चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा : भाग ५

व्यवस्थापनातील चौथे सूत्र आहे आदेशाची एकवाक्यता
चक्रवर्ती सम्राट अशोकाचे राज्य अखंड जम्बूद्वीप मध्ये होते .आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सम्राट अशोकाची शासन प्रणाली एवढ्या मोठ्या अवाढव्य साम्राज्यात कोणत्या हि प्रकारचे प्रशासन हे चुकीचे सापडत नाही कोणते व्यवस्थापन अतिशय कौतुकास्पद आहे
यामध्ये महत्वाचा आहे राजाचा आदेशाची अंमलबजावणी कशी होते ते . आणि सम्राट अशोकाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी होते याचे दाखले च त्याने कोरून ठेवलेले शिलालेखातून आपणास पाहायला मिळते .
यासाठी आपण महत्वाचा शिलालेख पाहू या

देवा……….

एल………..

पाट…………..ये केनपि संघे भेतवे ए चु खो

भिखु वा भिखुनी वा संघ भाखति से ओदितानि दुसानि संनंधापयिया अनावाससि

आवासयिये हेवं इयं सासने भिखुसंघसिच भिखुनिसंघसिच विनपयितविये

हेवं देवानंपिया आहा हेदिसाच इका लिपि तुफाकंतिकं हुवाति संसलनसि निखिता

इकंच लिपि हेदिसमेव उपासकानंतिकं निखिपाथ ते पि च उपासके अनुपोसथं यावु

एतमेव सासनं विस्वंसयितवे अनुपोसथं च धुवाये इकिके महामाते पोसथाये

याति एतमेव सासनं विस्वंसयितवे आजानितवे च आवतके च तुफाकं आहले

सवत विवासयाथ तुफे एतेन वियंजनेन हेमेव सवेसु कोटिविसवेसु एतेन

वियंजनेन विवासापयाथा

देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी याचा आदेश आहे कि , पाटीलपुत्र मध्ये भिक्खू व भिक्खुनी संघात जो कुणी फुट पाडत असेल व संघ दुषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संघापासून वेगळे करावे योग्य ती समज देवून शुद्ध करावे त्याला पांढरे वस्त्र देवून भिक्खू वा भिक्खुनी संघापासून वेगळे राहण्याची व्यवस्था करावी व उरलेला भिक्खू वा भिक्खुनी संघ विनयानुसार म्हणजेच विनय पिटकात दिलेल्या विनयानुसार संपूर्ण संघ पुन्हा विनशील करून घ्यावा. असे देवानपियेन प्रियदर्शी राजाने सांगितले आहे. या लेखाची प्रत स्वताजवळ ठेवावी कारण हे सर्वाना प्रसारित व्हावे यासाठी तसेच एक प्रत प्रत्येक उपासाकांकडे दिली जावी आणि उपासकांनी त्यानुसार अनुसरण करावे या अनुशासनावर विश्वास ठेवून ते कायम आचरणात आणावे . आणि प्रत्येक महामात्रा ने हे जपून ठेवावे म्हणून आपणास हा अनुशासन दिले आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि आचरण करावे जेव्हा आपण दूरवर विहार म्हणजे प्रवास करण्यास जाल तेव्हा देखील हि एक प्रत आपल्याकडे असावी कारण हे सर्व दूर असणाऱ्या प्रत्येक भागातील लोकांसाठी अनुशासन आहे. म्हणून हि आपल्या जवळ बाळगावी

वरील वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल पाटीलपुत्र हि अशोकाची राजधानी आहे इथून आदेश काढला आहे आणि सर्वदूर असणाऱ्या प्रदेशातील प्रत्येक महामात्रा तसेच प्रत्येक जनतेला खास करून इथे त्याने आपल्या जनतेला उपासक म्हणून म्हटलेले आहे यावरून च भारतातील जनता हि बौद्ध धम्माचे आचरण करणारी बौद्ध उपासक होते याचे ऐतिहासिक दाखले आहेत हे. उपासक यांच्याकडे हि हा आदेश दिलेला आहे कि एखादा व्यक्ती कोणी हि भिक्खू वा भिक्खू नि संघात फुट पाडण्याचे काम करत असेल तर अश्या भिक्खुंचे चीवर काढण्याचा आदेश आहे याची लिखित नोंद आपणास मिळते जरी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला असला तरी धर्माच्या ओझ्याखाली राज्यशासन दबलेले नाही याचा लिखित पुरावा आपणास पाहायला मिळतो

आदेशाची एकवाक्यता कशी असते ते पहा संपूर्ण जम्बुद्विपात आपला आदेश देणारा आणि त्याची अमलबजावणी व्हावी शिवाय हा आदेश चिरकाळ टिकून राहावा यासाठी ते आदेश शिलास्तंभ आणि शिलेवर कोरून ठेवले म्हणजे हजारो वर्षांनी हि ते लोकांनी वाचावे आणि त्यानुसार काम करावे अशी दूरदृष्टी ठेवून दिलेले आदेश आहेत पुढील आदेश अगदी आज हि आपल्या प्रशासनात आलेले दिसतात

प्राण्यांची हिंसा करू नये म्हणून काढलेल्या आदेशाची अमलबजावणी संपूर्ण राज्यात केली जाते शिवाय धम्माचे आचरण करावे यासाठी धम्ममहापात्रा ची नियुक्ती करून लोकांचे आचरण सुधारावे यासाठी काढलेला आदेश आणि त्याची अमलबजावणी हि साऱ्या राज्यात होते हि एक प्रशंसनीय गोष्ट आहे . सम्राट अशोकांनी या व्यवस्थापन कौशल्यात पारंगत होते म्हणून च त्यांना हा अवाढव्य असणारा राज्यकारभार सहज सांभाळता आला
इतिहासात हि बाब खूप महत्वाची आहे सम्राट अशोकाने दिलेली आदेश व त्याचे पालन झाले नाही अशी घटना आपणास पाहायला मिळत नाही शिवाय सम्राटाच्या आदेशाशिवाय इतर कोणी आदेश दिल्याची नोंद सापडत नाही जोवर सम्राटाचा आदेश येत नाही तोवर खालील कोणते हि अधिकारी स्वतःचा आदेश देत नव्हते . आपल्या महापात्रा याना त्यांनी काही अधिकार दिलेले होते पण जनतेवर अधिकार गाजवाण्यासाठी कोणी त्याचा गैरवापर होणार नाही यासाठी त्याची पूर्णपणे सम्राट अशोक यांच्याकडे अधिकार होते .

संपूर्ण जम्बूद्वीप मध्ये आपले राज्य प्रशासन काम करत असताना कोणत्या हि प्रकारचे चुकीचे नियोजन आपणास पाहायला मिळत नाही.
शिवाय प्रशासनातील जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडून हि कोणत्या हि चुकीच्या प्रकारची काम होताना पाहायला मिळत नाही. सम्राट अशोकाने घालून दिलेले नियम हे प्रत्यक अधिकारी जबाबदारीने पालन करत होता शिवाय लोक धम्म आचरण करणरे असल्यामुळे कपटनीती अथवा कोणत्या हि प्रकारचे चुकीची काम कोणी केलेली नाहीत हाच सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने अधोरेखित होतो
अश्या या महान सम्राटाला नक्कीच मानाचा मुजरा

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat