औरंगाबाद बुद्ध लेणी च्या तिसऱ्या गटातील दुर्लक्षित बुद्ध लेणी वर भिक्खू वर्गाच्या अधिपत्याखाली साफसफाई..

चला आपला बौद्धांचा वारसा जपुया..लेणी वाचवुया…
आज दुपारी 3 वाजता भंते करुणानंद महाथेरो यांच्या मार्गदर्शानाखाली बुद्ध लेणी सुरक्षा ग्रुपतर्फे औरंगाबाद मधील भीम टेकडीच्या पलीकडे असलेल्या बुध्दलेणीवर साफ सफाई करण्याकरीता उपक्रम राबवला. अनेक पक्ष, संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या युवा भीमसैनिकांनी आपल्या धम्मगुरूंचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आज दुपार नंतर औरंगाबाद शहराजवळील भीमटेकडी शेजारील ज्या दुर्लक्षित बुध्दलेणीचा वापर दारू पिऊन पार्ट्या करणे, अश्लील कृत्य, जुगार खेळणे, बिडी ओढने, तंबाखू, गुटखा खाऊन सर्वत्र थुंकूने, लघवी करणे इत्यादीसाठी होत आहे, त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून साफसफाईचे कार्य करून कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्मसेवा केली.भन्ते करुणानानंद थेरो यांनी बुद्ध वंदना घेऊन सर्व भीमसैनिकांचे मंगलकामना व्यक्त केली

साफ सफाई करत असतानाचे बौद्ध बांधवांचे काही फोटो

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat