गौरव लेणी संवर्धकांचा

लेणी संवर्धन कार्यात माणसे जोडली पाहिजेत म्हणून कामाला सुरुवात झाल्यावर अनेक जन जॉईन झाले आले तसे काही निघून हि गेले माणसे हि चळवळीत येतात आणि जातात हि पण काही ध्येयवादी च टिकतात हे हि तितके च सत्य आहे

आपले काम हि एक लढाई आहे आणि हि लढाई सांस्कृतिक संघर्षाची आहे जी हजारो वर्षापासून चालत आली आहे. इथे तुमचे अजेंडे जगासमोर मांडून चालत नाही तर त्या अजेंड्यावर काम चालले पाहिजे ना कि नाव आणि हे करत असताना जे प्रामाणिक पणे ध्येयवादी होवून काम करत होते तेच लोक टीम सोबत राहिले पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी झगमगाट बघून टीम शी संपर्क केले ते सोबत राहिले च नाहीत पण जे ग्राउंड वर येवून जुडले होते ते मात्र शेवट पर्यंत राहिले हा फरक आहे कृतीशील कामांचा

लेणी च्या कामात जॉईन होताना कोणता हि स्वार्थ न पाहता जे जॉईन झाले आणि टीम चे काम हे व्यक्तिगत काम नाही कुणाच्या घरातील काम नाही तर ते आपले स्वतःचे काम आहे आपण नाही केले तर कुणीच करणार नाही या अपेक्षेने जॉईन झालेले तरुणाई तसेच जेष्ठ वर्ग हि टीम चा अविभाज्य घटक बनलेला आहे.

आज ज्यांचे जन्मदिवस आहेत त्यांचा गौरव कशासाठी केला जातो कारण त्यांनी निष्ठेने लेणी संवर्धन कामात आपले योगदान दिलेले आहे कोणता हि स्वार्थ न साधता त्यांनी आपले काम करत आहेत
प्रसिद्धी हव्यास नाही कि मान सन्मानाचा ध्यास नाही आम्हाला काही तरी समाजाच्या हिताचे करायचे आहे पुढच्या पिढीसाठी काही तरी करायचे आहे हेच ध्येय उराशी बाळगून काम करणारे लेणी संवर्धक ज्यांनी अनेक उपक्रमात सोबत राहिले आहेत
टीम चे काम हे आपले क काम समजून नव्याने जॉईन होवून टीम चा अविभाज्य घटक होण्याचा प्रयत्न केला आणि हि टीम मधील महत्वाची रत्न टीम ला मिळाली

लेणी संवर्धक आयु बबन शिंगे यांचा जन्म दिवस आहे सोबत लेणी संवर्धक सुरेश टोणगे यांचा हि जन्म दिवस आहे. हे दोन अनमोल रत्न आहेत ABCPR टीम चे बबन शिंगे सरांचा सर्वांशी मैत्रिपुर्वक वागणे धम्माची हि स्मारके टिकली पाहिजे म्हणून पुढे येवून काम करणे आपल्या लहान मुलाला व आपल्या पत्नी ला लेणी वर घेवून लेणी चा वारसा समजवून सांगणारे व्यक्तिमत्व तर सुरेश टोणगे सरांचा मराठी भाषा आणि कन्नड भाषेतून लोकांना लेणी चा वारसा सांगण्याची पद्धत सहा डिसेंबर महापरीनिर्वाण दिनाच्या वेळी आलेल्या जनतेला दोन्ही भाषेत लेणी समजावून सांगताना कोणत्या हि प्रसिद्धी ची अपेक्षा न ठेवता केलेली काम हि लेणी संवर्धन कामात खूप महत्वाची आहेत

अश्या या दोन्ही लेणी संवर्धकांचा जन्म दिवस त्यांना त्यांच्या जन्म दिनाच्या मंगलमय सदिच्छा

🍂 बुध्दांच्या करुणामय मार्गाने तुमचे…
🍃 कल्याण हो …
🍂 मंगल हो….
🍃 भला हो..

ABCPR
( प्राचिन बौद्धलैणी संवर्धन संशोधन)

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

2 thoughts on “गौरव लेणी संवर्धकांचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat