चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग ७

प्राणी हिंसा बंदीचा आदेश

सम्राट अशोक यांच्या शिलालेखातून महत्वाच्या नोंदी पाहायला मिळतात त्यातील महत्वाची नोंद म्हणजेच, प्राण्यांच्या जीव हिंसा रोखण्यासाठी केलेला आदेश .आणि हा आदेश केवळ इतरांना देण्यासाठी नाही , तर तो स्वतः आपल्या घरात देखील पाळला गेला पाहिजे म्हणून कटाक्षाने त्याकडे लक्ष देणारा महान सम्राट म्हणून अशोक यांच्याकडे च पाहावे लागते.
अशोक यांचे शिलालेख हे चिरकाळ राहावे यासाठी त्याने तसे आदेश दिल्याचे आपणास पाहायला मिळते.
अशोकाने आपल्या शिलालेखात म्हटलेले आहे कि , ”इयं धमंलिपि अत अथी सिलाथमानि वा सिलाफलकानि वा तत कटविया एनं एसचिलठिति के सिया” यांचा अर्थ असा आहे कि हि धम्मलिपी जिथे कुठे शिलास्तंभ वा शिलाफलक यावर अश्या पद्धतीने अंकित करावी कि ती चिरकाल टिकू शकेल.
अश्या पद्धतीने सम्राट अशोकाने खूप मोठा दृष्टीकोण समोर ठेवून हे शिलालेख तयार केलेलं आहेत हे लिहून घेतलेले आहेत. कदाचित या जगात एकमेव हा महान शासक आहे कि ज्याने आपल्या जनतेने कसे आचरण करावे यावर भर दिलेला आहे.

गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचा पहिला एडीक्ट याला चतुर्थ शिलालेख म्हणतात आणि याचे चौदा भाग आहेत.

शिलालेख खालील प्रमाणे.

इ यं ध म लि पि दे वा नं पि येन
पि य द सि ना रा ञा ले खा पि ता इ ध न किं
चि जी वं आ र भि त्पा प जू हि त व्य
न च स मा जो क त व्यो ब हु कं हि दो सं
स मा ज म्हि प स ति दे वा नं पि यो पि य द सि रा जा
अ स्ति पि तू ए क चा स मा जा सा धू म ता दे वा नं
पि ये स पि य द सी नो रा ञो पु रा म हा न स म्हि
दे वा नं पि ये स पि य द सी नो रा ञो अ नु दि व सं ब
हु नि पा न स त स ह सा नि आ र भि सु सु पा था य
से अ ज य दा अ यं ध म लि पी लि खि ता ती ए व पा
णा आ र भ रे सु पा था य द्वो मो रा ए को म गो सो पि
म गो ण धु वो ए ते पि ती पा णा प छा न आ र भि स रे

इयं धमलिपि देवानं पियेन
पियदसिना राञा लेखापिता इध न किं
चि जीवं आरभित्पा पजूहितव्य
न च समाजो कतव्यो बहुकं हि दोसं
समाजम्हि पसति देवानं पियो पियदसि राजा
अस्ति पि तू एकचा समाजा साधू मता देवानं
पियेस पियदसीनो राञो पुरा महानसम्हि
देवानं पियेस पियदसीनो राञो अनुदिवसं ब
हुनि पान सत सहसानि आरभिसु सुपाथाय
से अज यदा अयं धमलिपी लिखिता ती एव पा
णा आरभरे सुपाथाय द्वो मोरा एको मगो सो पि
मगो ण धुवो एते पिती पाणा पछा न आरभिसरे

हि धम्मलिपी देवान पियेनपियादर्शी राजा याच्या द्वारे लिहिली आहे . कोणी हि प्राण्यांची हत्या बळी देण्यासाठी देवू नये आणि असे समाजाने देखील करू नये समाजामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत हे देवानपियेन पियादर्शी राजा याने पाहिलेले आहेत. तरी देखील निश्चित समाजाचे प्रकार च देवानपियादर्शी राजा ते योग्य मानतो.
पूर्वी देवानपियेन पियादर्शी राजाच्या भोजनालय मध्ये हजारो प्राणी सूप बनवण्यासाठी मारले जात होते. परन्तु आतापासून जेव्हापासून हि धम्मलिपी मधून हा आदेश कोरलेला आहे तेव्हापासून तीन च प्राणी मारले जात आहेत. दोन मोर आणि एक हरीण सूप बनवण्यासाठी मारले जात आहेत परंतू यामध्ये हरीण मारणे निश्चित नाही पुढे जावून काही दिवसात हे तिन्ही प्राणी मारले जाणार नाहीत

वरील शिलालेख पाहता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अशोक यांच्या भोजनालय यामध्ये नियमित असंख्य पशु पक्षी मारले जात होते प्रथम अशोक यांनी आपल्या भोजनालय मध्ये जीवहिंसा बंद केली आहे. शिवाय हा आदेश काढलेला हे कि अखंड जम्बुद्विपात कुठे हि जीव हिंसा बळी देण्यासाठी देवू नये त्यांची हत्या करू नये आणि मग एका व्यक्तीने हे कृत्य करावे कि समाजाने प्रत्येक मनुष्याने बळी देण्यासाठी कोणत्या हि प्राण्याचा वापर करू नये असे सम्राट अशोकाने हा आदेश काढलेला आहे
आज अनेक वर्षांनी आपण जेव्हा हा आदेश वाचतो तेव्हा आपण आजचे चित्र पाहिल्यावर लक्षात येते कि अशोक सम्राटाने हा काढलेला आदेश आज हि तितकाच लागू होतो म्हणून बाबासाहेब यांनी भारतीय संविधानात जेव्हा आपण तरतुदी पाहतो तेव्हा भारतीय घटनेच्या कलमात बुद्धाच्या शिकवणीचे सार ओतलेले बघायला मिळते
आज असंख्य ठिकाणी बळी दिले जातात आणि बळी मध्ये मुक्या जीवांचा बळी दिला जातो त्यांची कोणती हि चूक नसताना त्यांचा हकनाक बळी दिला जातो आपल्या इच्छे खातर प्राण्यांची केली जाणारी हिंसा हीच त्यावेळी अपेक्षितनव्हती आणि आज हि अपेक्षित नाही.
सम्राट अशोकाने ह्या सर्वावर आदेश काढून मुक्या जनावर यांच्यावर दाखवलेली भूतदया आहे .
त्यानंतर अशोकाच्या स्वतःच्या भोजनालय मध्ये मारले जाणारे पशु देखील अशोकाने बंद केले आहेत अश्या पद्धतीने जीव हिंसा बंद करणारा जागतील कदाचित एकमेव सम्राट आहे कि ज्याने स्वार्थासाठी इच्छेसाठी होणारी जीवहिंसा थांबवली आहेत
आणि असा सम्राट होणे नाही हे त्रिकालबाधित सत्य आम्ही समजून घेणे आवश्यक आहे
सम्राट अशोक भारताच्या इतिहासातील अनमोल रत्न आहे जे तथागत बुद्ध रुपी महासागरातील आहे .

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat