दिवाळी बौद्धांचा सण आहे का ? नेमके बौद्ध समाजाने काय केले पाहिजे

कार्तिक अमावस्या बौद्ध स्तुपांची प्रतिकृती तयार करून त्यांचे [पूजन केले जात होते आज तोच उत्सव दिवाळी च्या नावाने एका विशिष्ट धर्माच्या नावाने साजरा केला जातो बौद्धांनी त्यांची परंपरा बौध्द संस्कृती प्रमाणे का साजरी करू नये इथे कोणते कर्मकांड करायचे नाही इथे अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारा बुद्धांचा निर्वाण कडे घेवून जाणारा मार्ग का सोडून द्यायचा एक तर केवळ दुसऱ्या धर्मावर टीका करण्यासाठी च आम्ही या सणांना टार्गेट करण्यापेक्षा त्याचे महत्व ओळखून आपली संस्कृती जतन करण्याचा का प्रयत्न नये केवळ दिवाळीच दीप लावण्यासाठी चा सन नाही तर प्रत्येक अमावस्या हि अंधाराची असते तिला प्रकाशमान करा जवळच्या ऐतिहासिक वास्तू मध्ये जावून दीप लावून एक दिवसाचा जीवनात धम्म कसा आचरणात आणायचं याचे शिक्षण घ्या आणि आपल्या मुलांना हि ते शिक्षण द्यावे हा धम्म कृतीशील आचरणावर आहे पाठांतर आणि गप्पा गोष्टी वर नाही म्हणून आचरणात जितके आम्ही हा धम्म आणू तेवढा बदल घडणार आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी देखील आपल्या शिलालेखात स्पष्ट म्हटलेले आहे दुसऱ्या संप्रदायांची निंदा करून तुम्ही स्वतःच्या संप्रदायाचे नुकसान करून घ्याल म्हणून आणि हे वास्तव आहे थोडा शिलालेख समजून घेवू

देवानंपिये पियदसि राजा सवपासंडानि च प्रवजितानि च घरस्तानि च पूजयति दानेन च विविधाय च पूजाय पूजयति ने. न तु तथा दानं व पूजा व देवानंपियो मंञते यथा किति सारवढी अस सवपासंडानं. सारावढी तु बहुविधा. तस तस तु इदं मूलं य वचिगुती किति आत्पपासंडपूजा व परापासंडगरहा व नो भवे अपकरणम्हि लहका व अस तम्हि तम्हि प्रकरणे. पूजेतया तु एव परापासंडा तेन तेन प्रकरणेन. एवं कतं आत्पपासंड च वढयति परपासंडस च उपकारोति. तदं यथा करोतो आत्पपासडं च छणती परापासंड च पि  अपकरोति याहि कोचि आत्पपासंडं पूजयति परपासंड व गरहति सव आत्पपासंडभतिया किंति आत्पपासंडं दीपयेम इति सो च पुन तथ करातो आत्पपासंडं बाढतरं उपहनाति. त समवायो एव साधु किंति मञमंञस धंमं स्रुणाज च सुसंसेर च. एव हि देवानंपियस इछा किंति सव पासंडा बहुस्रुता च असु कलाणागमा च असु. ये च तत्र तत पसंना तेहि वतव्यं. देवानंपियो नो तथा दानं व पुजा व मंञते यथा किंति सारवढी अस सवपासंडान. बहका च एताय अथा  व्यापता धंममहामता च इथीझखमहामाता च वचभूमीका च अञे च निकाया. अयं च एतास फलं य आत्पपासंडवढी च होति धंमस च दीपना.

देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा दानाने आणि विविध पूजनाने सर्व संप्रदायातील प्रवज्जीत म्हणजे जे संन्याशी आहेत असे आणि जे सद गृहस्थ अर्थात चांगले गृहस्थ व्यक्ती यांचा सन्मान करतात. परंतु देवांचा प्रिय प्रियदर्शी कीर्ती आणि सार वृद्धीस मानतात तसेच दानास व पूजनास नाही सारवृद्धी हि अनेक प्रकारे होते यामध्ये अल्पवानी अर्थात बोलण्यावर संयम असणे विनाकारण स्वसंप्रदायाची पूजा व प्र संप्रदायाची निंदा करू नये अथवा अल्पशी चर्चा त्या त्या प्रकरणात व्हावी.
नेहमी पर संप्रदायाची पूजा व्हावी असे करणारा हा स्वसंप्रदायाची वृद्धी व परसंप्रदायची उपकृत करतो या विपरीत करणारा हा स्व संप्रदायाची हानी आणि पर संप्रदायाची अपकार करतो. जो कुणी स्वसंप्रदायाच्या भक्तिस्तव स्संप्रदायास प्रकाशित करण्यासाठी आपल्या संप्रदायाची पूजा आणि इतरांच्या संप्रदायाची निंदा करतो तो खरे पहाता स्वतःच्या संप्रदायाची अधिक हानी करतो म्हणून एकत्र असणे चांगले एकमेकांचा धम्म अर्थात जीवनाची मूळतत्वे ऐकणे व ऐकविणे देवांचा प्रिय याची इच्छा आहे कि सर्व संप्रदाय बहुश्रुत होवो कल्याण गामी होतोत आपापल्या संप्रदायातील जनास सांगावे कि देवांचा प्रिय कीर्ती व सार वृद्धीस जसे मानतात त्याच प्रकारे दानास व पूजनास मानीत नाहीत याच कारणास्तव अनेक धम्म महापात्रा स्त्री प्रधान महापात्रा वज्र भुमिक आणि अन्य अधिकारी नियुक्त केलेलं आहेत याचाच परिणाम आहे कि स्वसंप्रदायाची वृद्धी होवून धम्माचे प्रकाशन होत आहे.

सम्राट अशोक यांचा वरील शिलालेख पाहिल्यास आजच्या बौद्ध समाजाला एक कानाखाली जाळ काढल्यासारखे आहे. बाबासाहेबांनी यांच्या महापरिनिर्वाण झाल्यावर त्यांच्या पाठी जी चळवळ चालू केली लोकांनी ती द्वेष कारक च ज्यामुळे अन्य धर्माची निंदा करत यांनी स्वतःच्या धम्माची जितकी हानी केली आहे तितकी हानी इतरांनी हि केलेली नाही. सम्राट अशोकाच्या शिलालेखात लिहिलेले शब्द न शब्द आज सत्य प्रकाशित करत आहेत. इतर धर्मीय खास करून हिंदू धर्माचे सण उत्सव आले कि बौद्ध समाजाकडून विरोधाच्या गोष्टी समोर येतात वर्षभर झोपी गेलेले अभ्यासक झटकून जागे होतात आणि सर्व रेफरन्स देण्यास सुरुवात करतात पण दिवाळीच्या सणाच्या उत्सवाच्या वेळी बौद्धांनी नेमके काय करावे यावर मात्र मौन असतात. दीपावली असो वा दीपदान उत्सव असो बौद्ध समाजाने कार्तिक अमावास्या दिनी घरासमोर स्तुपाची भव्य प्रतिकृती निर्माण करून त्याचे पूजन करावे व एक संकल्प करावा कि बुद्धांच्या स्वरूप हा स्तूप आहे त्याच्याकडून बुद्धांच्या प्रत्यक शिकवणीचे सार घेत जावू खऱ्या जीवनात बुद्ध तत्व स्वीकारू

सम्राट अशोक यांच्या असंख्य शिलाखातून धम्म सांगण्यात आला आहे पण आज तो धम्म म्हणजे संप्रदाय समजून लोकांनी एकमेकांच्या संप्रदायाची निंदा सुरु केली यामुळे बौद्धांनी आपलेच मोठे नुकसान केलेलं आहे. प्राचीन काळात बौद्ध धम्म एवढ्या उंचावर उगाच नाही गेला तर प्रत्येक माणसाचा आदर प्रत्येक संप्रदायचा केलेला आदर हाच बौद्ध धम्माला एका उंचावर घेवून जाण्यास महत्वाचा ठरला बौद्ध धम्माच्या तत्वे जात पंथ भाषा प्रदेश याच्या पलीकडे जावून मानवास पाहतो तर आज त्याच धम्माचे अनुयायी एवढे द्वेषात्मक भावना अंतरंगात ठेवून का जगत आहेत. दुःखी कष्टी झालेल्या लोकांना मायेची प्रेमाची करुणेची गरज असते त्यांना तुमच्या संप्रदायात काय वाढले आहे त्याची गरज नाही अश्या लोकांना त्यांचे दुःख दूर करणारा मार्ग द्या त्यांचे कल्याण होईल कुणाला चुकीचा ठरवून आपण मोठे होवू शकत नाही हा निसर्ग नियम आहे तोच नियम आम्ही विसरून गेलो तर कसे चालेल शेवटी निसर्गाच्या वेगळे थोडी आपण आहोत

दीपावली सणाच्या निमित्ताने सम्राट अशोक यांनी दिलेला महान संदेश अवश्य आठवून प्रत्येक गोष्टी ला बौद्ध संस्कृती प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा दिवाळी आली म्हणून टीका नको उलट त्यांचे स्वागत करा इतरांच्या मनात मैत्री भावना निर्माण करा तोच खरा सण उत्सव आहे मैत्री चा उत्सव हाच मानवी जीवनास आवश्यक असतो. सणाचे महत्वच ते आहे सणांची निर्मिती च मुळात माणसाना एकत्र येण्यासाठी झालेली आहे. अश्यावेळी इतर कोणत्या हि संप्रदायची निंदा हि स्वताच्या विचारधारेची अधिगती कडे नेणारी सुरुवात आहे.
आज दिवाळी म्हटली कि बाबासाहेबांच्या नावाने लोक टीका सुरु करतात पण बाबासाहेब यांचे आम्ही भाषण कधी वाचले आहे का? देहूरोड मध्ये बाबासाहेब हे बौद्ध धम्मात कोणती खिचडी होवू देणार नाही असे स्पष्ट सांगतात अश्यावेळी आम्ही नेमके काय घ्यायचे हा मोठा प्रश्न आहे बौद्ध धम्म आणि त्याचे उत्सव खूप आहेत ते साजरे करू ते इतर धर्मियांच्या सोबत येतील त्यांच्याच सणाच्या दिवशी असतील म्हणून ते नाकारून चालणार नाही तुम्ही हि सुरुवात करा घराघरात स्तूप विहार लेण्यांच्या प्रतिकृती निर्माण करा स्पर्धांचे आयोजन करून लहान मुलांमध्ये आवड निर्माण करा ते नक्कीच या धम्म कडे वळतील धम्म घरात रुजवावा लागेल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल

दिवाळी च्या निमित्ताने बौद्ध समाजात अनेक गैर समज आहेत प्रथम बौद्ध समाजाने प्रत्येक सणासाठी इतर धर्मियांच्या सणांकडे पाहण्याचे सोडून द्यावे त्यांच्यावर टीका करण्याचे सोडून द्यावे जितकी इतरांची टीका जास्त कराल तितकेच आपले नुकसान जास्त होते हे बौद्ध समाजाला आजवर न कळलेला निसर्ग नियम आहे बुद्ध शिकवण आहे. आज हि आम्ही इतरांवर टीका करतो पण वास्तवात आम्ही आमचे खूप मोठे नुकसान केलेलं आहे हे आम्हाला अजून समजलेले नाही यासाठी सम्राट अशोक यांच्या शिलालेखाचा आज एक भाग सांगण्याचा प्रयत्न केला आहे अजून बरेच काही आहे आपण जोवर आपल्या धम्माची शिकवण रुजवत नाही तोवर आपले नुकसान अधिक च आहे. आपल्या प्रगती ला आडकाठी इथेच आहे कारण आम्ही इतरांच्या वर टीका करण्यात व्यस्त आहोत आम्ही आमच्या विकासाकडे लक्ष दिलेलं नाही.

शेवटी जाता जाता बौद्ध धम्माच्या शिकवणीने प्रत्येक बौद्ध समाजाने आलेला प्रत्येक सण बौद्ध संस्कृती चे जतन करण्यासाठी प्रयत्न करावे
अंधारातून प्रकाशाकडे अविद्याकडून निर्वाण दुःख मुक्त जीवन मंगल आचरण करणे हेच मोठे उत्सव आहेत
सम्राट अशोक यांच्या सोपारा येथील शिलालेखात उत्सव कोणते करावे सांगताना मंगल आचरण अर्थात धम्म आचरण हेच मोठे उत्सव आहेत लग्न बारसे सारखे मंगल उत्सव नाहीत तर धम्म आचरण हे चांगले उत्सव आहेत आणि बौद्धांनी त्यावर लक्ष द्यावे आजवर अनेक लोकांना डोक्यावर घेवून नाचण्याचे काम बौद्ध समाजाने केले पण जर आम्ही आपला इतिहास पाहिला तर इतरांच्या वर टीका करण्याची हि गरज [पडणार नाही एवढे वैभव आहे जे तुम्हाला जतन करायचे आहे चला तर दिवाळी च्या निमित्ताने संकल्प करू पुढच्या वर्षी याच काळात आपल्या प्रत्येक बुद्धांच्या घरी विहाराजवळ बुद्ध स्तुपाची प्रतिकृती निर्माण करू आणि जगाला हा शांतीचा महान संदेश देवू

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat