ABCPR परिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करणार……

आपण सर्वजण वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले असताना भारताची आणि महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी नाही. कधी नव्हे एवढ्या भयान वातावरणात आपणा सर्वांना दिवस काढावे लागत आहेत. ह्या परिस्थितीतून बाहेर नक्कीच निघून आपल सर्वांच आयुष्य पूर्ववत होईल. त्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय, उपाययोजना, नियमावली या सर्वांच काटेकोरपणे पालन करावे लागेल.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जर परिस्थिती नियंत्रणात आली तर, अन्यथा सरकार मुदत वाढवू शकते. सध्याची परिस्थिती नियंत्रणात येऊन सर्वांच जिवन पूर्ववत होईल अशी आपण फक्त आशा व्यक्त करु शकतो.

कोरोना व्हायरसचा धोका हा एकापेक्षा जास्त लोक एकत्र आल्याने वाढतोय त्यामुळे सध्या सोशल डिस्टंसींग मेंटेन ठेवण्यासाठी कोणताही सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्रम आपण एकत्रितपणे साजरे करू शकत नाही.
आपणा सर्वांना माहीत आहे आपल्या सर्वांचे उध्दारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल या दिवशी असते. बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपली दिवाळी असते. मोठी धामधूम असते. यादिवशी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरातील विविध संघटना दोन महिने अगोदरच मोठी तयारी करत असतात. परंतु यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करू शकत नाही. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्या भावनांना यावर्षी मुरड घालावी लागेल. याची खंत आहेच. ABCPR परीवार प्रत्येक वर्षी बुध्दलेण्यांवरती जाऊन लेण्यांवरती असलेल्या स्टाफला मिठाईचे वाटप करुन जयंती साजरी करते परंतु यावेळेस जयंती साजरी करणार ती अनोख्या पद्धतीने.

Team_ABCPR आपणा सर्वांना आवाहन करत आहे की, यावर्षी १४ एप्रिल २०२० डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या जयंतीनिमित्त ठीक सकाळी ११.०० वाजता आपण आपल्या कुटुंबासहित घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करून अर्थात सर्वानी ठरलेल्या एकाच वेळेत “बुद्ध वंदना” ग्रहण करूया शांततामय वातावरणात संपूर्ण भारतात बुध्द वंदनेचा आवाज घुमेल. दाखवून देऊ या जगाला तारण्यासाठी “युद्ध नको बुद्ध हवे”. आपल्या घरीच आपल्या कुटुंबासह ही जयंती साजरी करायची आहे. आपण कोणाच्या घरी जायच नाही किंवा कोणालाही आमंत्रण न देता यावर्षी १४ एप्रिलला फक्त आपल्या कुटुंबाच्या सानिध्यात बाबासाहेबांना अभिवादन करु.

सर्वांनी सकाळी बरोबर ११:०० फेसबुक लाइव्ह बुध्दवंदना घेऊन ज्या महामानवाने आपल्याला बुध्दाच्या ओटीत टाकल त्या महामानवाला अभिवादन करुयात.

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat