चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा : भाग २

सम्राट अशोक हा आधुनिक काळातील मॅनेजमेंट मधील मॅनेजमेंट चा निर्माता आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये प्रथम मॅनेजमेंट म्हणजे काय हे पाहणे आवश्यक आहे तर आधुनिक काळात त्याची व्याख्या आहे लोकां कडून काम करवून घेण्याची कला म्हणजे मॅनेजमेंट होय management is art of getting things done through people . आता याला कला का म्हटले आहे तर जन्मताच कोणाला काही येत नसते त्याला ते अवगत करावी लागते अशोकाचा व्यवस्थापन जगतातले काम आजवर कधी जगापुढे आले नाही ते आले असते तर अशोक आज मॅनेजमेंट जगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असा सम्राट ठरला असता पण त्याला तसे कोणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला नाही
आता याला कला का म्हणतात ते पाहू या त्याची कारणे असतात एक यात नावीन्य असावे लागते ते व्यवस्थापनात केले जाते म्हणजे नवनवीन युक्त्या नवे प्रश्न सोडवण्यासाठी वापरले नवीन संकटे असतात ते सोडवण्यासाठी नवा मार्ग शोधला जातो
एकदंरीत नवनव्या गोष्टींचे निर्माण करावे लागते त्यात एक नाविन्यता असेल तरच ते यशस्वी होते आता व्यवस्थापनात कॉपी करण्यास जागा नसतो कारण सतत बदलत असणारी परिस्थिती तसे बदल करण्यास प्रवृत्त करते त्यामुळे एखादा व्यक्ती जशीच्या तशी कृती करू शकत नाही आणि तशीच परिस्थिती असताना तसाच निर्णय घेऊ शकत नाही त्यात बदल करू शकतो म्हणजे काय यात बुद्धिमत्ता महत्वाची असते अशोकाने तक्षशीलेचे शमवलेले बंड असेल किंवा अशोकाने आपल्या साम्राज्यात विविध लोकांनी केलेलं बंड असतील किंवा धम्म प्रसारासाठी वापरलेली यंत्रणा आहे जे सारे त्याचंच एक भाग आहे पण हा लोकांसमोर कधी आला नाही
दुसरी गोष्ट व्यक्तिगत दृष्टिकोन हि महत्वाचा भाग आहे प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत वेगळी असते एकी व्यक्ती करतोय तशीच दुसऱ्याची कृती असू शकत नाही कारण दुसऱ्याच्या पद्धतीचा वापर आपणास तंतोतंत करता येत नाही तेव्हा कधी हि स्वतःची कृती महत्वाची असते
तिसरी गोष्ट असते मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणे म्हंजे काय हे दोन्ही घटक एकाच वेळी कामामध्ये युझ करणे आता आता व्यवस्थापक होण्यासाठी नुसते कौशल्य व ज्ञान असून फायदा नाही तर त्याच्याकडे शिस्त समर्पण बांधिलकी हे गुण असावे लागतात
सम्राट अशोकाने अनेक संकटाना झेलत एवढे मोठे साम्राज्य उभारले आहे ते बिना मॅनेजमेंट चे शक्य होईल का कोणत्या हि राजाला ते शक्य नाही व्यवस्थापन हा महत्वाचा भाग असतो
अशोकाने आपल्या आयुष्यात एक एक माणसे जोडली आहेत लोकांमध्ये प्रिय राजा म्हणून त्याची ओळख आहे सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये सम्राट अशोक सर्वात यशस्वी सम्राट झालेला आहे अशोकाची शिस्त हि आजच्याघडीला महत्वाची आहे आजवर कोणी यावर लक्ष दिलेले नाही सम्राट अशोकाने सैन्याला शिस्त घालून दिली च पण सोबत त्याने आपल्या जनतेला हि शिस्त घालून दिलेली आहे अशोकाच्या काळात अन्याय अत्याचार च्या घटना लांबची गोष्ट आहे या तीन तत्वांचा जिथे योग्य मेल असतो तिथे च कल्याणकारी राज्य निर्माण होते


सम्राट अशोकाची कारकीर्द किती वर्षाची आहे सम्राट अशोक इसवी सन पूर्व २६९ ला सत्तेवर बसला व इसवी सॅन पूर्व २३२ मध्ये त्याचे निधन झाले आहे ३७ वर्षाचा कालावधी मध्ये अशोकाने निर्माण केलेलं साम्राज्य ते हि एकछत्री साम्राज्य जगात एकछत्री साम्राज्य असावे असे लोकांना अशोकाचे साम्राज्य पाहूनच पुढे लोकांनी पावले उचलली आहेत यालाच व्यवस्थापक यांचे यश आहे जेव्हा मन आणि मेंदू एकत्र काम करतात तेव्हाच काम बिनचूक होते
चौथी गोष्ट आहे निकालावर आधारित म्हणजे काम रिझल्ट ओरियंटेड असावे लागते कोणते हि काम करताना कामाचा रिझल्ट लागणे गरजेचे असते नुसते आम्ही हे केले ते केले सांगून होत नाही तर त्याचा रिझल्ट लागणे आवश्यक आहे सम्राट अशोकाने धम्म विजय करून जगाला ते दाखवून दिले आहे कि कामाचा रिझल्ट कसा असायला पाहिजे ते शिवाय त्याचे साम्राज्य हेच त्याच्या कामाचा सर्वात मोठा रिझल्ट आहे शिवाय त्याने केलेलं प्रत्येक काम हे हे रिझल्ट ओरियंटेड आहे त्याने जे जे मनात आणले ते ते त्याने पूर्ण केले
सम्राट अशोकाने आपल्या राज्याचे विस्तार करतेवेळी साम्राज्यवादी भूमिका ठेवून ते केले असे म्हणता येत नाही लोकांनी चुकीचा अशोक मांडला आहे अशोकाला साम्राज्य विस्ताराची भूक नसून सामान्य लोकांच्या भल्याची भूक होती आणि त्यातून अशोकाचे व्यवसाय व्यवस्थापन पुढे येते
आधुनिक काळातील भले भले मॅनेजमेंट मध्ये पारंगत असणाऱ्या लोकांना जे जमले नाही ते अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी यशस्वी करून दाखवले
अशोकाच्या सैन्यामध्ये शिस्तप्रिय काम असायची प्रत्येक सैन्याला त्याचे एक अस्तित्व होते अशोकाने साम्राज्य विस्तार करताना अनेक राजांपुढे मैत्रीचा हात देतेसमयी महत्वाची गोष्ट केली आहे ती म्हणजे लोक जोडणे सामन्यातील सामान्य माणसाला जोडले गेले म्हणून अखंड भारत वर्ष साकारले गेले हे व्यवस्थापनाचे महत्वाचे भाग आहेत पाचवी बाब आहे ती म्हणजे पुढाकार घेणे म्हणजे आपण मागे आणि तुम्ही पुढे चला असे नाही प्रत्येकवेळी आपल्या सैन्याला नवीन गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेऊन दाखवत असे आणि योग्य ठिकाणी योग्य काम करणे हे महत्वाचे असते यासाठी योग्य त्याच माणसाला ते काम देणे अशोकाने धम्म प्रसारासाठी ज्या ज्या लोकांना निवडले ते ते लोक धम्माचा प्रसार करण्यात यशस्वी झाले आहेत याला मॅनेजमेंट म्हणतात अशोकाचा एक हि पराभव झालेला नाही हे अजून एक महत्वाचे आहे मग लढाई रणांगणावर ची असेल व बुद्धीच्या मैदानात अशोकाने हार पाहिलेली नाही कारण योग्य त्या ठिकाणी योग्य माणसाला नेमून काम पूर्ण करणे आणि अशोकाच्या राज्यात सामान्य जनतेला पुढाकार घेता येत होता म्हणून भारतभर स्तूपांची निर्मिती झाली आहे . ८४ हजार स्तूपांची निमिर्ती ती हि अवघ्या काही कालावधी मध्ये याला आजवर लोकांनी वेगळ्या मुद्द्यातून पाहिले पण हे एका अभियंत्याची दृष्टी आणि कृती चे मॅनेजमेंट म्हणतात टाइम मॅनेजमेंट म्हटले जाते
सहावी गोष्ट बुद्धिमत्ता हि तर लागतेच नसेल तर तो माणूस यशस्वी होत नसतो अशोकाच्या साम्राज्याचा विस्तार पूर्ण कल्पना देते अशोकाची बुद्धी कौशल्य किती अफाट असेल याचे
आता यात चार प्रकारची बुद्धिमत्ता असते एक मानसिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता अंतर व्यक्ती बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता
आता मानसिक मध्ये कोणत्या हि संकटाच्या वेळी अचूक पणे ज्याची कामे पूर्णत्वास जातात त्यालाच मानसिक बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे असे म्हणतात अशोकाने आपल्या भावाच्या चुकीच्या वागणुकीमुळे सामान्य माणूस पिळवटाला जातोय ये पाहून लोकांसाठी अतिशय नाजूक असणारा विषय त्याने हाताळून घेतला ते कौशल्य सहज कोणाला हि जमत नाही यामध्ये भावनेच्याभरात वाहून चुकीची पावले पडून विनाशाकडे वाटचाल होते व्यवस्थापकाला यामध्ये महत्वाचा भाग पार पाडावा लागतो
सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये त्या व्यवस्थापकाला सामाजिक परिस्थितीचे भान असायला लागते आणि सर्व समाजाचा पाठींबा असणे महत्वाचे आहे अशोकाने लोकांच्या मनात राष्ट्राप्रती एक भावना निर्माण करून दिली आहे ज्यामुळे लोक अशोकाच्या त्या प्रवाहात आली आहेत आणि अखंड भारत पूर्णत्वास नेला आहे
अंतर व्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे स्वतः बुद्धिमान असून चालणार नाही तर बुद्धिमान लोकांना शोधून आपल्या सोबत घेण्याची बुद्धिमत्ता असावी लागते
भावनिक बुद्धिमत्ता मानसिक व भावनिक म्हणजे वैचारिक व भावनिक शब्द एकत्र येतात म्हणजे काय वैचारिक बुद्धिमत्ता जिथे संपते तिथे भावनिक बुद्धिमत्ता चालू होते आणि यात भावनिक न होणे हिलाच भावनिक बुद्धिमत्ता म्हटली जाते अशोकाने भावनिक राजकारण केले नाही काही ठिकाणी कठोर निर्णयाची गरज होती तिथे कठोर निर्णयांची अंमलबजावणी केली आहे नुसते आदेश देऊन सोडले नाही त त्यावर अंमल झाला पाहिजे
सम्राट अशोकाने भावनिक राजकारण न करता
लोकांच्या भल्याचे राजकारण केले आहे राज्य करताना आदर्श राज्यकारभार कसा असावा याचे महत्वाचे पुरावे हे अशोकाकडेच पाहून घ्यावे लागतात
अशोकाच्या बाबतीत सर्वात मोठा गैरसमज असा आहे कि अशोक क्रूर होता कलिंगाच्या युद्धांनंतर तो बदलला तर हे अत्यंत चुकीचे आहे अशोकाच्या घराचे वातावरण हे बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव असणारे आहे काही इतिहासकारांनी अशोक चुकीचा रंगवला आणि त्याचे हि कारण आहे कारण बुद्धाला लोकांनी प्रेझेंट करण्यासाठी अशोक चुकीचा रंगवला म्हणजे बुद्ध तत्व सांगायला अशोक असा प्रकारे सांगितला गेला
एक गोष्ट लक्षात घ्या अशोकाची एकमेव लढाई आहे जो अशोक मैदानात लढाई करण्यासाठी गेला आहे आणि जिथे माणसे मारली गेली अशी त्याची एकमेव लढाई आहे ती म्हणजे कलिंग आणि कलिंगाच्या स्वाभिमानपणा हा त्यास कारणीभूत ठरला सामान्य लोक लढाई स उतरले शेवटी विजय झाला तेव्हा अशोक अस्वस्थ झाला होता कारण माणसे मारणे चुकीचे आहे हे त्याला माहित असताना हि लढाईत मारावेच लागतात कारण ती लढाई आहे लोकांनी मात्र अशोक याने मोठ्या प्रमाणात कलिंग बेचिराख केले असे चुकीचे सांगतात मुळात सामान्य माणसे लढाईत उतरली तेव्हाच अशोकाने लढाईच मार्ग बदलला आहे माणसे मारून काही होत नसते हे सांगणारा अशोक क्रूर असेल असे वाटत नाही
आणि लगेच काही तो बुद्ध तत्वज्ञान ऐकून बुद्धाकडे आलेला नाही त्याचा लहानपणापासून तो बुद्धाच्या शिकवणी च्या प्रभावाखाली आहे म्हणून अशोक बुद्धकडे सहज गेला कारण त्यावेळी बुद्धशिवाय कोणता पर्याय च समोर नव्हता
अशोकाने बुद्धाच्या प्रति प्रेरणेची भावना होती श्रद्धा वैगरे अजिबात ठेवणारा अशोक नव्हता कारण यशस्वी व्यवस्थापकाला श्रद्धा ठेवून जमत नसते तर त्याला प्रेरणेची गरज असते आणि अशोकाने आपल्या लोकांमध्ये प्रेरणा जागवली आहे
हे अशोकाचे स्किल आहे अशोक केवळ राजा किंवा चक्रवर्ती सम्राट नसून एक यशस्वी मॅनेजमेंट किंग आहे ज्याने दोन हजार वर्षांपूर्वी या जगाला मॅनेजमेंट कशी करावी हे शिकवून गेला
आता अशोकाच्या मॅनेजमेंट मधील सूत्रांचा अभ्यास करू जी आता मॅनेजमेंट सांगतात ते अशोकाने पूर्वी कशाप्रकारे अमलात आणले होते ते
कामाचे वाटप हे मॅनेजमेंट मधील पहिले सूत्र मानले जाते सम्राट अशोकाच्या संपूर्ण राज्याचे कामकाजाचे विभाग आहेत अशोकाचे नऊ मंत्री आहेत शिवाय अशोकाची सैन्य व्यवस्था त्यावेळच्या काळातीळ सर्वात मोठी सैन्य व्यवस्था आहे आणि हे सैन्य कायमस्वरूपी कामदार आहेत ६ लाख पायदळ ३० हजार घोडदळ व ९ हजार हत्तीदल आहे शिवाय अशोकाचे स्वतःचा खजिना म्हणजे कोषागार आहे म्हणजे आजची नॅशनल बँक अशोक हा बँक सिट्सम चा जनक होता असे म्हणायला हरकत नाही कारण त्याने तसे काम केले आहे अशोकाची स्वतंत्र अर्थव्यवस्था होती अशोकाचा स्वतःची अदयावत धान्याची बँक आहे लोकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा धान्य पुरवणारी जगातील पहिली सरकारी बँक अशोकाने केली आहे शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी बियाणाची इथूनच पुरवणी केली जायची अशोकाच्या व्यायामशाळा आहेत जिथे कसलेले पैलवान तयार केले जायचे खास करून अशोकाचे सैन्य त्या तोडीचे होते शिवाय अशोक हा कलागुणांना वाव देणारा सम्राट होता त्यामुळे त्याने स्वतंत्र विद्यालये ती हि विश्वविद्यालये निर्माण केली आहेत अशोकाच्या दवाखाने ,यंत्रशाळा हत्तीशाळा आरोग्यशाला पक्षी शाळा टाकसाळ असे बरेच विभाग आहेत अशोकाच्या राज्यात एकूण काय तर अशोकाने प्रत्येक काम विभागाहून देऊन कामाचे स्वरूप सहज आणि सोपे केले आहे अन्यथा एवढ्या अवाढव्य राज्याचा कारभार एकट्या व्यक्तीला करणे शक्य नसते
मॅनेजमेंट मध्ये महत्वाची गोष्ट आहे कामाची विभागणी इन प्रकारे केली जाते ते म्हणजे सोपे काम थोडे अवघड काम आणि अवघड काम अशी असते त्यात सोपी कामे करण्यासाठी लोक ठेवली जातात थोडे अवघड काम करण्यासाठी कौशल्य पूर्ण माणसे ठेवली जातात व अवघड काम करण्यासाठी स्वतः कौशल्य दाखवावे लागते म्हणजे काय एखादे सोपे काम आहे तर तेसैन्याच्या लायक आहे ते सैन्यानं च द्यायचे जे मंत्र्यांच्या लायक आहे ते मंत्र्यांना च करायला द्यायचे व मंत्री सेनापति यांच्यानी झाले नाही तर राजाला करावे लागायचे अशोकाने नेमके तेच केले आहे जे जे महत्वाचे काम आहे ते ते त्याने स्वतः केलेलं आहे अशोकाने धम्माच्या बाबतीत स्वतः लक्ष देऊन काम केले आहे माणसे निवडण्याचे काम अशोकाने स्वतः केले आहे म्हणजे कोणता माणूस कोणत्या ठिकाणी पाठवला पाहिजे हे अचूक माहित असणे हे मॅनेजमेंट आहे कौशल्य आहे ते कोणाला हि पाठवून जमणार नव्हते सीरियाच्या राजाकडे जाण्यासाठी अंतियोक नावाच्या भिक्षूला पाठवले मिश्र देशात तूरमय याला पाठवले म्हणजे भारताबाहेर ज्यांना पाठवले ते लोक तिकडे बुद्धाचा धम्म प्रभावी मांडतील असेच लोक पाठवले आहेत
अशोकाने एवढ्या मोठ्या साम्राज्याचे यशस्वी पणे राज्यकारभार कसा चालवला तर त्याने केलेली कामाची विभागणी आज आपण आपल्या भारताची जी यंत्रणा पाहतो तशीच यंत्रणा अशोकाची आहे सम्राट अशोकाच्या हाताखाली नऊ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या हाताखाली प्रांतवार माणसांची नेमणूक केलेली आहे आणि महत्वाचे म्हणजे अशोकाच्या राज्यात वतनदार पाहायला मिळत नाहीत कारण सामान्य माणसाला टॅक्समुक्त करणारा जगातला पहिला सम्राट हा सम्राट अशोक आहे आजच्या युगात सोडा असा एकही राजा भेटणार नाही ज्याने रयतेकडून टॅक्स घेतला नाईल पण अशोकाचे सर्वत्र एकछत्री राज्य असल्यामुळे कुठे हि बंडाळी नव्हती कारण कामाचे यशस्वी नियोजन महत्वच भाग आहे अशोकाच्या राज्यात रयतेवर जुलूम जबरदस्ती करण्याची मुभाच नव्हती कारण थेट यंत्रणा अशोकाच्या निगराणी खाली होती त्यामुळे सैन्याला त्याप्रकारे आदेश होते अशोकाचा काळ सुवर्ण काळ गणला जातो कारण शेती हा प्रमुख व्यवसाय असणारा भाग असल्याने अशोकाने जगातील सर्वातमोठ्या प्रमाणावर शेतमालाचा व्यापार करणारी यंत्रणा उभारली
आणि हे सारे शक्य झाले कारण अशोकाने कामाची विभागवार काम लोकांना देऊ केली ज्याची जशी गुणवत्ता तशी त्याला कामाची पोस्ट दिली जायची
आधुनिक यंत्रणेत हि तशी सिस्टम नाही गुणांनुसार कामांची विभागणी आज हि प्रभावी पणे चालताना दिसत नाही पण अशोकाने ती त्याकाळची यशस्वी करून दाखवली आहे आणि त्याच्याकडून च बहुतांश लोकांनी ती यंत्रणा वापरली आहे
सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने व्यवस्थापन क्षेत्रात केलेली क्रांती आजवर च्या इतिहासात लोकांनी कधी सांगितली च नाही
असो व्यवस्थापन मधील दुसरे सूत्र पुढच्या भागात पाहू
पण सम्राट अशोकाला इतिहासकारांनी न्याय दिला नाही एवढेच म्हणावे लागेल
कारण अशोकाची यंत्रणा हि प्रभावी यंत्रणा म्हणून जगापुढे नेली गेली पाहिजे
सम्राट अशोक हा व्यवस्थापनाचाजनक आहे

TEAM ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat