चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग : ९

चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या राज्याचा राज्यकारभार कसा चालत होता याचा राज आदेश आपणास इथे पाहायला मिळतो आज भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये दर पाच वर्षांनी निवडणूक होवून सरकार निवडले जात होते प्राचीन काळात हा प्रकार पाहायला मिळत नाही पण मात्र अशोकाचा शिलालेख वाचल्यास दर पाच वर्षांनी आपल्या अधिकारी वर्गाला आपल्या आपल्या क्षेत्रात यात्रा करण्याचे आदेश दिलेले आपणास वाचायला मिळते हा एक औलीकिक इतिहास आहे जो आजवर जगापुढे आला नाही.

इतिहासकार यांनी सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास भले हि विसरून गेले असले तरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र सखोल सम्राट अशोकाचा अभ्यास करून त्यावर काम केलेलं पाहायला मिळते.

सम्राट अशोकाच्या इतिहाची अनेक महत्वाची साधने आहेत त्यात अतिशय महत्वाचा म्हणून त्यांचा शिलालेख आहेत आणि त्यानुसार च त्याच्या राज्याची कल्पना आपणास येते कसे सुशासन होते ते पाहायला मिळते. आपल्या अधिकारी वर्गाने जनतेचे प्रश्न प्रत्यक्ष जावून पहिले पाहिजेत आणि त्यासाठी नियोजित दौरा तो हि सम्यक असावा यासाठी आदेश देणारा सम्राट अशोक हा आहे अधिकारी वर्ग हा उन्मत्त होता कामा नये यासाठी आपल्या अधिकाऱ्या ना सम्यक प्रकारे जनतेची वागणूक केली पाहिजे म्हणून सांगणारा सम्राट अशोक जगनिराला च ठरतो.
त्याच प्रकारे त्याने राज्याला धम्म विनयानुसार अनुसरण करण्यासाठी चे आदेश आहेत त्याचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे यासाठी काम केले जात आहे.

शिलालेख सविस्तरपणे

दे वा नं पि यो पि य द सी रा जा ए वं आ ह द्वा द स व सा भि सी ते नं म या इ द आ ञ पि ता
स व त वि जि ते म म यु ता च रा जू के च प दे सि के च पं च सू वा से सु अ नु सं
य नं नि या तू ए ता ये व अ था य इ मा य ध मा नु स स्टी य य था अ ञा
य पि कं मा य सा धू मा त री च पि त री च सु स्तु सा मि ता सं स्तु त ञा ति नं बा म्ह ण
स म णा न सा धू दा नं प्रा णा नं अ ना रं भो अ प व्य य ता अ प भां ड ता सा धू
प रि सा पि यु ते आ ञ प यी स ति ग ण ना य हे तु तो च व्यं ज न तो च

देवानं पियो पियदसी राजा एवं आह द्वादसवसाभिसीतेनं मया इद आञपिता
सवत विजिते मम युता च राजूके च पदेसिके च पंचसू वासेसु अनुसं
यनं नियातू एतायेव अथाय इमाय धमानुसस्टीय यथा अञा
य पि कंमाय साधू मातरी च पितरी च सुस्तुसा मिता संस्तुत ञातिनं बाम्हण
समणान साधू दानं प्राणानं अनारंभो अपव्ययता अप भांडता साधू
परिसा पि युते आञपयीसति गणनाय हेतुतो च व्यंजनतो च

देवानं पियेन पियदसी राजा असे म्हणतो आहे कि, माझ्या राज्याभिषेकाच्या १२ व्या वर्षानंतर ,माझ्याद्वारे आज्ञा देण्यात आली आहे कि,
माझ्या राज्यातील सर्व जागेतील युक्त रज्जूक आणि प्रादेशिक हे सर्वजण आपल्या आपल्या क्षेत्रात दर पाच वर्षांनी यात्रा करण्यासाठी निघावे आणि धम्माचे जे निर्देश दिलेले आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करावा तसेच अन्य राज्यांच्या संबंधी जी कामे आहेत ती करावी |
मात्यापित्याची सेवा करणे हे सर्वोचित आहे. मित्र परिचित सबंधित तसेच ब्राह्मण श्रमण यांच्या प्रति आदर सदभाव देखील सर्वोचित आहे. प्राण्यांची हत्या न करणे तसेच संग्रहात कमी करणे हे देखील सर्वोचित आहे.
राज्य परिषद यांनी राज्याधिकारी यांना वरील आदेशाचे शब्दानुसार आणि भावानुसार पालन करावे

वरील शिलालेखाचा अर्थ पाहता एक गोष्ट लक्षात येते सम्राट अशोकाने आपल्या अधिकाऱ्यांना नेमूण दिलेली कामे नियमित केली जावेत यासाठी सक्त आदेश दिलेले आहेत.अशोकाने आपली जनता धम्माच्या मार्गाने आचरण करावि यासाठी त्याने आपल्या आदेशात धम्माचे शिकवण दिलेली आपणास पाहायला मिळते तसेच अशोकाने आपले अधिकारी हे केवळ एकाच जागी बसून ण राहता त्यांनी आपल्या प्रदेशात आपल्या क्षेत्रात जावून प्रत्यक्ष काम करावे यासाठी आदेश काढलेला आहे आणि हे कदाचित खूप कमी राजांच्या कालखंडात पाहायला मिळते जवळपास कोणीच राजा नाही कि ज्याने जनतेच्या भल्यासाठी एवढा मोठा प्रशासन निर्माण करून ते कामाला लावण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्रणा च जणू काही उभी केलेली आपणास पाहायला मिळते हे सम्राट अशोकाचे वैभव आहे

शिलालेखातील महत्ताचे शब्द समजून घेवू या
देवान पियो पियदसी राजा : सम्राट अशोक याची उपाधी
आह : बोलतो कि ,
द्वादस वासाभिसितेन : राज्यभिषेकाच्या १२ वर्ष झाल्यावर
आञपितं : आज्ञा देणे
युता च राजुके च पदेसिके : युक्त रज्जूक आणि प्रादेशिक अर्थात राष्ट्रीक पेतनिक हि उपाधी असणारे अधिकारी वर्ग
पंच सु पंचसू वासेसू : प्रत्येक पाच वर्षांनी
अनुसंयानं नियातु : आपल्या क्षेत्रात नियमपुर्वक जाणे
एतायेव अथाय : या प्रयोजनासाठी अथवा या कारणासाठी
इमाय धमानूस्टीय : या धम्म शासनासाठी
अञाय पि कंमाय : अन्य कामासाठी
सुस्तुसा : सांगणे ऐकणे
अना रम्भो : हिंसा ण करणे
अपभांडता : संचय कमी करणे
परिसा : परिषद

थोडक्यात काही शब्दांची माहिती शिलालेखासाठीत देण्याचा हा प्रयत्न आहे जेणेकरून शब्दाचा अर्थ समजण्यास मदत व्हावी आणि सम्राट अशोकाचा इतिहास समजून घेण्यासाठी प्रयत्न व्हावा हा एक छोटा प्रयत्न आहे
अशोकाचा इतिहास हा शिलालेखांच्या माध्यमातून अगदी सहज लोकांना समजू लागला त्यामुळे खूप सारी क्रांती झालेली पाहायला मिळू शकते यासाठी आपण देखील याकामी सहकार्य करून माहितीचा प्रचार आणि प्रसार करणे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat