चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख : गिरनार शिलालेख १

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखातून भारताचा इतिहास समजू लागला. अनेक शिलालेख या भारताच्या अनेक प्रदेशात सापडू लागले यातून एक नवा इतिहास जगासमोर येवू लागला आणि हा इतिहास नक्कीच प्रेरणादायी असा इतिहास आहे. अश्या महान इतिहासाचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अश्या शिलालेखांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.

सम्राट अशोक यांचा गुजरात राज्यातील गिरनार येथील शिलालेख मधील भाग पहिला पाहू या

Giranar Rock Edict ( Corpus Inscriptonum Indicarum vol-1)

शिलालेखाचे वाचन

इ यं ध म लि पि दे वा नं प्रि येन
प्रि य द सि ना रा ञा ले खा पि ता इ ध न किं
चि जी वं आ र भि त्पा प्र जू हि त व्य
न च स मा जो क त व्यो ब हु कं हि दो सं
स मा ज म्हि प स ति दे वा नं प्रि यो प्रि य द सि रा जा
अ स्ति पि तू ए क चा स मा जा सा धू म ता दे वा नं
प्रि ये स प्रि य द सी नो रा ञो पु रा म हा न स म्हि
दे वा नं प्रि
ये स प्रि य द सी नो रा ञो अ नु दि व सं ब
हु नि पा न स त स ह सा नि आ र भि सु सु पा था य
से अ ज य दा अ यं ध म लि पी लि खि ता ती ए व पा
णा आ र भ रे सु पा था य द्वो मो रा ए को म गो सो पि
म गो ण धु वो ए ते पि ती प्रा णा प छा न आ र भि स रे

इयं धमलिपि देवानं प्रियेन
प्रियदसिना राञा लेखापिता इध न किं
चि जीवं आरभित्पा प्रजूहितव्य
न च समाजो कतव्यो बहुकं हि दोसं
समाजम्हि पसति देवानं प्रियो प्रियदसि राजा
अस्ति पि तू एकचा समाजा साधू मता देवानं
प्रियेस प्रियदसीनो राञो पुरा महानसम्हि
देवानं प्रियेस प्रियदसीनो राञो अनुदिवसं ब
हुनि पान सत सहसानि आरभिसु सुपाथाय
से अज यदा अयं धमलिपी लिखिता ती एव पा
णा आरभरे सुपाथाय द्वो मोरा एको मगो सो पि
मगो ण धुवो एते पिती पाणा पछा न आरभिसरे

भाषांतर : हि धम्मलिपी देवान प्रियेन प्रियदर्शी राजा याच्या द्वारे लिहिली आहे . कोणी हि येथे यज्ञ यागासाठी प्राण्यांची हत्या बळी देण्यासाठी देवू नये आणि असे समाजउत्सव देखील करू नये उत्सवामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत हे देवानपियेन पियादर्शी राजा याने पाहिलेले आहेत. तरी देखील निश्चित उत्सवाचे प्रकार च देवानपियादर्शी राजा ते योग्य मानतो.
पूर्वी देवानपियेन पियदर्शी राजाच्या भोजनालय मध्ये हजारो प्राणी सूप बनवण्यासाठी मारले जात होते. परन्तु आतापासून जेव्हापासून हि धम्मलिपी मधून हा आदेश कोरलेला आहे तेव्हापासून तीन च प्राणी मारले जात आहेत. दोन मोर आणि एक हरीण सूप बनवण्यासाठी मारले जात आहेत परंतू यामध्ये हरीण मारणे निश्चित नाही पुढे जावून काही दिवसात हे तिन्ही प्राणी मारले जाणार नाहीत

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखांची हि शृंखला भारतीय समाजाला सम्राट अशोक यांच्या इतिहासाची माहिती करून देण्यासाठी करत आहोत अश्या प्रकारचे अनेक शिलालेख ABCPR वेब साईट वर आपणास पाहायला मिळतील.

या शिलालेखाच्या माध्यमातून जीव हिंसा त्यागणारा चक्रवर्ती सम्राट अशोकाचा एक महत्वाचा गुण आपणास पाहायला मिळतो. एवढे मोठे बलाढ्य साम्राज्य सांभाळण्याची ताकद आणि आदेशाची एकवाक्यता काय असावी हे सम्राट अशोक यांच्या शिलालेखातून आपणास पाहायला मिळते.

TEAM ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat