धम्म अध्ययन चारिका : नेणावली बुद्ध लेणी

प्राचीन बौद्ध लेण्यातून धम्म अध्ययन व प्राचीन बौद्ध स्थळांचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या बौद्ध स्थळांचे अध्ययन आणि संवर्धन हे दोन्ही गोष्टी शिकण्यासाठी एक दिवशीय धम्म अध्ययन चारिका व बौद्ध स्थळांचे संवर्धन कृतिकार्यक्रम आदरणीय बौद्ध भिक्खू यांच्या सोबत दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेणी नेणावली या ठिकाणी आदरणीय बौद्ध भिक्खू यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म सहल एक कृतीशील चिंतन घेण्यात येणार आहे. तरी या कृतीशील कार्यक्रमात आपणास काय मिळणार आहे
१) धम्म कश्या पद्धतीने आचरणात आणायचं याचे शिक्षण
२) आपल्या ऐतिहासिक बौध्द धम्माचा इतिहास, त्याची ओळख
३) बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती त्याचा इतिहास व त्याचे वाचन कसे करायचे याचे शिक्षण
४) धम्मलिपी चे अध्ययन विनाशुल्क
५) बौद्ध धम्माचा हा इतिहासक वारसा जतन कश्या पद्धतीने करायचे याची माहिती
६)नेणावली लेण्यांचा इतिहास , पाली सुधागड चा इतिहास , रायगड जिल्ह्याचा इतिहास ,

तरी वरील अध्ययन चारिकेत सहभागी होण्यासाठी खालील गोष्टी अवश्य वाचून आपण सहभागी व्हावे

वरील अध्ययन चारिकेत सहभागी होण्यासाठी खालील गोष्टी पाहणे

१) या ट्रेकिंग साठी येणार असाल तरच आणि तरच समूह जॉईन करावा
२) समूह हा ट्रेकिंग साठी जाण्याच्या माहितीसाठी आहे त्यानुसार समूहात चर्चा करणे
३) समूहात कॉपीपेस्ट कमेंट करू नये
४) समूहात आल्यावर प्रथम लिस्ट अपडेट करणे व दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक असेल
५) मुंबईहून ट्रेकिंग साठी सेपरेट गाडी केली जाते इतर ठिकाणाहून येणाऱ्या सदस्यांना डायरेक्ट लोकेशन दिले जाते
६) समूहात नियोजनाचे अपडेट घेत राहणे
७) हि ट्रेक म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून ध्यास आहे धम्माचा वारसा जतन करण्याचा
८) समूहात जॉईन झाल्यावर नाव अपडेट केल्यावर येणे बंधन कारक आहे
९) नाव अपडेट करून न आलेल्या सदस्यांना पुढच्या वेळेस बॅन केले जाते
१०) समूहात सामील झाल्यावर येणे बंधनाकारक असेल
११) समूहात जॉईन झाल्यावर दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक आहे
१२)गैर बौद्धांना ह्या समूहाची लिस्ट देऊ नये
१३) या ट्रेक साठी प्रवासखर्च जो असेल तो देणे बंधनकारक असेल तो टीम च्या बँकेत च्या account वर जमा केल्यावर आपले नाव कन्फर्म केले जाईल ( मुंबई मधील सदस्यांना )

जॉईन होण्यासाठी खालील फोटो वर क्लिक करा

CLICK PHOTO
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat