चिपलून बौद्ध लेणी / Chiplun Buddha Leni

लेणीचे नाव :चिपलून बौद्ध लेणी 
                         लेण्यांची उंची : लेणीचा प्रकार  : अतिक्रमण झालेली  लेणी                                                          डोंगररांग       : सह्याद्री जिल्हा              : रत्नागिरी                                                                     श्रेणी                : सोपी तालुका             : चिपळूण              गाव                  : बावशेवाडी

लेणीचा इतिहास :  चिपलून बौध्द लेणी इसवी सन पहिल्या शतकात कोरलेली लेणी असून हि व्यापारी मार्गावर असणारी लेणी आहेत या  प्राचीन काळात खेड हे प्राचीन व्यापारी बंदर इथे या ठिकाणी हि लेण्या असून त्या हि हीनयान काळातील असून त्या चिपळूण लेण्यांशी साम्य साधणाऱ्या लेण्या आहेत त्याच काळात त्यांची हि निर्मिती झालिअसावीचिपळूण हा प्रांत सातवाहन साम्राज्याचा एक घटक होता या ठिकाणी सातवाहन राजांचे अधिराज्य होते नंतर शक छत्रप राष्ट्राकृट यांचे साम्राज्य मग मुघल मराठे पेशव्यांचे राज्य आले सातवाहन काळात या ठिकाणी लेण्या कोरण्यात आल्या या लेण्यांच्या आजूबाजूच्या परिसरात लेण्यांचे अवशेष पाहायला मिळतात तसेच चिपळूण मध्ये  कोळकेवाडी इथे डोंगरावर लेण्या आहेत तसेच अजून काही भागात लेण्या आहेत परंतु त्यांचे अजून संशोधन  व्हायचे आहेत अपरांत म्हणजे आजचा कोकण आणि  अपरांत मध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता त्याची हि ऐतिहासिक स्थळे आपणास पाहायला मिळतात चिपळूण तालुक्यात असणारी हि लेणी गुहागर बायपास वर आहेत तीन लेण्यांचा समूह असून या ठिकाणी बौद्ध भिक्षु ना राहण्याची सोय या ठिकाणी केलेलि होती

पाहण्याच्या गोष्टी :साधारण तीन लेण्यांचा समूह आहे हा
लेणी क्रमांक १ यामध्ये हि अत्यंत छोटी खोली आहे इथे भिक्षु ना राहण्यासाठी कोरलेली असावी साधारण लहान आहेत इथे एक दगडी बाक आहे झोपण्यासाठी सध्या भग्न अवस्थेत आहे
त्यांनतर लेणी क्रमांक २  हे पहिल्या लेण्यापेक्षा मोठे लेणे आहे परंतु इथे असे काही नाही इथे काही तरी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला असावा असे वाटते एकूण लेणी पाहिल्यावर
त्यांनतर लेणी क्रमांक ३ हि  मुख्य लेणी आहेत यामध्ये एल स्तूप आहे परंतु सध्या हा स्तूप अर्धा नष्ट केलेल्या अवस्थेत असून या वर लोकांनी गणपती व महादेवाची पिंड ठेवली आहे व ते एक पांडव कालीन महादेवाचे मंदिर आहे असे समजून इथे लोक दर्शनास येत असतात बौद्ध लोकांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहेलेण्याच्या वरच्या बाजूस स्तूपाची हार्मिक पाहायला मिळते सध्या इथे अतिक्रमण केले गेले आहे हिंदू धर्माचे इथला बौद्ध धम्माचा वारसा नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहे इथे असणारा हि स्तूप अर्धवट आहे नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न त्यांनतर त्यावर महादेवाची पिंडी बसवलेली आहे स्तूपाचे अवशेष असल्याने हि लेणी बौद्ध धम्माची आहेत यात तिळमात्र शंका नाही पण पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष असून इथली लेणी  दुर्लक्षित आहेत  बौद्ध धम्माची  लेणी असणारी लेणी प्रामुख्याने पांडव लेणी म्हणून लोकांनी त्यांच्या जागा हडप गेल्या त्याच पद्धतीने या हि लेण्यांची  अवस्था अशीच आहे बाजूला एक पाण्याचे टाके देखील  आहे व तिथे जाण्यासाठी कोरीव पायऱ्या हि आहेत या लेण्यांचा कालावधी निश्चित करता येत नाही तरी काही जणांची मते हि इसवी सण २ ते ३ रे असू शकते पण आम्ही मात्र हे लेण्यांचे बांधकाम हे इसवी सणाच्या पूर्वी पहिल्या शतकात असावे असे वाटते कारण  महत्वाचे कारण स्तूप दगडाचा स्तूप बांधण्याची कला हि इसवी सनापूर्वी ची आहे  आणि अशोकाच्या काळात बौद्ध धम्म कोकणात मोठ्या प्रमाणात  होता जवळपास सर्वच कोकणवासीय लोकांचा बौद्ध धम्म हा  धर्म बनला होता लोकधर्म झाला होता आणि त्याच काळात लेणी बांधणे यासाठी दान दिले जात असे कोकणात सातवाहन राजांचे हि वर्चस्व होते  सातवाहनांच्या काळात स्तूप निर्मिती ला हि वेग होता  त्यामुळे कोकणातील हे स्तूप  शक्य तो सातवाहन काळातील असण्याची शक्यता आहे कारण कोकणात बहुतांश अवशेष हे इसवी सणाच्या आधीचे पाहायला मिळतात लेणी बांधण्याची काम हि सम्राट अशोकचन्या काळातच कोकणात  झालेली आहेत कारण व्यापारी मार्गामुळे व अशोकाच्या धर्म प्रसार या  ध्येयामुळे कोकणात लेणी  कोरण्याची काम अशोकाच्याच काळात घडलेली आहेत दुसरी गोष्ट काही लेण्यांचा कालावधी निश्चित जरी सांगता आला नाही तरी ती लेणी इसवी सणाच्या पाचव्या शतकाच्या  नंतर ची येत नाहीत कारण हा काळापर्यंत कोकणातील व्यापारी मार्ग भरभराटीचा होता सर्व सुविधांनी  उपयुक्त होता त्यामुळे इथे असणारी लेणी यांचा कालावधी इसवी सणाच्या पाचव्या शतकानंतर येत नाही इतके नक्की
चिपळूण मधील लेणी हि इसवी सणाच्या पूर्वीची असू शकतात अशी संभावना आहे
परंतु हि लेणी आज दुर्लक्षित आहेत हिंदू धर्माच्या लोकांनी त्यावर अतिक्रमण करून त्यावर कब्जा केलेला आहे  वास्तविक स्तूपाचे अवशेष असताना देखील बौद्ध समाजाचे  याकडे दुर्लक्ष का आहे तेच कळायला मार्ग नाही  लेण्याबाबत बौद्ध लोक  हे अनुकूल का नाहीत आपला ऐतिहासिक वारसा पाहून  लोकांनी कमीत कमी याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे
चिपळूण मधिल बौद्ध लोकांनी या लेण्यांना हिंदू  धर्माच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक आहे सरकार कडे  निवेदने देणे आवश्यक आहे आणि यासाठी सर्व बौद्ध बांधवानी हि लेणी वाचवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे

लेणीवर पोहोचण्याच्या वाटा  : चिपळूण एसटी  स्टॅन्ड वरून थेट नवीन गुहागर कडे जाणारा बायपास रोड ने जावे पहिल्याच वळणावर  डाव्या बाजूला महालक्ष्मी डोंगर आहे किंवा बाजूला बावशे वाडी नामक गाव आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या या महालक्ष्मी डोंगरात हि लेणी कोरलेली आहेत
गुगल  मॅपhttps://goo.gl/maps/6QYZAJ8dGYT2

लेणी च्या वर्कशॉप साठी ABCPR टीम कडे संपर्क साधने 

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat