बौद्ध संस्कृतीची देन गुढी पाडवा नवीन वर्ष उत्सव

गुढी पाडवा  हा नवीन वर्ष म्हणून मराठी कालगणना म्हणून देखील स्वीकारली जाते हि कालगणना पुढे जावून समस्त हिंदू धर्माची कालगणना झाली गुढी पाडवा हा सन महाराष्ट्र आणि तेलगु कानडी लोक साजरे करतात उत्तर  भारतात हा सन का साजरा केला जात नसावा याबबत आजवर कोणी प्रश्न विचारला नाही हिंदू फक्त याच भागात आहेत का तर याचे उत्तर आम्ही कधी शोधात नाही याचे कारण स्पष्ट आहे सातवाहन साम्राज्य

महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश सातवाहन हा सम्राट अशोकाचा मांडलिक असून सम्राट अशोकाच्या नंतर त्याने स्वतःला राजा म्हणून घोषित केले व स्वतःचे राज्य सुरु केले शक सुरु झाला तो निर्माता आहे तो सम्राट कनिष्क हा शक राजा आहे महाराष्ट्रात क्षत्रप हे कनिष्काचे मांडलिक आहेत महाराष्ट्रात सातवाहन आणि क्षत्रप यांचा संघर्ष हा आपल्याला इतिहासत पाहायला मिळतो 

गुढी पाडवा म्हणजे काय तर नवीन वर्षाची सुरुवात असणारा सन हा सन फक्त सातवाहन राजांच्या आधिपत्य असणाऱ्या भागात च होतो हे विशेष दुसरी गोष्ट गुढी उभारली जाते का तिचे कारणे त्यावेळची कारणे वेगळी होती आज वेगळी आहेत तेव्हा गुढी म्हणजे काय यावर सखोल माहिती घेत असताना सरळ आणि सोपा भाग आहे तो म्हणजे विजयी पताका आहे कि सातवाहन राजांची या महाराष्ट्रात उभी केली  इसवी सन पहिल्या शतकात त्याचा उल्लेख आपणास पाहायला मिळतो सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश असून त्यांचे राज्य महारष्ट्रात दीर्घकाळ म्हणजे ४६० वर्षे सलग राज्य कर्ते म्हणून सातवाहन सम्राट यांच्याकडे जाते आता प्रश्न आहे गुढी पाडवा बौद्ध लोकांचा हि हिंदू लोकांचा त्यावर जेव्हा आपण लक्ष देतो इतिहास अभ्यासतो तेव्हा सरळ स्पष्ट कल्पना येते कि या काळात महाराष्ट्रात बौध्द धम्म भरभराट होवून वाढला होता आणि याची उत्तर नुसती ऐकीव नाहीत तर बोलके पुरावे आज हि उपलब्ध आहेत

महाराष्ट्रात बौद्ध जनता बौद्ध धम्मासाठी खूप मोठ्या प्रमाणावर  बौद्ध लेण्यांची निर्मिती करत आहेत शिवाय सातवाहन राजांचे राज्यादेश आढळतात एकूणच  यांचे  बौध्द धम्माचा आपल्या राज्य धर्माचा दर्जा  पाहायला मिळतो

सातवाहन काळात बौध्द धम्म हि  महाराष्ट्रात उच्च जागेवर होता क्षत्रप हे देखील  बौद्ध धम्मास वाहून गेलेले राजे होते शक हे  बौद्ध धम्माचे उपासक हि होते शिवाय शंकांचे आणि सातवाहनांचे सबंध देखील आहेत कान्हेरी मध्ये असणाऱ्या शिलालेखात शक आणि सातवाहन यांचे सोयरिक असल्याचे पुरावे आपणास मिळतात

शकाचा पराभव करणारा सम्राट हा गौतमीपुत्र सातकर्णी हा या महाराष्ट्रातील सर्वात पराक्रमी सम्राट आहे आणि हा सम्राट बौद्ध धम्माचा उपासक आहे बौद्ध धम्मासाठी त्याचे राज्यादेश आहेत बौद्ध भिक्खुंच्या सोयीसुविधांसाठी त्यांचे आदेश आहेत  ज्यांना विजयी घोषणा म्हणतात त्या विजयी घोषणेत दिले जात असत जेव्हा एखादा सम्राट विजयी घोषणा करतो आहे आणि ते हि बौद्ध धम्मासाठी करतो आहे यावरून त्याचे धम्माप्रती असणारी भूमिका लक्षात येते

गुढी उभारण्यामागे कारण आहे ते म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी याने शक राजा क्षत्रप नहपान यांचा पराभव करून महाराष्ट्रावर अधिकृतरीत्या सातवाहनांचे अधिराज्य प्रस्थापित केले आणि त्या नंतर आपल्या सातवाहन साम्राज्याचा राज्यकारभार सुरु केला तो क्षण सालीहन सके शालिवाहन शके अर्थात शालिवाहन हे संस्कृत आहे तर सालाहन हे प्राकृत मधील आहे

शक सवंत चा निर्माता सम्राट कनिष्क आहे हे मात्र जाणीवपूर्वक लपवले जाते सातवाहन राजाने  इसवी सन ७८ मध्ये शक सुरु केले हा खोटा प्रचार सुरु केला गेला मुळात ७८ ला शक सुरु करणारा सम्राट हा कनिष्क आहे  शालिवाहन शके हे सम्राट गौतामुपित्र सातकर्णी याने सुरु केला आहे तो कालखंड हा इसवी सन १०६ ते १३१ २५ वर्षे गौतमीपुत्र सातकर्णी ने राज्य केले आता ७८ ला गौतमी पुत्राने शक सुरु केला हा मुळात पाहिली चुकीची गोष्ट शक सवंत सुरु करणारा सम्राट कनिष्क हा  बौद्ध सम्राट आहे विक्रम सवंत हि हिंदू कालगणना आहे तर शक सवंत हि बौद्ध कालगणना आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे  गुढी उभारण्याचा क्षण  महाराष्ट्रात कधी सुरु केला याबबत विद्वानामध्ये भेद आहेत ७८ ला महाराष्ट्रात गुढी उभारली असेल तर ती कशी काय हा प्रश्न पडतो मुळात शक सवंत निर्मिती करणारा कनिष्क हा शक सम्राट आहे शिवाय तो बौद्ध धम्माचा उपासक आहे

१०६ मध्ये गौतमी पुत्र सातकर्णी चा राज्यकाल आहे त्यामुळे गौतमी पुत्र सातकर्णी ने नहपान याचा पराभव करून शालिवाहन शके सुरु केले तो कालखंड हा इसवी सन दुसरे शतकाच्या सुरुवीचा आहे

कनिष्काने सुरु केलेल्या शका लाच पुढे सालीवाहन शके मध्ये रुपांतरीत केले गेले आहे हे जाणीवपूर्वक सांगितले जात नाही  दोघे हि बौद्ध सम्राट आहेत आणि या बौद्ध सम्राटांनी आपले आपले  शक  निर्माण केले आहेत

त्याच काळात प्रजानन हे बौद्ध लोक आहेत आता बौद्ध लोक असतील तर उत्सवाचा तो दिवस साहजिक च बौद्ध लोकांचा असणार हे सांगण्याची आवश्यकता नाही

गौतमी पुत्र सातकर्णी नंतर वाशिष्टी पुत्र पुळूमावी हा सत्तेवर आलेला आहे  एकूणच यांचा कालखंड हा इसवी सन दुसरे शतक आता

शके संवतची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिश्क (७८-१०१) ने राज्याभिशेकापासून  केली. आणि  आजही शके संवत व ग्रेगररयन दिनदर्शिकेत ७८ वर्षाचं अंतर कायम आहे. त्या  शकाला शालिवाहन  ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिश्क  बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार  काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पयंत होता. त्याच्या काळात चौथी धम्म संगीती जालंधर किंवा  काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहली मुती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व भगवान  बुद्धांची प्रतिमा  असलेली सोन्याची नाणी तयार केली.  सम्राटाने पेशावरला  बांधलेला विहार  हा ४०० फूट उंच होता. सम्राट  कनिष्का   मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्या त्याच्या दरबारी होते. (संदर्भ: बौद्ध धर्म के २५०० वर्ष: पी वि बापट )

गुढी पाढवा बाबत माहिती पाहिली तर काल्पनिक कथेशिवाय दुसरे काहीच नाही 

 • ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे.
 • श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.[१३]
 • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
 • प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकांंमध्ये आले आहेत.

यात शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव केला  हि देखील एक काल्पनिक कथा आहे जे बौद्ध इतिहास  लपवण्याचा प्रयत्न करतात 

आता हा सन बौद्धांचा कसा आहे याच्याकडे पाहू या 

बौध्द इतिहास पाहताना जनतेचा त्यावेळी असणारा लोकधर्म कोणता होता हे पाहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे ऐतिहासिक पुरावा असणे आता यामध्ये महत्वाचे पुरावे आहेत ते  म्हणजे शिलालेख या महाराष्ट्रात असणाऱ्या असंख्य लेण्यात अनेक लोकांचे  दान शिलालेख आहेत या दान शिलालेखात लोकांनी धम्म दान दिलेले आहे बौद्ध धम्मासाठी दिलेलं दान आहे शिवाय ते बौद्ध धम्माचे उपासक असल्याचे हि  नमूद केलेले आहे  हे सर्व ज्यांच्या राज्यकालात झाले ते दुसरे तिसरे कोणी नसून सातवाहन सम्राट आहेत आणि अनेक लेण्यातील  शिलालेखात सातवाहन राजांनी बौद्ध धम्मासाठी  दान दिलेल्या गोष्टीसाठी चे आदेश आहेत 

सातवाहन हे बौध्द राजे होते याला प्रमाण म्हणजे त्यांचे शिलालालेख एखाद्या धर्मासाठी कोणता हि व्यक्ती राज्यादेश काढू शकत नाही सातवाहन यांचा राजधर्म हा बौद्ध धम्म असल्याने त्यांनी बौद्ध धम्मासाठी खूप मोठ्या प्रमाणावर दान दिलेलं आहे आता सातवाहन गौतमी पुत्र याचा कार्ला लेणी मध्ये असणारा राज्यादेश पहा 

कार्ला बौद्ध लेणीच्या चैत्यगृहाच्या मधील आणि उजव्या दरवाजांवरील दुसऱ्या व तिसऱ्या पट्टीवर सहा ओळीत कोरला आहे.
बौद्ध धम्माला मिळालेला राजाश्रय गौतमीपुत्र सातकर्णी याचा हा आदेश आहे
यावरून गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा बौद्ध धम्माचा अनुयायी होता हे अजून जास्त सांगण्याची गरज नाही
शिवाय या शिलालेखात च काय कार्ला मधील शिलालेखात एकविरेचा उल्लेख आलेला नाही आता इतिहासकार कसा इतिहास लिहतात बघा सातकर्णी राजाच्या आदेशात कुठेच दिवीचे नाव नाही कोणत्या हि शिलालेखात नाव नाही यावरून हि देवीची मूर्ती तिथे पहिली होती आणि मग नंतर लेणी बांधली असे होऊ शकणार नाही कारण लेणी कोरणाऱ्या ना तिचा उल्लेख नक्की केला असता
याचा अर्थ हि देवीची मूर्ती हि नक्कीच लेण्यातील एखादे शिल्प असणार जे मूर्तिकला सुरु झाल्यावर ची आहे
नाही तर राजाच्या आदेशात देवीचे उल्लेख आले असते पण देवीची निर्मिती हि खूपच अलीकडे केलेली वाटते थोडक्यात बौद्ध धम्माचा प्रभाव हे पाहण्यासाठी खालील शिलालेख पहा
या शिलालेखाचे शब्द खालील प[प्रमाणे आहेत
(आनपयति) मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवान
पवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालाहारे उतरे मगेगामे करजके
भिखुहले ददम एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि एतस चस
गामस करजकान भिखुहलपरिहार वितराम अपावेस अ . . . . पारिहारिक च एतेहि न परिहारेहि परिहरह एतस चस गाम करजके
भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत . . . . छतो विजयठसातारे दतो ठे. . . पटिका सव वा प दिव सिवखदगुतेन कटा .
शिलालेखाचे भाषांतर: मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की वलुरक येथील लेण्यांत वास्तव करणाऱ्या भिक्षूंच्या संघाला महासंघिकांना निर्वाहाकरिता मामाड आहारातील (विभागातील) उत्तरेच्या मार्गावरील करजक गावात भिक्षुहल (भिक्षूंकरिता जमीन) दिले आहे. म्हणून तुम्ही त्यांना त्या जमिनीचा ताबा द्यावा.

या करजक गावातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत. या जमिनीत कोणी (अधिकाऱ्यांनी) प्रवेश करू नये. त्यात हस्तक्षेप करू नये. तश्याच (अन्य) सवलती दिल्या आहेत. या (सर्व) सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गांव आणि भिक्षुहलसंबंधित सवलतींची तुम्ही नोंद करून ठेवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती विजयी शिबिरात राजाने दिली आहे. तिची पट्टीका संवत्सर १८ वर्षापक्ष ४ दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.

मामाड किंवा मामाल (आजचा मावळ तालुका) हा मावळ प्रांतासंदर्भातील सर्वात जुना पुरावा आहे. त्याचबरोबर लेखात उल्लेखलेले वलुरक म्हणजे आताचे विहारगाव  विहार गावापासून ५ किलोमीटर अंतरावर कार्ला हे  गाव आहे . तेच लेखातील करजक गाव. ह्या लेखाचा सुरुवातीचा भाग नष्ट झाल्यामुळे ही आज्ञा कोणत्या राजाने आणि कुठून दिली हे इतर शिलालेखांवरून ठरवता येते. ह्या लेखात उल्लेख आलेले करजक गांव पूर्वीच उसभदत्ताने (ऋषभदत्त) याने वलूरक लेण्यांमध्ये वर्षावास काळात राहणाऱ्या भिक्षूंच्या निर्वाहाकरीता दिल्याचा शिलालेख कार्ले येथे आहे. त्या शिलालेखात करजक गावाचा उल्लेख करजिक असा केलेला आहे.

अशाच पद्धतीचा विजयी शिबिरातून गौतमीपुत्र सातकर्णीने आज्ञा दिलेला शिलालेख लेख नाशिक येथील लेणी क्र. ३ मध्ये आहे. कार्ले येथील आज्ञासुध्दा विजयी शिबिरातूनच दिलेली आहे. आधी ऋषभदत्ताने महासंघिकेला दिलेले दान विजयी राजाने पुन्हा महासंघिकेला दिले आहे. तसेच नाशिक लेखात संवत्सर १८ आहे, कार्ले येथील लेखाचे संवत्सर सुध्दा १८ आहे. नाशिक येथे संवत्सर १८ वर्षापक्ष २ दिवस १ या दिवशी त्रिरश्मी येथील भिक्षुंना अजकालकिय शेत दान दिल्यानंतर दोन आठवड्यांनी गौतमीपुत्र सातकर्णीने पुणे आणि आजूबाजूचा परिसर क्षत्रापांकडून जिंकून घेतल्यानंतर कार्ले येथील महासंघिय पंथाच्या भिक्षूंना हे करजक गांव दिले असल्याचे हा शिलालेख आहे इथे वर्षापक्ष ४ थे आहे म्हणजे २ च आठवड्याने याचा अध्यादेश दिलेला आहे
आता वरील शिलालेखाचा अभ्यास केल्यावर आपणास बौद्ध धम्माचा प्रभाव दिसून येतो आपणास महाराष्ट्रातील राजवंश असणारा सम्राट सातकर्णी याचा आदेश सांगून तो बौद्ध धम्माचा अनुयायी असल्याचे दाखले आहेत

अश्या पद्धतीने नाशिक येथील लेण्यात हि गौतमी पुत्र सातकर्णी याचे शिलालेख आहेत त्याचा कालखंड हा इसवी सन दुसर्या शतकातील आहे तर इसवी सन ७८ मध्ये सम्राट कनिष्क ने शक सवंत सुरु केला आहे

पुढे जावून तो शालिवाहन शके झाले शालिवाहन अर्थात सातवाहन शके असा आहे 

बौध्द लोकांनी विजयाचा दिवस म्हणून गुढी उभारली तो इतरांचा सन कसा काय होवू शकतो साहजिक च तो बौद्ध धम्माचा सन होणार पण पुढे जावून त्याला विकृत करून मांडणी केलेली आपणस दिसते 

आज पाडवा म्हणजे एखाद्या साम्राज्याचा पाडाव करून विजय संपदान केलेला दिवस म्हणून हि पाहिला जातो 

महाराष्ट्रातील जनता हि  बौद्ध धम्माचे आचरण करणारी जनात होती याचे अनेक शिलालेखात पुरावे आहेत त्यामुळे महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सन साजरा केला जातो ते नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आणि हे नवीन वर्ष शक सवंत म्हणून च साजरा केला जातो आणि शक सवंत निर्माता हा बौद्ध सम्राट कनिष्क आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे तसेच त्यांच्यानंतर महाराष्ट्रात शकांचा पराभव म्हणजे शकाचे मांडलिक क्षत्रप आहेत त्यांचा पराभव करून महाराष्ट्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा गौतमीपुत्र सातकर्णी हा दुसरा शककर्ता आहे हे माहिती असणे आवश्यक आहे  सातवाहन राजांचा विजयी दिवस म्हणून महाराष्ट्रातली जनता आनंद उत्सव साजरा करत असे आणि या विजयी दिवसात सातवाहन यांचे विजयी घोषणा हि आहेत जे बौद्ध धम्मासाठी दिलेले  धम्म दान आहेत 

बौद्ध धम्माचे सन उत्सव पुढे जावून वैदिक लोकांनी कश्या पद्धतीने बदलले आहेत याचे पुरावे आपणास दिसतात महाराष्ट्रातील जनतेला फसवले जातेय सणांच्या नावाखाली  पण महाराष्ट्रातील जनता त्यांचे जुने अस्तित्व स्वीकारत का नाही मुळात बौध्द असणारे हे लोक वैदिक संस्कृतीचा हिंदू धर्म आज साभाळत बसली आहे आणि आपला आचरणात असलेला बौद्ध धम्माचा तिरस्कार करते आहे जी जनता एकेकाळी बौद्ध धम्माची उपासक होती ज्यांनी बौद्ध धम्मासाठी असंख्य अशी धम्म दान दिलेली आहेत शिवाय पिढ्यान पिढ्या दिलेले आहेत त्यांची आजची पिढी मात्र विसरून गेलेली आहे महाराष्ट्रात  जसे गुढी पाडवा सन बदलला तसा उत्तर भारतात बुद्ध मेला आज कुंभ मेला म्हणून प्रसिद्धीस आला आहे 

प्रयागराज हे सम्राट हर्षवर्धन याने सुरु केलाला बुद्ध मेला आज कुंभ मेला या नावाने दिसतोय तेव्हा विद्वान बुअद्ध भिक्खू आणि उपसाकांचा मेला असायलाच आज मात्र नंगेपुंगे साधूंचा मेळा असतो 

हर्षवर्धन याने दर पाच वर्षांनी प्रयागराज  इथे बुद्ध मेला आयोजित केला होता कालांतराने असा बदल झाला   आहे 

सांगण्याचे कारण हे कि बौद्ध सणांचे कसे आपली धर्मात महत्व आणाले  गेले यालाच प्रतिक्रांती म्हणतात याचा हा पुरावा आहेत 

मराठी महिने कसे निर्माण झाले आणि त्यांचा इतिहास काय तर मुळात जेव्हा आपण शक सवंत हि चंद्रावर आधारित कालगणना आहे चंद्राची प्रत्येक कलेनुसार पक्ष तयार केला दिवसाला चंद्र कलेनुसार वाढत जातो व एका दिवसी तो पूर्ण असतो त्यानंतर कमी होत जातो व एका दिवशी गायब होतो  यावरून महिन्याचे तीस दिवस येतात आणि पौर्णिमा अमावास्या हे कालगणना मध्ये आले मुळात हि कालगणना नाग लोकांची देन आहे आणि पुढे जावून नाग लोक हे बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत हा इतिहास आहे 

गुढी संदर्भात पुरावे पाहिले तर सातवाहनांच्या साम्राज्यात च गुढी उभारली जातेय  तर शक मात्र निर्माता हा कनिष्क आहे हे जाणीवपूर्वक लपवले जाते 

शकांचा पराभव करून गौतामिपुत्राने शक सवंत चालू केले हे असे नसून क्षत्रापांचा पराभव करून शालिवाहन शके चालू केले हा शक सवंत म्हणून च ओळखला जातो परंतु कनिष्क हा शक सवंत निर्माता आहे हा बौद्ध धम्माचा महान सम्राटा पैकी एक आहेत 

शिवाय सातवाहन हा बौद्ध धम्माचा उपासक राजवंश आहे हे महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेश कर्नाटक आंध्रप्रदेश याचा भागातील ऐतिहासिक स्थळे व शिलालेख पाहून आपणास पुरावे मिळतात त्यामुळे बौद्ध सन उत्सवांचे कसे बदलते स्वरूप आहे हे आपणस पाहायला मिळते मुळात आपल्या सम्राटांची आपणास माहिती असायला हवी आहे आणि ती जर का नसेल तर मात्र आपण इतरांच्या कारस्थानांना बळी पडतो जसे आज महाराष्ट्रातील लोक वैदिकांच्या कपटनीतीचे शिकार झालेले आहेत जेव्हा त्यांना त्याचा इतिहास समजेल तेव्हा ते बौद्ध धम्माचे उच्च दर्जाचे उपासक असल्याचे पाहायला मिलेले 

तूर्तास छोटा सा च लेख प्रपंच केलाय लिहायला गेल्यास यावर खूप मोठा लेख  होईल पण आपला इतिहास हा आपला कसा आहे हे समजून घ्या अनेक शिलालेख आणि अनेक बौद्ध स्मारके या सातवाहन राजांच्या काळात झालेले आहेत ते केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील जनता हि बौद्ध असल्याचे प्रमाण आहे म्हणून च 

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat