बौद्ध संस्कृतीची देन : बुद्ध लेणी

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा झाल्यास बौध्द संस्कृतीचा विचार प्राधान्याने करावा लागतो. तरच प्राचीन इतिहास हा पूर्णत्वास जाईल. प्राचीन बौध्द संस्कृतीच मुळ स्वरूप जे प्रामुख्याने व्यापार, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक या माणवाच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयावर अवलंबून होत. खरतर समाजाचा विकास आणि एकूणच माणवजातीचा विकास या महत्त्वाच्या मूल्यांवर अवलंबून होता. माणसाचा वैयक्तिक आयुष्य आणि तत्कालीन समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाच्या मुल्यांच्या विकासावर अधिक भर हा बौध्द संस्कृतीच्या कार्यप्रणालीचा एक भाग होता. त्यामुळे समृध्द बौध्द संस्कृतीचा प्रभाव संपूर्ण आशियाई देशांमध्ये पडलेला आपणास दिसून येतो. मुख्यत्वेकरून सम्राट अशोक व त्यानंतर उदयास आलेल्या राजांच्या राज्यकारभारामार्फत बौध्द संस्कृतीला विषेश चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे दिसून येते.

बौध्द संस्कृतीची महत्त्वाची देन म्हणजे पाषाणात कोरलेल्या लेण्या आणि शिल्पकला. याची सुरुवात झाली इ. स. पुर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात बाराबर टेकडीवर पहिली लेणी कोरली आणि इथूनच पाषाणात लेण्या कोरण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात जवळपास दोन हजार लेण्या कोरल्या गेल्या परंतु महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये असलेल्या अग्निजण्य खडकामुळे आणि त्या खडकामध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे नंतरच्या काळात सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरल्या गेल्या. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आणि बाजूला असलेल्या विस्तृत अरबी समुद्र किनारा या समुद्र किनार्‍यावर व्यापारी बंदरांचा विकास होत गेला. प्रमुख बाजारपेठा आणि व्यापारी बंदर व्यापारी मार्गाने जोडले गेले याच प्राचीन व्यापारी मार्गावर देखण्या लेण्यांचा साज चढवला गेला. इथूनच समतेचा, बंधुतेचा संदेश जगभर प्रसार झाला. ही आहे बौध्द संस्कृतीची व्यापार आणि आर्थिक स्तर उंचावणारी.

या प्राचीन लेण्यांमध्ये शिलालेख कोरले गेले लेण्या कोरण्यासाठी दानकर्ते हे समाजातील प्रत्येक स्तरांतून भरघोस दान देत होते त्यांची सविस्तर माहिती शिलालेखांमुळेच मिळू लागली. त्यामुळे प्राचीन लीपीमध्ये उपलब्ध असलेला शिलालेखाच्या माध्यमातून प्रथमच लिपीची त्यासोबत लिखाणाची ओळख करून दिली ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी सम्राट अशोकाने भारताला दिली. पाली भाषेतून त्रिपिटकांसारख्या भव्य ग्रथांबरोबरच अनेक बौध्द साहित्याची नंतर निर्मिती झाली हे प्राचीन साहीत्य आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. बौध्द भिक्खू धर्मप्रचारकांनी आपले विचार हे त्यावेळच्या लोकांच्या (पाली) भाषेमध्ये मांडल्यामुळे बौध्द धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला व त्यामुळे पालीभाषेचा मोठ्याप्रमाणात विकास झाला.

विज्ञानाच्या सर्व कसोटीवर खरा ठरलेल्या बौध्दधम्माने शिक्षण प्रसारासाठी खूप मोठ योगदान दिलं. ज्ञानदान तक्षशिला हे विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तान त्या विद्यापीठाचे अवशेष आढळून येतात. त्याच्या उत्खननात आढळून आलेल्या पूराव्यावरून तक्षशिला विद्यापीठाची भव्यता दिसून येते. त्याचबरोबर नालंदा येथे उभारलेल्या विश्वविद्यापिठात त्याकाळात देशविदेशातील जवळजवळ दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते व दोन ते अडीच हजार शिक्षक विद्यादानाच बहुमुल्य काम करत होते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी हजारो वर्षांपासून आपल्याला शिक्षणाच महत्त्व सांगत आहे. मुस्लिम आक्रमकांनी जेव्हा नालंदा विश्वविद्यापिठ जाळल तेंव्हा कित्येक महिने ते जळत होतं कित्येक ग्रंथाची नासधूस केली होती. याच्यावरून नालंदा विश्वविद्यापिठाची भव्यता दिसून येते.

सम्राट अशोकाच्या कालापासून म्हणजे इस पुर्व तीनशे या काळापासून अखंड दगडामध्ये लेण्या कोरण्याच काम सुरू झालं ते इस. एक हजार पर्यंत चालू होतं या कालावधीत अनेक शिल्पकलांचा विकास झाला व त्याचमाध्यमातून प्राचीन बौध्द संस्कृती,कला, सभ्यता, रहाणीमान, व्यापार तत्कालीन स्त्री वर्गाची समाजातील स्थान यांची माहिती मिळत असते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण. ही शिल्पकलेची भव्यता परदेशातील तसेच देशातील अनेकांना भूरळ घालणारी आहे. कारण या शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक आज भारतात येत असतात.

इतर धर्मातील प्रमुख हे स्वतःला देव किंवा प्रेषित समजतात. माणूस संकटात सापडल्यानंतर त्याला देवाकडे प्रार्थना करावी लागते. किंवा मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्तीसाठी धाव घ्यावी लागते पण बुद्धाने हे सर्व नाकारून मी मोक्षदाता नसून मी मार्गदाता आहे हे सांगितले. जे करायचे आहे ते तुम्हालाच करावे लागेल बुद्धाने मानवाच्या मनावर जास्त भर दिला असल्यामुळे स्वर्ग तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकता हे सांगितले कारण जे विचार तुम्ही करता तेव्हा तेच तुम्ही कृतीमध्ये उतरवत असता.

इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते एकदा एक शिल्पकार दगडामध्ये शिल्प घडवत असतो त्याचवेळी तिथे जवळ असलेल्या एका व्यक्तीने त्या शिल्पकाराला विचारले की तु ही कला कशी आत्मसात केली तेव्हा तो शिल्पकार उत्तर देतो की मी एक शिल्पकार आहे आणि जे शिल्प कोरणार आहे ते या दगडामध्येच आहे मी फक्त त्याच्या भोवती असणारा अनावश्यक भाग आहे तो मी काढणार आहे. बुध्द विचार हेच सांगतो की तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारा अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे तरच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल.

आज आपल्याला याच समृध्द संस्कृतीचा विसर पडलेला आहे. आपण ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपयशी ठरलेलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप विचारपूर्वक आपल्याला या धम्माची देण व बौध्द संस्कृतीची ओळख करून दिली. पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला संस्था निर्माण करून दिल्या त्याच संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

-लक्ष्मण कांबळे

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat