अनिल जाधव

https://www.facebook.com/profile.php?id=100007920221228

नाव : अनिल जाधव
पत्ता: गाव अडूर , तालुका गुहागर , जिल्हा रत्नागिरी

लेणी संवर्धक

अनिल जाधव

अनिल सुडक्या जाधव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात अडूर गावामध्ये जन्म झाला असून बालपण मुंबई मध्ये गेले . या मुंबईत संघर्षाला सामोरे जात स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी चळवळीत अगदी कमी वयापासून काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आज लेणी संवर्धन कार्यात गेली अनेक वर्षे काम करत आहेत. लहान मुलांना शिक्षणासाठी तसेच कोणत्या हि गरजवंत अश्या चळवळीतील कार्यकर्त्याला सहकार्य करत चळवळीत सर्वाना सोबत घेवून जाण्याचे काम करत आहेत . राजकीय क्षेत्रात हि काम करत असून आज पूर्णवेळ हा धम्म चळवळीत देत आहेत. लेणी संवर्धन कामासाठी आपला सारा वेळ देत लेणी जतन करण्यासाठी काम करत आहेत.

मुंबई येथील कान्हेरी लेण्यावर जावून लेणी जतन करण्यासाठी प्रयत्नशील असून आज कान्हेरी लेणी वर पूर्णपणे कंट्रोल करत कोणते हि गैरकृत्य या लेनित होणार नाही याची काळजी ते घेत आहेत प्रत्येक आठवड्यातील तसेच सुट्टीच्या दिवशी लेण्यावर जावून त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील असून धम्म पथावर चालत असून अनेक लोकांना ते धम्म कार्यात वळवत आहेत.

लेणी संवर्धनासाठी धम्म संवाद हा प्रत्येक विहारात कार्यक्रम घेत प्रत्येक बौद्ध बांधवाना हा धम्म सांगण्यासाठी व आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी ते काम करत आहेत.
तसेच महाराष्ट्रातील अनेक लेण्यावर जावून त्यांचे संवर्धनाचे काम प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन या लेणी संवर्धन टीम सोबत ते काम करत असून महाराष्ट्रभर लेण्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत .

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat