड} : स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यांस न पेलवणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये 

२} कलम ३९{ क } : उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री व पुरुष नागरिक याना सारखाच असावा 

३} कलम ३९ {ख } जनसामान्यांच्या हिताला सर्वाधिक उपकारक होईल अश्या रीतीने समाजाच्या  भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्वाधिकार व नियंत्रणाधिकार यांचे वाटप व्हावे 

४} कलम ३९{ ग}  आर्थिक यंत्रणा राबविताना परिणामी धनदौलतीचा व उत्पादन साधनांचा जनसामान्यास अपायकारक होईल अश्या प्रकारे एकाच ठिकाणी संचय होऊ नये 

५} कलम ३९{ घ} पुरुष व स्त्रिया याना दोघांना हि सामान कामाबद्दल सामान वेतन मिळावे 

६} कलम ४३ : कोणत्याही  मार्गाने शेतकी , औद्योगिक अथवा  अन्य प्रकारच्या सर्व मजुरांना काम निर्वाह वेतन समुचित जीवनमान आणि फुरसती चा व सामाजिक आणि सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपभोग याची शास्वती  देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः राज्य ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर  कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील 

७} कलम ४३{ क} कोणत्या हि उद्योग धंद्यात गुंतवलेले उपरकं आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी राज्य अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाय योजना करील 

८} कलम ४१ राज्य हे आपली आर्थिक क्षणात व विकास मर्यादेत कामाचा शिक्षणाचा अधिकार आणि बेकारी वार्धक्य  आजार व विकलांगता यांनी पीडित अश्या व्यक्तीच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हालाखीचे  जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे अश्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत सरकार साहाय्याच्या अधिकार उपल्बध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील 

९} कलम ४६ राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करूळ आणि सामाजिक अन्याय व सवर्णअन्याय  प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करून

१०}कलम १९ {६}१ : कोणत्याही पेशा आचारण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय उदीम किंवा धंदा चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक अथवा नागरिकांना पूर्णतः  किंवा अंशतः  अथवा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या निगमने कोणताही व्यापार धंदा उद्योग किंवा सेवा चालविणे 

या कामगार लोकांसाठी तसेच व्यापारी लोकांसाठी देखील  संविधानात तरतुदी करून ठेवल्या आहेत आज आम्हाला भारतीय जनतेला किती माहिती आहे हे अद्याप कोडेच आहे  

भारतीय स्त्रीवर्गाचे  उद्धारकर्ते : भारतीय  स्त्री चे खऱ्या अर्थाने बाबासाहेब उद्धारकर्ते आहेत हे कमी जणांना माहित आहे . नुसते पुस्तकरूपी बाबासाहेब हि माहित असून जमणार नाही आजच्या काळात बाबासाहेब यांनी काय काय तरतुदी करून ठेवल्या आहेत हे ज्यांना माहित असेल त्यांनाच बाबासाहेब स्त्रियांचे उद्धारक  कसे हे माहित पडेल तर 

संविधानात  असणाऱ्या तरतुदी आपण पाहू या  

१} कलम १४ : कायद्यापुढे स्त्री पुरुष समानता प्रदान केली आहे 

२}कलम १५ : राज्य केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारचे भेदभाव करणार नाही 

३} कलम १५ { ३} या अनुच्छेदातील कोणत्याही  गोष्टीमुळे स्त्रिया व बालके त्यांच्याकरता विशेष तरतूद   करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही 

४} कलम १६{२} केवळ लिंगावरून राज्याच्या अखत्याराखाली कोणती हि नोकरी पद त्यांच्याकरता अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत प्रतिकूल भेदभाव केला जाणार नाही 

५} कलम ३९{ क } : उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री व पुरुष नागरिक याना सारखाच असावा  

६} कलम ३९{ घ} पुरुष व स्त्रिया याना दोघांना हि सामान कामाबद्दल सामान वेतन मिळावे 

७} कलम ३९{ड } स्त्री व पुरुष कामगारांचे आतोग्य व  ताकद यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांस आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय आणि ताकद यांस न पेलवणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये 

८} कलम ४२ : राज्य हे कामाबाबत न्याय व मानवोचित परिस्थिती उपलब्ध करण्यासाठी  व प्रसूती साहाय्यासाठी तरदूत करील 

९} कलम ३२५ : कोणत्याही व्यक्ती धर्म वंश जात किंवा लिंग या कारणावरून मतदार यातील समाविष्ट होण्यास पात्र असावयाची नाही किंवा तिने खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी हि करावयाची नाही  

 घटनेमध्ये  जागोजागी  स्त्रियांना अधिकार देऊ केले आहेत त्याशिवाय स्त्रियांना आपल्या . स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार ३. पोटगी  ४. विवाह   ५ . घटस्फोट         ६. दत्तकविधान  ७. अज्ञानत्व व पालकत्व   

या सात महत्वाच्यागोष्टी बिलामध्ये मांडल्या पण सनातनी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला बिल पास होऊ दिले नाही म्हणून बाबासाहेबानी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला   आणि हा प्रसंग नेहरू सरकार ला भारी पडला होता शेवटी बाबासाहेबांचे कष्ट काही वाया घेणे नाही अहो जे अशक्य काम  तेच बाबासाहेब पूर्ण करीत असत 

आणि बाबासाहेब यांनी घटनेत च हिंदू कोडबिल लिहून स्त्रियांना  हक्क मिळवून दिले आज स्त्रियांनी आधी ते हक्क काय आहेत हे माहित करून घेणे आवश्यक आहे 

 स्त्रियांना कोणतेच हक्क नव्हते एकदा लग्न झाले कि नवरा कसा हि असू द्या स्त्रीला कायम चे स्वतःला त्याच्या दडपणाखाली बांधून राहावे लागत होते स्त्री ला घरातील मालकी  हक्क नव्हते चूल आणि मूळ याशिवाय स्त्रीला स्वातंत्र्य नव्हते अश्या वेळी बाबासाहेब यांनी घटनेतून स्त्रीला सारे अधिकार बहाल केले आहेत 

स्त्रियांनी बाबासाहेब जाणून घेणे विषयक आहे ते यासाठीमूलभूत अधिकारांमध्ये सर्वच स्त्रियांना समानता देऊन स्त्रीला पुरुषांच्या जोडीला आणले आहे आज स्त्रियांचा होणार भारतात गौरव हा केवळ बाबासाहेब यांच्या संविधानातील तरतुदी मुले आहे पण आज हि स्त्रियांना त्याची जाणीव नाही असो 

आपले काम सांगण्याचे आहे आपण सांगत राहू या 

विद्यार्थ्यांचे  उद्धारक बाबासाहेब : बाबासाहेब विद्यार्थ्यांचे हितचिंतक होते  कारण स्वतः बाबासाहेब आजीवन विद्यार्थी म्हणून राहिले 

बाबासाहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला आहे कि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि हे सत्य आज  किती प्रकर्षाने जाणवते ते पहा   बाबासाहेबानी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयात शिक्षणच घ्यावे अगदी शक्तीचे कारण भविष्य घडवायचे असेल तर शिक्षण घ्यावे तसेच आपल्या कलागुणांना विद्यार्थ्यांनी वाव द्यावा यासाठी सरकार ने कसे लक्ष द्यावे  यासाठी बाबासाहेब घटनेत हि तरतुदी करतात त्या पुढील प्रमाणे 

१} कलम १५{३} कोणत्या हि गोष्टीमुळे स्त्रिया व  बालके त्यांच्याकरता  कोणतीही विशेष तरदूत करण्यात राज्याला प्रतिबंध होणार नाही 

२} कलम २४ चौदा वर्षे व्याखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम कारण्यासाठी व नोकरीस ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्याची योजना केली जाणार नाही 

३} कलम ४५ राज्य हे या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्षाच्या कालावधीच्या आत सर्व बालकांना त्यांच्या वयाच्या चौदा वर्षे पूर्ण होई पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतुद करण्यासाठी प्रयत्नशील राहील 

याशिवाय बाबासाहेब यांनी गरीब समाजाच्या जातिप्रथेमुळे पिचलेल्या  लोकांच्या मुलांसाठी विशेष सवलती लागू करण्याच्या हि तरतुदी केल्या आहेत मुलाना राहण्यासाठी वसतिगृह शिक्षणासाठी मोफत पुस्तके फी मध्ये सवलती शिष्यवृत्ती अश्या अनेक गोष्टींचे  प्रावधान त्यांनी करून ठेवले आहे शिक्षणाचा कणा सुधारला तर देशाचा कणा  मजबूत होऊ शकतो 

विद्यार्थ्यांना  सांगताना बाबासाहेब म्हणतात मी सिडनहॅम कॉलेज ला असताना माझे लेक्चर मी १२ ते १३ वेळा लिहून काढायचो आणि  यापेक्षा अजून  कोणी अधिक सांगू शकणार नाही याची खात्री  झाल्यावर मी विद्यार्थ्यांना लेक्चर देत  होतो 

बाबासाहेब यांनी शिक्षण या एका गोष्टीस  भुकेपेक्षा जास्त महत्व दिले आहे  सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून बाबासाहेब यांनी  शिक्षण संस्था उभी केली कॉलेज  बांधले  

शिवाय बाबासाहेब विद्यार्थ्यांना कलागुणांमध्ये  वाढ व्हावी यासाठी देशी परदेशी खेळांचे शिक्षण हि मुलांनी घेतेले पाहिजे  या दृष्टीने विचार केला आहे 

बाबासाहेब यांनी शिक्षणासाठी ची जबाबदारी सर्वात मोठी समजली आहे कारण विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक असतात आणि त्यांना घडवले तरच देश घडूशकतो देशाचे भवितव्य हा विद्यार्थी असतो त्यामुळे विद्यार्थ्याला  घडवणे महत्वाचे असते आणि यासाठीच बाबासाहेब यांनी लोकांना  संदेश दिला आहे शिक्षणाचा 

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा . 

 बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते

” आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो . प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे . माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही मी इतके सांगू इच्छितो कि आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता  वाटते.

अशाप्रकारची संमेलने फार होतात . त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आल – मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले कि त्यात बिद्यार्थ्याना एक टोमणा मारलेला असतो . तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देश सेवा करण्याचा उपदेश करण्यात येतो . पण यात काही हशील नाही . विद्यार्थ्यासंबंधी मो जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो कि हा उपदेश खोटा  आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही. विद्यार्थ्याने शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप आहे ? त्याला आयुष्य आहे, भावना आहेत. प्रत्येक मनुष्याचे अनित्म ध्येय काय आहे ? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होवून त्यास गोड फळे यावीत . हेच ध्येय आहे . म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही . म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा . मला असा अनुभव आला आहे कि , सरकारी नोकरी हल्ली एकाच जातीचा मक्तेदारी होवून बसली आहे . कलेक्टर ओफिदात किंवा इतर प्रत्येक ऑफिस मध्ये एकाच  जातीची माणसे आहेत . पुष्कळ माणसे सांगतात : ‘ तुम्ही नोकरीसाठी का भांडता ? लायकी असली कि नोकरी मिळते, त्यात जातीचा कशाला प्रश्न ? परंतु सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे , असे विचारणारे मूर्खपणाचे आहे . या देशात जातीभेदाचे प्रस्थ  फार आहे . आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्या हाती खरी सत्ता  आहे . तो तिचा सदभावनेने उपयोग न करता आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतो . नोकरीमुळे पगार  हाती येतो . ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत , जो समाज अधिकाराच्या जागेवर नाही त्याची उर्जितावस्था होणार नाही . ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत  गुंतलेला आहे . त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो . तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा पिच्छा पुरवल्यामुळे समाजाची उन्नती होईल . याचा तुम्ही काशोसीने प्रयत्न करा .

शिकलेल्या माणसात काही दोष असतात –  शिकल्यावर नोकरीच्या मागे लागणे हा धोश नव्हे . ते दोष व अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाही याची खबरदारी घ्या पहिली गोष्ट : शिक्षण पूर्ण झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो . मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे परंतु शिकलेला मनुष्य स्वतःच्या हिताची  काळजी ह्जेतो . मझिनि म्हणतो कि , ‘ लोकात पारतंत्र्य पसरले , माणसे शिकली तरी   त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते ” आपले कर्तव्य कोणते , याची भावना जागृत होत  नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोष आहे .

मला खेद वाटतो कि शिकलेला मनुष्यास पदवी मिळाली आणी त्याला निकारी  लागली कि त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ सुटतो . विद्येचे महत्व खुंटले जाते . मी प्रवास करीत असताना मजजवळ नेहमी चार  पुस्तके व वर्तमान पत्रे असतात . परंतु प्रवासात जी शिकलेली  माणसे दिसतात.  त्यांच्या हातात पुस्तके, वर्तमान पत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात . मनुष्य बी. ए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय ? बि.ए. किंवा एम. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले . हि भावना चुकीची आहे . अगस्ती   मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते ! बडोदे संस्थानात एक ग्रहस्थ होता तो बि. ए झाला होता महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती त्यावेळी बडोदे संस्थानचे दफ्तर गुजराथीतून चालत असे इंग्रजीतून चालत नसे .  मनुष्यफार आळशी ! कधी चुकून टाईम्स देखील वाचीत नसे . याचा परिणाम असा झाला कि काही वर्षांनी त्यास ए . बि. सि.ची देखील ओळख राहिली नाही हे अगदी सत्य आहे ; माझासुद्धा असाच अनुभव आहे पि.एच. डी . हि पदवी  मिळवण्यासाठी फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे त्यावेळी त्या भाषा मला अवगत होत्या . परंतु आत त्या भाषांचा व्यासंग नसल्याने त्या भाषातून बोलने मला कठीण जाते अलीकडे मी फ्रांस व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या भ्शेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे . ज्याप्रमाणे एखादा माणूस दारू प्यावयास लागला तो ती जन्मभर पीत राहतो त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे . झाले पाहिजे . विद्येची  खरी गोडी कोणाला लागली ? परीक्षेनंतर जो आपली पुस्तके नळ  बाजारात विकतो त्याला ? बायकोपेक्षा , पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम असते त्याला विद्येची गोडली लागली , असे मि म्हणेन . माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जब्ती आली व बेलीगाने जर माझ्या  पुस्तकाला हात लावला तर मी त्याला गोळी घालून जगाच्या जागी ठार करीन .

मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोडी दिसते लग्नात मुलगी सुंदर आहे काय ? ती आपणास पसंद आहे काय ? वैगरे गोष्टी तुम्ही पाहता . पण त्रोच हक्क मुलीना द्या . बऱ्याच सुंदर स्त्रिया कुरूप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पहिल्या आहेत . या देशात  मला कंटाळा आलेला आहे . परन्तु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे . म्हणून मला इथे राहणे भाग पडले यातील धर्म, सामाजिक रचना सुधारणा व संस्कृती यांचा मला फारच कंटाळा आला आहे . i am  at war with  civilization .

येथील कोट्याधीश मारवाड्यांच्या घरात काय दिसेल ? त्यांच्या घरात स्टच्यु , फर्निचर पेंटिंग व पुस्तके यापैकि एक हि वस्तू दिसणार नाही , हीच गोष्ट ब्राह्मणांची  . एखादा ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यास तो आपल्या बायकोला एखादी सोन्याची पुतली करण्याच्या गडबडीत असतो . कारण सोने संकट समयी उपयोगी पडते न ! जगात फक्त जगणे हेच ध्येय असेल तर पशु आणि मनुष्य यात फरक काय ? मनुष्य सौदर्याची साठवण करू शकतो ; पशुला ते करता येत नाही . नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौदर्य वाढत नाही मी आतापर्यंत दहा ते अठरावेला विलायतेला गेलो . माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेला आले होते . त्यांना आता मी पाहतो तो काय त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य ! त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही . काय  त्यांचा जन्म !  हिंदू धर्मातील सर्व  घाण त्यांना मान्य आहे . तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात . अतंत्य घाणेरड्या पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे . तुमच्या आईबापाना शिक्षण नाही . अठराविश्वे दारिद्र्य  तेव्हा हा मैल साफ करणे हे तुअम्चे कर्तव्य आहे . बायबलात मी वाचले आहे कि  मिठाच जर आळणी झाले तर बाकी पदार्थाला चव कशी येणार ! कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजे . स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकवणार ? सुधारणेचे मुल वंश परंपरा रुजले गेले पाहिजे . तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.

तुमच्या पैकी बहुतेक अविवाहित असतिल. क्रीत्येकांची लग्ने झाली असतील . पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात ? या बाबतीत तुम्हावर फार मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्या वडिलांच्या उदाहरन घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो . त्यांना एकंदर चौदा मुले झाली आणि त्यातले मी चौदावे रत्न परंतु मी एलिफ़िस्टन कॉलेज मध्ये असताना माझी काय दशा होती ? माझ्या पायात वाहणा नव्हत्या !अंगात माजरपाठाचे शर्ट आणि वडिलांचा फाटका कोट ! तुम्ही एलिफ़िस्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला तेथे मुल्लर सहिएबनचे तसबीर दिसेल . त्यांनी मला शेवटच्या वर्षात दोन शर्ट  पुरवली . मी विचार करीत असे , माझ्या वडिलांना चौदा ऐवजी चार मुले असती तर माझी किती चंगळ झाली असती . माझ्या या दुःखाला माझे वडिलच कारणीभूत होते . एकदा मी कॉलेजात जात असताना रेल्वेचा पास घरी विसरलो आणि त्याच दिवशी पासाची तपासणी होती . तिकीट घेणाऱ्या मास्तराने मला अडविले ज़वल तर दिडकी नव्हती चार वाजेपर्यंत चर्चगेट च्या स्टेशनवर बसून राहिलो होतो नंतर कैकिण नावाचा माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे आला . त्याने विचार ; ” काय रे येथे का बसलात ? मी त्याला सर्व हकीगत सांगितली त्याने चार आणे भरून माझी सुटका केली व त्याच्याच पैशाने तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले . तेव्हा या  बाबतीत मी वडिलांना दोष देतो. कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही . वडिलांचे चुकत असताना त्यांना सांगणे गैर  आहे , असे मला वाटत नाही .  तुमच्यावर आता जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे मी बोलतो ते केवळ पुरुषांकरिता नव्हे स्त्रियांनी सुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही नोकरीवर जाल मला   वाटते तुम्हापैकी बहुतेक कारकून हितील तर काही ५०-६० रुपये तुम्हास पगार मिळेल आणि त्यात तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार ? याची जबाबदारी समाजावर टाकणार ? याचा तुम्ही चांगला विचार करा तुम्ही सन्यास घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही कोणी घेतला तर फारच चांगले { हशा } हसू नका हि फार महत्वाची गोष्ट आहे . मला पाच मुले झाली त्यापैकी चार मेली याबद्दल आता वाईट वाटत नाही  तर उलट आनंदच वाटतो हि मुले जर जगली असती तर त्याचे शिक्षण खाणे राहणे यांचा बोजा माझ्यावर पडला असता व ते मला त्रासाचे झाले असते मला एकच  मुलगा आहे  माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे . त्याच्या एकशतांश जरी जबाबदारी तुम्ही आपल्या मुलाबद्दल दाखवली तरी फार उत्तम हि समजाच्या  कल्याणाची गोष्ट आहे तुम्हाला  पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार . त्यांची काळजी कशी घेणार ? मला वाटते हि चढती भाजणीच्या ऐवजी उतरती भाजणी आहे तेव्हा स्त्री पुरुषांचे पशुप्रमाणे जीवन घालवणे माणुसकीला सोडून आहे या गोष्टींचे तुम्ही अवश्य विचार करा .

बाबासाहेबांचे हे  भाषण आज हि विद्यार्थ्यांना   बरेच काही सांगून जाणारे आहे 

बाबासाहेबांची विदेशनीती : बाबासाहेब आंबेडकर यांची विदेश नीती कशी होती याचा अभ्यास केला असता भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे या बाबत बाबासाहेब यांचे विचार आपण ऐकले पाहिजे बाबासाहेब यांनी चीन गोवा पाकीस्थान काश्मीर सारख्या प्रदेशांच्या बाबतीत जे विचार मांडले होते  ते पाहणे  आवश्यक आहे

बाबासाहेब यांनी चीन या देशाचा अभ्यास करून चीन बाबत विचार केला  होता तो असा चीन ची राजकीय परिस्थिती तेथील नेतृत्व याचा अभ्यास करून   बाबासाहेब यांनी आपले विचार  व्यक्त केले आहेत बाबासाहेब १९५४ च्या राज्यसभेत म्हणाले होते कि चीन भारतावर एक दिवस आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही आणि नेमके तेच झाले १९६२ च्या डिसेंबर महिन्यात चीनने भारतावर आक्रमण केले जेव्हा चीन ने भारतावर आक्रमण केले तेव्हा सर्वच नेत्यांचे डोळे उघडले बाबासाहेबांची भविष्यवाणी खरी ठरली बाबासाहेब यांचे जर ऐकले असते तर कदाचित चीन ने भारतावर आक्रमण झाले नसते हे संकट टळले असते परंतु सत्तेने अंध झालेल्या नेते याशिवाय दुसरे काय करू शकतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते तिबेट ला buffer state  म्हणून राहू द्यावे इंग्रज सरकारनी तिबेट मध्ये आपले सैन्य ठेवून आपली मुत्सद्देगिरी दाखवली समजा चीन बरोबर युद्ध झालेच असते तर ते तिबेट च्या भूमीवर झाले असते पंचशील करार करून तिबेट वर चीन चे सार्वभौमत्व मान्य करण्यात आले यामुळे  भारताची सरहद्द चीनला जावून  मिळाली भारताचे पंतप्रधान नेहरू म्हणाले भारत चीनी भाई भाई हा नारा  फसवा ठरला आपल्या पंतप्रधानांनी पंचशील करार करून भारताची सरहद्द चीन च्या सरहद्द शी भिडवण्याचे सहाय्य केले ज्या चीन बरोबर हा करार झाला त्या चीन च्या माओला पंचशील बाबत काहीच घेणेदेणे नाही पंचशील बौद्ध धर्माचे महत्वाचे अंग आहे त्यावर माओला विश्वास नाही कारण बौद्धांना चीन मध्ये काही चांगल्या पद्धतीने वागविल्या जात नव्हते माओ हे कम्युनिष्ट असून काम्युनिष्टांचा विश्वास पंचाशिलेवर नाही पंचशील हे सामाजिक  जीवनात आवश्यक आहे पंचाशिलाचे राजकारणात स्थान नाही असे असल्यामुळे नेहरू नि जो करार केला तो चुकीचा होता असे बाबासाहेब यांना वाटे तसेच बाबासाहेब  यांचे म्हणणे होते कि भारताने आपले प्रश्न सोडवताना दुसर्या देशाचे प्रश्न सोडवणे हेच परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र आहे असे त्यांना वाटे

गोवा बाबत बाबासाहेब यांचे मत : बाबासाहेब यांनी तर सांगितले कि गोवा विकत घ्या कारण त्यावेळी पोर्तुगीज गोवा विकत द्यायला तयार झाला होता पण बाबासाहेबांच्या ह्या सांगण्याकडे तत्कालीन लोकांनी दुर्लक्ष केले आणि नंतर मात्र त्याच गोव्यावर मिलिटरी कारवाई करावी लागली रक्ताचे पाट वाहले गेले आर्थिक हानी झालीच पण मनुष्य हानी हि झालीच असंख्य लोकांचा जीव गमवावा लागला विकत घेण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पटीने किंमत मोजावी लागली असा देशाचे नुकसान करण्यात आले बाबासाहेबांचे ऐकले असते तर रक्ताचे  पाट वाहिले असते का नाही न पण त्यावेलि बाबासाहेबांची दूरदृष्टी या लोकांना समजलीच नाही बाबासाहेब यांचे तत्वज्ञान समजलेच नाही आणि आज हि समजले नाही  आहे नाही तर आज भारतकधीच महासत्ता झाला असता

रशिया भारत याचं मैत्री झाली तेव्हा त्या कराराला हि बाबासाहेबाचा विरोध केला कारण रशिया हे साम्यवादी होते रशियाने फिनलंड इस्टोनिया लाटव्हिआ लुथुनिय पोलंड झेकोस्लोव्हाकिया हंगेरी रुमानिया बल्गेरिया व अल्बानिया या देशांना गिळंकृत केले होते आणि हि रशिया भारत देश सुद्धा  नेस्तनाभूत करण्यास मागेपुढे पाहणार नाही हा बाबासाहेबांचा दृष्टीकोन होता

काश्मीर बाबत बाबासाहेबांचे धोरण काय होते : भारत १६४७ ला स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या उन्यावर असलेला एकही देश नव्हता पण आपल्या सर्वच मित्रांनी आपला त्याग केलेला आहे आपले कोणी मित्र राहिलेला नाही स्वतःला वेगळे करून एकलकोंडेपणाने वावरत आहोत सयुंक्त राष्ट्र संघात आपल्या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी आम्हाला कोणी सापडत नाही असे आपले  परराष्ट्रीय धोरण आहे  काश्मीर चा प्रश्न न सुटल्यानेच पाकिस्तानशी असलेले आपले सबंध  बिघडलेलं आहेत या प्रश्नाला मूलाधार ठरवून विचार केला तर माझे नेहमीचेच मत  आहे कि  काश्मीरचे  विभाजन करणे हाच उत्तम पर्याय आहे काश्मीरचा हिंदू आणि  बौद्ध प्रदेश भारताला द्यावा व मुसलमानी प्रदेश पाकिस्तान ला द्यावा वस्तुतः काश्मीरचा जो मुसलमान व्याप्त भाग त्याच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही पाकिस्तान मुसलमानांनी व काश्मीरच्या मुसलमान यांनी आपसात निर्णय घेण्याचा प्रश्न आहे त्यांना  हवा तो निर्णय  या  बाबतीत ते घेवू शकतात किंवा तुम्हाला मान्य असल्यास काश्मीरचे तीन विभाग कल्पावे. १ युद्धविराम संधीक्षेत्र २ काश्मीरचे खोरे ३  नाम्मू लद्दाक चे क्षेत्र केवळ काश्मीरच्या खोऱ्यात जनमत घ्यावे प्रास्तविक सार्वत्रिक मतगणनेला मी घाबरण्याचे कारण म्हणजे काश्मीरची हिंदू व बौद्ध जनता पाकिस्तानात घसातट जाइल आणि पूर्व बंगाल मध्ये जशी आज स्थिती आहे तशीच स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल अशी मला भीती वाटते

बाबासाहेब यांचे मततत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी विचारात घेतले नाही उलट  हा प्रश्न युनो मध्ये नेवून चिघळविन्याचाच प्रयत्न केलेला आहे अजूनही हा प्रश्न भारताला सोडविता आलेला नाही तसाच लोंबकळत ठेवलेला आहे

काश्मीरच्या प्रश्नासाठी त्या काळी ३५० कोटी उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये खर्च होत  होते आज हि हा खर्च चालूच आहे आज बाबासाहेबांचा सल्ला स्वीकारला असता तर आज जी सैन्यावर केला  जाणारा खर्च हा काश्मीरच्या विकासासाठी वापरता आला असता सैन्याची होणारी जीवित हानी टाळता आली असती खर्चहानी आणि जीवहानी टाळण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी बाबासाहेब  यांनी काश्मीर प्रश्नावर आणि हिंदू कोड बिलाच्या  मुद्द्यावर  कायदेमंत्री पदाचा त्याग केला तसेच आपल्या  राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणात काश्मीरचा प्रश्न घेवून अपयश सुद्धा सहन केले केवळ जनतेच्या कल्याणासाठी

आज काश्मीरबाबत दोन्हीन देशांना वाटते कि काश्मीर आमच्यचं  ताब्यात असावा म्हणून पाकिस्तान काश्मीरला आपली ढाल म्हणून उपयोग करून घेत आहे तर भारत आपली सरहद्द असुरक्षित राहू नये म्हणून म्हणून काश्मीरची आवश्यकता आहे

सत्तेवर आल्यावर असेच वाटते कि आपणच केवळ  भारतीय जनतेचे कल्याण करणार आहोत इतरांनी भारतीय जनतेच्या कल्याणाचा विचार कितीही तळमळीने केला तरी दुर्लक्षित करायचे असेच भारतीय सत्ताधाऱ्यानी  ठरवले आहे याशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही

पाकिस्तान विषय : बाबासाहेब यांनी १९४० साली पाकिस्तान अथवा भारताची फाळणी हे पुस्तक लिहिले उपोद्घातात लिहितात कि पाकिस्तानची समस्या प्रत्येक व्यक्तीकरिता डोकेदुखी बनून राहिली आहे  विशेषतः माझ्याकरिता . त्यांनी आपले साहित्यिक कार्य थांबवून सुनिश्चित असे विचार पक्षपात न करता शिफारस  न करता मांडलेले आहेत

म गांधी म्हणाले कि माझ्या शरीराचे दोन तुकडे झाले तरी चालतील पण पाकिस्तान  हिवू    देणार   नाही पण त्यांच्या डोळ्यादेखत भारताचे दोन तुकडे झाले आणि म गांधी यांना दूरदृष्टी दिसून आली परंतु बाबासाहेब यांनी स्पष्टपणे सांगितले कि अखंड भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग व्हावेत हे का  व्हावे याची मीमांसा सर्व बाजूने केली हि मीमांसा करताना कोणाला खुश करण्याचा दृष्टीकोन ठेवलं नाही किंवा पक्षपात हि केला नाही

बाबासाहेब यांना वाटे कि जर अखंड भारताची  फाळणी झालीच तर लोकसंख्येची अदलाबदली करावी परंतु बाबासाहेब यांचा हा सल्ला  मान्य केला नाही नव्हे याकडे बुद्धिपुरस्पर दुर्लक्ष केल्या गेले त्याचा हा परिणाम म्हणून जिकडे तिकडे कत्तली जाळपोळ मारझोड बेअब्रू इ बाबींची हानी झाली ती हानी लोकांना पाहायला सुद्धा मिळाली

बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात मुसलमानांना राजकीय मागणीचा उल्लेख  केलेला आहे त्याचप्रमाणे मुसलमानांची स्थिती हि दर्शवली आहे पाकिस्तान विरोधात हिंदूंची विचारप्रणाली पाकिस्तान अभावी काय पाकिस्तान ची वेदना पाकिस्तान झालेच पाहिजे काय पाकिस्तान ची समस्या आणि निर्णय व उपसंहार यामधून बाबासाहेबांनी सर्व बाजूनी  विचार केला आणि म्हणूनच गांधी आणि जीनांनी बाबासाहेब यांची मुक्त कंटाने प्रशंसा केली आहे आणि पाकिस्तान या विषयावर हे एक अधिकृत पुस्तक म्हणून मान्यता देवून याची सार्थकता पटवून देण्यात आली आहे

राष्ट्रीयत्वाची जी भावना असते ती जर लोकांमध्ये निर्माण झाली तर ते स्वतंत्र  होण्याचा प्रयत्न करतात आनिऊ त्याच्याच परिणाम म्हणून वेगवेगळ्या राष्ट्रांची  निर्मिती झाली आहे काय हे पाहण्यासाठी पाकिस्तान अथवा पाकिस्तानची फाळणी  हा ग्रंथ अवश्य वाचवा

दुसऱ्या महायुद्धाच्या समयी : दुसरे महायुद्ध ३/९/१९३९  ला सुरु झाले १०/८/१९४५  ला संपले  या महायुद्धाच्या एका बाजूला जर्मनी इटली आणि जपान होते तर दुसऱ्या बाजूला रशिया अमेरिका आणि ब्रिटन होते या देशाचे प्रमुख म्हणून जर्मनीचा हिटलर इटालीचे मुसोलिनी  आणि जपानचे साझुकी  होते तर रशियाचे स्टालिन अमेरिकेचे रूझवेल्ट ब्रिटन चे चर्चिल होते एका बाजूला हिटलर सारखा हुकुमशहा होता तर एकाबाजूला चर्चिल सारखा लोकशाही वादी होता असे हे युद्ध  हुकुमशहा विरुद्ध लोकशाहीचे होते असे म्हटल्यास काही हरकत येणार नाही

या महायुद्धात गांधी आणि   नेहरू यांनी चले जाव ची चळवळ उभारून ब्रिटनच्या विरोधात उभे राहिले सुभाषचंद्र बोस जपानमध्ये जावून आझादहिंद सेना उभारून त्यांच्या विरोधात कार्य करू  लागले परंतु बाबासाहेब मात्र ब्रिटन च्या विरोधात न उभेराहता सहकार्यांच्या बाजूने उभे राहिले

आता सर्वाना याचेच आश्चर्य वाटते आणि सारे लोक बाबासाहेब यांना यामुळेच देश द्रोही ठरवतात पण त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा काह्डी विचार केला नाही का बाबासाहेब ब्रिटन च्या बाजूने उभे राहिले जर युद्धात हुकुमशहा विजयी झाला असता तर भारत एका साम्राज्यवादी इंग्रजाकडून हुकुमशहा हिटलर च्या ताब्यात  गेला असता येथे लोकशाही प्रस्थापित झाली नसती आणि भारताला स्वतंत्र्यासाठी खूप कालावधी गेला असता

दिनांक २७/७/१९४२ ला टाईम्स ऑफ इंडिया च्या मुलाखतीत बाबासाहेब म्हणतात भारतीयांच्या संबंधात बोलायचे झाले तर ब्रिटीश आता शेवटच्या खंदकात लढत आहेत जर लोकशाही चा जय झाला तर भारताच्या स्वातंत्र्याच्या आड कोणी येवू शकत नाही आणि  म्हणूनच बाबासाहेब हे   ब्रिटनच्या बाजूने उभे राहिले त्याबाबत म्हणतात कि दुसरे महायुध्दा झोटिंगशाही आणि लोकशाही यांच्यात जुंपले आहे आणि सर्वांनी  किमान लोकशाहीची मुल्ये आणि संस्कृती जतन करण्यासाठी झटले पाहिजे

दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर भारत १५/८/१९४७ ला स्वतंत्र झाला जर गांधी आणि सुभाषचंद्र ब्रिटन च्या विरोधात झगडले नसते तर भारताला १९४५ च्या शेवट पर्यंत स्वतंत्र भेटले असते कारण संपूर्ण शक्ती बाबासाहेब यांच्या बाजूने एकवटली असती पण तसे नाही या लोकांनी बाबासाहेब यांना एकटे पाडले त्यासाठी अनेकांनी आपल्या परीने प्रयत्न केले यांना बाबासाहेब यांच्या पद्धतीने स्वतंत्र नको होते कारण जर तसे झाले असते तर बाबासाहेबांचा  स्वातंत्र्याच्या मध्ये योगदान आले असते पण बाबासाहेब यांचे स्वातंत्र्यासाठी  असणारे योगदान हे लोक जाणीव पूर्वक विसरतात यालाच ब्राह्मणशाही म्हणतात पण बाबासाहेबांच्या असणाऱ्या बुद्धीमत्ते पुढे शेवटी झुकावेच लागले

बाबासाहेबांचा हा पैलू लोकांच्या नजरेस कधी येवू दिला नाही हीच खरी या देशाची शोकांतिका आहे बाबासाहेबांचे हे विचार लोकांनी स्वीकारले असते तर पाकिस्तान फाळणी समयी झालेला अमानुष हत्याकांड झाले नसते लोकांची ती अवस्था झाली नसती शेवटी आज ना उद्या कळेल या भावनेत लोक राहिले पण बाबासाहेब अजून काही समजण्यात हा भारत देश मागे राहिला आहे याचीच खंत आहे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat