चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग : ११

चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यात केलेले शासन आणि त्यामध्ये जे काही बदल करून सुधारणा केली त्याचे अनेक उदाहरणे आपणास सम्राट अशोकाच्या राज्यात पाहायला मिळते.
चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्य स्थापन केल्यानंतर बिंदुसार याने हे साम्राज्य सांभाळले पुढे जाऊन सम्राट अशोकाच्या हातात हे साम्राज्य आल्यावर मात्र यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आणि त्याची अनेक उदाहरणे आपणास शिलालेखांतून आपणास पाहायला मिळते.

सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यात असलेली परिस्थिती पाहून काही शासन मध्ये सुधारणा करून घेतलेल्या आहेत त्यातील महत्वाच्या सुधारणा आपण पाहू या

१) आपल्या साम्राज्यात सुशासनासाठी नवीन अधिकारी नियुक्त केले आहेत. विशेष म्हणजे हे अधिकारी महत्वाची भूमिका बजावण्यासाठी त्यांना विशेष अधिकार देऊन निर्भय होऊन काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. यामध्ये महत्वाचे काही अधिकारी नियुक्त केले आहेत त्यांची माहिती घेऊन या
महामात्रा : अनेक शिलालेखात महापात्रा चा उल्लेख आपणास वाचण्यास मिळतो हे प्रशासनातील महत्वाचे पद असावे यात शंकाच नाही. महापात्रा आजच्या जिल्हाधिकारी सारखे पद होते. अनेक विभागांचे अधिकारी एकमेकांना जोडण्याची संकल्पना सम्राट अशोकाने अत्यंत सुरेख पद्धतीने बांधणी केलेली आपणास पाहायला मिळते. महापात्रा यांना जनतेच्या सुखासाखी काम करण्याचे आदेश आहेत.
धम्ममहापात्रा : हे विशेष अधिकारी पद निर्माण करण्यात आले ले आपणास पाहायला मिळते जे पूर्वी पाहायला मिळत नाही प्रत्येक व्यक्ती ला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले होते कोणत्या हि धर्माची बंदी घातलेली आपणास पाहायला मिळत नाही तसेच धम्म अनुशासन मात्र त्यावेळी आपणास स्पष्ट पाहायला मिळते . त्याकाळात धर्म हि संकल्पना नव्हतीच एक संपद्राय म्हणून लोक आपली विचारधारा मांडून तयार करत होते अश्या संप्रदाय वाल्या लोकांसाठी देखील अशोकाने बौद्ध धम्माचे जे विनय आहेत त्यांचे अनुशासन बंधनकारक केले होते. आणि यासाठी एक अधिकारी नेमला होता त्याला त्या काळात धम्ममहापात्रा या नावाने त्याची ओळख होती याचे काम असे लोक धम्मानुशासनं आचरणात आणत आहेत कि नाही यावर त्यांचे लक्ष असे शिवाय लोकांना सुद्धा आचरणाची याअधिकाऱ्यांकडून काम करून घेतले जात असे आणि हे काम अखंड जंबुद्वीप मध्ये केले जात होते हे विशेष महत्वाचे आहे. साधारण ह्या धम्म महापात्राला लोकांनी चांगले जीवन जगावे म्हणून नियुक्त करणारा जगातील एकमेव सम्राट आहे ज्यांनी लोकांच्या आचरणावर हि लक्ष दिलेले आहे.

स्त्रीयाध्यक्ष महापात्रा : आजच्या इतिहासातील हे महत्वाचे असे अधिकारी पद सम्राट अशोकाने आपल्या प्रशासनात निर्माण केले असून स्त्रियांच्या हितसुखासाठी तसेच अशोक यांच्या काळात स्त्री हि व्यावसायिक होती मोठे व्यापार करणारी होती त्यामुळे त्यांच्या सरक्षानार्थ आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यावर काम करण्यासाठी खास स्त्रीयाध्यक्ष महापात्रा हे पद निर्माण करून जगाच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटनांची नोंद आपणास वाचण्यास मिळते
वचभूमिक महापात्र : वच हे प्राकृत नाव आहे संस्कृत मध्ये व्रज होते हे पद आजच्या वनाधिकारी असतात तश्या पद्धतीचे होते सम्राट अशोकाने पशुहत्या वर बंदी घातली होती अनेक पशु प्राण्यांना अभय दिलेले होते वने वाढवली होती आणि त्यासाठी एक महत्वाचा अधिकारी नेमला होता त्याला वच भुमिक म्हटले जायचे शिवाय काही शिलालेखाच्या आधारावर हा अधिकारी धम्म महापात्रा यांच्यासोबत धम्म प्रसारात सहकार्य करत असे
अन्तमहापात्रा : हा अधिकारी त्याच्या नावानुसार च समजला जातो अन्त म्हणजे सीमा प्रदेशाच्या सीमेवर शिवाय एकमेकांच्या प्रदेशात जावून सम्राट अशोक यांचे धम्म दया दान आधी अशोक यांच्या नीती चा प्रचार प्रसार करण्यासाठी नेमण्यात आला होता थोडक्यात हा अधिकारी आजच्या भाषेत विदेश मंत्री म्हणून त्याच्याकडे पाहता येईल असे आहे.
व्यावहारिक महापात्रा : ह्या अधिकारी चे काम न्याय व्यवस्था सांभाळण्यासाठी चे होते
रज्जूक : न्याय व्यवस्थेतील हा प्रमुख अधिकारी आहे. याची नेमणूक हि व्यवहार समता आणि दंड समता यासाठी झालेली आहे याच्या कार्याचा उल्लेख चौथ्या स्तंभलेख मध्ये केलेला आपणास पाहायला मिळतो राज्याचा न्यायधीश म्हणून याची ओळख असे रज्जूक यांच्यासाठी विशेष अधिकार दिलेले होते एखाद्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली असेल तर त्याला जीवनदान देण्याचे अधिकार हि रज्जूक याला देण्यात आलेले आहेत. शिवाय यांना हि धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करण्याचे काम होते शिवाय प्रजेच्या कल्याणासाठी रज्जूक हा राजाचा प्रातिनिधि म्हणून काम करत होता चौथ्या स्तंभ लेखात स्पष्ट म्हटलेले आहे ”जनपदस हिते सुखाय” तसेच ग्रामीण भागात यांची काम असत कृषी अर्थात शेती आणि जमिनी विवाद देखील रज्जूक यांनाच पाहावे लागत असे आणि या अधिकारी वर्गावर धम्म महापात्राचा अंकुश असे एखाद्या रज्जूक कडून गैर वापर होवू नये म्हणून घेतलेली काळजी .
युत : युत रज्जूक आणि प्रादेशिक अशी नावांचा उल्लेख आपणास एकाच शिलालेख मध्ये हि तिन्ही नावे सापडतात युत हा आर्थिक खात्याचा प्रधान अधिकारी होता. याचे काम अर्थ व्यवस्था सांभाळणे त्यावर देखरेख ठेवणे त्यानुसार संपत्तीची देखरेख तसेच लेखाजोखा मांडणे शिवाय लेखाविभागाचा हिशोब देखील याच अधिकाऱ्या कडे असे. तसेच यांना दर पाच वर्षांनी आपल्या भागात जावून घराघरात धम्म प्रचार आणि प्रसार साठी काम करायचे होते शिवाय लोकांच्या समस्या जाणून त्यांची सम्राट अशोक यांच्याकडे माहिती अर्थात अहवाल पाठवणे होते.
प्रादेशिक : हा प्रांतीय अधिकारी होता आजच्या गव्हर्नर च्या हाताखाली असणाऱ्या अधिकाऱ्या सारखे याचे पद होते आजच्या कमिशनर पदाची व्यक्ती
प्रतीवेदक आणि पुरुष : हे दोघे अधिकारी एक प्रकारे सम्राट अशोकाकडून आलेल्या आदेशांचे सूचना सर्वसामान्य प्रजेला देण्याचे व काम करून घेण्याचे काम करत असत. हे एक प्रकारे गुप्तचर असल्या सारखे काम करत असते हे अधिकारी थेट सम्राट अशोक यांच्या अधिपत्याखाली असत शिवाय राजा आणि प्रजा यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून देखील काम करत असत

केंद्र आणि प्रांत मध्ये अनेक अधिकारी वर्ग आहेत. प्रतीवेदिका , लिपिकर , दूत , दायक, सावक, नगर व्यवहारक अश्या पद्धतीने अनेक अधिकारी वर्गाचा उल्लेख अशोक यांच्या शिलालेखात आलेले आपणास पाहायला मिळते

अनेक अधिकाऱ्यांची नावे वाचावाल्यावर आपणास सम्राट अशोकांच्या शासनात असणाऱ्या मंत्रालयाची नाव लक्षात येतील सम्राट अशोकाने मनापासून पशु पर्यंत सर्वाची काळजी स्वतः पित्याप्रमाणे घेतली आहे अनेक शिलालेखात त्यांनी सवे मनुषे पजा ममा असे म्हटलेले आहे अर्थात सर्व मनुष्य हि माझे लेकरे आहेत पुत्र आहेत असा उल्लेख केलेला आहे आणि या लेकरासाठी सुखसुविधा देखील निर्माण केलेल्या आहेत .
सम्राट अशोक याने अनेक महत्वाच्या गोष्टी लिहलेल्या आहेत त्यापैकी सम्राट अशोकाची सर्वात महत्वाची नोंद पाहायला मिळते ती म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केलेली परिसा नावाची समिती हे असे विशेष मंत्रालय आहे कि ज्याच्या द्वारे सम्राट अशोक याच्यावर नियंत्रण राहण्यासाठी निर्माण केलेली हि एक परिषद होती. सम्राट अशोकाचा ३६ वा शिलालेखात अशोकाने स्पष्ट स्वरुपात याची मांडणी केलेली आहे. राजाला त्याच्या का आदेशात चुकीचे काही आढळले तर त्वरित राजाला ते सांगण्याचा अधिकार त्यांना दिलेला होता त्यांच्याकडे राजाने दिलेली आज्ञा कार्यन्वित करण्याचे काम असे तसेच खालील अधिकाऱ्या ना कामाचे आदेश देणे . लेख विभागावर लक्ष ठेवणे राजाची आज्ञा बदलण्यास सूचना देणे तसेच महामात्रा यांच्याकडे जे काम नेमूद दिलेले आहे त्याच्यावर लक्ष ठेवणे अशी अनेक कामे या परिषदेला होती एकूण च सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट असून हि आपल्याकडून चुकून आदेश गेला तर प्रजेला कोणता त्रास होवू नये म्हणून स्वतःवर हि नियंत्रण ठेवणारा कदाचित जगाच्या इतिहासातील हा महत्वाचा सम्राट आहे

युद्ध बंदी करून धम्म विजय स्थापन करून काम करण्यास सुरुवात करून शासन व्यवस्था पूर्णपणे ध्म्मानुसार चालवण्यास सुरुवात केली. पशु प्राण्यांची हत्या बंद करून जगातील अभयारण्यांचा जनक म्हणून त्याच्याकडे पहिले जाते आणि त्यासाठी भारताच्या इतिहासातील वन विभागाची निर्मिती चे श्रेय हे सम्राट अशोककडे च जाते. आपल्या अधिकाऱ्या च्याकडून चुकीचे काम होवून सामान्य प्रजेला त्रास होईल असे होवू म्हणून प्रत्येक्ष अधिकाऱ्या ना जनतेच्या विभागात जावून दौरे करण्यास लावले व समस्या जाणून त्यावर उपाय करण्यास सांगितलेले आहे. जेल मध्ये असणाऱ्या कैदी हा चुकीच्या गोष्टी किंवा कृत्यामुळे तो चूक करून बसला आहे अश्या कैद्यांना सुधारून त्यांना मुक्त करण्याचे काम हि अशोकाने केलेले आहे शासन व्यवस्था एवढी प्रभावी आजपर्यंत आपणास सापडत नाही हे सम्राट अशोकाच्या साम्राज्याचे वैभव आहे.
प्रजेचे आपल्यावर ऋण आहेत हे मानून स्वतः या ऋणातून मुक्त होण्यासाठी जनतेचे कल्याण करावे हि भावना मनात ठेवून राज्य करणारा कदाचित हा एकमेव सम्राट आहे.
अश्या महान विचारांच्या सम्राटाला नतमस्तक होण्याखेरीज जगातील कोणाला हि राहवणार नाही अश्या सुशासन निर्माण करणारा आणि त्याचे वर्तमानात हि महत्व लक्षात येत आहे अश्या या महानायकाला जगाच्या इतिहासात एक अजरामर म्हणून च पाहिले जाते

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat