चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा १०

भारताच्या इतिहासातील अनमोल रत्न म्हणून सम्राट अशोकाच्या राज्याकडे पहिले जाते सम्राट अशोकाने आपले राज्य बुद्ध धम्माच्या अनुशासन चालवण्यास सुरुवात केल्यापासून जे काही बदल झालेले आहेत ते अशोक यांनी स्वतः लिखित लिहून स्वतः त्याची उदाहरणे दिलेली आहेत. जेव्हा जेव्हा हे वाचले जातील तेव्हा तेव्हा सम्राट अशोकाच्या या कार्याचा गौरव होणे स्वाभाविक च आहे आणि हे निरंतर राहावे यासाठी देखील आम्ही प्रयत्न केले पाहिजेत

सम्राट अशोकाने जे धम्मानुसार चालवलेले शासन होते आणि त्यात जो काही बदल झाला ह्याचा शिलालेख गिरनार येथील शिलालेखात चौथ्या भागात मांडलेला आहे. भारताच्या इतिहासातील हि एक महत्वाची घटना म्हणून याकडे पहिले जाते जगामध्ये असंख्य सम्राट होऊन गेले आणि किती तरी राजे होऊन गेले पण जे सम्राट अशोकाने साध्य केले ते मात्र इतरांना करता आले नाही हे सर्वात महत्वाचे
नेमके काय घडले होते सम्राट अशोकाच्या राज्यात धम्म अनुशासनाने त्याचा सविस्तर आढावा घेऊ या शिलालेखाच्या माध्यमातून

शिलालेख सविस्तरपणे

शिलालेखाची भाषा पाकृत पाली असून शिलालेखाचे लिपी धम्मलिपी आहे शिवाय हा शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या बाराव्या वर्षी लिहण्यात आलेला आहे.
अ ति का त अं त र ब हु नि वा स स ता नि व ढि तो ए व प्रा णा रं भो वि हिं सा च भू ता न ञा ती सु
अ सं प ति प ति ब्रा ह्म णा सा म णा न अ स प ति प ति त अज दे वा नं पि य स पि य द सी नो रा ञो
ध म च र णे न भे री घो सो अ हो धा म घो सो वि मा न द स णा च ह स्ति द स णा च
अ गि खं धा नी च अ ञा नि च दि व्यां नी रू पा नी द स यि त्पा ज नं या रि से ब हू हि व स स ते हि
न भू त पु वे ता रि से अ ज दे वा नं पि ये स पि य द सी नो रा ञो ध मा नू स स्टि या अ ना रं
भो प्रा णा न अ वि ही सा भू ता न ञा ती न स प टि प ती ब्र ह्म ण स म णा न सं प टि प ति मा त री पि त री
सु स्तू सा थै र सु स्तू सा ए स अ ञे च ब हु वि धे ध म च र णे व ढी ते
पि य द सी रा जा ध म च र ण इ दं पू ता च पो ता च प पो ता च दे वा नं पि य स पि य द सी नो रा ञो
प व ध यी सं ती इ दं ध म च र ण आ व स व ट क पा ध म म्ही सी ल म्ही ती स्ट तो ध म अ नु सा पि स ति
ए स हि से स्टे कं मे य धं मा नु सा स नं धं मा च र णे पि न भ व ति अ सी ल स व त इ म म्ही अ थ म्ही
व धी च अ हि नी च सा धू ए ता य अ था य इ दं ले खा पि तं इ म स अ थ स वि धी यु जं तू ही नि च
लो चे ता व्य द्वा द स वा सा भि सी ते नं दे वा नं पि ये न पि य द सी ना रा ञो इ दं ले खा पि तं
अतिकात अंतर बहुनि वास सतानि वढितो एव प्राणारंभो विहिंसा च भूतान ञातीसु
असंपतिपति ब्राह्मणा सामणा न असपतिपति त अज देवानं पियस पियदसीनो राञो
धम चरणेन भेरी घोसो अहो धाम घोसो विमान दसणा च हस्ति दसणा च
अगिखंधानी च अञानि च दिव्यांनी रूपानी दसयित्पा जनं यारिसे बहूहिवसस ते हि
न भूत पुवे तारिसे अज देवानं पियेस पियदसीनो राञो धमानूसस्टिया अनारं
भो प्राणान अविहीसा भूतान ञातीन सपटिपती ब्रह्मण समणान संपटिपति मातरी पितरी
सुस्तूसा थैर सुस्तूसा एस अञे च बहुविधे धम चरणे वढीते
पियदसी राजा धम चरण इदं पूताच पोता च पपोता च देवानं पियस पियदसीनो राञो
पवधयीसंती इदं धम चरण आव सवट कपा धमम्ही सीलम्ही तीस्टतो धम अनुसापिसति
एस हि सेस्टे कंमे य धंमानु सासनं धंमाचरणे पि न भवति असीलस व त इमम्ही अथम्ही
वधी च अहिनी च साधू एताय अथाय इदं लेखापितं इमस अथस विधी युजंतू हीनि च
लोचेता व्य द्वादस वासाभिसीतेनं देवानं पियेन पियदसीना राञो इदं लेखापितं

प्राकृत शब्दांचे अर्थ

अतिकांत : होवून गेलेले आहे , वढितो: वाढले आहेत , ञातीसु : प्रति , असंपतिपति : अनादराचा भाव , धमचरणेन : धम्म आचरनाने , भेरी घोसो : भेरी चा आवाज , अहो : झाला आहे
विमानदसणा : राजमहाल दाखवणे , हस्ति दसणा : हत्ती दाखवणे
अगीखंधानी : आगीच्या मशाली , रुपानी : दृश्य , दसयित्पा: दाखवून , जनं : लोकांना , यारिसे : जसे
भूतपूवे : यापूर्वी , तारिसे : तसे अविहिंसा : अहिंसा , थेरसुस्तूसा : वृद्धांची सेवा करणे ,
पूता : मुलगा , पोता : नातू , पपोता : परतुंड , पवधयिसंति : वाढवणे , आव सवटकपा : पृथ्वीच्या विनाशापर्यंत , तिस्टतो: प्रतिष्टीत झाले , अनुसासीसंती : जीवनात कश्या पद्धतीने उतरवायचे हे शिकणे , असिलस : शील नसलेले , वधी : वाढणे ,अहिनी : कमी न होणे , युजंतू : लागणे
लोचेतव्या : रस घेणे

पूर्वी शेकडो वर्षापूर्वी असंख्य पशूंचा बळी दिला जात असे जीव प्राण्याच्या बाबतीत निदर्यता तसेच श्रमण आणि ब्राह्मणाप्रती सन्मानाची असणारी वागणुक वाढत च होती
परंत्तू आता देवाण प्रियदर्शी राजाने जेंव्हापासुन धम्म च्या प्रसार सुरु केला आहे त्यामुळे युद्धाच्या रणांगणावर आता धम्म घोष ऐकण्यास येत आहे. जनतेला आता मराजमहाल रथ हत्ती अग्नी ज्योती च्या दिव्य रूपात दाखवले जात आहेत. देवाण प्रियदर्शी राजा यांनी जेव्हापासून धम्म प्रचार सुरु केला त्यामुळे शेकडो वर्षांपासून जे दिसत नव्हते ते आता दिसू लागले आहे. लोकांनी आता पशु हत्याच निषेध करतात जीवांच्या प्रति आता निर्दयता चा अभाव होऊ लागलाय तसेच ब्राह्मण श्रमण यांच्याप्रती आता आदर सन्मान आहे मातापित्या सेवा केली जात आहे.
अश्या पद्धतीने आता धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. देवाण प्रियदर्शी राजा नेहमी धम्माची शिकवन विकसित करण्यासाठी तसेच देवाण प्रियदर्शी राजा चे मुले नातवे परनातवे धम्माच्या विकासात नेहमी आपले योगदान देतील. आणि ते पृथ्वीच्या अंतापर्यंत चालेल ते स्वतः धम्माचे अनुसरण करतील आचरणाचे पालन करतील तसेच लोकांना धम्माचे उपदेश देतील आणि सदाचार हि सांगतील
धम्माचा उपदेश देणे हे कार्य अंत्यंत गौरवास्पद आहे. ज्यांना आपले चारित्र्य रहित आहेत तसेच ज्यांना धम्म आचरण करता येत नाही त्यांनी देखील धम्माच्या विकासात मागे राहता कामा नये आणि याच उद्देशाने हा शिलालेख लिहलेला आहे. लोकांनी या धम्म च्या आचरणात स्वतःला समर्पित करावे हा लेख देवाण प्रियदर्शी राजा च्या राज्याभिषेकाच्या बाराव्या वर्षात नंतर कोरलेला आहे .

वरील शिलालेखाचा अर्थ पाहता आपणास एक गोष्ट लक्षात येईल कि सम्राट अशोकाने केवळ जनतेलाच आदेश दिलेला नाही तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला तो आदेश दिलेला आहे शिवाय ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करतील ते हि पृथ्वीच्या अंतापर्यंत कदाचित हा एकमेकव असा सम्राट आहे कि ज्याने आपल्या घरातील कुटुंबांनी देखील या धम्म कार्यात काम केले पाहिजे म्हणून आदेश लिहून ठेवलेला आहे . त्याशिवाय महत्वाचे म्हणजे हे कार्य अनादी काळ टिकून राहावे म्हणून हे कार्य सातत्याने केले पाहिजे कारण या कामामुळे रणांगणावर वाचणारे युद्धाचे वाद्य आज बंद होऊन त्या ठिकाणी धम्माचा जयघोष होऊ लागला आहे. युद्ध बंद करून मैत्री करुणेचा धम्म लोकांना सांगण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक बदल घडले लोकांमध्ये अनेक बदलावं झालेले पाहायला मिळाले हे सम्राट अशोकाने स्वतः पाहिलेला रिझल्ट होता म्हणून च सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे करण्याचा निश्चय केलेला आहे

अश्या महान शासकाचा गौरवशाली इतिहास शिलालेखांतून सविस्तर अभ्यासण्यास मिळत आहे.

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat