चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा : भाग ३


मागील भागात आपण मॅनेजमेंट च्या पहिल्या सूत्रांचे विश्लेषण केले होते आता मॅनेजमेंट च्या १३ सूत्रांची माहिती घेऊ या

२: अधिकार व जबाबदारी : भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार जसे दिलेलं आहेत तसे आपणास जबाबदारी हि दिलेली आहे हे समजण्यासाठी मॅनेजमेंट माहित असावी लागेल हा एक मॅनेजमेंट चा भाग आहे बाबासाहेब ते उत्तम जाणत होते म्हणून संविधानात अधिकार सोबत जबाबदारी दिलेली आहे. त्याच हेतूने मॅनेजमेंट मध्ये देखील हा महत्वाचा भाग असतो
म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्याला काम करण्याची संधी देतो तेव्हा त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी हि देणे आवश्यक आहे कारण लोक नुसते काम देतात जबाबदारी नसते म्हणून जबाबदारी हे मॅनेजमेंट मधील महत्वाचा भाग आहे यामध्ये जितके अधिकार जास्त दिले जातात तितकीच जबाबदारी जास्त असायला हवी अन्यथा तो व्यक्ती त्या अधिकारांचा गैरवापर करू शकतो उलट जितकी जबाबदारी जास्त असते तितका तो अधिकारांचा गैरवापर कमी करतो कारण त्याच्यावर जबाबदारीचे ओझे असते व त्या दबावाखाली तो व्यक्ती पूर्णपणे काम करण्यात व्यस्त असतो आणि हे व्यवस्थापनातील सूत्र सम्राट अशोकाने दोनहजार वर्षांपूर्वी अमलात आणून जगाला दाखवून दिले आहे
सम्राट अशोकाच्या दरबार असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला जसे अधिकार दिलेत तसे त्यांना तेवढी जबाबदारी हि दिलेली आहे कारण एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा म्हणजे त्याचे मंत्रिमंडळ केवढे असणार आजच्या पंतप्रधान म्हणजे अशोकाचा प्रधान असे त्याला आपण वजीर हि म्हणतो आणि वजिराच्या हाताखाली आज जसे खासदार असतात तसे अशोकाच्या राज्यात देखील त्येवळचे खासदार आहेत प्रत्येक प्रांताचा एक अधिकारी नेमलेला आहे जो आजचा खासदार आहे आता याना जशी अधिकार दिलेत तशी त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्यावेळच्या काळात अशोकाचे सैन्य व्यवस्थापन मध्ये ६ लाख नुसते पायदळाचे सैन्य आहेत ते आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती ला जसे सैन्य व्यवस्थापनाचे अधिकार दिलेत तसे त्याला सैन्याची बांधणी करण्याची जबाबदारी दिलेली आहे घर तिथे सैनिक ह्याचे निर्माण करणारा कोणी असेल तर तो सम्राट अशोक आहे म्हणजे सेनापती ला नुसते एकाच प्रांतातील सैन्य व्यवस्थापन नाही अशोकाच्या संपूर्ण राज्यात सैन्य व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्याकडून चूक झाली तर कठोर शासन हे अशोकाच्या राज्यात दिले आहे म्हणजे नुसते अधिकार गाजवून प्रजेला कष्ट द्यायचे नाहीत तर दिलेली जबाबदारी पूर्ण करून द्यायची आहे आणि सम्राट अशोक पहिला सम्राट आहे ज्याने आपल्या राज्यात असणाऱ्याकाम करणाऱ्या लोकांना टार्गेट बेस काम देऊ केले आहे म्हणजे एका दिवसाचा वा एका आठवड्याचा किंवा एका महिन्यात जे काम दिलेले असायचे ते पूर्ण झालेच पाहिजे मग त्यात कसर केली जायची नाही
आता महत्वाचे यात चुका करणाऱ्या मंत्र्याला हि चूक झाली म्हणून ती चूक का झाली याची कारणे संगवई लागत असत मंत्र्याला हि कधी मोकळे सोडलेले नाही
अशोक धम्माच्या मार्गावर आला म्हणजे त्याने तलवार टाकून दिली हा सर्वांचा मोठा गैरसमज कोणता हि सम्राट आपली हातातील तालावर सोडून देत नसतो त्याला त्याची वेळोवेळी गरज असतेच राजेशाही मध्ये ती महत्वाची मानली जाते स्वतः सम्राट असून अशोकाने जेवढे आपले अधिकार आहेत त्याहून अधिक जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यामुळे सम्राट अशोकाची पावले कुठे हि चुकीच्या दिशेला गेली नाहीत भारतीय इतिहासात राजपूत राजे असो हिंदू राजे यांचे मात्र उलटे झाले त्यांनी अधिकार खूप घेतले पण जबाबदारी काहीच घेतली नाही त्यामुळे हिंदू राजे बाई आणि बाटली यामध्ये व्यस्त राहिले व शत्रूला आयते साम्राज्य कष्ट न करता मिळवता आले खूप सारी संपत्ती लुटून घेऊन गेले हा त्यांचा विलासीपणा मुले कारण त्यांच्याकडे जबाबदारी नव्हते आणि इथे सम्राट अशोकाने आपल्याला देखील या सूत्रापासून वेगेळे ठेवले नाही याला खरे मॅनेजमेंट म्हणतात
दुसरी बाब सम्राट अशोकाने बुद्धाच्या धम्माल राजधर्म म्हणून मान्यता दिल्यावर धम्म प्रसार करण्यासाठी भिक्षूंची नेमणूक केली आहे तेव्हा त्याने धर्मगुरू म्हणून नाही तर धम्माचे प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक करून त्यांना काही अधिकार देऊ केलेत म्हणजे जिथे जिथे हा प्रचारक जाईल तिथे तिथे त्याचा मान हा एखाद्या राजाच्या तोडीचा होता त्याचे अधिकार देऊ केले होते पण त्याच बरोबर घरघरात धम्म पोहचला पाहिजे हि सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे तुम्ही ज्या भागात आहेत तिथे कोणत्याही प्रकारची कमी तुम्हाला पडणार नाही पण धम्म प्रसारात कसूर झाल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी लागायची जे लोक योग्य काम करत नसायचे अश्यांची भिक्षु संघातून हकालपट्टी करणारा सम्राट अशोक होता हे मॅनेजमेंट चे स्किल आहे अधिकार व जबाबदारी देऊन त्यांचा समतोल बांधणे याला खरे मॅनेजमेंट म्हटले जाते
आम्ही कधी याचा विचार केला आहे का अशोकाला आम्ही चक्रवर्ती सम्राट एवढ्यावर च मांडले मी पण त्या चक्रवर्ती सम्राटाला चक्रवर्ती का म्हणतात हे कधी आम्ही पहिले नाही तो वेगळा भाग आहे तो सविस्तर दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत

थोडक्यात आपण मॅनेजमेंट मधील दुसऱ्या सूत्र अशोकाने किती सचोटीने व काटकोर पणे आपल्या साम्राज्यात राबवले आहे याची जाणीव होईल आपणास

थोडक्यात अशोकाचे विविध विभाग आहेत प्रत्येक विभागाला मुख्य अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला सर्व अधिकार देऊन त्याला त्या विभागाची सर्व जबाबदारी देऊ केलेली आहे की तो त्याच्या जबाबदारी शिवाय दुसरा विचारच करू शकत नाही म्हणून अशोकाचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच गेले लोक जोडत गेले एक हि माणूस शत्रूला जाऊन मिळाला नाही शत्रू मात्र सम्राटाच्या राज्याचा भाग बनून राहिला याला एका यशस्वी व्यवस्थापकाचे कौशल्य म्हणतात आणि सम्राट अशोक हा मॅनेजमेंट मधील किंग होता हे उभ्या जगाने समजून घेणे आवश्यक आहे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat