लेणी संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्व विभाग उदासीन पुरातत्व अधिकाऱ्यांची लेणी संवर्धकांना मुजोर उत्तरे

जयभीम नमो बुद्धाय
प्राचीन बुद्ध लेण्यांच्या संवर्धनाचे काम हे भारतीय पुरातत्व विभाग भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली येते. सदर विभाग हा सांस्कृतिक मंत्रालय यांच्या अधिपत्याखाली आहे.
भारतात अनेक बौद्ध स्थळांच्या संवर्धनाची सर्वस्वी जबाबदारी या विभागाची असताना या विभागाचे कर्मचारी अधिकारी ते काम करताना दिसत नाही. आणि यासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम गेली अनेक वर्षे यांच्या पाठी लागून हे काम करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः टीम दुर्लक्षित लेणी साफ करून घेत आहेत एवढेच नाही तर हि लेणी संवर्धक टीम यांच्या कामात हि यांना सहकार्य करत असते. मुंबई सर्कल च्या अधिपत्याखाली असणारी कान्हेरी निर्वाण भूमी मधील शेकडो किलो च्या हार्मिका दरीतून काढून वरती संवर्धनासाठी टीम ने काम करून दिले अनेक लेणी दुर्लक्षित आहेत तिथे लेणी संवर्धक स्वतः जावून ते काम करत आहेत. अश्यावेळी हे पुरातत्व विभागाचे अधिकारी या लेण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत
दिनांक २२ जुलै २०२० रोजी लेणी संवर्धक प्रशांत माळी सर यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कल च्या अधिकारी राजेंद्र यादव जे अधिक्षक पुरातत्वशास्त्र आहेत यांच्याशी प्राचीन कुडा बुद्ध लेणी या लेणीच्या संवर्धन कामासाठी चर्चा केली असताना सदर अधिकाऱ्यांनी लेणी संवर्धक यांच्याची मुजोर भाषेत उत्तर देत पुरातत्व विभागाकडे फंड नाही असे उत्तर देत लेणी च्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे .

Conservation Approval App- 2019

दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी लेणी संवर्धक टीम ने tribils च्या माध्यमातून पत्रव्यवहार केला असताना त्याचे उत्तर २३ एप्रिल २०२० रोजी मुंबई सर्कल च्या जुने सर्कल अधिकारी बिपीनचंद्र नेगी यांनी दिले होते या मध्ये त्यांनी संवर्धनाची कामे करण्यासाठी अप्रुव्हल दिले होते आणि जंजिरा सर्कल च्या अधिकारी यांना आवश्यक कामांची पाहणी करून काम सुरु करण्यासाठी देखील सांगितले होते. तरी आजतागायत लेणी वर कोणते हि संवर्धनाचे काम सुरु झालेले नाही वर्षभर वाट पाहून हि सरकार काही करत नाही म्हणून लेणी संवर्धक टीम ने पत्रव्यवहार करून लेणी मध्ये आलेल्या लोकांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने इथे लोक लेणी मध्ये जावून मुत्र विसर्जन करण्याची काम करतात आणि यासाठी सदर टीम ने स्वखर्चातून हे काम करून देण्यास तयारी दाखवली होती परन्तु त्यांनी त्याचा हि कोणता रिप्लाय टीम ला दिलेला नाही ज्या कामांची मागणी केलेली होतो त्याची हि पूर्तता अजून झालेली नाही आणि याचा जाब विचारण्यासाठी ABCPR लेणी संवर्धक टीम चे भारत सरकार यांच्याशी संर्पक करण्यासाठी च्या Government contact Dept. चे प्रमुख लेणी संवर्धक प्रशांत माळी यांनी जेव्हा त्यांच्याशी संर्पक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मुजोर भाषेत उत्तर देत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

या नंतर सदर रायगड जिल्ह्याचे खासदार मा. सुनील जी तटकरे यांनी देखील यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हि फोन ला यांनी उत्तर दिलेले नाही लोकप्रतिनिधी यांच्या हि फोन ना उत्तर न देण्याचा हा मुजोरपणा उतरवला पाहिजे यासाठी बौद्ध बांधवांनी या अधिकाऱ्यांना फोन करून यांची कान उघडणी करण्याची गरज आहे.

कुडा बुद्ध लेणी हि ऐतिहासिक प्राचीन लेणी असून इथे असणाऱ्या शिलालेखात भारताच्या प्राचीन लोकजीवनाचा इतिहास कोरून ठेवलेला आहे अनेक शिल्प शिलालेख भिक्षु निवास स्तूप अशी विविध गोष्टी असून हि इथे केले जाणारे दुर्लक्ष पणा हा लेणी च्या नाशास कारणीभूत आहे सदर लेणी हि लिकेज असल्याने पावसाचे पाणी लेणी मध्ये येवून लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक शिलालेख हे खराब होत असून ते हि नष्ट होवू लागले आहेत. अनेक कपल लोक लेणी येवून सेक्स करण्यासाठी लेणी चा वापर करतात अश्या अनेक घटना घडत असताना केले जाणारे दुर्लक्ष हे लेणी चे अस्तित्व नष्ट करण्यासाठी चे आहे आणि यासाठी च लेणी संवर्धक गेली १५ वर्षे या सरकार शी पाठ पुरावा करतोय पण आता संयम संपलेला आहे म्हणून या अधिकारी लोकांची काम न करण्याची भूमिकेवर आता आवाज उठवला च पाहिजे

लेणी पुरात्तव विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने या लेणी वर काम करण्याची जबाबदारी सर्वस्वी या विभागाची असते इथे बौद्ध समाजाला काहीच करता येत नाही जर करण्याचा काही प्रयत्न केला तर हेच लोक पुरात्तव अधिनियम वापरून कारवाई करणार आणि हे मात्र काहीच करणार नाही . या अधिकारी वर्गाची नेहमी चे रडगाणे आहे कि आमच्याकडे फंड नाही जर तुमच्याकडे फंड नाही तर हि लेणी तुमच्या ताब्यात कशाला ज्या साठी तुमच्याकडे फंड नाही तर हि लेणी तुमची ABCPR लेणी संवर्धक टीम च्या ताब्यात द्यावी लेणीस संवर्धक टीम या लेणीचे संवर्धन करण्यास कटिबद्ध आहे.

सदर अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील संपर्कावर फोन करून जाब विचाराने आणि मेल वरती मेल करून काम का केली जात नाही याचे उत्तर मागावी सदर कामाचे अप्रुवल आल्याचे लेटर वरती दिलेले आहे ते जोडून मेल पाठवून जाब विचारण्यात यावा तसेच प्रत्यक्ष फोन करून हि जाब विचारावा कि का काम करण्यास टाळाटाळ करता आणि जर तुमच्याकडे फंड नाही तर अधिकारी काम करण्यासाठी कशाला ठेवलेत

मा . राजेंद्र यादव अधीक्षक पुरातत्वशास्त्र मुंबई सर्कल सायन भारतीय पुरातत्व विभाग
मोबाईल नंबर : 9324386442
Office No : 022-24077400, 24078266

वरील संपर्कावर फोन करून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करण्याची गरज आहे. यासाठी वरील संपर्क दिलेले आहेत आपण संपर्क करून यांना जाब विचारावा .ABCPR लेणी संवर्धक टीम हे लेणीचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “लेणी संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्व विभाग उदासीन पुरातत्व अधिकाऱ्यांची लेणी संवर्धकांना मुजोर उत्तरे

 1. What a great job done by SBCPR team, please tell what all of you team members do for your financial income sources for you & your family?
  And most important how do you manage your profession and ABCPR Team work?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat