चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग :८

सम्राट सम्राट अशोकाच्या लोक कल्याण कार्याचा योजनांचा तसेच विदेशनीती चा इतिहास पाहण्यासाठी आपणास अशोकांच्या शिलालेखांची माहिती घ्यावी लागते. एक बलाढ्य साम्राज्य आणि त्याचे सुशासन ठेवण्यासाठी इतर राष्ट्रांशी असलेले सबंध शिवाय आपल्या जनतेच्या हितसुखासाठी केलेली कामाची आखणी हे समजून घेण्यासाठी आपणास सम्राट अशोक यांचे शिलालेख हेच जास्त विश्वसनीय गोष्ट आहे .
सम्राट अशोक यांनी जनतेला कोणत्या सोयी सुविधा निर्माण करून दिल्या यावर देखील लिखित स्वरुपात आजवर कोणत्या राजाची वा सम्राटाची माहिती मिळत नाही पण गेली साडे बावीसशे वर्षे नंतर हि त्यांच्या कार्याचा हा लिखित इतिहास सापडणे हे महत्वाचे ठरते .
सन १८२२ मध्ये मेजर जेम्स टॉड पहिल्यांदा गिरनार येथील शिलालेख शोधला होता आणि हा शिलालेख १४ भागात लिहिलेला होता एकूण चौदा आदेश या शिलालेखात लिहिलेले होते. या गिरनार येथील शिलालेखात असणारा हा दुसरा आणि महत्वपूर्ण शिलालेख असून ज्यामध्ये सम्राट अशोकाच्या विविध बाबींचा इतिहास पाहायला मिळतो .
सविस्तर शिलालेखातून पाहू या.

शिलालेख खालील प्रमाणे

स व त वि जि ते म्ही दे वा नं पि यस पि य द सि नो रा ञो
ए वं म पि पा च ते सु य था चो डा स ति य पु तो के त ल पु तो अ त ब प णी
अं ती य को यो न रा जा ये वा पि त स अं ती य क स स सा मी नो
रा जा नो स व त दे वा नं पि य स पि य द सि नो रा ञो द्वे चि कि छा क ता
म नू स चि कि छा च प सु चि कि छा च ओ सु ढा नि च या नि म नू सो प गा नि च
प सु प गा नि च य त यत ना स्ती स व त हा रा पि ता नि च रो पा पि ता नि च
पं थे सु कु पा च खा ना पि ता व छा रो पा पि त प रि भो गा य प सु म नू सा नं

सवत विजितेम्ही देवानं पियस पियदसिनो राञो
एवंमपि पाचतेसु यथा चोडा सतियपुतो केतलपुतो अ तब पणी
अंतीय को योन राजा ये वा पि तस अंतीयकस स सामीनो
राजानो सवत देवानं पियस पियदसिनो राञो द्वे चिकिछा कता
मनूस चिकिछा च पसु चिकिछा च ओसुढानि च यानि मनूसोपगानि च
पसुपगानि च यत यत नास्ती सवत हारापितानि च रोपापितानि च
पंथेसु कुपा च खानापिता वछा रोपापितपरिभोगाय पसु मनूसानं
देवानं प्रियेनप्रियदर्शी राजा ने सर्वत्र विजय संपादन केल्यावर प्रत्येक ठिकाणी चोल पांड्या सत्यपुत्र केरळपुत्र ताम्रपर्णी अंतियोक यांच्या जवळ असणारे राजे सर्व ठिकाणी देवानं पियेन [प्रियदर्शी राजाने दोन चिकित्सालय निर्माण केली आहेत एक मनुष्य चिकित्सालय आणि एक पशु चिकित्सालय आहे . त्याच प्रमाणे जी औषधे मनुष्य आणि पशु याना उपयोगी आहेत व ती जिथे जिथे नाहीत अश्या ठिकाणी सर्व ठिकाणाहून ती आणून लावण्यात आली आहेत. तसेच मूळ आणि फळ जिथे जिथे नाही अश्या ठिकाणी ते सर्व ठिकाणी आणून लावलेलं आहेत . रस्त्यामध्ये मनुष्यांसाठी आणि पशु साठी विहिरी अर्थात पाणवठे खोदण्यात आले आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आली आहे.

वरील शिलालेखाचा सारांश पाहता भारताच्या इतिहासातील महत्वाची बाब आहे कि एक राजा जो चक्रवर्ती सम्राट आहे त्याला आपल्या राज्यातील जनतेबद्दल असणारी कणव तसेच आपल्या राज्यातील पशु प्राण्याबद्दल असणारा भूतदया जगाच्या इतिहासात एवढे सखोल विचार करून प्रशासन चालवणारे राजे आजवर सापडलेले नाहीत.
सम्राट अशोकाने आपला धम्म विजय अर्थात सर्व जंबुद्वीपावर विजय मिळवल्यावर हा शिलालेख लिहलेला आहे. आणि शिलालेखात विशेष करून आपण काय काम केलेली आहेत त्याबद्दल लिखित स्वरूपात माहिती दिलेली आहे. माणसासाठी आज दवाखाने असतात तसेच प्राण्यांचे देखील दवाखाने आहेत त्याचा जनक सम्राट अशोक आहे तसेच आज जे मेडिकल क्षेत्र आहे त्याचा हि जनक सम्राट अशोक आहे कि इथे औषधे उपलब्ध होत नाहीत तिथे औषधे उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे माणसाला जशी गरज असते तशी प्राण्यांना हि गरज असते हे ओळखून सम्राट अशोकाने निर्माण केलेला हा महत्वाचा निर्णय आपणास इतिहास जागृत करून सांगतो अशोकाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली कारण त्या रस्त्याने जाणाऱ्या पशु तथा मनुष्याला हि थंडगार सावलीतून प्रवास करता यावा यासाठी खास घेतलेली काळजी तसेच जागोजागी पाणवठे अर्थात विहिरी निर्माण करून पशु तथा मानवाला प्रवासात पाण्याची सोय करून दिलेली आहे .
आज हि आपण हि सुविधा पुरवता आलेली नाही आज भरमसाठ वृक्षतोड होतेय अश्या वेळी सम्राट अशोकाचा हा शिलालेख त्यात कोरलेला आदेश पाहून आज त्याची महत्वता किती होती याचा अंदाज येतो
सम्राट अशोक यांना आपण चक्रवर्ती म्हणतो ते केवळ नावासाठी नाही तर तसे त्यांचे महान कार्य आहे आणि हे महान कार्य आज त्यांचेच शिलालेख सांगत आहेत अश्याच शिलालेखाचा हा दैदिप्यमान इतिहास जगाला माहिती व्हावा यासाठी आपण सर्वानी चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा अवश्य वाचा

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat