चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा : भाग ४

मागच्या भागात आपण मॅनेजमेंट च्या सूत्रातील दुसरे सूत्र पाहिले आता आपण तिसरे सूत्र पाहू या

३} शिस्त : शिस्त हि महत्वाचा भाग आहे मॅनेजमेंट मध्ये कारण प्रत्येक संस्थेला संघटना किंवा राज्याला शिस्त असावी लागते शिस्त नसेल तर त्या संस्था वा राज्य उभे राहू शकत नाही शिस्त हि सर्वाना पाळावीच लागते आता इथे जशी शिस्तीची अपेक्षा मालक नोकरांकडून करतो तशीच शिस्त मालकाला हि असणे आवश्यक आहे म्हणजे एखाद्या राजाने सैन्यानं शिस्त व स्वतः मात्र बेशिस्त असेल तर राज्य बुडते शिस्तीला जगाच्या इतिहासात खूप महत्व आहे
राजाने शिस्त पाळली तरच तो सैन्याला जनतेला शिस्त पाळण्यास सांगू शकतो

सम्राट अशोक शिस्तीच्या बाबतीत सर्वात कठोर मानला जातो त्याच्या सैन्याला हि त्याच प्रकारची शिस्त दिलेली आहे अगदी खुद्द स्वतः सम्राट असून देखील शिस्त मोडलेली नाही अगदी अशोकाच्या साम्राज्यात रयतेला देखील शिस्त घालून दिलेली होती शिक्षणाची द्वारे उघडली होती अशोकाचा आदेश आहे शिक्षणासाठी घरातील प्रत्येक मुलाला शिक्षित झाले पाहिजे यासाठी अशोकाचे स्वतंत्र विभाग आहे शिक्षणाचा ज्यामध्ये मुलाला सर्व प्रकारचे शिक्षण दिले जायचे शिक्षणासाठी स्वतंत्र्य विभाग तयार करणारा सम्राट म्हणून जगात तो एकमेव च गणला जातो जो दोन हजार वर्षांपूर्वी शिक्षणाला महत्व दिले आहे तक्षशिला विद्यापीठाला विश्वविद्यापीठाचा दर्जा दिला तिथे सर्व विद्यांचे शिक्षण दिले जायचे त्याचा स्वतःचा मुलगा कुणाल हा त्या काळातला पहिला इंजिनियर आहे ज्याने लेण्याची व स्तूपांचे इंजिनियरिंग करून बांधकाम केले आहे अशोकाने घालून दिलेली शिस्त पहा
त्याची मुले धम्माच्या प्रचारासाठी देऊ केली कारण स्वतः राजा शिस्तप्रिय असेल तरच रयत शिस्तप्रिय असते आणि म्हणूनच अशोकाचा भारत हा सुवर्णमय होता जगातील पहिली आर्थिक महासत्ता असणारा देश म्हणून दोन हजार वर्षांपूर्वी भारत महासत्ता होता पण आज आम्हाला तेच माहित नाही अशोक इतिहासात सांगताना अशोकाची महत्वाची कौशल्य लोक विसरले
अशोक शिस्तप्रियसम्राट आहे हेच लोक विसरून गेले इतिहासकरांनी चुकीचा अशोक रंगवून सांगितलं कारण कुठे तरी धम्म मोठा व चांगला वाटावा म्हणून
कलिंग चे युद्धात माणसे मारावी हा हेतूच नव्हता पण ऐनवेळी कलिंगातील रयत युद्धात उतरली त्याच क्षणी अशोकाने आदेश दिलेला आहे युद्ध विरामाचा पण खुल्या मैदानात घडलेले तो प्रसंग अशोकाला वेदना देऊन गेला त्यावेळी अशोकाने मैत्रीने जग जिंकण्याचे निश्चित केले
ते अशोकाच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे च
अशोकाने आपल्या सैन्याला एक शिस्तच घालून दिली होतो कि प्रथम आपला देश व नंतर आपण म्हणून अशोकाचे राज्य टिकून होते अशोकांनंतर अनेक राजे झाले तरी देखील त्याचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला आहे सातवाहन असोत कि गुप्त राजे असोत अशोकाचा प्रभाव त्यांच्या वर स्पष्ट दिसतो हि एक शिस्तप्रिय राजाची वैशिष्टये असतात
अशोकाने रयतेला शिस्त अशी दिली आहे की अशोकाच्या साम्राज्यात चोरी घडल्याचे प्रसंग नाही अशोकाच्या राज्यात बलात्कार सोडा स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नव्हती कारण अशोकाच्या सैन्यात स्त्री वर्गाची स्वतंत्र फौज होती स्त्रीला देखील सैन्यामध्ये स्थान देऊन ती अबला नाही हे दाखावून देणारा पहिला चक्रवर्ती सम्राट अशोक आहे
अशोकाच्या राज्यात कधी संपत्तीसाठी भांडणे झाली नाहीत कारण अशोकाचे कार्यव्यवस्थापन कारणीभूत आहे कारण अशोकाच्या राज्यात शिस्तीने काम केले जायचे प्रत्येक घरात अशोकाचा सैनिक होता
इतकेच काय अशोक स्वतः रयतेमध्ये वेषांतर करून प्रजेला कोणाकडून उपद्रव तर होत नाही ना याची काळजी घेत होता लोकांनी अशोक चुकीचा रंगवला आहे
कारण अशोक लगेच बदलून इतका प्रेमळ झाला असे म्हणता येत नाही अशोक प्रेमळ च होता न्यायी राजा होता त्याच्या अंगी मैत्री भावना आधीच होती म्हणूनच तो एवढे मोठे साम्राज्य उभे करू शकला
तलवारीच्या पातीवर साम्राज्य उभे केले जाते पण मैत्रीच्या माध्यमातून साम्राज्य उभे करून प्रजेच्या हक्काचे राज्य निर्माण करणारा अशोक जगातला पहिला सम्राट आहे

अशोकाची अजून एक महत्वाची गोष्ट
अशोकाने आपल्या साम्राज्यात घालून दिलेलं नियम अतिशय कठोर आहेत न्यायप्रिय राजा म्हणून अशोकाची ओळख आहे
व्यवस्थापनात महत्वाची गोष्ट हीच असते
शिक्षण कला गुणानं वाव देणारा राजा सम्राट अशोक होता त्याच्या शिस्तप्रियतेमुळे अशोकाला जगप्रसिद्धी मिळाली आहे
धम्म प्रसारासाठी माणसे निवडताना हि त्याने योग्य तीच निवडली आहेत
भिक्षु संघ बुद्धाच्या नियमांचे उल्लंघन करतोय असे जाणवले त्यामुळेच धम्म संगीती घेऊन बेशिस्त भिक्षुना त्याने संघातून हाकलून दिले आहे

अशोक नेहमीच नवनव्या रूपात तुम्हाला पाहायला मिळेल पण इतिहासाने अन्याय केला असल्याने त्याचे चित्रण चुकीचे होते आहे

मॅनेजमेंट मध्ये महत्वाची गोष्ट शिस्त आहे जिच्यामुळेच मॅनेजमेंट यशस्वी होते अशोकाच्या साम्राज्यत त्याने केलेलं मॅनेजमेंट थक्क करणारे आहे
बहुधा लोकांनी सम्राट अशोक समजून च घेतलेला नसतो तर अशोकाचे मॅनेजमेंट तर लांबची गोष्ट आहे आपण जाणून घेऊ या एक एक सूत्रे जी आजच्या काळात मांडली गेली तीच सूत्रे सम्राट अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी वापरली आहेत

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat